एक्स्प्लोर

पाण्यासाठी नोकरीवर पाणी सोडणारा वीर

"सुदर्शन सुतार..." तू आमचे डोळे अंजनाने नाही तर तुझ्या गावच्या CCT त साठलेल्या गढूळ पाण्याने धुऊन काढलेत .. अन तरीही कुठल्या महागड्या ड्रॉपने नाही एवढे ते स्वच्छ झालेयत. आम्हाला आमच्याच आयुष्याकडं परत एकदा शुद्ध दृष्टीनं पाहायला शिकवलंस..."

सोलापूरला येऊन जाऊन नोकरी करतोय. एका खासगी शाळेताय कामालाय. सुतारकाम अन् इलेक्टरेशिअन म्हणून. गावात पाण्याची नुसती बोंबाबोंब. सकाळ संध्याकाळ दुसरी काय कामं सोडून येड्यागत घागरी कळशी घ्या, सायकलला टांगा, की जावा पाणी आणायला हिकडं तिकडं असा उद्योग नुसता. च्याआयला कंटाळा आला वर्षानवर्षे तेच-तेच करुन. मग ह्या वर्षी ही पाणी फाऊंडेशनची कायतर भानगड निघाल्याली. आता पाण्याची अडचण जरी असली तरी नसती झंझाट कोण लावून घेणार मागं?? कामधंदा सुडून ही असल्या भानगडी काय करू वाटत नाईत. पण आमच्या गावचं 'काका' मनजे मेन बॉस. नेमकं ते म्हणलं "सुदर्शन राव जरा जाऊन या ट्रेनिंग ला 4 दिवस , गावाला फायदा हुईल हे पाण्याचं काम झालं तर." या विनंतीत एक 'आज्ञा' दडलेली असते हे आपल्या आपण गुपचूप ओळखायचं असतं... आता खरं सांगू का अजिबात म्हणजे अजिबात इच्छा नव्हती खरंतर 4 दिवस तिकडं कुटं सातारा भागात एवढ्या लांब ट्रेनिंग अन् फिनिंगला जायची. मनलं नौकरी वाली द्यायची शिव्या 4 दिवस कामाला नाही आल्यावर. घरदार सोडून, गावासाठी मनुन , वरून एक रुपया मिळणार नसताना कोण जाईल तिकडं?? नाही म्हणायचं ठरवलं. पर गावात काकाच्या पुढं जाता येत नाई. काकानं सांगितलं म्हणजे "तुमचा विषय संपला." तुमाला ते हसत नायतर रडत!! पर करावं तर लागणारच. मग ट्रेनिंगला गेलो. पहिला दिवस सुद्धा काढायचा मुश्किल होईल असं वाटलेलं एवढा अति नकारात्मक होऊन गेलतो. पण आता खरं मनापासनं सांगतो. "ह्या पाणी फाऊंडेशनच्या ट्रेनिंगमध्ये एक धुंदीय राव!". सगळी म्हणत्यात ते खरंय,, जादुई ही एक नुसती. म्हणजे ध्यान लावून बसल्यासारखं मन पावित्र निर्मळ, नुसतं स्वच्छ पाण्याने धुतल्यासारखं होतंय. 4 दिवस झाले अन ट्रेनिंग संपलं तवा खरंच शिवाराच्या आधी, डोळ्यात पाणी होतं सगळ्यांच्या. 70 टक्के लोकं हेच सांगतील तुमाला. आमी टोटल 11 जण ट्रेनिंगला गेलतो गावातनं. जाताना 11 जणांची 1100 मतं होती,, पण येताना सगळ्यांचं फक्त 'एक अन एकच.' "गावात यावर्षी पाणी आणायचंय" आणि थांबवायचंच!!! अकरा जण बोलले तरी एकच आवाज बाहेर येईल, इतके आमी सगळे एकरूप झालेलो. माघारी आलो अन् पहिल्या दिवसापासनंच काम चालू केलं. रोज फिल्ड वर येणं-जाणं, शिवार फेरी करणं, कोणते उपचार करायचे ठरवणं, आखणी करणं, श्रमदान करणं सुरू झालं. एवढ्या कामापुढं घर बी दिसंना अन दार बी अन नौकरीचं काम बी ...अन दुसरं काहीच. फक्त हायड्रोमार्कर, CCT, फक्की, पाणसळ, LBS एवढेच शब्द लक्षात यायचे, बाकी सगळं अन संपूर्ण विसरून गेलेलो. आता लक्षात येत होतं की काकानं मुद्दाम मला का पाठवलं ट्रेनिंगला. कारण माझा व्यवसाय सुतारकाम, मग आखणी करताना बरोब्बर मापं घेण्यात माझी गावाला लंय मदत व्हायली. कामात Accuracy भरपूर आली, सगळी खुश होती. काम इतकं वाढलं की महिन्यात किती का जवळचं असेना पण एकाही लग्नाला गेलो नाही, किंवा दुसरया कुठल्याच कार्यक्रमाला नाही, घरी बायका लेकरांची भेट सुद्दा मुशकील व्ह्यायली. होणार बी कशी, सकाळी 6 ला घराबाहेर पडायचो, कायतर तात्पुरतं खाऊन, आंघोळ न करता तसाच. लोकं भरपूर कामाला येणार अन कामाला फिल्ड किंवा आखणी नाही असं व्ह्याला लागलं, एवढं करत होतो तरी अजून कमी पडत होतं, मग आमी आयडिया केली, गावात कामाच्या 10 साईट चालू केल्या अन कुणी कुठं जायचं ठरवून दिलं, आमीबी मग सगळीकडं जाऊन आखणी करत राहायचो. आता मग काम ठीक-ठाक चालू झालं. यात आमाला दुपारी 1 ते 2 वाजायच्या घरी यायला. मग घरी येऊन अंघोळ अन जेवण की पाठ न टेकता परत कामावर , परत सगळं आखणी अन साईट वरनं यायला रात्री 9 , 10 वाजायच्या अन परत ऑफिस मधी येऊन दुसरया दिवशीच्या प्लानिंग मध्ये 2, 3 तास, म्हणजे घरी यायला रोज रात्रीच्या 12 ते 1. लेकरं तवा झोपलेली असणार. सकाळी घरून निघतानाबी झोपलेली असणार. भेट झाली तर दुपारी काय मिनिटं फकस्त. .. आमची टीम एवढी जबरदस्त झाली की 11 जण 11 गावं उभा करू शकत होतो. इतकं की काही गावं जिथं श्रमदानाला लोकं कमी येत होते, हायड्रोमार्कर सुद्धा आमी बनवून दिले. आता खरा कामाला वेग आलेला. पण घरात माझ्या ह्या अशा काम धंदा सोडून ह्या कामात गुतल्याने अन पैशासाठी म्हणून कुरबुरी सुरू झाल्या, पगार बंद होता. उसनं-पासनं करून घर चालवत होतो. बायकुचं काईच चुकत नव्हतं. दीड महिन्यात 12 हजार उसने झालतं. एके दिवशी रात्री फिल्ड वरनं 12 ला घरी आलो तर घरात कुणीच नाई... घराला कुलूप अन चावी जुन्या बुटात नेहमीच्या ठिकाणी ठेवलेली. कंटाळून शेवटी बायको गेलेली त्या दिवशी माहेरी निघून. म्हणलं बोंबला आता. तरी मला वाटलं यील दोन तीन दिवसात, पर कुठलं काय.. आता अवघड झालतं, काम ऐन मोक्यावर आलेलं अन बायको ला बी आणायचं महत्वाचं हुतं. मग दिवसा तर जाता येत नव्हतं कामावरनं. मग रात्री ह्या पाणी फौंडेशनच्या कामावरनं आलो की कुणाचीतरी 2 व्हिलर घ्यायचो अन रात्रीच तिच्या माहेरच्या दारात जाऊन विनवत बसायचो की चल बाई चुकलं माझं, अन हे अन ते म्हणून. पण ती काय ऐकायची न्हाई, परत तसाच रात्रीत माघारी फिरायचो अन पहाटं 5- 6 ला काम सुरू व्हायच्या आत गावात परत यायचो. कुणालाच माहीत नसायचं. विचित्र परिस्थिती होती. स्वतःचच हासायलाबी यायचं. म्हणजे या कामामुळं बायकुला आणायला सुद्दा मला रात्रीच जावं लागतं होतं. दोन आठवडे हे असंच चालू होतं. शेवटी मात्र मोठा आघात झाला. एके दिवशी शाळेने अर्जंट सोलापूरला बोलावलं. साहेबांच्या केबिन मध्ये गेलो. ते म्हणले दीड महिना झाला तू कामाला आला नाहीस. एवढं चांगलं काम करतोयस हिथं शाळेत. लोकांना मिळत नाही काम. तुला मिळालंय अन एवढे दिवस एवढं चांगलं काम केलंयस, सगळ्यांच्या मर्जीतला झालायस, अन आता अचानक काय त्या पाणी फौंडेशनच्या नादी लागलायस??, उद्या आमी नौकरी वरनं काढून टाकलं तर काय हे पाणी फौंडेशन यिऊन घरचा किराणा भरणाराय का? पोट कसं भरणार? घास कोण देणार तुला, म्हणून कामाला ये, तुझ्या भविष्यासाठी चांगलं सांगतोय... काय विचार करून उत्तर दिलतं त्यावेळी माहीत नाही. ट्रेनिंग आठवून असं बोललो? गावचा वर्षानुवर्षाचा दुष्काळ आठवून, का स्वतः दिवस रात्र एक महिना केलेलं काम आठवून, का दुष्काळ मुक्तीची घेतलेली शपथ पूर्ण करायची म्हणून, का अजून कशासाठी माहीत नाही? पण साहेबाना एवढंच बोललो- "साहेब माफ करा, पण आता गावाला पाणी मिळवून दिल्याशिवाय यातून माघार नाही, अजून पंधरा दिवस राहिलेत आता जर मी अंग काढून घेतलं तर गावाचं होणारं नुकसान ह्याच डोळ्यानं बघू शकणार नाही, बारकी-बारकी पोरं 4 - 4 किलोमीटर वरनं कमरे-खांद्या-डोक्यावर कळशी-घागरी नं पाणी आणायलेले मी अजून एक दिवसही बघू शकत नाही.. मी माझा निर्णय घेतलाय अन त्याच्यावर ठाम आहे... पंधरा दिवसांनी परत एकदा येईल हिथं... "कामावर घ्या" किंवा "राजीनामा लिहून मागा" दोन्ही हसतच करेल हा शब्द देतो... पण आता ह्या एकाच पावसाळ्यात गावाला दुष्काळ मुक्तीच्या जंजाळातून सोडवल्याशिवाय माघार नाही... --- "12 हजार कर्ज डोक्यावर येऊन पडलं असताना, बायको घर सोडून जात असताना, बारक्या पोरानी ओळखायचं बंद करावं असं असताना, 4-5 किलो वजन कमी होऊन शरीर काडीसारखं होत असताना, नातेवाईक अन इतर सगळं विसरून जात असताना, सर्वात महत्वाचं म्हणजे - एवढ्या खटाटोपीनं मिळालेली आयुष्याची नौकरी एका क्षणात जात असताना, आरशात खोल गेलेले डोळे अन काळं ठिककर पडलेला चेहरा स्वतः स्वतःला ओळखू येत नसताना अन या सर्वांच्या बदल्यात एक रुपयाही मिळत नसतानाही एवढं तुटून काम करायची इच्छा कुठून ह्याच्या ह्रदयात पाझरली असेल??? "सुदर्शन सुतार..." तू आमचे डोळे अंजनाने नाही तर तुझ्या गावच्या CCT त साठलेल्या गढूळ पाण्याने धुऊन काढलेत .. अन तरीही कुठल्या महागड्या ड्रॉपने नाही एवढे ते स्वच्छ झालेयत. आम्हाला आमच्याच आयुष्याकडं परत एकदा शुद्ध दृष्टीनं पाहायला शिकवलंस..." गाव: वडाळा, ता: उत्तर सोलापूर जि: सोलापूर... सचिन अतकरे यांचे याआधीचे ब्लॉग : दुष्काळाचा कणा जिद्दीनं फोडणारा 77 वर्षांचा वाघ...!!! काळीज चिरणारी चिठ्ठी काल रात्री बाराचा पाऊस... अपयशावरचा पहिला घाव..!! धमन्या पेटलेले 40 सैनिक... जगावेगळ्या रोपवाटिकेची कहाणी श्रमदानासाठी परदेशातून मदत करणारे सादिकभाई सलाम दोस्तहो... ...हे वाचायला थोडीशी ताकद लागेल...! द ग्रेटेस्ट वॉटर हिरो - अजित देशमुख
अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parbhani : पर्यवेक्षकाच्या वेतनातून मागितली लाच, उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिकेसह लिपीक एसीबीच्या जाळ्यात 
पर्यवेक्षकाच्या वेतनातून मागितली लाच, उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिकेसह लिपीक एसीबीच्या जाळ्यात 
भिवंडीत 2 गोदामाला भीषण आग, सुदैवाने जिवीतहानी नाही; फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी
भिवंडीत 2 गोदामाला भीषण आग, सुदैवाने जिवीतहानी नाही; फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी
बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
मंत्र्यांच्या भडकाऊ भाषणाबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न?; अटलबिहारी वाजपेयींचा दाखला, फडणवीसांनी नितेश राणेंचे कान टोचले
मंत्र्यांच्या भडकाऊ भाषणाबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न?; अटलबिहारी वाजपेयींचा दाखला, फडणवीसांनी नितेश राणेंचे कान टोचले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 100 | टॉप 100 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर वेगवान ABP MajhaNagpur Rada FIR: नागपूरमध्ये हिंसाचार, काय सांगते एफआयआर? त्या रात्री नेमकं काय घडलं?Sangh On Nagpur Rada : कान टोचले, नागपूरच्या राड्यानं संघानं काय मांडली भूमिका?Zero Hour Aurangjeb Kabar : संघाच्या भूमिकेनंतर औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा मागे पडणार का?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parbhani : पर्यवेक्षकाच्या वेतनातून मागितली लाच, उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिकेसह लिपीक एसीबीच्या जाळ्यात 
पर्यवेक्षकाच्या वेतनातून मागितली लाच, उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिकेसह लिपीक एसीबीच्या जाळ्यात 
भिवंडीत 2 गोदामाला भीषण आग, सुदैवाने जिवीतहानी नाही; फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी
भिवंडीत 2 गोदामाला भीषण आग, सुदैवाने जिवीतहानी नाही; फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी
बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
मंत्र्यांच्या भडकाऊ भाषणाबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न?; अटलबिहारी वाजपेयींचा दाखला, फडणवीसांनी नितेश राणेंचे कान टोचले
मंत्र्यांच्या भडकाऊ भाषणाबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न?; अटलबिहारी वाजपेयींचा दाखला, फडणवीसांनी नितेश राणेंचे कान टोचले
विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी! ग्रीष्मातली चंदन पूजा असो की पाद्यपूजा, वेगवेगळ्या पूजांसाठी घरबसल्या नोंदणी करता येणार
विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी! ग्रीष्मातली चंदन पूजा असो की पाद्यपूजा, वेगवेगळ्या पूजांसाठी घरबसल्या नोंदणी करता येणार
गोपीचंद पडळकरांनी औंध देवस्थानाची 34 एकर जमीन लाटली; कागदपत्रे दाखवत राम खाडेंचा गंभीर आरोप
गोपीचंद पडळकरांनी औंध देवस्थानाची 34 एकर जमीन लाटली; कागदपत्रे दाखवत राम खाडेंचा गंभीर आरोप
शेतकरी आत्महत्या थांबवायच्या असतील तर शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, अमर हबीब यांचं अन्नत्याग आंदोलन 
शेतकरी आत्महत्या थांबवायच्या असतील तर शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, अमर हबीब यांचं अन्नत्याग आंदोलन 
नागपूरचे CP ऑन द स्पॉट, घटनास्थळाची पाहणी; फहीम खानच्या रोलबाबत रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली माहिती?
नागपूरचे CP ऑन द स्पॉट, घटनास्थळाची पाहणी; फहीम खानच्या रोलबाबत रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली माहिती?
Embed widget