एक्स्प्लोर

IND vs ENG: इंग्लंड चीत, भारताची जीत!

Team India vs England : डकेट, क्राऊली, पोप, रुट, बेअरस्टो, स्टोक्स अशी फलंदाजांची मजबूत फळी एकीकडे, तर रोहित शर्मा, जैस्वाल, गिल, श्रेयस, पाटिदार, सरफराज अशी फलंदाजीची फळी दुसरीकडे. इंग्लंडची (Team England) फलंदाजी तगडी आणि कसोटी क्रिकेटचा भरपूर अनुभव गाठीशी असलेली. म्हणजे मालिका संपताना रुट, स्टोक्स आणि बेअरस्टो या तिघांच्याही नावावर कसोटी सामन्यांचं शतक लागलंय. तर भारतीय फलंदाजीचा अनुभव आकडेवारीतून पाहा, रोहित – 59 कसोटी, जैस्वाल – 9 कसोटी, गिल – 25 कसोटी, सरफराज – 3 कसोटी, पड्डीकल – पदार्पणाची कसोटी.

आकडेवारीत इंग्लंडचं पारडं जड होतं. पण, भारतीय युवा फलंदाजांनी कमाल केली.  खास करुन जैस्वाल,गिल यांनी.

संघ अडचणीत असताना या दोघांनीही कसोटीचं टेम्परामेंट आणि वनडेची आक्रमकता यांचा संगम साधत नैया पार केली. गेल्या कसोटीत तर, नवख्या ज्युरेलला घेऊन गिलने हेलकावे खाणारं संघाचं जहाज विजयाच्या किनाऱ्याला लावलं.

जैस्वालचा मालिकेतला फॉर्म स्वप्नवत होता. 80, 15, 209, 17, 10, 214 नाबाद, 73, 37 आणि 57 ही धावांची आकडेवारी दृष्ट लागू नये म्हणून तीट लावावी अशीच आहे. या मालिकेतील खेळपट्ट्या किट बॅगमध्ये घेऊन जगभरात फिरावं, असं जैस्वालला नक्की वाटत असेल, इतकी भन्नाट बॅटिंग त्याने पाचही सामन्यांमध्ये केली. धावांचं अफलातून सातत्य राखलं. आक्रमकतेचा मंत्र जपताना संयमाच्या तंत्राचीही कास धरली. तरीही 70, 80 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या.

तर, गिलची कहाणी काहीशी वेगळी होती. विशाखापट्टणम कसोटीआधी नऊ डावात अर्धशतकही न गाठणाऱ्या गिलची त्या नऊ डावातली सर्वोच्च धावसंख्या होती 36. या मालिकेतील विशाखापट्टणम कसोटीत मात्र त्याच्या बॅटने धावांची कूस बदलली आणि धावा बॅटमधून वाहायला लागल्या. पुढे 34,104,0,91, 38, 52 आणि 110 असा सन्मानजनक स्कोरबोर्ड त्याच्या नावावर लागला. गिलला पूर्ण बहरात असताना फलंदाजी करताना पाहणं हा एक अनुभव असतो. त्याच्याकडे मखमली ड्राईव्ह्ज आहेत. मनगटी नजाकत आहे. चेंडूला स्टँडमध्ये सहल घडवून आणण्याची कलाही अवगत आहे. फिरकीवर हल्ला चढवतानाच वेगवान माराही डोईजड न होऊ देण्याचा त्याचा प्रयत्न असतो. अनुभवी कॅप्टन रोहित शर्माने राजकोटला 131, रांचीत दुसऱ्या डावात 55 आणि धरमशालामध्ये 103 अशा महत्त्वाच्या इनिंग केल्या. एरवी मेन हीरोच्या भूमिकेत असणाऱ्या रोहितने इथे युवा सहकाऱ्यांना 'भिऊ नका, मी आहे म्हणत त्यांच्या पाठीवर अनुभवाचा हात ठेवला आणि आपण सहनायकाची भूमिका चोख पार पाडली. खरं तर कोहली, राहुलसारखे आंतरराष्ट्रीय मैदान गाजवणारे शिलेदार संघात नसताना रोहितने युवा बॅट्समना ज्या पद्धतीने गाईड केलं, हाताळलं त्याला तोड नाही. मालिकेतील खेळाडूंच्या कामगिरीचं क्रेडिट कोच राहुल द्रविडने अजित आगरकरच्या सिलेक्शन कमिटीलाही दिलं. ज्यांनी हे गुणवत्तवान हिरे काढून त्याच्या ओंजळीत टाकले. 

इथे सरफराज, ज्युरेलचाही उल्लेख करावा लागेल. दोघंही कसोटी क्रिकेटचा दबाव झुगारत खेळले. गरजेवेळी मोठे फटके बिनधास्तपणे खेळले. हा फ्रेश अॅप्रोच भारतीय संघाला खूप पुढे घेऊन जाईल. खास करुन ऑसी, दक्षिण आफ्रिकेसारख्या खेळपट्टीवर खेळताना. फलंदाजांनी कमाल फॉर्म दाखवल्यावर भारतीय खेळपट्ट्यांवर अश्विन, जडेजा, कुलदीप, बुमरा या चौघांना फेस करणं सोपं नव्हतं. किंबहुना भारतीय माऱ्याशी दोन हात करताना इंग्लंडच्या अनुभवी फलंदाजांच्या तोंडाला फेस आला. डकेट-क्राऊली जोडीने बहुतेक वेळा चांगली सलामी देऊनही ते कोसळत राहिले. मधल्या फळीचा फ्लॉप शो त्यांना भोवला. अश्विनचं वैविध्य, कुलदीपचा टर्न, बुमराच्या व्हेरिएशननेही त्यांना सळो की पळो केलं. पोपच्या पहिल्या मॅचमधील यादगार इनिंगचा अपवाद वगळता इंग्लंड टीमच्या बॅटिंगवर भारतानेच वर्चस्व गाजवलं. रुट, बेअरस्टो, स्टोक्स हे कसलेले वीर फिरणाऱ्या खेळपट्ट्यांवर शस्त्रहीन दिसले किंवा बेझबॉल थिअरीने खेळताना अति आक्रमकतेच्या विळख्यात फसले असंही म्हणता येईल. इथे येईपर्यंत एकही कसोटी मालिका या थिअऱीने खेळून त्यांनी गमावली नव्हती. या मालिकेत मात्र 1-0 आघाडीवरुन त्यांना 1-4 अशा मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यांनी आक्रमक बॅटिंग करुन काही वेळा सामन्यात रंगत निर्माण करण्याचा प्रयत्न केलादेखील. पण, कसोटी मालिकेत सेशन बाय सेशन खेळाचा आढावा घेऊन खेळ करावा लागतो. इथे त्यांचं गणित फसलं. इंग्लंडला आपण चीत केलं, मायदेशातल्या आणखी एका मालिकेत आपल्या भाळी मालिका विजयाचा टिळा लागला. ज्या विजयात युवा ब्रिगेडने गाळलेल्या घामाचं सोनं झालं होतं. हे सोनंच पुढे भारतीय क्रिकेट खास करुन कसोटी चमकत ठेवेल आणि आणखी उजळून टाकेल, अशी अपेक्षा करुया.

अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Nathuram Godse Hanging History : नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :15 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaABP Majha Headlines :  11 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut on Devendra Fadnavis : फडणवीसांना खोटं बोलण्याचा रोग; त्यामुळे महाराष्ट्राचं नुकसानDevendra Fadnavis : सरकार स्थापनेच्या दिल्लीतील बैठकांना अदानी उपस्थित नव्हते

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Nathuram Godse Hanging History : नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Embed widget