एक्स्प्लोर
Advertisement
BLOG | पडद्यामागचा 'कोव्हिड योद्धा'
प्रतिकूल परिस्थिती 'गंभीर' झाली, पण आपण 'खंबीर' असल्याचा विश्वास उद्धव ठाकरेंनी जनतेला दिला. त्यामुळे सर्वच स्तरावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर कौतुकाचा वर्षाव सुरु झाला. पण नुसतं मुख्यमंत्र्यांचं कौतुक करून चालणार नाही, तर त्यामागे दडलेल्या अनेक हातांचं कौतुक करावं लागेल. कारण मुख्यमंत्र्यांच्या मागे दडलेले नुसते हात नाहीयेत तर योद्ध्याची ढाल बनून काम करत आहेत. त्यापैकीच एक नावम्हणजे - 'आदित्य उद्धव ठाकरे'
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव सुरु आहे. कुणी फोन करून कौतुक करतंय तर, कुणी सोशल मीडियावर कौतुक करतंय. स्वाभाविक आहे, कारण, कोणताही प्रशासकीय अनुभव गाठिशी नसताना अचानक ओढावलेल्या संकाटाला एक मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे ज्या हिमतीनं तोडं देत आहेत, त्यामुळे कौतुक होणं सहाजिक आहे.
मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळल्यानंतर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न, कर्जमाफी, अवकाळी पाऊस, मेट्रो सिटीचे मुद्दे अधिक चर्चेला होते.
या सर्व प्रश्नांची उकल होत असतानाच कोरोनानं महाराष्ट्राला विळखा घातला. संकट अवघ्या जगावर आलंय. प्रतिकूल परिस्थिती 'गंभीर' झाली, पण आपण 'खंबीर' असल्याचा विश्वास उद्धव ठाकरेंनी जनतेला दिला. त्यामुळे सर्वच स्तरावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर कौतुकाचा वर्षाव सुरु झाला. पण नुसतं मुख्यमंत्र्यांचं कौतुक करून चालणार नाही, तर त्यामागे दडलेल्या अनेक हातांचं कौतुक करावं लागेल. कारण मुख्यमंत्र्यांच्या मागे दडलेले नुसते हात नाहीयेत तर योद्ध्याची ढाल बनून काम करत आहेत. त्यापैकीच एक नाव
म्हणजे - 'आदित्य उद्धव ठाकरे'
जबाबदार मुलगा ते जबाबदार नेता
कोरोनाच्या संकटात जेवढ्या खंबीरपणे मुख्यमंत्री तोंड देत आहेत, त्यामागचा लपलेला चेहरा म्हणजे आदित्य ठाकरे.
कोरानाचं संकंट सुरु झाल्यापासून आदित्य ठाकरे आणि त्यांच्या टीमनं कुठेही गाजावाजा न करता, एकही फोटो न काढता अगदी माणसांपासून ते मुक्या जनावरांपर्यंत मदतीचं सत्र सुरु ठेवलंय. सत्तेची पॉवर काय असते हे काही वेगळं सांगायला नको. पण कुठेही चमकेशगिरी न करता मुख्यमंत्र्यांचा मुलगा आणि मंत्री म्हणून आदित्य ठाकरेंनी पडद्यामागूनच महत्वाची भूमिका निभावली आहे आणि ती कौतुकास्पद आहे.
भारतात सर्वात जास्त कोरोनाग्रस्तांची संख्या महाराष्ट्रात आणि त्यातही मुंबईत वरळीसारख्या मतदारसंघात वाढत असताना अतिशय सावधपणे, धीरानं आणि तांत्रिक दृष्ट्या, स्फोटक परिस्थितीवर नियंत्रण ठेवलं गेलं. वरळी कोळीवाड्यातल्या स्फोटक परिस्थितीवर ठेवलेल्या नियंत्रणाचं तर केंद्रीय पथकानं कौतुकही केलंय. कोरोनाचा उद्रेक थोपवण्याच्या दृष्टीनं वरळी कोळीवाडा हे उर्वरित देशासाठी आदर्श उदाहरण ठरू शकतं. असं मत केंद्रीय पथकानं व्यक्त केलं आहे.
यंग बट “कोल्ड ब्लड”
तुम्ही म्हणाल आता त्यात काय आलं एवढं. काम केलं तर काय झालं? ते तर राजकाराणी आहेत, नेते, मंत्री आहेत, सत्ता त्यांच्या हातात आहे, मग कशाला कौतुक करायचं? तुमचं खरंय. पण सर्व काही व्यवस्थित सुरु असताना, घरात बसून रिमोट कंट्रोलची भूमिका निभवायला मिळत असताना अवघ्या 21 व्या वर्षात एक तरूण राजकारणात काय येतो आणि अवघ्या 9 वर्षात ठाकरे कुटुंबातला पहिला सदस्य निवडणूक लढवून मंत्री होतो आणि अतिशय संयमानं कोरोना विरुद्धच्या वैश्विक लढाईत वडिलांच्या खांद्याला खांदा लावून उभा राहतो हे खरोखर कौतुकास्पद आहे.
खरं तर यंत्रणेला आदेश दिल्यानंतर त्यांच्यावर वचक ठेऊन जबरदस्तीनं काम करून घेणं फार सोपं आहे. पण अधिकारी, कर्मचारी आणि कार्यकर्त्यांशी आपल्या मृदू भाषेत संवाद साधत, त्यांना आपलंसं करत, काम कसं मार्गी लावता येईल, यावर जास्त भर दिला. कुठेही बेजबाबदारपणा नाही, कुठेही बेताल वक्तव्य नाही, सोशल मीडियावर मोजकेच बोलणे, माध्यमांपासून दूर राहणे आणि पडद्यामागून आपल्या वडिलांच्या आदेशानुसार यंत्रणा सांभाळणे, हे आदित्य ठाकरेंचं या काळातलं वैशिष्ट्य ठरली आहेत. ज्या वयात रक्त सळसळतं असतं त्या वयात डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेऊन शांतपणे आदित्य ठाकरे कोरोनाची परिस्थिती संयमाने हाताळत आहेत.
फायटिंग स्पिरिट...
मुख्यमंत्र्यांची यंत्रणा काम करतेय का? तळागाळापर्यंत अधिकारी पोहचतायत का? एवढंच नाही तर कोरोनाच्या काळात आपल्या वडिलांच्या नावाला कुठेही डाग लागणार नाही ना? याची खबरदारी सध्या आदित्य ठाकरे घेत आहेत.
प्रशासकीय यंत्रणा सांभाळताना एक नेता म्हणून स्वत:च्या पक्षावरही तितकंच बारकाईनं लक्ष ठेऊन आहेत. युवा सेनेच्या टीमचाही मुख्यमंत्र्यांच्या वाटचालीत मोठा वाटा आहे. पहाटे चार वाजता झोपणे सकाळी 8 वाजता उठून पुन्हा वही, पेन घेऊन कोरोनाचा आढावा घेण्याचं काम आदित्य ठाकरे करत आहेत. रात्री झोपताना सर्व वॉर्ड अधिकाऱ्यांशी संवाद साधून उद्या काय करावं लागेल यांचे प्लॅनिंग करूनच झाोपण्याचा दैनंदिन कार्यक्रम सुरु आहे. अधिकारी, डॉक्टर, उद्योजक, मित्र, युवासेना टीम, शाखाप्रमुख यांच्याशी सातत्यानं व्हिडीओ कॉन्फरसवर संवाद साधणे कुठल्या भागात काय कमी आहे? क्वारंटाईन लोकांना काय कमी पडतंय? डॉक्टर कसे उपलब्ध करायचे? यासाठी आदित्य ठाकरे पडद्यामागून काम करत आहेत.
सोशल मीडिया आणि टीम आदित्य
ट्वीटर, फेसबुक, इंस्टग्राम आणि मेसेजवर येणाऱ्या लोकांच्या अडचणींचे मेसेज तातडीनं सोडवण्यासाठी युवा सेनेचे दोन व्हाट्स अप ग्रुप बनविण्यात आले आहेत. ज्या माध्यमातून औषध, भाजीपाला, अन्न धान्य, जीवनाश्यक वस्तू आणि पदार्थ पुरविण्याचं काम सध्या सुरु आहे. हे काम करतानान कोणताही गाजावाजा करायचा नाही. मानुसकी धर्माचं पालन करायचं. असा कडक आदेश सध्या मातोश्रीवरून सर्व शिवसैनिकांना दिला गेलांय. त्यामुळे सर्व शिवसैनिक आणि युवासैनिक एकदिल होऊन काम करतायेत.
वेळप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसमोरच मोबाईल पकडून फेसबुक लाईव्ह करणे, एक मुलगा म्हणून वडिलांची काळजी घेणे , एक नेता म्हणून पक्षप्रमुखांला साथ देण्याचं काम आदित्य ठाकरे पडद्यामागून करत आहेत, याची माहिती फार कमी लोकांना आहे. वरळीपासून ते महाराष्ट्रापर्यंत, भारतापासून ते लंडनपर्यत अनेकांच्या संपर्कात राहून कोरोनाविरोधात कसं लढतां येईल याची माहिती संकलित करण्याचं काम करत आहेत. नवीन एक्स रे तंत्र, स्वॅब बूथ, टेटं क्लिनिक अशा विविध संकल्पना अंमलात आणण्याचं काम आदित्य ठाकरे करतायत.
युरोप आणि अमेरिकेची काय वाताहत झालीय हे आपण पाहतच आहे. त्या तुलनेत भारतात परिस्थिती अजून तरी स्फोटक बनलेली नाहीये. जे काही अनुमान जागतिक आरोग्य संघटनेनं लावलं होतं. त्याला छेद देण्याचं काम भारताने गेल्या काही दिवसांत केलंय. आतापर्यंत लाखोंच्या संख्येने रुग्णं सापडतील असं सांगितलं गेल्यावर भारताने अजूनही 25 हजारांचा टप्पाही ओलांडलेला नाहीये. त्यामुळे भारत या कठीण परिस्थीतीचा उत्तम सामना करतोय. भारतात सर्वाधिक रुग्णं महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात निर्माण झालेली आपत्कालीन परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी ठाकरे सरकार खंबीर असल्याचं त्यांच्या आता पर्यंतच्या कणखर नेतृत्व गणांनी दाखवून दिलंय. हेच खंबीर नेतृत्व निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीवर यशस्वीपणे मात करेल याबाबत सर्वांच्या मनात विश्वास आहे.
कोरोनाच्या काळात जात,धर्म, पंथ आणि पक्ष बाजूला ठेऊन सर्वांना एकत्र घेऊन कोरोनावर मात करण्याचा प्रयत्न तुमचा आमचा सर्वांचा आहेच, त्याचप्रमाणे एक 29 वर्षांचा तरूण आदित्य उद्धव ठाकरे कोरोनाविरोधातली लढाई जिंकण्यासाठी दिवस रात्र एक करतोय, त्यांच्या प्रयत्नांना यश मिळो, हीच आशा आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement