एक्स्प्लोर

नवीन वर्षापासून ATM मधून पैसे काढणे महागणार, पाहा काय आहेत नियम...

ग्राहकांनी जर आता  (ATM) व्यवहार मर्यादा ओलांडली तर त्यांना 1 जानेवारी 2022 पासून अधिकचे पैसे द्यावे लागणार आहेत. तसेच त्यावर ग्राहकांना जीएसटीही भरावा लागणार आहे.

ATM Cash Withdrawal Charge : ग्राहकांना आता एटीएमधून (ATM ) विनाशुल्क पैसे काढण्यावर मर्याद आल्या आहेत.  ग्राहकांनी जर आता  ATM व्यवहार मर्यादा ओलांडली तर त्यांना 1 जानेवारी 2022 पासून अधिकचे पैसे द्यावे लागणार आहेत. कारण भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने प्रत्येक सार्वजनिक आणि खासगी बँकेसाठी पैसे काढण्यावर शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. जून 2021 च्या आदेशाप्रमाणे, 1 जानेवारी 2022 पासून लोकांनी विनामूल्य व्यवहाराची मर्यादा ओलांडल्यानंतर बँकांना एटीएम व्यवहारांवर प्रति व्यवहार 21 रुपये आकारण्याची परवानगी दिली आहे. याशिवाय ग्राहकांना त्यावर जीएसटीही भरावा लागणार आहे. या नव्या नियमांमुळे एटीएममधून पैसे काढणं किंवा इतर कोणतेही व्यवहार करणं तुम्हाला महागात पडणार आहे

दरम्यान, ग्राहकांना त्यांच्या स्वतःच्या बँकेच्या एटीएममधून महिन्यातून पाच वेळा विनामूल्य पैसे काढता येणार आहेत. पाचपेक्षा जास्त वेळा पैसे काढले तर ग्राहकांना अधिकचे पैसे द्यावे लागणार आहेत. तर इतर बँकांच्या एटीएममधून तीन वेळा विनामूल्य व्यवहार  करू शकता. इतर एटीएमधून तीनपेक्षा जास्त वेळ पैसे काढले तर त्यांनी अधिकचे पैसे द्यावे लागणार आहेत.

रिझर्व्ह बँकेने एका निवेदनात म्हटले आहे की, “बँकांना उच्च विनिमय शुल्काची भरपाई करण्यासाठी आणि खर्चात सामान्य वाढ लक्षात घेता, त्यांना ग्राहक शुल्क प्रति व्यवहार 21 रुपये करण्याची परवानगी आहे. एचडीएफसी बँक आणि अॅक्सिस बँकेने आधीच ग्राहकांना विकासाबद्दल माहिती देण्यास सुरुवात केली आहे. आरबीआयच्या मंजुरीनंतर खासगी क्षेत्रातील अॅक्सिस बँक आणि एचडीएफसी बँकेने आपल्या ग्राहकांना माहिती देण्यास सुरुवात केली आहे. यासंदर्भातील माहिती ग्राहकांना एसएमएसद्वारे पाठवली जात आहे. एसएमएसमध्ये स्पष्टपणे लिहिले आहे की, अॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक  किंवा इतर बँकेच्या एटीएममधून मोफत मर्यादेनंतर केलेल्या व्यवहारावर 21 रुपये शुल्क आणि जीएसटी भरावा लागणार आहे. यासाठी आधी 20 रुपये आकारले जात होते. परंतु, आता या रकमेत वाढ करण्यात आली असून आता 21 रुपये आकरण्यात येणार आहेत.  मेट्रो शहरात राहणाऱ्या ग्राहकांसाठीच्या नियमातही बदल करण्यात आले आहेत. बंगळुरू, मुंबई, चेन्नई, दिल्ली, कोलकाता आणि हैद्राबाद शहरातील एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांना आणि अ‍ॅक्सिस बँकेच्या ग्राहकांना एटीएममधून तीन वेळा निशुल्क पैसे काढता येणार आहेत.

आणखी एक बदल आहे, ज्याबद्दल तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. बँकांना प्रत्येक व्यवहारासाठी इंटरचेंज शुल्क वाढवण्याचीही परवानगी देण्यात आली आहे. आर्थिक व्यवहारांसाठी हे शुल्क 15 रुपयांवरून 17 रुपये करण्यात आले आहे. गैर-आर्थिक व्यवहारांसाठी इंटरचेंज फी 5 रुपयांवरून 6 रुपये करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parbhani : पर्यवेक्षकाच्या वेतनातून मागितली लाच, उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिकेसह लिपीक एसीबीच्या जाळ्यात 
पर्यवेक्षकाच्या वेतनातून मागितली लाच, उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिकेसह लिपीक एसीबीच्या जाळ्यात 
भिवंडीत 2 गोदामाला भीषण आग, सुदैवाने जिवीतहानी नाही; फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी
भिवंडीत 2 गोदामाला भीषण आग, सुदैवाने जिवीतहानी नाही; फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी
बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
मंत्र्यांच्या भडकाऊ भाषणाबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न?; अटलबिहारी वाजपेयींचा दाखला, फडणवीसांनी नितेश राणेंचे कान टोचले
मंत्र्यांच्या भडकाऊ भाषणाबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न?; अटलबिहारी वाजपेयींचा दाखला, फडणवीसांनी नितेश राणेंचे कान टोचले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nagpur Rada FIR: नागपूरमध्ये हिंसाचार, काय सांगते एफआयआर? त्या रात्री नेमकं काय घडलं?Sangh On Nagpur Rada : कान टोचले, नागपूरच्या राड्यानं संघानं काय मांडली भूमिका?Zero Hour Aurangjeb Kabar : संघाच्या भूमिकेनंतर औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा मागे पडणार का?Devendra Fadnavis On Nitesh Rane: कधी कधी तरुण मंत्री बोलून जातात, त्यांच्याशी मी संवाद साधतो

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parbhani : पर्यवेक्षकाच्या वेतनातून मागितली लाच, उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिकेसह लिपीक एसीबीच्या जाळ्यात 
पर्यवेक्षकाच्या वेतनातून मागितली लाच, उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिकेसह लिपीक एसीबीच्या जाळ्यात 
भिवंडीत 2 गोदामाला भीषण आग, सुदैवाने जिवीतहानी नाही; फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी
भिवंडीत 2 गोदामाला भीषण आग, सुदैवाने जिवीतहानी नाही; फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी
बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
मंत्र्यांच्या भडकाऊ भाषणाबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न?; अटलबिहारी वाजपेयींचा दाखला, फडणवीसांनी नितेश राणेंचे कान टोचले
मंत्र्यांच्या भडकाऊ भाषणाबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न?; अटलबिहारी वाजपेयींचा दाखला, फडणवीसांनी नितेश राणेंचे कान टोचले
विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी! ग्रीष्मातली चंदन पूजा असो की पाद्यपूजा, वेगवेगळ्या पूजांसाठी घरबसल्या नोंदणी करता येणार
विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी! ग्रीष्मातली चंदन पूजा असो की पाद्यपूजा, वेगवेगळ्या पूजांसाठी घरबसल्या नोंदणी करता येणार
गोपीचंद पडळकरांनी औंध देवस्थानाची 34 एकर जमीन लाटली; कागदपत्रे दाखवत राम खाडेंचा गंभीर आरोप
गोपीचंद पडळकरांनी औंध देवस्थानाची 34 एकर जमीन लाटली; कागदपत्रे दाखवत राम खाडेंचा गंभीर आरोप
शेतकरी आत्महत्या थांबवायच्या असतील तर शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, अमर हबीब यांचं अन्नत्याग आंदोलन 
शेतकरी आत्महत्या थांबवायच्या असतील तर शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, अमर हबीब यांचं अन्नत्याग आंदोलन 
नागपूरचे CP ऑन द स्पॉट, घटनास्थळाची पाहणी; फहीम खानच्या रोलबाबत रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली माहिती?
नागपूरचे CP ऑन द स्पॉट, घटनास्थळाची पाहणी; फहीम खानच्या रोलबाबत रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली माहिती?
Embed widget