एक्स्प्लोर

घातक ‘प्लॅस्टिक’युग

जगभरात दरवर्षी जवळपास आठ मिलियन मेट्रिक टन प्लॅस्टिक समुद्रात ढकललं जातं. अगोदरच 150 मिलियन मेट्रिक टन प्लॅस्टिकमध्ये हे ढकललं जातं आणि समुद्रातील पर्यावरणाला दूषित करतं. हाच ट्रेंड कायम राहिला तर 2050 पर्यंत म्हणजे पुढच्या 32 वर्षात जगभरातील समुद्रात माशांपेक्षा प्लॅस्टिक जास्त असेल.

मी हा ब्लॉग टाईप केलाय तो की-बोर्ड, तुमचा मोबाईल, संगणक, ज्या वाहनाने घरी जाता ती कार, ज्याने पाणी पिता ती बॉटल आणि रोजच्या जीवनावश्यक वस्तूंमध्ये प्लॅस्टिकचा मोठा वाटा आहे. पण रोज वापरण्यात येणाऱ्या प्लॅस्टिकमध्ये 50 टक्के प्लॅस्टिक हे वन टाईम युज म्हणजे एकदाच वापरलं जातं आणि रस्त्यावर किंवा समुद्रात जमा होतं. कालच्या जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने 2022 पर्यंत भारत सिंगल युज प्लॅस्टिक नष्ट करेन, असा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला. अनेक क्षेत्रातील दिग्गजांनी काल रस्त्यावर येत प्लॅस्टिक मुक्तीचं आवाहन केलं, अनेकांनी समुद्र किनाऱ्यावर जाऊन स्वच्छता केली, पण प्रश्न असाय की सर्वांना खरंच प्लॅस्टिक बंदी किंवा प्लॅस्टिकचा वापर बंद करणं पटतं का? ते पटण्यासाठी विषयाचं गांभीर्य त्यांना माहीत आहे का आणि माहित असूनही आपण तसेच डोळ्यांवर पट्टी बांधतोय का? जगभरात दरवर्षी जवळपास आठ मिलियन मेट्रिक टन प्लॅस्टिक समुद्रात ढकललं जातं. अगोदरच 150 मिलियन मेट्रिक टन प्लॅस्टिकमध्ये हे ढकललं जातं आणि समुद्रातील पर्यावरणाला दूषित करतं. हाच ट्रेंड कायम राहिला तर 2050 पर्यंत म्हणजे पुढच्या 32 वर्षात जगभरातील समुद्रात माशांपेक्षा प्लॅस्टिक जास्त असेल, अशी भीती काल संयुक्त राष्ट्र संघाच्या सचिवांनी व्यक्त केली. समुद्रात जमा होणारं हे प्लॅस्टिक कुणी थेट समुद्रात नेऊन टाकत नाही. हे आपल्या घरातून रस्त्यावर किंवा नाल्यांमध्ये आणि पुढे विविध मार्गातून ते समुद्रात जातं. प्लॅस्टिक समुद्रात गेलं म्हणजे आपली जबाबदारी संपली असं ज्यांना वाटत असेल त्यांनी हा मुद्दा अत्यंत गांभीर्याने लक्षात घेणं गरजेचं आहे. समुद्रात गेलेल्या या प्लॅस्टिकचे बारीक बारीक कण तयार होतात, जे जलचर प्राणी खातात, मासे हे कण खातात तेव्हा त्यांच्या पोटात याचं विष तयार होतं, परिणामी मासे आणि इतर जलचर प्राण्यांचा यामुळे मृत्यू होतो. हेच मासे वगैरे आपण खाल्ले तर आपल्यालाही विविध आजार होतात. यापेक्षा भीषण म्हणजे हेच कण आपल्या रोजच्या जेवणातलं जे मीठ असतं त्यातूनही आपल्या पोटात जातात. भारतात पोरबंदर, सोमनाथ, भावनगर, दमन, सुरत, मुंबई गोवा, उडपी, कोची, तिरुवअनंतपुरम, रामेश्वरम, पुद्दुचेरी, विशाखापट्ट्णम्, चेन्नई आणि पुरी ही शहरं समुद्राच्या काठावर आहेत. या शहराचा सगळा प्लॅस्टिक कचरा समुद्रात जातो, कचरा नष्ट करणे म्हणजे तो समुद्रात फेकणं हा एक साधा आणि अत्यंत चुकीचा समज आपल्याकडे आहे. पर्यावरणाच्या बाबतीत, जे आपल्याला निरोगी ठेवतं, चांगलं आयुष्य जगण्याची हमी देतं, त्याच्या बाबतीत आपण किती उदासीन आहोत, हे एक रिपोर्ट सांगतो. ‘सायन्स अॅडव्हान्स’च्या रिपोर्टनुसार, जगभरात केवळ नऊ टक्के प्लॅस्टिकवर प्रक्रिया केली जाते, 12 टक्के प्लॅस्टिक जाळलं जातं, जे पुन्हा हवा प्रदूषणाच्या माध्यमातून आपल्यासाठीच धोकादातक ठरतं, तर 79 टक्के प्लॅस्टिक पर्यावरणाचा एक भाग आहे जे सध्या समुद्रात किंवा इकडे-तिकडे पडलेलं आहे. 2050 पर्यंत एक अब्ज 20 कोटी टन प्लॅस्टिक कचरा तयार होण्याचं सध्या चित्र आहे. एवढ्या माहितीनंतरही प्लॅस्टिकमुक्तीचं महत्त्व लक्षात आलं नसेल तर आणखी एक आकडेवारी चिंता वाढायला लावणारी आहे. तुम्ही बाजारातून भाजीपाला आणलेली पिशवी (याच पिशव्यांचं प्रमाण जास्त आहे) फेकून दिली तर पुढचे 20 वर्ष ती नष्ट होत नाही. शीतपेय पिऊन फेकलेली कॅन साधारणपणे 200 वर्ष नष्ट होत नाही, डायपर 450 वर्ष, प्लॅस्टिकचे चमचे एक हजार वर्ष, काचेच्या बाटल्या चार हजार वर्ष, तर प्लॅस्टिकच्या बाटल्या कधीही नष्ट होत नाहीत. यावरुन आपण लक्षात घेऊ शकतो की आपण प्लॅस्टिक फेकण्याची केलेली एक चूक पुढचे किती वर्ष पर्यावरणाला शिक्षा देते. यावर काही पर्याय आहे का? या प्रश्नाचं उत्तर नक्कीच हो असं आहे. काही प्लॅस्टिकच्या वस्तू आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनल्या आहेत, त्यामुळे त्या वापरणं कसं बंद करायचं हा प्रश्न स्वाभाविकपणे पडू शकतो. मात्र प्रत्येक गोष्टीवर उपाय असतो तसाच यावरही आपण ठरवलं तर बरंच काही करु शकतो. रोज वापरण्यात येणाऱ्या पिशव्या वापरणं बंद करुन त्याला इको फ्रेंडली आणि कागदी पिशव्यांचा पर्याय आहे, प्लॅस्टिक चमचांऐवजी धातूचे चमचे, सिंथेटीक फॅब्रिक कपड्यांऐवजी कॉटन, लहान मुलांना हौसेने जे प्लॅस्टिक खेळणी आणतो त्याऐवजी मुलांचं भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी लाकडांची खेळणी आणता येतील. जगभरात दर मिनिटाला जवळपास 10 लाख प्लॅस्टिक बाटल्यांची खरेदी होते, त्यामुळे पुन्हा पुन्हा वापरता येतील अशा बाटल्या घेऊ शकतो, बाहेरच्या देशातून येणारं पॅकिंग अन्न जे घेता त्यापेक्षा लोकल ब्रँडला पसंती दिली तर दुहेरी फायदा होईल, प्रत्येक कचरा फेकण्यासाठी डस्टबिनचा वापर, घरातल्या सजावटीसाठी प्लॅस्टिकचा वापर टाळणं असे कित्येक उपाय आपण ठरवलं तर करु शकतो. महाराष्ट्र प्लॅस्टिक बंदी करणारं देशातलं पहिलं राज्य ठरलं, तामिळनाडूनेही जानेवारी 2019 पासून पूर्णपणे प्लॅस्टिकचा निर्णय घेतलाय. केंद्र सरकारही याबाबत गंभीर आहे, पण गंभीर तुम्ही आम्ही होणं गरजेचं आहे. कारण, सरकार नियम आणि कायदे बनवू शकतं, पण ते पाळण्याची जबाबदारी आपली आहे. प्रत्येक घराघरातून बाहेर येणारा प्लॅस्टिक कचरा बंद झाला आणि प्रत्येक व्यक्तीला आपली वैयक्तिक जबाबदारी समजली तर प्लॅस्टिकमुक्तीची क्रांती घडवणं आपल्याच हातात आहे.
अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhagan Bhujbal Stylish Look : गॉगल,मफ्लर, शूज ते कडक ब्लेजर...स्टार्सना टक्कर देणारा भुजबळांचा लूक!Chhagan Bhujbal NCP Adhiveshan Shirdi :नाराजी दूर झाल्याचा प्रश्नच नाही...छगन भुजबळांचं मोठं वक्तव्यAjit Pawar Shirdi : राष्ट्रवादीच्या अधिवेशनासाठी अजितदादा शिर्डीत, साईंच्या चरणी नतमस्तकNCP Ajit Pawar Shirdi : 500 पदाधिकाऱ्यांना निमंत्रण,दादांची रांगोळी; NCPच्या शिबिराची तयारी पाहा

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Chhagan Bhujbal : पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
Chhagan Bhujbal : पहिल्यांदाच पंकज दिसताच चर्चा सुरु झाली, पण तटकरेंनी विनंती करताच नाराज छगन भुजबळही अधिवेशनाला पोहोचले
पहिल्यांदाच पंकज दिसताच चर्चा सुरु झाली, पण तटकरेंनी विनंती करताच नाराज छगन भुजबळही अधिवेशनाला पोहोचले
Nashik Accident : कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
Dhananjay Munde : प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
Embed widget