एक्स्प्लोर

बिटकॉइन घोटाळा प्रकरण! गौरव मेहतांच्या घरावर ED चा छापा, सुप्रिया सुळेंसह नाना पटोलेंची चौकशी करण्याची किरीट सोमय्यांची मागणी

ED Raids Gaurav Mehta House : महाराष्ट्रातील क्रिप्टो करन्सी बिटकॉइन घोटाळ्याप्रकरणी (Bitcoin scam in Maharashtra) ईडीच्या टीमने गौरव मेहतांच्या घरावर छापा (ED raids Gaurav Mehta house) टाकला आहे.

ED Raids Gaurav Mehta House : महाराष्ट्रातील क्रिप्टो करन्सी बिटकॉइन घोटाळ्याप्रकरणी (Bitcoin scam in Maharashtra) ईडीच्या टीमने गौरव मेहतांच्या घरावर छापा (ED raids Gaurav Mehta house) टाकला आहे.  ईडीची टीम गौरव मेहता यांच्या रायपूर येथील निवासस्थानी पोहोचली आहे. क्रिप्टो करन्सी घोटाळ्यात गौरव मेहता हे राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि काँग्रेसचे नेते नाना पटोले (Nana Patole) यांच्या संपर्कात होते, अशीही माहिती आहे. निवडणुकीदरम्यान बिटकॉईनच्या माध्यमातून क्रिप्टो करन्सीची विक्री करण्यात आली होती. तो रोखीचा खेळ आहे. दरम्यान, या घटनेवर भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी एक ट्वीट केलं आहे. यामध्ये त्यांनी क्रिप्टो करन्सी घोटाळ्यात सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांच्या सहभागाची चौकशी आवश्यक असल्याचे म्हटले आहे. 

किरीट सोमय्यांनी ट्वीटमध्ये नेमकं काय म्हटलंय?

235 कोटी रुपयांच्या बिटकॉइन घोटाळ्याप्रकरणी गौरव मेहता यांच्या घरावर ईडीने छापे टाकले आहेत. या क्रिप्टो करन्सी घोटाळ्यात सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांच्या सहभागाची चौकशी आवश्यक असल्याचं किरीट सोमय्या यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी रोख रकमेसाठी #Bitcoin ची देवाणघेवाण झाल्याचे सोमय्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

बिटकॉइन घोटाळा समोर आला आहे. पुण्यातील माजी पोलीस अधिकारी रवींद्र पाटील यांनी निवडणुकीत परकीय चलन वापरल्याचा आणि आर्थिक व्यवहारांसाठी बिटकॉइनचा वापर केल्याचा आरोप केला होता. तसेच भाजपाचे खासदार, प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी पत्रकार परिषद घेऊन कॉल रेकॉर्डिंग्स व व्हॉट्सअ‍ॅप चॅट्सचे स्क्रीनशॉट प्रसिद्ध केले होते. सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांच्या कथित आवाजातील ऑडिओ क्लिपही समोर आली होती. आता या प्रकरणी ईडीने मोठी कारवाई केली आहे. सुप्रिया सुळे यांच्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये ज्या गौरव मेहताचा उल्लेख झाला. त्याच्या रायपुर मधील घरी ईडीने धाड टाकली आहे. 2018 साली झालेल्या क्रिप्टोकरन्सी घोटाळ्याप्रकरणाचा तपास करण्यासाठी धाड टाकल्याचे सांगण्यात आले. माजी आयपीएस अधिकारी रविंद्र पाटील यांनी 2018 च्या क्रिप्टोकरन्सी घोटाळ्यात गौरव मेहता हा प्रमुख आरोपी असल्याचे म्हटले होते. गौरव मेहता हा एका ऑडिट फर्मचा कन्सलटन्ट असून पुणे पोलीस 6600 कोटींच्या क्रिप्टोकरन्सी घोटाळ्याप्रकरणी त्याची चौकशी करणार आहे. रविंद्र पाटील यांनी दावा केला की, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गौरव मेहताला फोन करून क्रिप्टोकरन्सी घोटाळ्यातील रक्कम निवडणुकीच्या कामासाठी मागितली होती.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दोघांत तिसरा, आता नाशिकचं पालकमंत्रिपद भाजपकडेच? रायगडचा वाद वेगळ्या वळणावर, महायुतीत नेमकं चाललंय काय?
दोघांत तिसरा, आता नाशिकचं पालकमंत्रिपद भाजपकडेच? रायगडचा वाद वेगळ्या वळणावर, महायुतीत नेमकं चाललंय काय?
मोठी बातमी! बायकोला संपवणाऱ्या राजेशनेही झुरळ मारण्याचं औषध प्यायलं; रुग्णालयात उपचार सुरू
मोठी बातमी! बायकोला संपवणाऱ्या राजेशनेही झुरळ मारण्याचं औषध प्यायलं; रुग्णालयात उपचार सुरू
Ajit Pawar: पीक कर्जमाफी होणार की नाही? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं,  म्हणाले, 'पीक कर्जमाफी होणार...'
पीक कर्जमाफी होणार की नाही? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, 'पीक कर्जमाफी होणार...'
Nagpur Violence : नागपूर हिंसाचार प्रकरणी आणखी एका म्होरक्याला अटक; जमावाला भडकावल्याचा आरोप, पोलिसांकडून आरोपींचे अटकसत्र सुरूच!
नागपूर हिंसाचार प्रकरणी आणखी एका म्होरक्याला अटक; जमावाला भडकावल्याचा आरोप, पोलिसांकडून आरोपींचे अटकसत्र सुरूच!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 01 PM TOP Headlines 01 AM 28 March 2025Pune Gauri Sambrekar Bangalore :  गौरी संबरेकरची पतीकडूनच बंगळूरमध्ये भीषण हत्याABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12 AM 28 March 2025ABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11AM 28 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोघांत तिसरा, आता नाशिकचं पालकमंत्रिपद भाजपकडेच? रायगडचा वाद वेगळ्या वळणावर, महायुतीत नेमकं चाललंय काय?
दोघांत तिसरा, आता नाशिकचं पालकमंत्रिपद भाजपकडेच? रायगडचा वाद वेगळ्या वळणावर, महायुतीत नेमकं चाललंय काय?
मोठी बातमी! बायकोला संपवणाऱ्या राजेशनेही झुरळ मारण्याचं औषध प्यायलं; रुग्णालयात उपचार सुरू
मोठी बातमी! बायकोला संपवणाऱ्या राजेशनेही झुरळ मारण्याचं औषध प्यायलं; रुग्णालयात उपचार सुरू
Ajit Pawar: पीक कर्जमाफी होणार की नाही? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं,  म्हणाले, 'पीक कर्जमाफी होणार...'
पीक कर्जमाफी होणार की नाही? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, 'पीक कर्जमाफी होणार...'
Nagpur Violence : नागपूर हिंसाचार प्रकरणी आणखी एका म्होरक्याला अटक; जमावाला भडकावल्याचा आरोप, पोलिसांकडून आरोपींचे अटकसत्र सुरूच!
नागपूर हिंसाचार प्रकरणी आणखी एका म्होरक्याला अटक; जमावाला भडकावल्याचा आरोप, पोलिसांकडून आरोपींचे अटकसत्र सुरूच!
Ajit Pawar : फोटोसाठी मोठी गर्दी, अजितदादांनी थेट संचालकांना ढकललं मागं; बारामतीत नेमकं काय घडलं?
फोटोसाठी मोठी गर्दी, अजितदादांनी थेट संचालकांना ढकललं मागं; बारामतीत नेमकं काय घडलं?
Pune Crime: साताऱ्याच्या गौरीचा बंगळुरुत सुटकेसमध्ये मृतदेह, महिनाभरापूर्वी मुंबईतून शिफ्ट झालेल्या पती राकेशने पत्नीला का संपवलं?
साताऱ्याची गौरी, पुण्याचा राकेश, बंगळुरुत वाद, पत्नीला संपवून सुटकेसमध्ये ठेवलं, मुंबई ते बंगळुरू हत्याकांडाचा थरार!
पुस्तकाला वह्यांची पानं जोडण्याचा नियोजन शून्य निर्णय, राज्य सरकारला कोट्यवधींचा फटका, नेमका किती झालाय आतापर्यंत खर्च?
पुस्तकाला वह्यांची पानं जोडण्याचा नियोजन शून्य निर्णय, राज्य सरकारला कोट्यवधींचा फटका, नेमका किती झालाय आतापर्यंत खर्च?
Dhule News : अवघ्या दोन गुणांनी हुकली आर्मीत भरती होण्याची संधी, उच्च शिक्षित तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धुळ्यात हळहळ
अवघ्या दोन गुणांनी हुकली आर्मीत भरती होण्याची संधी, उच्च शिक्षित तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धुळ्यात हळहळ
Embed widget