Aadhaar PVC Card : एटीम कार्ड सारखं आधार कार्ड कसं मिळवायचं, किती रुपये भरावे लागतील, संपूर्ण माहिती एका क्लिकवर
Aadhaar PVC Card : आधार पीव्हीसी कार्ड मागवण्यासाठी आधार कार्डच्या यूआयडीएआय या वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
![Aadhaar PVC Card : एटीम कार्ड सारखं आधार कार्ड कसं मिळवायचं, किती रुपये भरावे लागतील, संपूर्ण माहिती एका क्लिकवर Aadhaar PVC Card is more secure Order online with a minimal charge of 50 only check details marathi news Aadhaar PVC Card : एटीम कार्ड सारखं आधार कार्ड कसं मिळवायचं, किती रुपये भरावे लागतील, संपूर्ण माहिती एका क्लिकवर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/03/bd01e066c2393d7637dd2dd17d43f7481725352925508989_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : भारतात शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी किंवा विविध कारणांसाठी आधार कार्ड क्रमांक देणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे. आधार कार्डचे अनेक प्रकार असतात. आधार लेटर, आधार पीव्हीसी कार्ड (Aadhaar PVC Card), ई आधार आणि एम आधार हे चार प्रकार आहेत. या चार प्रकारच्या आधारला तितकंच महत्त्व असून ते वैध मानले जातात. आधार कार्डच्या चार प्रकारांपैकी कोणत्याही प्रकारचं कार्ड तुम्ही वापरू शकता.
आधार पीव्हीसी कार् एटीएम कार्ड प्रमाणं असतं. त्यामुळं ते पाण्यानं भिजलं तरी ते खराब होत नाही. आधार पीव्हीसी कार्ड ही सुविधा ऑनलाईन असून यूआयडीएआयनं सुरु केलं आहे. आधार कार्ड धारक त्यांचे पीव्हीसी कार्ड नाममात्र शुल्क देऊन डाऊनलोड करु शकतात.
आधार पीव्हीसी कार्ड कसं मिळवायचं?
आधार पीव्हीसी कार्डची काही वैशिष्ट्ये देखील आहेत. त्यावर टेम्परप्रुफ क्यूआर कोड असतो. होलोग्राम, मायक्रो टेक्स्ट,घोस्ट इमेज, आधार कार्ड जारी करण्यात आलेली तारीख, छापलेली तारीख, आधार कार्डचा इम्बोस्ड लोगो असतो. आधार पीव्हीसी कार्ड मागवण्यासाठी जीएसटी आणि स्पीड पोस्टाच्या चार्जेससह 50 रुपये शुल्क द्यावं लागतं.
आधार पीव्हीसी कार्ड हवं असल्यास आधार कार्ड धारक https://myaadhaar.uidai.gov.in/genricPVC या वेबसाईटला भेट देऊन आवश्य असलेली माहिती भरुन अर्ज सादर करु शकतो. यासाठी त्यांना आधार क्रमांक किंवा आधार नोंदणी क्रमांक नोंदवावा लागेल, त्यासह कॅप्चा, फोन नंबर रजिस्टर असल्यास ओटीपी येईल तो नोंदवून 50 रुपये शुल्क भरुन आधार पीव्हीसी कार्ड मागवता येईल. ज्यांचा फोन नंबर नोंदवलेला नसेल त्यांना पर्यायी क्रमांक नोंदवावा लागेल. अशा वेळी त्यांना आधार कार्ड प्रिंट करण्यापूर्वी पाहता येणार नाही.
आधार पीव्हीसी कार्डसाठी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, यूपीआय आणि पेटीएमद्वारे शुल्क भरता येईल.
आधार पीव्हीसी कार्डसाठी अर्ज दाखल केल्यानंतर ते पुढील पाच दिवसांनंतर स्पीड पोस्टानं संबंधित आधार कार्ड धारकाच्या घरी पाठवलं जातं.
दरम्यान, यूआयडीएआयनं ज्या आधार कार्ड धारकांकडील आधार कार्ड 10 वर्षांपेक्षा जुनं असेल त्यांना बायोमेट्रिक अपडेट करायला सांगितलं आहे. हे काम मोफत करता येईल, मात्र यासाठी 14 सप्टेंबर ही अंतिम तारिख निश्चित करण्यात आली आहे. आधार कार्डमध्ये काही दुरुस्ती आणि बदल करायचे असल्यास ते केल्यानंतर आधार पीव्हीसी कार्डसाठी अर्ज करावा, असं आवाहन करण्यात आलं आहे. आधार लेटरच्या तुलनेत आधार पीव्हीसी कार्डमध्ये सुरक्षेचे अनेक फीचर्स असतात.
इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)