एक्स्प्लोर

उडने दो म्हणताना...

लैंगिक शोषणाच्या केसेसमध्ये ड्रायव्हर, वॉचमॅन, शाळेतील शिपाई हेच गुन्हेगार असतात असे नाही, परंतु प्रत्येक केसमध्ये पहिला संशयित म्हणून त्यांच्याकडेच पाहणे कितपत बरोबर आहे?

फिल्मफेअर वेबसाईटवर 2019 या वर्षातील पुरस्कारासाठी नामांकन मिळालेले काही लघुपट ( शॉर्टफिल्म्स) पाहायला मिळाले. त्यामध्ये fiction (काल्पनिक)या विभागात 'उडणे दो' नावाचा एक लघुपट होता. विषय होता "गुड टच आणि बॅड टच"चा. शाळकरी मुलामुलींना आपल्या व परक्या माणसांकडून होणारा चांगला-वाईट स्पर्श ओळखता यावा, अज्ञानामुळे ते लैंगिक शोषणाला बळी पडू नयेत म्हणून त्यांना या विषयाचं ज्ञान देणं किती गरजेचं आहे यावर प्रकाश टाकणारा हा लघुपट मुलामुलींना आणि त्यांच्या पालकांना निश्चितच सावध करणारा आहे. पण अत्यंत चांगल्या हेतूने बनविलेल्या या लघुपटातील काही बाबी मात्र खटकणाऱ्या आहेत. उडणे दो लघुपटामध्ये 'बॅड टच गुड टच'च्या वर्कशॉपमध्ये आपल्याला कोण बॅड टच करू शकतं? याविषयी सांगताना वर्कशॉपमधील शिक्षिका म्हणते की 'बॅड टच करणाऱ्यांमध्ये तुमचे आंटी-अंकल, तुमचे फ्रेंड्स असू शकतात अथवा बस ड्राइव्हर, माळी, वॉचमन किंवा तो पुरुष तुमच्या शाळेतील शिपाईही असू शकतो.' पण बस ड्राइव्हर, माळी, शिपाई ही नावं घेताना त्या शिक्षिकेच्या आवाजात बराच ठामपणा दाखवला आहे. लघुपट म्हणून खूप चांगला असला तरी मुलांना चुकीचा स्पर्श करून त्यांच्या लैंगिक शोषणाला कारणीभूत असणारा वर्ग म्हणून तृतीय क्षेत्रात अर्थात सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांवर निशाणा साधला आहे. त्याच लघुपटातील एका मुलासोबत वाईट वागणारा पुरुष म्हणून त्याच्या नात्यातील पुरुष दाखवला असला तरी मुलीशी चुकीची वर्तणूक करणाऱ्या शिपायावर जास्तीत जास्त फोकस करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. लघुपटातील शाळा ही उच्चशिक्षित व उच्चवर्गीय लोकांच्या मुलांसाठीची आहे. 'स्पर्श' नावाचा अजून एक लघुपट यू ट्युबवर बघायला मिळाला. त्यामध्ये उच्चवर्गातील एक मॉडर्न मुलगी टॅक्सी ड्रायव्हरशी अत्यंत उद्धटपणे वागून त्याला अपमानित करते. तो त्याचं त्याचं काम करत तिचा प्रतिवाद करत असतो. पण जेव्हा ती त्याची कॉलर धरते तेव्हा मात्र झटापटीत त्याचा तिला स्पर्श होतो. ड्रायव्हरची काहीही चूक नसताना मुलगी पोलिसांना बोलावून 'याने मला वाईट हेतूने स्पर्श केला' असा आरोप त्याच्यावर करून त्याला पोलिसांच्या ताब्यात देते. ड्रायव्हर कितीही खरं बोलत असला तरी तक्रार करणारी ही मुलगी आहे आणि ड्रायव्हर लोकांची मुलींवर वाईट नजर असते या पूर्वग्रहदूषित शक्यतेचा विचार करून पोलिसांना ड्रायव्हरवर केस दाखल करावी लागते. लॉकअप मधून ड्रायव्हरला मारल्या जाणाऱ्या प्रत्येक फटक्यासरशी ड्रायव्हरचा विव्हळणारा आवाज ऐकून त्या मुलीला कोण शांती मिळते! उडणे दो आणि स्पर्श दोन्ही लघुपटांमध्ये शोषित म्हणून आर्थिक व शैक्षणिकदृष्ट्या उच्चवर्ग तर शोषक वर्ग म्हणून सेवा वर्गातील व्यक्तींना दाखवले आहे. नकळत्या किंवा कळत्या वयातल्या मुलामुलींशी विकृत वर्तन करणाऱ्या, त्यांचे लैंगिक शोषण करणाऱ्या व्यक्ती या केवळ तृतीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीच असतात का? आणि उच्चवर्गातील सगळ्याच्या सगळ्या व्यक्ती या धुतल्या तांदळासारख्या असतात का? हे कळीचे प्रश्न हे दोन्ही लघुपट पाहिल्यानंतर माझ्या मनात उपस्थित झाले. लैंगिक शोषणाच्या अनेक केसेसमध्ये आपण बघतो की लैंगिक शोषण करणारे हे अधिकतर पीडित मुलाच्या/मुलीच्या नात्यातले किंवा कुटुंबियांच्या खूप परिचयाचे लोक असतात. बऱ्याचशा केसेसमध्ये ड्रायव्हर, वॉचमॅन, शाळेतील शिपाई असतात असे नाही, परंतु प्रत्येक केसमध्ये पहिला संशयित म्हणून त्यांच्याकडेच पाहणे कितपत बरोबर आहे? त्या वर्गातील चार लोकांनी माती खाल्ली म्हणून तो संपूर्ण वर्गच बदनाम करताना आपण गव्हाबरोबर किडेही रगडत नाही ना? याचाही विचार व्हायला हवा. मध्यंतरी दिल्लीत एका ओला कार चालवणाऱ्या ड्रायव्हरच्या माणुसकीचा एक किस्सा खूप व्हायरल झाला होता. संतोष गुहा या ओला ड्रायव्हरने दोन महिलांना रात्री एक वाजता इच्छित स्थळी सोडले परंतु त्यांच्या सोसायटीचे गेट बंद असल्याने तो त्यांच्यासोबतच थांबून राहिला. तब्बल दीड तासाने गेट उघडल्यानंतर त्या आत गेल्यानंतरच ड्रायव्हर तिथून निघाला. आणि महत्वाची गोष्ट ही की त्या दीड तासात एकही बुकिंग त्याने घेतले नाही. गोरेगावमध्ये रात्री साडेबाराला स्टॉपवर उतरलेल्या मुलीची रिक्षा येईपर्यंत बस ड्रायव्हरने बस थांबवून ठेवल्याचाही किस्सा ताजाच आहे. श्रीमंत लोकांच्या रिक्षात, टॅक्सीत विसरलेल्या लाखो रुपयांच्या बॅगा परत करणारेही हेच ड्रायव्हर असतात. पण उच्चवर्गातील लोकांसाठी कुठे थोडं खुट्ट झालं की संशयित म्हणून आरोप करायला हे ड्रायव्हर, माळी, शिपाई लोक हक्काची जागा असतात. मोठमोठ्या सोसायट्यांमध्ये राहणारे श्रीमंत लोक कुणाच्या जीवावर विनाग्रीलच्या खिडक्या, गॅलऱ्या सताड उघड्या ठेवून शांतपणे झोप घेऊ शकतात? त्यांच्या मुलांना बागेत, सोसायटीच्या मोकळ्या जागेत कोणाच्या जबाबदारीवर ते खेळायला सोडतात? त्यांच्या मुलांना शाळेतून वेळेवर जपून ने-आण करण्याची भूमिका कोण पार पाडतं? रात्री-अपरात्री पार्ट्या संपवून ड्रिंक्स घेऊन तर्राट झालेल्या यांच्या मुलामुलींना अगदी सुरक्षितपणे घराच्या दारापर्यंत कोण आणून सोडतं? शाळेच्या वेळेत कुठे दुखलं खुपलं तर त्यांची काळजी घ्यायला कोण तत्पर उभं राहतं? याचा कृतज्ञातापूर्वक विचार होत नाही. त्यांना त्यांच्या सेवेचा आर्थिक मोबदला योग्य मिळतो अथवा नाही हा विषय बाजूला ठेवूया. या सेवेकऱ्यांकडून सेवा करून घ्यायला उच्चशिक्षित व उच्चवर्गीय लोक जेवढे पुढे असतात तेवढेच किंबहुना त्याहूनही पुढे ते त्यांच्या चांगुलपणाकडे दुर्लक्ष करून वाईटपणाला गृहीत धरण्यात असतात. त्यांचा पदोपदी अपमान करणे, छोट्याशा चुकीपाई अंगावर ओरडणे, वेळप्रसंगी मारहाण करणे या फार सामान्य गोष्टी झाल्या आहेत. एखाद्या मुलामुलीच्या बाबतीत वाईट प्रसंग घडला की याच लोकांना जबाबदार धरून शहानिशा न करता पोलिसांच्या ताब्यात देण्याचं प्रमाणही झपाट्याने वाढत आहे. क्राइम पेट्रोल, सावधान इंडिया या गुन्हेविषयक कार्यक्रमातही बलात्काराच्या, लैंगिक शोषणाच्या केसेसमध्ये सोसायटीचा वॉचमॅन, बस ड्रायव्हर, माळी यांचीच प्रथम चौकशी केल्याचं दाखवलं जातं. या अशा कार्यक्रमांमुळेच लोक सुरक्षा, देखभाल, घरकाम यांसारखी कामे करणाऱ्या व्यक्तींकडे सतत संशयाने पाहू लागले आहेत. उडणे दो किंवा fight for freedom म्हणताना आपल्या पायाखाली एखादा गरीब निष्पाप जीव तर चिरडला जात नाही ना? किंवा सेवेकरी वर्गाकडे पूर्वग्रहदूषित नजरेतून बघून आपण चोर सोडून संन्याशाला तर फाशी देत नाही ना? याचा गांभीर्याने विचार होणं गरजेचं आहे. नाहीतर केवळ दलित आहेत म्हणून त्यांच्यावर अन्याय अत्याचार करणारे सवर्ण आणि शिक्षण आणि पैसा असूनही असंस्कृत राहिलेला उच्चवर्ग यांच्यात फरक करता येणार नाही. उडने दो म्हणताना... 'उडणे दो ' हा लघुपट विद्यार्थी आणि पालकांना एकत्रितपणे अनेक शाळांमध्ये दाखवला जाईल. त्याचा फायदा मुलामुलींच्या धीटपणात वाढ होण्यासाठी व पालकांना सावधान करण्यासाठी खात्रीने होईलच पण त्याचबरोबर या मुलामुलींमध्ये आपापल्या शाळेतले शिपाईमामा, माळीकाका, ड्राइवर, वॉचमॅन या काही अपवाद वगळता निरुपद्रवी लोकांकडे कायम संशयित नजरेनेच बघण्याचा कायमस्वरूपी दृष्टीकोण तयार होईल याचाही धोका संभवतो. चालू पिढीला काय गुड आणि काय बॅड हे समजावून सांगत असताना येणाऱ्या पिढीत भविष्यात एक मोठी सामाजिक दरी तर आपण निर्माण करत नाही ना? याचे तुम्ही आम्ही आणि मीडियात काम करणाऱ्या सर्वांनीच आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे.
View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

SBI : आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले, कोणाला फायदा होणार? 
आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर गगनाला भिडले, विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले....
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर नियंत्रणावर केंद्रीय मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या
ट्रम्प यांनी टॅरिफ लादलं, भारतानं जुमानलं नाही, रशियाकडून तेल खरेदी सुरुच ठेवली, नोव्हेंबरमध्ये विक्रमी तेल खरेदी
ट्रम्प टॅरिफला न जुमानता भारताची रशियाकडून विक्रमी तेल खरेदी, नोव्हेंबरची आकडेवारी समोर
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
ABP Premium

व्हिडीओ

Savarkar Statue Andaman : सावरकरांना वंदन, पुतळ्याचं अनावरण Special Report
Maratha Reservation Hyderabad gazette : हैदराबाद गॅझेटचा खरंच फायदा झाला का? Special Report
CBSE Syllabus : CBSE भोंगळ कारभारावर शिवप्रेमींचा संताप Special Report
Nashik Tapovan Kumbhmela :  तपोवनचा वाद, संतापला हरित लवाद Special Report
Shiv Sena-BJP Alliance : महानगर पालिका निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना यांच्यात युती Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SBI : आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले, कोणाला फायदा होणार? 
आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर गगनाला भिडले, विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले....
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर नियंत्रणावर केंद्रीय मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या
ट्रम्प यांनी टॅरिफ लादलं, भारतानं जुमानलं नाही, रशियाकडून तेल खरेदी सुरुच ठेवली, नोव्हेंबरमध्ये विक्रमी तेल खरेदी
ट्रम्प टॅरिफला न जुमानता भारताची रशियाकडून विक्रमी तेल खरेदी, नोव्हेंबरची आकडेवारी समोर
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
Embed widget