ED कडून JSW स्टीलची 4025 कोटींची संपत्ती परत, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?
ED Return Property to JSW : अंमलबजावणी संचलनालय म्हणजेच ईडीनं 4025 कोटी रुपयांची संपत्ती जेएसडब्ल्यू स्टीलला परत केली आहे.
नवी दिल्ली : ईडी म्हणजेच अंमलबजावणी संचलनालयानं मोठा निर्णय घेतला आहे. ईडीनं जेएसडब्ल्यू स्टीलला 4025 कोटी रुपयांची संपत्ती परत केली आहे. ही संपत्ती पूर्वी भूषण पॉवर अँड स्टील लिमिटेडची होती. ती कंपनी दिवाळखोरीत निघाली होती. आयबीसी आणि सीआयआरपीच्या माध्यमातून ही संपत्ती जेएसडब्ल्यू कंपनीला सोपवण्यात आली आहे.
भूषण पॉवर अँड स्टील लिमिटेडच्या माजी प्रमोटर्सवर बँकांची फसवणूक करणे, बँकांचे पैसे खासगी गुंतवणुकीसाठी वापरण्याचा आरोप होता. ईडीनं या कारणामुळं पीएमएलएच्या कलम 5 नुसार संपत्ती अस्थायी स्वरुपात जप्त केली होती. ही संपत्ती पीएमएलच्या कलम 8 (8) नुसार पीएमएलए रेस्टोरेशन ऑफ प्रॉपर्टी रुल्सच्या नियमानुसार 3A नुसार परत करण्यात आली. सुप्रीम कोर्टानं 11 डिसेंबर 2024 ला याला मंजुरी दिली होती. या प्रक्रियेनुसार ट्रायल पूर्ण होण्यापूर्वी संपत्ती संबंधितांना परत देण्यात येते.
सुप्रीम कोर्टानं आतापर्यंत हे निश्चित केलेलं नाही की ईडीकडे कॉर्पोरेट थकबाकीदारांची संपत्ती सीआयआरपीनुसार जप्त करण्याचा अधिकार आहे की नाही. त्याशिवाय एखाद्या कंपनीविरोधात पीएमएलएनुसार चौकशी सुरु असेल तर ते आयबीसी कलम 32 A नुसार दावा करु शकते का यावर सुप्रीम कोर्टात प्रकरण प्रलंबित आहे.
ईडीनं सांगितलं की 4025 कोटी रुपयांची संपत्ती परत करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टानं बुधवारी याला मंजुरी दिली होती. ईडीनं आरोप केला होता की बीपीएसएलनं वेगवेगळ्या बँकांमधून कर्ज घेत हेराफेरी करण्याच्या अनेक पद्धती वापरल्या होत्या.
जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेड ही मुंबईतील एक बहुराष्ट्रीय स्टील उत्पादक कंपनी आहे. याशिया जेएसडब्ल्यू उद्योग समुहाची एक प्रमुख कंपनी आहे. भूषण पॉवर अँड स्टील, इस्पात स्टील आणि जिंदल विजयनगर स्टील लिमिटेडच्या विलिनीकरणानंतर जेएसडब्ल्यू भारतातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी दुसरी कंपनी आहे.
दरम्यान, ईडीकडून आर्थिकदृष्ट्या फसवणुकीच्या प्रकरणांची चौकशी केली जाते. ईडीही केंद्रीय तपास यंत्रणा असून ती थेट एखाद्या प्रकरणात तपास करु शकत नाही. त्यासाठी अगोदर कोणत्यातरी तपास यंत्रणेनं संबंधित प्रकरणात एफआयर दाखल करणं आवश्यक असतं. त्यानंतर ईडी त्या प्रकरणात ईसीआयर दाखल करुन तपासाला सुरुवात करते. ईडीच्या कारवायांवरुन देशभर चर्चा होत असतात.
इतर बातम्या :
पैसे ठेवा तयार! 19 डिसेंबरला येणार 2 बम्पर IPO, भरपूर पैसे कमवण्याची नामी संधी?