(Source: Poll of Polls)
शेअर बाजारात हाहा:कार! गौतम अदानींवरील नव्या आरोपांनंतर अदानी उद्योग समूहाचे शेअर्स धडाम्!
अमेरिकेत गौतम अदानी यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप करण्यात आले आहेत. या आरोपांमुळे अदानी उद्योग समूहाच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स गडगडले आहेत.
मुंबई : भारतीय शेअर बाजारात (Indian Stock Market) आज खळबळ उडवून देणारी घटना घडली आहे. अमेरिकेच्या जिल्हा न्यायालय आणि सेक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशनने गौतम अदानी (Gautam Adani) आणि अन्य अधिकाऱ्यांवर लाचखोरी आणि फसवणुकीचे गंभीर आरोप केले आहेत. या आरोपानंतर भारतीय शेअर बाजारात अदानी उद्योग समूहाच्या (Adani Industries Group) मालकीच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स गडगडले आहेत. अदानी उद्योग समूहाच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स साधार 10 ते 20 टक्क्यांनी घसरले आहेत.
अदानी उद्योग समूहाच्या कोणकोणत्या कंपन्यांचे शेअर्स गडगडले?
अदानी एनर्जी सोल्यूशन्स- 20 टक्के घसरण
अदानी विल्मर- 10 टक्के
अदानी ग्रीन एनर्जी- 18.93 टक्के
अदानी पोर्ट्स- 10 टक्के
अदानी एन्टरप्राईजेस- 15 टक्के
अदानी टोटल गॅस- 14.70 टक्के
अदानी पॉवर- 14.53 टक्के
21 नोव्हेंबर रोजी नेमकं काय घडलं?
गुरुवारी 21 नोव्हेंबर 2024 रोजी शेअर बाजार खुला होताच अदानी उद्योग समूहाचेशेअर्स गडगडले. अदानी उद्योग समूहाच्या शेअर बाजारावर सूचिबद्ध झालेल्या सर्वच दहा कंपन्यांचे शेअर्स गडगडले. अदानी एनर्जी सोल्यूशन्स कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांच्या घसरणीसह 697.70 रुपयांवर घसरले. अदानी टोटल गॅसचे शेअर्स 14 टक्क्यांनी घसरून 577.80 रुपयांपर्यंत घसरले. तर एसीसी कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांनी घसरून 1966.55 रुपयांपर्यंत खाली आले.
अदानी उद्योग समूहाच्या इतरही कंपन्यांचे शेअर्स गडगडले
अदानी पोर्ट्स अँड एसईझेड कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांनी घसरून 1160 रुपयांवर आले. तर अदानी विल्मर कंपनीचे शेअर्सही 10 टक्क्यांनी घसरून 301 टक्क्यांवर आहेत. अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स 15.34 टक्क्यांनी घसरून 443.70 पोहोचले आहेत. तर अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांनी घसरून 2539 रुपयांपर्यंत खाली आले आहेत.
गौतम अदानी यांच्यावर नेमका आरोप काय?
भारतातील सर्वांत मोठा सौरउर्जी निर्मिती प्रकल्पाचे कंत्राट मिळावे यासाठी गौतम अदानी आणि त्यांचा पुतण्या सागर अदानी यांनी भारतीय अधिकाऱ्यांना सुमारे 250 दशलक्ष डॉलर्स देण्याचे मान्य केले होते. या प्रकल्पातून पुढच्या 20 वर्षांत साधारण 2 अब्ज डॉलर्सचा नफा मिळणार होता. तसेच कर्जदार आणि गुंतवणूकदार यांच्यापासून हा भ्रष्टाचार लपवून गौतम अदानी आणि अदानी ग्रीन एनर्जीचे सीईओ विनीत जैन यांनी 3 अब्ज डॉलर्स किमतिचे बॉण्ड्स आणि रोखे जमा केले होते, असाही आरोप करण्यात आला आहे.
हेही वाचा :