मोठी बातमी : बँक कर्मचाऱ्यांना 17 टक्के पगारवाढ देणाऱ्या करारावर अंतिम स्वाक्षऱ्या, सात लाख कर्मचाऱ्यांचे वेतन वाढणार
Bank Employees Salary Hike : बँक कर्मचाऱ्यांसाठी (Bank Employees) आनंदाची बातमी समोर आलीये. बँक कर्मचाऱ्यांना (Bank Employees) 17 टक्के पगारवाढ देणाऱ्या करारावर आज (दि.8) युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन आणि इंडियन बँक असोसिएशनच्या प्रतिनिधींमध्ये करारावर अंतिम स्वाक्षऱ्या झाल्या आहेत
Bank Employees Salary Hike : बँक कर्मचाऱ्यांसाठी (Bank Employees) आनंदाची बातमी समोर आलीये. बँक कर्मचाऱ्यांना (Bank Employees) 17 टक्के पगारवाढ देणाऱ्या करारावर आज (दि.8) युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन आणि इंडियन बँक असोसिएशनच्या प्रतिनिधींमध्ये करारावर अंतिम स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. 12 सार्वजनिक क्षेत्रातील बँका, 10 खाजगी आणि 3 विदेशी बँकातील सात लाख बँक कर्मचारी (Bank Employees) तसेच अधिकाऱ्यांना ही पगारवाढ लागू असणार आहे. त्यामुळे जवळपास 7 कर्मचाऱ्यांना या पगार वाढीचा लाभ होणार आहे. बँक कर्मचारी अनेक दिवसांपासून पगारवाढीची मागणी करत होते. आता ही मागणी पूर्ण झाली आहे.
12 हजार 449 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा
लागू होणाऱ्या पगारवाढीसाठी बँक व्यवस्थापनाला दरवर्षी 12 हजार 449 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा सहन करावा लागणार आहे. याचवेळेस साडेसात लाख सेवानिवृत्तांना देखील दरमहा आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. ज्या पोटी बँकर्सना दोन हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पेलावा लागणार आहे. बँक कर्मचारी (Bank Employees) अनेक दिवसांपासून पगारवाढीची मागणी करत होते. आता ही मागणी पूर्ण झाली आहे.
नोकर भरतीवरही लवकरात लवकर निर्णय होणार
ही वाढ 2022 पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात आली आहे. या पगारवाढीमुळे मुळ पगार, महागाई भत्ता, विशेष पगार, विशेष भत्ता, रजा, रजेचे रोखीकरण, घरभाडे भत्ता इत्यादी सेवाशर्तीत लक्षणीय सुधारणा घडून आली आहे. बँकातून पुरेशी नोकर भरती करण्यात यावी, आऊटसोर्सिंग बंद करण्यात यावे प्रश्नावर चर्चा करण्याचे मान्य करण्यात आले आहे. शिवाय, नोकर भरतीवरही लवकरात लवकर निर्णय होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे आता पुढील नोकर भरतीवरही सर्वांचे विशेष लक्ष असणार आहे.
पाच दिवसांचा आठवड्याच्या मागणीला तत्वता मान्यता
महिला कर्मचाऱ्यांच्या सेवाशर्तीत विशेष सुधारणा करण्यात आल्या आहेत. हा पगारवाढीचा करारावर ऑक्टोबर 2027 पर्यंत लागू असेल. याच करारात बँकर्सनी पाच दिवसांचा आठवडा या बँक कर्मचाऱ्यांच्या लोकप्रिय मागणीला तत्त्वतः मान्यता दिली आहे. प्रत्यक्षात आणण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे पुढील काळात बँक कर्मचाऱ्यांना 5 दिवसांचा आठवडा मिळू शकतो. बँक कर्माचारी 5 दिवसांचा आठवडा व्हावा, यासाठी नेहमीच आग्रही राहिले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या