एक्स्प्लोर

HDFC Bank : आयसीआयसीआय बँकेनंतर एचडीएफसी बँकेचा ग्राहकांना धक्का, किमान शिल्लक रक्कम वाढवली, नियम 'या' खातेदारांना लागू

HDFC Bank : एचडीएफसी बँकेनं किमान शिल्लक रक्कम वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय आयसीआयसीआय बँकेनंतर घेण्यात आला आहे.

नवी दिल्ली : आयसीआयसीआय बँकेनं बचत खात्यातील किमान सरासरी शिल्लक रकमेसंदर्भातील नियम बदलल्यानंतर एचडीएफसी बँकेनं देखील किमान सरासरी शिल्लक रकमेत वाढ केली आहे. एचडीएफसी बँकेनं शहरी भागातील बचत खात्यांमध्ये किमान शिल्लक रक्कम 10000 रुपयांवरुन 25000 रुपये  करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय 1 ऑगस्ट 2025 तारखेनंतर उघडल्या जाणाऱ्या बँक खात्यांसाठी लागू असेल. 

आयसीआयसीआय बँकेनं काहीच दिवसांपूर्वी किमान सरासरी शिल्लक रक्कम 10000 रुपयांवरुन 50000 रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर एचडीएफसी बँकेनं हा निर्णय घेतला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं आयसीआयसीआय बँकेच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता. 

एचडीएफसी बँकेच्या अधिकाऱ्यांकडून जे खातेदार  किमान सरासरी शिल्लक रक्कम खात्यात ठेवण्यात अपयशी ठरतील त्यांच्याकडून दंड आकारण्यात येईल. किमान सरासरी शिल्लक रक्कम वाढवल्यानं सेवेची गुणवत्ता वाढेल आणि गुंतवणूक वाढेल अशी अपेक्षा एचडीएफसी बँकेला आहे.

एकीकडे खासगी क्षेत्रातील बँका किमान शिल्लक रक्कम वाढवत असताना सार्वजनिक क्षेत्रातील बँका मात्र किमान शिल्लक रकमेचा नियम शिथील करत आहेत. सर्वप्रथम स्टेट बँक ऑफ इंडियानं बचत खात्यात किमान शिल्लक रक्कम ठेवण्यासंदर्भातील नियम शिथील केला. स्टेट बँक ऑफ इंडियानं हा बदल 2020 पासून लागू केला आहे. 

स्टेट बँक ऑफ इंडियासह सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी बचत खात्यात किमान शिल्लक रक्कम ठेवण्यासंदर्भातील नियम शिथील करत कोणतंही शुल्क न आकारण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये इंडियन बँक, कॅनरा बँक, पंजाब नॅशनल बँकेचा समावेश आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर संजय म्हलोत्रा यांनी सोमवारी किमान शिल्लक रक्कम ठेवण्याचा निर्णय बँकांच्या अखत्यारित आहे, त्याचा आरबीआयसोबत संबंध नाही.  

किमान शिल्लक रक्कम किती ठेवायचा या संदर्भातील निर्णय आरबीआयनं बँकांवर सोडलेला आहे. काही बँकांनी किमान शिल्लक रक्कम 10 हजार रुपये तर काही बँकांनी 2000 रुपये ठेवली आहे तर काही बँकांनी ते माफ केलं आहे. हा विषय आमच्या नियमनाच्या अखत्यारित येत नाही, असं संजय म्हलोत्रा म्हणाले.

आयसीआयसीआय बँकेनं मेट्रो मधील बँक खात्यातील किमान शिल्लक रक्कम 10 हजारांवरुन 50 हजार रुपये केलं आहे.जे खातेदार नियमांचं पालन करणार नाहीत त्यांना 6 टक्के किंवा 500 रुपये जे कमी असेल ते शुल्क आकारलं जाईल. 

दरम्यान, खासगी बँकांनी बचत खात्यासंदर्भातील किमान शिल्लक रक्कम वाढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याबाबत ग्राहकांची प्रतिक्रिया कशी येते ते पाहावं लागेल. 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rupee vs Yuan : डॉलरनंतर आता चिनी 'युआन'समोर रुपयाची ऐतिहासिक घसरण; आयात महागणार, महागाई वाढण्याची शक्यता
डॉलरनंतर आता चिनी 'युआन'समोर रुपयाची ऐतिहासिक घसरण; आयात महागणार, महागाई वाढण्याची शक्यता
Share Market Today: राजधानी दिल्लीपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या तैवानच्या शेअर बाजाराचा भारताला हादरा; तैवान गुंतवणूकदारांसाठी पहिली पसंती
राजधानी दिल्लीपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या तैवानच्या शेअर बाजाराचा भारताला हादरा; तैवान गुंतवणूकदारांसाठी पहिली पसंती
RBI : परदेश प्रवासावर भारतीयांनी उडवला अब्जावधींचा धूर; RBI च्या आकडेवारीतून मोठा खुलासा!
RBI : परदेश प्रवासावर भारतीयांनी उडवला अब्जावधींचा धूर; RBI च्या आकडेवारीतून मोठा खुलासा!
भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या, पण पाकिस्तानात नेमकी काय स्थिती? जाणून घ्या सविस्तर माहिती 
भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या, पण पाकिस्तानात नेमकी काय स्थिती? जाणून घ्या सविस्तर माहिती 

व्हिडीओ

BMC Sudhar Samiti Special Report : मध्यरात्रीच्या घडामोडी, शिंदेंवर कुरघोडी? | ABP Majha
Vidhanparishad Election Special Report : अंतिम जागावाटपावर तिन्ही पक्षाचं समाधान कधी? | ABP Majha
NCP Meeting Special Report : आव्हानांचा चक्रव्यूह सुनेत्रा पवार कसा भेदणार? | ABP Majha
Ashok Kharat Movie Special Report : खरात फाईल्स मोठ्या पडद्यावर! | ABP Majha
Amit Deshmukh On Petrol Diesel Crisis : इंधन तुटवड्याच्या प्रश्नावर काय बोलावे हे सरकारकडून शिकावं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed Crime : संतापजनक! केजमध्ये अत्याचारग्रस्त अल्पवयीन मुलीची हेळसांड, आरोग्य तपासणीसाठी दहा तास, तर गुन्हा दाखल होण्यासाठी स्टेशनमध्ये रात्र गेली
संतापजनक! केजमध्ये अत्याचारग्रस्त अल्पवयीन मुलीची हेळसांड, आरोग्य तपासणीसाठी दहा तास, तर गुन्हा दाखल होण्यासाठी स्टेशनमध्ये रात्र गेली
Share Market Today: राजधानी दिल्लीपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या तैवानच्या शेअर बाजाराचा भारताला हादरा; तैवान गुंतवणूकदारांसाठी पहिली पसंती
राजधानी दिल्लीपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या तैवानच्या शेअर बाजाराचा भारताला हादरा; तैवान गुंतवणूकदारांसाठी पहिली पसंती
Maharashtra Live blog updates: मुंबईत बकरी ईदच्या कुर्बानीवरुन वाद, मिरा रोडमधील बकरे पोलीस बंदोबस्तात इतरत्र हलवले
मुंबईत बकरी ईदच्या कुर्बानीवरुन वाद, मिरा रोडमधील बकरे पोलीस बंदोबस्तात इतरत्र हलवले
Ramdas Athawale on Bakri Eid: बकरी ईदच्या कुर्बानीवरुन भाजप आक्रमक, रामदास आठवले म्हणाले, 'संविधानाला छेद देणारं काही होऊ नये, सगळे आपलेच...'
बकरी ईदच्या कुर्बानीवरुन भाजप आक्रमक, रामदास आठवले म्हणाले, 'संविधानाला छेद देणारं काही होऊ नये, सगळे आपलेच...'
Rupee vs Yuan : डॉलरनंतर आता चिनी 'युआन'समोर रुपयाची ऐतिहासिक घसरण; आयात महागणार, महागाई वाढण्याची शक्यता
डॉलरनंतर आता चिनी 'युआन'समोर रुपयाची ऐतिहासिक घसरण; आयात महागणार, महागाई वाढण्याची शक्यता
सत्ता जाताच पक्षावरील 'ममता' आटू लागली! तृणमूल खासदाराचा पक्षातील सर्व पदांचा राजीनामा, 100 नगरसेवकांच्या राजीनाम्याची सुद्धा चर्चा
सत्ता जाताच पक्षावरील 'ममता' आटू लागली! तृणमूल खासदाराचा पक्षातील सर्व पदांचा राजीनामा, 100 नगरसेवकांच्या राजीनाम्याची सुद्धा चर्चा
Vaibhav Sooryavanshi: जगातील सर्वात वेगवान शतकाचा मान हुकला, वैभव सूर्यवंशीच्या विकेटने अभिमानाचा हुंदका दाटला!
Video: जगातील सर्वात वेगवान शतकाचा मान हुकला, वैभव सूर्यवंशीच्या विकेटने अभिमानाचा हुंदका दाटला!
DK Shivakumar: संकटमोचक डीकेंची कर्नाटकात स्वप्नपूर्ती होत असतानाच सीएम सिद्धरामय्यांच्या फक्त तीन शब्दातील प्रतिक्रियेनं भूवया उंचावल्या
संकटमोचक डीकेंची कर्नाटकात स्वप्नपूर्ती होत असतानाच सीएम सिद्धरामय्यांच्या फक्त तीन शब्दातील प्रतिक्रियेनं भूवया उंचावल्या
Embed widget