परांजपे स्कीम्सची पुण्यातील धोरणात्मक जमिनींच्या संपादनासाठी WSB कडून दीडशे कोटी रुपयांची उभारणी
पुण्यातील नामांकित रिअल इस्टेट डेव्हलपर परांजपे स्कीम्स यांनी डब्ल्यू एस बी आणि त्यांच्या सहगुंतवणूकदारांमार्फत 150 कोटी रुपयांची उभारणी केली आहे.

पुणे – पुण्यातील अग्रगण्य रिअल इस्टेट डेव्हलपर परांजपे स्कीम्स यांनी डब्ल्यू एस बी (WSB) रिअल इस्टेट पार्टनर्स आणि त्यांच्या सह-गुंतवणूकदारांकडून एकूण दीडशे (₹150) कोटींची गुंतवणूक उभारली. हा निधी कंपनीच्या महत्त्वाच्या टाउनशिप प्रकल्पांमधील धोरणात्मक जमिनींच्या खरेदीसाठी वापरला जाणार आहे.
या गुंतवणुकीमुळे परांजपे स्कीम्स आणि डब्ल्यू एस बी ( WSB) यांच्यातील दीर्घकालीन भागीदारी अधिक दृढ झाली आहे. WSB रिअल इस्टेट पार्टनर्सने आपल्या फंड्स आणि सह-गुंतवणूक प्लॅटफॉर्म्सद्वारे परांजपे स्कीम्समध्ये यापूर्वीही अनेक गुंतवणुक केल्या असून त्यांच्या कामगिरीवरील विश्वास आणि वाढीच्या दृष्टिकोनाला पाठींबा दिला आहे.
या निधीचा वापर हिंजवडीतील ब्लू रिज आणि भुगावमधील फॉरेस्ट ट्रेल्स या परांजपे स्कीम्सच्या प्रमुख टाउनशिप प्रकल्पांतील उच्च संभाव्यतेच्या जमिनींच्या विकासासाठी करण्यात येणार आहे. या जमिनींवर नवीन निवासी टप्पे उभारण्यात येणार असून, त्याद्वारे या टाउनशिपमधील पायाभूत सुविधा, प्रमाण आणि जीवनशैली आणखी समृद्ध होणार आहेत.
परांजपे स्कीम्सने ३५ वर्षांच्या परंपरेसह आजवर महाराष्ट्रभर २५ दशलक्ष चौरस फूटांहून अधिक बांधकाम आणि २०,००० पेक्षा जास्त घरे पूर्ण केली आहेत. ब्लू रिज, फॉरेस्ट ट्रेल्स तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या अग्रगण्य अथश्री ही कंपनीची महत्त्वपूर्ण प्रकल्प आहेत.
याबाबत परांजपे स्कीम्सचे कॉर्पोरेट फायनान्स संचालक राहुल परांजपे म्हणाले,
“WSB रिअल इस्टेट पार्टनर्ससोबतचे आमचे दीर्घकालीन नाते आम्हाला अतिशय महत्त्वाचे आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठींब्याबद्दल आम्ही आभारी आहोत. या गुंतवणुकीमुळे आम्हाला धोरणात्मक जमिनींना विकासासाठी खुले करण्यास मदत होईल. तसेच पुढील विकास वाढीच्या टप्प्याला गती मिळेल. या प्रकल्पांतून सुमारे ₹2,500 कोटींच्या उत्पन्नाची क्षमता आहे. आमचे ध्येय दीर्घकालीन दृष्टिकोनाशी सुसंगत आहे. यातून एकत्रित आणि सशक्त समुदाय तयार करणे जे रहिवाशांचे जीवन समृद्ध करतात. ही भागीदारी म्हणजे भारतातील रिअल इस्टेट क्षेत्रात सुजाण शहरी विकास आणि दीर्घकालीन मूल्यनिर्मिती करण्याच्या दोन्ही संस्थांच्या बांधिलकीचे द्योतक आहे.
अधिक माहितीसाठी, www.pscl.in या संकेतस्थळाला भेट द्या.
Disclaimer: This is a sponsored article. ABP Network Pvt. Ltd. and/or ABP Live does not in any manner whatsoever endorse/subscribe to the contents of this article and/or views expressed herein. Reader discretion is advised.
















