एक्स्प्लोर

Small Cap Fund : बजाज फिन्सर्व्ह एएमसीचा स्मॉल कॅप फंड लाँच, गुंतवणूकदारांना तीन गोष्टी एकाच ठिकाणी मिळणार

NFO : बजाज फिन्सर्व्ह एएमसीचा स्मॉल कॅप फंड लाँच करण्यात आला आहे. या फंडमध्ये 500 रुपयांपासून पुढं गुंतवणूक करता येईल, अशी माहिती आहे.

मुंबई/ पुणे: बजाज फिन्सर्व्ह एएमसीने ‘बजाज फिन्सर्व्ह स्मॉल कॅप फंड’च्या सुरूवातीची घोषणा केली आहे. हा एक ओपन-एंडेड इक्विटी फंड असून, प्रामुख्याने स्मॉल कॅप शेअर्समध्ये गुंतवणूक करतो आणि गुणवत्ता, वाढ व मूल्य यांचा लाभ देतो. या फंडासाठी सदस्यता 27 जून 2025 पासून सुरू होणार असून, 11 जुलै 2025 रोजी बंद होणार आहे.

सध्या स्मॉल कॅप शेअर्समध्ये नुकत्याच झालेल्या घसरणीमुळे दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी आकर्षक प्रवेश बिंदू उपलब्ध झाला आहे. जरी 80% हून अधिक स्मॉल कॅप कंपन्यांनी 38% इतक्या मजबूत नफ्याच्या वाढीबरोबरच चांगले रिटर्न रेशो नोंदवले असले, तरी बहुतांश कंपन्यांचे व्यवहार अजूनही त्यांच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकाच्या 15% ते 45% खाली सुरू आहेत. या अलीकडील बाजार घसरणीमुळे या कंपन्यांच्या वास्तविक मूल्यात आणि सध्याच्या बाजार किमतीत एक स्पष्ट फरक निर्माण झाला आहे.

‘मेक इन इंडिया’ उपक्रमाचा जोर, वाढती औपचारिकता आणि विविध क्षेत्रातील डिजिटल रूपांतरण यासारख्या संरचनात्मक सकारात्मक प्रवाहांमुळे स्मॉल कॅप कंपन्या आगामी विकास चक्रात अतिरिक्त प्रमाणात लाभ घेण्याच्या उत्कृष्ट स्थितीत आहेत, ज्यामुळे ही गुंतवणुकीसाठी एक आकर्षक संधी ठरते.

बजाज फिन्सर्व्ह स्मॉल कॅप फंड दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्याचा उद्देश असलेल्या गुंतवणूकदारांसाठी तयार करण्यात आला आहे, जो प्रामुख्याने स्मॉल कॅप कंपन्यांच्या इक्विटी आणि इक्विटीशी संबंधित साधनांमध्ये गुंतवणूक करतो. फक्त गुणवत्तापूर्ण शेअर्सची निवड करण्यापलीकडे , हा फंड कमकुवत व्यवस्थापन, अस्थिर मूलभूत घटक किंवा आर्थिकदृष्ट्या धोक्याची चिन्हे असलेल्या कंपन्या काटेकोरपणे वगळतो. या शिस्तबद्ध पद्धतीमुळे सुमारे 1,100 हून अधिक स्मॉल कॅप शेअर्सच्या विश्वातून उच्च संभाव्यतेच्या निवडक व्यवसायांवर लक्ष केंद्रीत केले जाते. या प्रक्रियेतील एक महत्त्वाचा भाग म्हणजे आमचे अंतर्गत फॉरेन्सिक व जोखीम-जाणीव असलेले विश्लेषण, जे कमकुवत व्यवस्थापन किंवा आर्थिकदृष्ट्या धोक्याची चिन्हे असलेल्या कंपन्यांना काटेकोरपणे बाहेर ठेवते. सुमारे 300 ते 400 स्मॉल कॅप शेअर्सच्या विश्वातून, या शिस्तबद्ध पद्धतीद्वारे निवड मर्यादित करून सुमारे 40 ते 100 काळजीपूर्वक निवडलेल्या व्यवसायांचा पोर्टफोलिओ तयार केला जातो.

या लाँचविषयी बोलताना, बजाज फिन्सर्व्ह एएमसीचे व्यवस्थापकीय संचालक गणेश मोहन म्हणाले, "स्मॉल कॅप फंड चा लाँच हा भारतातील गतिशील स्मॉल कॅप शेअरविश्वाच्या दीर्घकालीन संभाव्यतेवरील आमच्या ठाम विश्वासाचे प्रतीक आहे. स्मॉल कॅप शेअर्समध्ये सामान्यत: व्यापक निर्देशांकांच्या तुलनेत अधिक अस्थिरता दिसून येते, त्यामुळे बाजारातील चढ-उतारांमधून मार्ग काढण्यासाठी आणि गुणवत्तापूर्ण संधी ओळखण्यासाठी सक्रिय व्यवस्थापनाचे महत्त्व अधोरेखित होते. ही रणनीती अशा उच्च-गुणवत्तेच्या कंपन्यांना ओळखण्यावर आधारित आहे, ज्या त्यांच्या वाढीच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहेत आणि काळानुसार अधिक चांगले प्रदर्शन करु शकतात. अलीकडील स्मॉल कॅप घसरण लक्षात घेता, हा नवीन फंड ऑफर (NFO) या सुवर्णसंधीचा फायदा घेण्याच्या योग्य स्थितीत आहे आणि गुंतवणूकदारांना अशा व्यवसायांमध्ये भाग घेण्याची संधी मिळवून देतो, जे दीर्घकाळात प्रगती करतील आणि अर्थव्यवस्थेत प्रभावी आणि सार्थक योगदान देतील.”

बजाज फिन्सर्व्ह स्मॉल कॅप फंड त्यांच्यासाठी अत्यंत योग्य आहे जे सध्या अंतर्निहित मूल्यापेक्षा कमी किमतीत व्यवहार करणाऱ्या, मूलभूतदृष्ट्या मजबूत व्यवसायांच्या वाढीच्या संधींपासून लाभ मिळवू इच्छितात. तसेच, आपल्या पोर्टफोलिओमध्ये वाढीची क्षमता असलेले स्मॉल कॅप शेअर्स समाविष्ट करून विविधीकरण करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठीही हा फंड आकर्षक आहे. या फंड ची बेंचमार्क तुलना बीएसई 250 स्मॉलकॅप इंडेक्स TRI शी केली आहे.

या संदर्भात बजाज फिन्सर्व्ह एएमसीचे मुख्य गुंतवणूक अधिकारी नीमेश चंदन पुढे म्हणतात, “आमचा नवीन स्मॉल कॅप फंड हा अशा गुणवत्तापूर्ण व्यवसायांचा पोर्टफोलिओ असेल, जे स्केलेबल (म्हणजेच वाढीची क्षमता असलेले) असून सध्या त्यांच्या अंतर्निहित मूल्यापेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहेत. अनेक उद्योग व उपक्षेत्रे ही विशेषतः स्मॉल कॅप श्रेणीतच उपलब्ध असतात. मुळात, उदयोन्मुख व्यवसायांतील भविष्यकालीन नेतृत्व करणाऱ्या कंपन्या आणि इतर क्षेत्रातील आव्हान देणाऱ्या कंपन्या निवडण्याची ही एक उत्तम संधी आहे. एनएसई स्मॉल कॅप 250 निर्देशांक मागील वर्षाच्या तुलनेत जवळजवळ स्थिर आहे, पण गेल्या वर्षी अनेक कंपन्यांनी मजबूत नफा वाढ दर्शवली आहे. यामुळे नुकत्याच झालेल्या किमतीतील घसरणी नंतर आम्हाला त्या स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये गेल्या वर्षीपेक्षा कमी मूल्यांकनावर गुंतवणूक करण्याची संधी उपलब्ध होते.”

बजाज फिन्सर्व्ह एएमसीने कंपनीच्या तीन वेगळ्या गुंतवणूक धोरणांअंतर्गत वाढ (मेगाट्रेंड्स), गुणवत्ता (मोट इन्व्हेस्टिंग) आणि मूल्य (कॉन्ट्रेरियन); 78 वेगळ्या स्मॉल कॅप शेअर्समध्ये गुंतवणूक करून स्मॉल कॅप गुंतवणुकीच्या व्यवस्थापनामध्ये सिद्ध कौशल्य दाखवले आह. या क्षेत्रावरील आपल्या ठाम विश्वासाचे प्रतिबिंब म्हणून, एएमसीने आपल्या विविध पोर्टफोलिओंमध्ये स्मॉल कॅप्समधील धोरणात्मक वाटा वाढवले आहेत. विशेषतः, जानेवारी 2025 मध्ये बजाज फिन्सर्व्ह फ्लेक्सी कॅप फंडातील स्मॉल कॅप वाटा 21.8% होता, जो मे 2025 मध्ये वाढून 26% झाला, तर बजाज फिन्सर्व्ह लार्ज अँड मिड कॅप फंडामधील स्मॉल कॅप वाटा याच कालावधीत 9% पर्यंत वाढला आहे.

फंडाचा इक्विटी भाग नीमेश चंदन (मुख्य गुंतवणूक अधिकारी) आणि सॉर्भ गुप्ता (प्रमुख – इक्विटी) यांच्या व्यवस्थापनाखाली असेल, तर फंडाचा डेब्ट भाग सिद्धार्थ चौधरी (प्रमुख – फिक्स्ड इनकम) यांच्या देखरेखीखाली व्यवस्थापित केला जाईल.

फंडामध्ये किमान अर्ज रक्कम ₹500 (त्यापुढील रु.1च्या पटीत) असून, किमान अतिरिक्त अर्ज रक्कम ₹100 (त्यापुढील रु.1 च्या पटीत) आहे. वाटपाच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या आत गुंतवणूक रिडीम केल्यास 1% एक्झिट लोड लागू होईल. या फंडामध्ये वाढ आणि IDCW (इन्कम डिस्ट्रीब्युशन कम कॅपिटल विदड्रॉवल) असे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत.

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Karmala : करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
मोठी बातमी! नागपुरात भाजपच्या वार्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या, मुलाच्या वाढदिवसाचे सामना आणण्यास जाताना हल्ला
मोठी बातमी! नागपुरात भाजपच्या वार्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या, मुलाच्या वाढदिवसाचे सामना आणण्यास जाताना हल्ला
Dhule: हृदयद्रावक! आईची पोटच्या दोन्ही चिमुकल्यांना घेऊन विहिरीत उडी, 30 फुट खोल पाण्यात बुडून मृत्यू
हृदयद्रावक! आईची पोटच्या दोन्ही चिमुकल्यांना घेऊन विहिरीत उडी, 30 फुट खोल पाण्यात बुडून मृत्यू
दोन कोटी भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, AI आणि व्यापारातील अस्थिरतेमुळे मध्यमवर्गीयांसमोर मोठं संकट
दोन कोटी भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, AI आणि व्यापारातील अस्थिरतेमुळे मध्यमवर्गीयांसमोर मोठं संकट
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Pune गुन्हेगारीवर आळा कधी? वाहतूक कोंडी कधी सुटणार?;पालिका निवडणूक चुरशीची
Mahapalikecha Mahasangram Jalna जालन्यात व्यापाऱ्यांच्या पक्षांकडून अपेक्षा काय? कोण मारणार बाजी?
Mahapalikecha Mahasangram Mira Bhayandar : कोण मारणार मिरा-भाईंदरमध्ये बाजी? स्थानिकांना काय वाटतं?
Mahapalikecha Mahasangram Solapur : सोलापूर महापालिकेतील राजकीय गणित बदलणार? कोण बाजी मारणार?
Mahapalikecha Mahasangram Vasai Virar पालिकेत कोणाची बाजी? अनधिकृत बांधकामामुळे पालिका चर्चेत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Karmala : करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
मोठी बातमी! नागपुरात भाजपच्या वार्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या, मुलाच्या वाढदिवसाचे सामना आणण्यास जाताना हल्ला
मोठी बातमी! नागपुरात भाजपच्या वार्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या, मुलाच्या वाढदिवसाचे सामना आणण्यास जाताना हल्ला
Dhule: हृदयद्रावक! आईची पोटच्या दोन्ही चिमुकल्यांना घेऊन विहिरीत उडी, 30 फुट खोल पाण्यात बुडून मृत्यू
हृदयद्रावक! आईची पोटच्या दोन्ही चिमुकल्यांना घेऊन विहिरीत उडी, 30 फुट खोल पाण्यात बुडून मृत्यू
दोन कोटी भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, AI आणि व्यापारातील अस्थिरतेमुळे मध्यमवर्गीयांसमोर मोठं संकट
दोन कोटी भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, AI आणि व्यापारातील अस्थिरतेमुळे मध्यमवर्गीयांसमोर मोठं संकट
लोकांनी राहुल गांधींना गटांगळ्या खायला लावल्या;राधाकृष्ण विखे पाटलांची बोचरी टीका,शरद पवारांनाही टोला
लोकांनी राहुल गांधींना गटांगळ्या खायला लावल्या;राधाकृष्ण विखे पाटलांची बोचरी टीका,शरद पवारांनाही टोला
मुंबईत इमारतीच्या पायाभरणीवेळी दुर्घटना, मातीच्या ढिगाऱ्याखाली 2 कामगारांचा मृत्यू, 3 जखमी
मुंबईत इमारतीच्या पायाभरणीवेळी दुर्घटना, मातीच्या ढिगाऱ्याखाली 2 कामगारांचा मृत्यू, 3 जखमी
Bihar Election Result 2025: नितीश कुमार सरकारवर 62 हजार कोटींच्या घोटाळ्यांचा आरोप केला अन् निकाल लागताच भाजपकडून माजी केंद्रीय मंत्र्याची हकालपट्टी
नितीश कुमार सरकारवर 62 हजार कोटींच्या घोटाळ्यांचा आरोप केला अन् निकाल लागताच भाजपकडून माजी केंद्रीय मंत्र्याची हकालपट्टी
PM नरेंद्र मोदी चंद्रावरही शिवशक्ती कॉलनी उघडणार; भाजपच्याच मंत्र्यांचा दावा, आदित्य ठाकरेंना टोला 
PM नरेंद्र मोदी चंद्रावरही शिवशक्ती कॉलनी उघडणार; भाजपच्याच मंत्र्यांचा दावा, आदित्य ठाकरेंना टोला 
Embed widget