एक्स्प्लोर
ही तरुण पिढी बदलतीये
जेंव्हा विद्यार्थी विद्यार्थिनींच्या स्वातंत्र्यसाठी एक होतात, त्यांच्या पाठीशी उभं राहतात. विद्यार्थिनी तोकडे कपडे घालू नये, याबाबत अनेक बातम्या मुंबई पुण्यासारख्या शहरातील महविद्यालयात झाल्या आणि वाद पण झाले. आज जेजे वैद्यकीय महविद्यालयात अशीच एक स्टोरी करतानाचा किस्सा ज्यामध्ये मुलींवर लादलेल्या जाचक नियम आणि अटींविरोधात मुलांनी सुद्धा साथ देत त्यांना लढायला प्रवृत्त केलं.

जेंव्हा विद्यार्थी विद्यार्थिनींच्या स्वातंत्र्यसाठी एक होतात, त्यांच्या पाठीशी उभं राहतात. विद्यार्थीनी तोकडे कपडे घालू नये, याबाबत अनेक बातम्या मुंबई पुण्यासारख्या शहरातील महविद्यालयात झाल्या आणि वाद पण झाले. आज जेजे वैद्यकीय महविद्यालयात अशीच एक स्टोरी करतानाचा किस्सा ज्यामध्ये मुलींवर लादलेल्या जाचक नियम आणि अटींविरोधात मुलांनी सुद्धा साथ देत त्यांना लढायला प्रवृत्त केलं.
काल रात्री काही 3-4 मुलींचे कॉल आले की, 'जेजे मेडिकल कॉलेजमध्ये काही नियम केलेत असा मेसेज हॉस्टेल वार्डनने आम्हा मुलींना पाठवलं आहे. ज्यामध्ये आम्हाला महविद्यालयात सुरु असलेल्या कार्यक्रमात तोकडे कपडे घातल्यास कारवाई होणार, 10च्या आत हॉस्टेलमध्ये यावं लागणार' वगैरे वगैरे... सगळं सांगितलं...बातमी समजली...पण ह्यावर कॉल कोणी केला त्याचं नाव सांगायला पण मुली घाबरत होत्या... आता तुम्ही म्हणाल 'का ?' त्याच कारण सगळ्या ठिकाणी एकच असतं, ' सर आम्ही बोललो, आम्ही समोर आलो तर आमचं वर्ष हे कॉलेज वाया घालवेल, कारण इंटर्नल मार्क्स यांच्या हातात आहेत..मग आम्ही नाही बोलू शकत. पण आम्हाला त्रास होतो या अटींचा, नियमांचा'...
मुली बोलणार नाही हे स्पष्ट झालं...बातमीची दुसरी बाजू म्हणजे जेजे सारख्या नामांकित मेडिकल कॉलेजची बाजू डीनकडून समजून घेतली. त्यांनी सांगितलं आम्ही हे नियम केले पण एका कार्यक्रमापुरते आम्ही ड्रेस कोडचा नियम ठेवला होता, असं डीन अजय चांदनवाले त्यांनी सांगितलं...
मग मुलींच्या बाजूमध्ये पण तथ्य असा होता की जेजे सारख्या महविद्यालयात आता मुलगा-मुलगी कॅम्पसमध्ये गप्पा करताना दिसले किंवा ग्रुपमध्ये जरी दिसले तर त्यांना जाब विचारला जातोय, पोलीस, सेक्युरिटी त्यांना पळवून लावताय..हे जरा भयंकर होतं.. मुलं हे रात्रभर बाहेर फिरू शकतात पण मुलींनी रात्री 10 च्या आत हॉस्टेलमध्ये यायचं, याबाबत मुलींनी वार्डनला याचं कारण विचारलं तर वार्डनकडून उत्तर मिळालं 'मुली प्रेग्नेंट होतात, मुलं नाही'.
वाह! हे उत्तर हसण्यासारखं तर होतंच पण एक तरुण तरुणीच्या मनात चीड आणणाराही...आता यावर मुली बोलणार नाही हे पक्क झाल्यानंतर त्यातील काही तरुण विद्यार्थी ( मुलं ) एकत्र आले आणि मुलींना बोलायला त्यांनी धाडस दिल. हे इतर कॉलेजमध्ये खूप कमी पाहायला मिळत. कारण मुलींचे प्रॉब्लेम या मुली सोडवतात. नाही सोडवता आले तर सहन करत बसतात किंवा सोडून देतात.
पण जेंव्हा मुलांनी मुलींना याबाबत बोलण्यासाठी प्रवृत्त केलं तेंव्हा 'तुम्ही आम्हाला ब्लर करा किंवा चेहरा दाखवू नका, पण आमचं म्हणणं लोकांना कळू द्या' असं मेडिकल टॉपर्स विद्यार्थिनी बोलल्या तेंव्हा जरा विचारात आम्ही पडलो.. ज्या मुली नीट, सीईटीसारखी परीक्षा क्रॅक करून नामांकित मेडिकल कॉलेजमध्ये शिकतात. तेंव्हा त्यांना आपली बाजू मांडण्यासाठी कॉलेजच्या धाकात राहावं लागत. आपण अपराधी नसलो तरी वर्ष वाया जाईल, हे कॉलेज आम्हाला इंटर्नलमध्ये फेल करेल या भीतीने जाऊ द्या करू सहन हा विचार विद्यार्थी करतात याचं वाईट वाटतं...
अखेर त्यांनी ठरवलं आपण बोलायचं, संतप्त प्रतिक्रिया देण्यासाठी आम्ही 70 ते 80 मुलींना अपरेन घालून तयार केलं आणि स्टोलने चेहऱ्यावर झाकून बोलत केलं..यासाठी मुलांनी मुलींना पाठींबा दिला...'तुम्ही तुमचं म्हणणं मांडा आम्ही मुलं तुमच्यासोबत आहोत', हे जेव्हा मुलांनी मुलींना सांगितलं...तेंव्हा खरंच वाटलं, एक तरुण गट शिकलेला, समाजाचा भान असलेला, पुढारलेल्या विचारांनी पुढे येणारा असा तयार होतोय, जो अन्याया विरोधात, तरुण तरुणीच्या स्वातंत्र्यवर घाला घालणाऱ्या नियमाविरोधात एकत्र येऊन लढणारा आहे...हा ग्रुप हा गट आता पुढे येऊन परिवर्तन घडवेल ही आशा आहे...त्यासाठी आपण तरुणांनी एकत्र यायला हवं आणि साथ एकमेकांना साथ द्यायला हवी... तरच हा गट वेगळ्या विचारसरणीने जगायला शिकवेल...नाहीतर हे भीतीच भूत वर्षांवर्षे तरुणांच्या मानगुटीवर बसेल.
View More

























