एक्स्प्लोर

1 July Financial Changes : आजपासून देशात आर्थिक नियमांत बदल, दैनंदिन जीवनावर काय परिणाम?

Changes From Today, 1st July 2022 : आजपासून देशभरात महत्त्वपूर्ण आर्थिक बदल झाले आहेत. हे बदल आपल्यासाठी अनिवार्य असणार आहेत, जाणून घ्या सविस्तर...

Changes From Today, 1st July 2022 : देशात आजपासून म्हणजेच, एक जुलै 2022 पासून आर्थिक व्यवहाराबाबतच्या नियमात काही बदल करण्यात आले आहेत. त्याशिवाय काही वस्तूंच्या दरांतही वाढ होणार आहे. या बदलांचा परिणाम आपल्या सगळ्यांच्या दैनंदिन आर्थिक व्यवहारांवर आणि खिशावरही होणार आहे. याशिवाय काही करप्रणाली, शेअर बाजार आणि कामगार नियमांमधील सुधारणाही आजपासून लागू होण्याची शक्यता आहे. 

आजपासून देशभरात महत्त्वपूर्ण आर्थिक बदल झाले आहेत. हे बदल आपल्यासाठी अनिवार्य असणार आहेत. ज्यामध्ये आजपासून देशात एकेरी प्लास्टिक वस्तूंच्या वापरावर बंदी असणार आहे. तर यासह ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून फूड ऑर्डर करताना आता खाद्यपदार्थांच्या दर्जाची माहिती देणं बंधनकारक असणार आहे. यासोबतच दुचाकी आणि एसी घेणं महाग होणार आहे. तर पॅन-आधार कार्ड लिंक केलं नसल्यास आता लिंकिंगसाठी दुप्पट शुल्क आकारलं जाणार आहे. याशिवाय कार्ड टोकनायझेशन लागू केल्यामुळे ऑनलाईन पैश्यांचा व्यवहार सुरक्षित होणार आहे. याशिवाय डिमॅट आणि ट्रेडिंग खात्यासाठी तुम्ही KYC अपडेट करू शकणार नाहीत कारण यासाठी सेबीने दिलेली मुदत 30 जूनला संपली आहे. याशिवाय आता भेटवस्तूंवर 10 टक्के टीडीएस लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा कर सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर आणि डॉक्टरांनाही लागू होणार आहे. यासोबतच  प्रत्येक व्यवहारावर 1 टक्के टीडीएस लागू करण्यात आला.

जाणून घेऊयात आजपासून कुठले नियम बदलले आहेत आणि कुठल्या वस्तू महाग होणार, जाणून घ्या सविस्तर... 

1. आधार-पॅन कार्ड लिंक करा, अन्यथा दंड

केंद्र सरकारने दंड आणि आधार कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2023 निश्चित केली आहे. 30 जून 2022 पर्यंत 500 रुपयांच्या दंडासह आधार-पॅन लिंक करण्यास मुभा देण्यात आली होती. त्यानंतर आता  एक जुलैपासून या दंडाच्या रक्कमेत वाढ होणार असून 1000 रुपयांच्या दंडासह  आधार-पॅन कार्ड लिंक करता येणार आहे. 

2. ऑनलाइन पेमेंटसाठी टोकन सिस्टीम

1 जुलैपासून ऑनलाइन शॉपिंग कंपन्या, व्यापारी आणि पेमेंट गेटवे त्यांच्या प्लॅटफॉर्मवर क्रेडिट आणि डेबिट कार्ड डेटा सेव्ह करू शकणार नाहीत. बँक ग्राहकांची सुरक्षितता लक्षात घेऊन भारतीय रिझर्व्ह बँक 1 जुलैपासून कार्ड टोकनायझेशन प्रणाली सुरू करणार आहे. या अंतर्गत, कार्डचे तपशील टोकनमध्ये रूपांतरित केले जातील. ऑनलाइन व्यवहाराची ही एक सुरक्षित पद्धत असणार आहे. 

3. भेटवस्तूंवर 10 टक्के टीडीएस

उद्योग आणि विविध व्यवसायांमधून मिळणाऱ्या भेटवस्तूंवर 1 जुलै 2022 पासून 10 टक्के टीडीएस लागू होणार आहे. हा कर सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर आणि डॉक्टरांनाही लागू होणार आहे. एखाद्या कंपनीने मार्केटिंगच्या उद्देश्यानं  सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर्सला उत्पादन, वस्तू दिल्यास त्यावर टीडीएस लागू होणार आहे. मात्र, जर तेच उत्पादन, वस्तू कंपनीला पुन्हा दिल्यास त्यांना टीडीएस भरावा लागणार नाही. 

4. एसीच्या दरात वाढ होणार 

दुचाकींच्या किंमतीसह एक जुलैपासून एसीदेखील महाग होणार आहे. Bureau of Energy Efficiency ने एसीच्या एनर्जी रेटिंगमध्ये बदल केला आहे. त्यामुळे आता 5 स्टार रेटिंग कमी होऊन 4 स्टार होणार आहे. नवीन Energy Efficiency लागू झाल्यानंतर एसीच्या किंमतीत 10 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. 

5. दुचाकींची किंमत वाढणार 

एक जुलैपासून देशात दुचाकींच्या किंमतीत वाढ होणार आहे. हीरो मोटोकॉर्पने आपल्या वाहनांच्या किंमतीत तीन हजार रुपयांनी वाढ केली आहे. कच्च्या मालाची वाढती किंमत आणि महागाई यामुळे दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. हीरो मोटोकॉर्प ही भारतीय बाजारपेठेतील आघाडीची कंपनी आहे. हीरोच्या निर्णयानंतर इतर वाहन कंपन्यांकडून वाहनांच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. 

6. क्रिप्टोकरन्सीवर द्यावा लागणार टीडीएस 

IT कायद्याच्या नवीन कलम 194S अंतर्गत, 01 जुलै 2022 पासून, क्रिप्टोकरन्सीचा व्यवहार एका वर्षात 10,000 रुपयांपेक्षा जास्त असल्यास, त्यावर एक टक्के शुल्क आकारले जाईल. आयकर विभागाने व्हर्च्युअल डिजिटल मालमत्तांसाठी अधिसूचना जारी केली आहे. सर्व NFTs किंवा डिजिटल चलने त्याच्या कक्षेत येतील.

7. डिमॅट खात्याचे केवायसी अपडेट करता येणार नाही 

डिमॅट आणि ट्रेडिंग खात्यासाठीची केवायसी प्रक्रिया कोणत्याही परिस्थितीत 30 जूनपर्यंत करावी लागणार आहे. एक जुलै नंतर तुम्ही KYC अपडेट करू शकणार नाही. त्यानंतर तुम्हाला अडचणीचा सामना करावा लागू शकतो. यापूर्वी, डिमॅट खात्यांसाठी केवायसी 31 मार्च 2022 पर्यंत पूर्ण करणे आवश्यक होते, परंतु सेबीने अंतिम मुदत 30 जूनपर्यंत वाढवली.

8. एलपीजी किमती

1 जुलै रोजी एलपीजीच्या किमती पुन्हा वाढू शकतात. सरकार दर महिन्याच्या पहिल्या दिवशी किमतीत सुधारणा करते. गॅस सिलिंडरची किंमत दर महिन्याच्या पहिल्या दिवशी बदलते. गेल्या काही महिन्यांपासून ज्या पद्धतीने दर वाढत आहेत, ते पाहता यंदा 1 जुलैपासून पुन्हा भाव वाढण्याची शक्यता आहे. यावेळी विनाअनुदानित गॅस सिलिंडर आणि व्यावसायिक गॅस सिलिंडर या दोन्हींच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.

9. गृहकर्ज EMI महाग

आजपासून, ज्या गृहकर्ज ग्राहकांची गृहकर्ज रीसेट तारीख 1 जुलै 2022 आहे त्यांच्यासाठी EMI महाग होतील. ज्यांची होम लोन रिसेट तारीख 1 जुलै आहे त्यांना या महिन्यापेक्षा जास्त ईएमआय भरावा लागेल.
 
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली

व्हिडीओ

Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ
Special Report on Sambhajinagar Sena : रशीद मामू खैरे, दानवेंमधला सामना पक्षाला महागात पडणार?
Sanjay Kelkar on Thane Mahayuti : ठाण्यातील महायुतीवर नाराजी असली तरी युती धर्म पाळणार
Chandrakant Khaire vs Ambadas Danve : भाजपला सोपं जावं म्हणून दानवेंनी... खैरेंचे स्फोटक आरोप
Anandraj Ambedkar BMC Election : भविष्यात आम्हीही बंधू एकत्र येऊ;आनंदराज आंबेडकरांचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Embed widget