उन्हाचा चटका वाढला, बाजारात लिंबाला झळाळी; दरात झाली 350 टक्क्यांची वाढ
सध्या बाजारात लिंबाच्या दरात (Lemon Price) तेजी आल्याचं पाहायला मिळत आहे. ज्या शेतकऱ्यांकडे विक्रीसाठी लिंब आहेत, त्या शेतकऱ्यांना मोठा फायदा होतोय.
Lemon Price : सध्या देशाचा उन्हाचा (Heat) तडाका चांगलाच वाढला आहे. वाढत्या उन्हामुळं नागरिकांच्या अंगाची काहीली होत आहे. देशातील बहुतांश भागात पारा हा 35 अंशाच्या आसपास गेला आहे. दरम्यान, या वाढत्या तापमानात (temperature) लोक लिंबू सोडा, विविध प्रकारचे कोल्ड्रिग घेत आहेत. या स्थितीमुळं सध्या बाजारात लिंबाच्या दरात (Lemon Price) तेजी आल्याचं पाहायला मिळत आहे. ज्या शेतकऱ्यांकडे विक्रीसाठी लिंब आहेत, त्या शेतकऱ्यांना मोठा फायदा होतोय. लिंबाच्या दरात 350 टक्क्यांची वाढ झालीय.
तापमानात वाढ झाल्यास दरात आणखी वाढ होणार
मिळालेल्या माहितीनुसार, यापूर्वी लिंबू सोडा 20 रुपये प्रति कप विकला जात होता. आता लिंबू सोडा 25 ते 30 रुपये प्रति कप विकला जातोय. दरम्यान आणखी तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जातेय. त्यामुळं पुढच्या काळात आणखी लिंबाच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मध्यम आकाराच्या लिंबाला प्रतिकिलो 100 रुपयांचा दर मिळत आहे. उन्हाचा चटका वाढल्यानं बाजारात लिंबाची मागणी वाढत आहे, त्यामुळं दरातही वाढ होत आहे.
लिंबाच्या दरात 350 टक्क्यांची वाढ
सध्या कर्नाटक राज्यात किरकोळसह घाऊक बाजारातही लिंबाच्या दरात वाढ झालीय. ही वाढ 350 टक्क्यांची झाली आहे. दरम्यान, तापमानात जर अशीच वाढ राहीली तर लिंब आणखी महाग होऊ शकते.
दुष्काळी परिस्थिती आणि बदलतं हवामानाचा पिकाला फटका
दुष्काळी परिस्थिती आणि बदलतं हवामान यांचा काही ठिकाणी लिंबाला फटका बसलाय. अनेक ठिकाणी लिंबाच्या बागांचं नुकसान झालं आहे. त्यामुळं बाजारपेठेत सध्या लिंबाचा म्हणावा तेवढा पुरवठा नाही. पुरवठा कमी झाल्याचा परिणाम दरावंर झालाय. लिंबू विक्रेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिना भरापूर्वी 1000 लिंबाचा दर हा 2000 रुपये होता. आता याच 1000 लिंबाचा दर हा 7000 रुपयांपेक्षा जास्त झाला आहे. त्यामुळं याचा शेतकऱ्यांना चांगला फायदा होतोय.
महाराष्ट्रातील विविध भागात तापमानाचा पारा चांगलाच वाढला
हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील विविध भागात तापमानाचा पारा चांगलाच वाढत आहे. वाढल्या तापमामुळ नागरिकांना त्रास होत आहे. महाराष्ट्रातील बहुतांश भागात तापमानाचा पारा 35 ते 40 अंशावर गेला आहे. त्यामुळं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन हवामान विभागानं गेलं आहे. दोनच दिवसात मार्च महिना संपत आहे. मात्र, यापुढेही तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळ या उन्हाच्या पार्श्वभूमीवर सावधगिरी बाळगणं गरजेच आहे.
महत्वाच्या बातम्या: