(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Apple Market Value: अॅपलने बाजार मूल्य 3 ट्रिलियन डॉलर्स गाठत रचला इतिहास; फक्त एका कंपनीसमोर भारतातील तब्बल 1,242 कंपन्या सुद्धा फिक्या!
अॅपल 2011 मध्ये पहिल्यांदा जगातील सर्वात मौल्यवान स्टॉक ठरला. जेव्हा त्यांचे मार्केट कॅप 340 अब्ज डॉलर्सपेक्षा कमी होते आणि S&P 500 च्या सुमारे 3.3 टक्के होते. तेव्हापासून हा मान क्वचितच गमावला आहे.
Apple Market Value: आयफोन निर्माती Apple Inc. ने 3 ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त बाजार मूल्य असलेली जगातील पहिली कंपनी ठरवत असून वॉल स्ट्रीटवर इतिहास घडवला आहे. इक्विटी मार्केटवर अॅपलचा घौडदौड सुरुच असून जवळपास कंपन्यांची सोडा, जगातील निम्म्या देशांची अर्थव्यवस्था सुद्धा नाही. उदाहरण अॅपलशी देशातील 1242 कंपन्यांची $1.4t (1,242 companies)बाजार मूल्यची तुलना केली तरी निम्म्याच्या खाली आहे. आयफोन निर्मात्या कंपनीमध्ये शुक्रवारी 2.3 टक्क्यांनी वाढ केली. या वाढीमुळे यावर्षी त्यांच्या बाजार मुल्यामध्ये 983 अब्ज डॉलर्सची भर घातली आहे. Apple ने मैलाचा दगड गाठल्यामुळे Nasdaq 100 इंडेक्सला त्यांच्या आतापर्यंतच्या सर्वोत्कृष्ट-पहिल्या सहामाहीत जाण्यास मदत झाली आहे. ॉ
अॅपलने बाजार केलेल्या चमत्काराने अनेक रणनीतीकारांना सुद्धा डोके खाजवण्याची वेळ आणून सोडली आहे. दुसरीकडे, काहींनी त्यांच्या व्यवहार्यतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. कारण अर्थव्यवस्थेला फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर वाढीचा सामना करावा लागत आहे. तथापि, गुंतवणुकदार कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढीच्या संभाव्यतेबद्दल (artificial intelligence) उत्साही राहतात आणि Apple कडे असलेल्या गुणवत्तेच्या घटकांकडे देखील लक्ष वेधले आहे, ज्यात मजबूत ताळेबंद, शाश्वत महसूल प्रवाह आणि मजबूत स्पर्धात्मक स्थिती यांचा समावेश आहे.
ट्रिलियन-डॉलर क्लब
अॅपल 2011 मध्ये पहिल्यांदा जगातील सर्वात मौल्यवान स्टॉक ठरला होता, जेव्हा त्यांचे मार्केट कॅप 340 अब्ज डॉलर्सपेक्षा कमी होते आणि S&P 500 च्या सुमारे 3.3 टक्के होते. तेव्हापासून, हा मान क्वचितच गमावला आहे. 2018 च्या मध्यात ते प्रथम 1 ट्रिलियन डॉलर्स मूल्यापर्यंत पोहोचले आणि ऑगस्ट 2020 मध्ये 2 ट्रिलियन डॉलर्सचे मूल्य गाठले, ज्यामुळे तो आकडा ओलांडणारी ती पहिली यूएस कंपनी बनली.
अॅपल वि. जग (बाजार भांडवल)
- अॅपल: $2.7 ट्रिलियन
- यूके : $2.6t (595 कंपन्या)
- फ्रान्स: $1.8t (235 कंपन्या)
- भारत: $1.4t (1,242 कंपन्या)
- जर्मनी: $1.3t (255 कंपन्या)
इतर महत्वाच्या बातम्या