एक्स्प्लोर
Advertisement
काल रात्री आणि आज दिवसभरात काय घडलं ? पवईच्या रेनीसॉन्स हॉटेलमध्ये
आमदार कुठे जातोय, कोणाला बोलतोय, आमदाराकडे कोण जातंय, या प्रत्येक घडामोडीवर शिवसैनिकांचे बारीक लक्ष होते. सगळी जबाबदारी राजन विचारे आणि श्रीकांत शिंदे दोन खासदार यांनी पार पडली. शिवसेनेचे कार्यकर्ते काही रात्रभर जागे होते. प्रत्येक आमदाराच्या रूम समोर एक नगरसेवक रात्रभर खुर्चीवर बसून होता. असं वाटलं होतं की सकाळी नाश्त्याला सगळे आमदार भेटतील पण सगळ्या आमदाराचा नाश्ता देखील त्यांच्या रूममध्ये पोहोचेल याची व्यवस्था करण्यात आली होती.
मुंबई : यशवंतराव चव्हाण सेंटर वरून निघालेली बस रात्री अकराच्या दरम्यान पोहोचली. बस पोहचेपर्यंत शिवसेना रेनीसॉन्स हॉटेलचा ताबा घेतलेला होता. प्रत्येक आमदार मागे शिवसेनेचे दहा शिवसैनिक आणि एक नगरसेवकांवर जबाबदारी देण्यात आली होती. आमदारांनी हॉलमध्ये जेवण केलं आणि नंतर रूममध्ये पोहोचले. शिवसैनिक रात्रभर रेनीसॉन्स हॉटेलमध्ये पहारा देत होते. आमदार ज्या फ्लोरवर राहिले आहेत त्या प्रत्येक फ्लोरवर रूमच्या बाहेर खुर्चीवर एक शिवसैनिक बसून होता.
आमदार कुठे जातोय, कोणाला बोलतोय, आमदाराकडे कोण जातंय, या प्रत्येक घडामोडीवर शिवसैनिकांचे बारीक लक्ष होते. सगळी जबाबदारी राजन विचारे आणि श्रीकांत शिंदे दोन खासदार यांनी पार पडली. शिवसेनेचे कार्यकर्ते काही रात्रभर जागे होते. प्रत्येक आमदाराच्या रूम समोर एक नगरसेवक रात्रभर खुर्चीवर बसून होता. असं वाटलं होतं की सकाळी नाश्त्याला सगळे आमदार भेटतील पण सगळ्या आमदाराचा नाश्ता देखील त्यांच्या रूममध्ये पोहोचेल याची व्यवस्था करण्यात आली होती.
सकाळ सकाळची एक घटना राष्ट्रवादीचा एक आमदार व्यायाम करण्यासाठी बाहेर गेला. त्यावेळी त्याच्या अवतीभोवती देखील शिवसैनिकांचा पहारा होता .एक महिला आमदार ज्यांना डॉक्टरांनी चालण्यासाठी सांगितलं होतं. त्या बाहेर पडल्या त्या सोबतच काही शिवसैनिकही त्यांच्यासोबत बाहेर पडले शेवटी त्यांना फोन करून सांगावं लागलं की माझे पाय दुखतात म्हणून पाय मोकळे करत आहे. कृपया या शिवसैनिकांना मागे पाठवू नका. म्हणजेच शिवसैनिकाला जी जबाबदारी दिली होती ती जबाबदारी प्रत्येक जण पार पडत होता.
आजच्या घडामोडी साठी एक व्हाट्सअप ग्रुप देखील होता .एखादा आमदार दुसऱ्या मजल्यावर जात असेल तर दुसर्या मजल्यावर सूचना देखील पोहोचत होत्या सकाळी दहा वाजता पुन्हा हॉटेलमध्ये लगबग सुरू झाली बातमी होती शरद पवार आणि उद्धव ठाकरे येणार असल्याची त्यानंतर तर हॉटेलमध्ये कार्यकर्त्यांची अधिक गर्दी वाढलेली होती. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि सुप्रिया सुळे यांची टीमही हॉटेलच्या परिसरात कार्यरत होती.
उद्धव ठाकरे येणार असल्याने येथे शिवसैनिकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर ती वाढली सुरुवातीला शरद पवार आले त्यानंतर उद्धव ठाकरे आणि नंतर आदित्य ठाकरे हॉटेलमध्ये पोहोचले तीनही नेत्यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांसोबत संवाद साधला त्यानंतर आमदारांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या भाषणाची चर्चा जोरदार सुरु होती. त्यानंतर शरद पवार ,उद्धव ठाकरे यांची हॉटेल रेनीसन्सच्या सहाव्या मजल्यावर बंद दाराआड चर्चा झाली.
उद्धव ठाकरे यांनी आमदारांना कुठल्याही चर्चावर विश्वास न ठेवण्याचा आवाहन करत राष्ट्रवादीच्या आमदारांना विश्वास दिला. दुपारनंतर पुन्हा एकदा हॉटेल रेनीसॉन्स हॉटेलच्या हॉलमध्ये सर्व आमदार एकत्र आले आत मध्ये काहीतरी कागदपत्रांची जमवाजमव सुरू होती. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कागदपत्र घेऊन ये जा करत होते जितेंद्र आव्हाड त्यांची टीम सुप्रिया सुळे त्यांची टीम आणि शिवसैनिक आमदारांवर ती लक्ष ठेवून होते. एका आमदारांचा फोन लागला नाही ते गाडीत जाऊन झोपले होते. तेव्हा काही काळ धावपळ झाली ज्यांच्यावर त्यांना सांभाळण्याची जबाबदारी देण्यात आली होती त्यांची कुजबुजली ऐकायला आली. मात्र जीतेंद्र आव्हाड यांनी त्यांना शोधून परत हॉटेलमध्ये बोलावले प्रत्येक आमदारांच्या सह्या घेतल्या जात होत्या शपथपत्र वगैरे केलं जात होतं. नंतर पुन्हा कुजबुज सुरु झाली या हॉटेल मधूनही राष्ट्रवादीचे आमदार इतर ठिकाणी हलवले जाणार होते. त्याची देखील तयारी शिवसैनिकांनी सुरू केली होती.
संध्याकाळी सहाच्या दरम्यान एक बस हॉटेलच्या दारात उभी होती. शिवसैनिक अवतीभवती होते. आमदारांच्या सामानाची आवराआवर झाल्यावर शिवसैनिकांनी साखळी तयार केली. दिवसभरात कोणालाही मोबाईलवर शूटिंग काढू दिले जात नव्हतं .कोणी शूटिंग काढताय का यावरही बारीक नजर होती. कारण काही पोलीस साध्या देशात शूटिंग करताना कार्यकर्त्यांना दिसून आले होते .त्यामुळे कोण शूटिंग करता आहे कशासाठी करत आहे याची बारकाईने चौकशी केली जात होती. शूटिंग करणाऱ्याच्या मागेही मोबाईल काढला की चार-पाच कार्यकर्ते असायचे. अखेर शिवसैनिकांच्या साखळीतून एकेक आमदार बसमध्ये बसत होते. त्यावेळी खरोखरच शिवसैनिकांनी, ताई आव्हाड यांनी केलेल्या नियोजनाची जाणीव होत होती . कधीकधी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आपल्या मागे असलेल्या शिवसैनिकांचा विटही आला असेल काहींनी ते बोलूनही दाखवलं. पण आज दिवसभर रेनीसन्स हॉटेलला शिवसैनिकांनी गराडा घातला होता. आणि प्रत्येक घडामोडींवर प्रत्येक कार्यकर्ता लक्ष देऊन होता. मी आज हे दिवसभर जाणवत होतं. आज दिवसभर चर्चा होती ती जितेंद्र आव्हाड सुप्रिया सुळे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना केलेल्या नियोजनाची.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
बातम्या
क्रिकेट
भविष्य
Advertisement