एक्स्प्लोर

BLOG : ब्ल्यू जीन (2022) - ब्रिटनमधला होमोफोबिया आणि सेक्शन 28

BLOG : मार्गारेट थॅचर यांचं नाव ब्रिटनच्या इतिहासात मोठं आहे. ब्रिटनच्या पहिल्या महिला पंतप्रधान. आयर्न लेडी.  पंतप्रधान पदावर सर्वाधिक काळ राहणाऱ्या. देशात आर्थिक सुधारणा करणाऱ्या. असे अनेक बिरुद त्यांना लावले जातात. कंझर्वेटिव्ह पार्टीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या थॅचर तितक्याच वादग्रस्तही ठरल्या. ब्रिटनमध्ये त्यांनी होमोफोबिया वाढवला. सेक्शन 28 हे वादग्रस्त बिल त्यांनी 1987 मध्ये आणलं. सेक्शन 28 नुसार LGBTQ+ समुहाला जगण्याचा हक्कच नाकारला. अतिशय किचकट आणि बुरसटलेला हा कायदा 1988 मध्ये संमत ही करण्यात आला. याचा LGBTQ+ समुहानं जोरदार विरोध केला. मॅन्चेस्टर असो वा लंडन देशभरात LGBTQ+ समुह रस्त्यावर उतरला. गल्लो-गल्लीत आदोलनं झाली.  हे आंदोलन दाबण्याचे  प्रयत्नही जोरदार झाले. पण LGBTQ+ समुह आपल्या हक्कांसाठी इरेला पेटला होता. त्याला समाजातून ही पाठिंबा मिळत होता. 

सेक्शन 28 म्हणजे नक्की काय? तर समलैंगिक संबंधांवर स्थानिक कायद्यानुसार बंदी. 1980 च्या दशकात समलैंगिक संबंधांना मान्यता मिळावी, यासाठी ब्रिटनमध्ये आंदोलनं सुरू झाली होती. त्पंतप्रधान मार्गारेट थॅटर यांच्या सत्ताधारी  कंजरव्हेटिव पार्टीला हे मान्य नव्हतं. या आंदोलनाला मोडून काढण्यासाठी सेक्शन 28 बिल आणलं गेलं.  या कायद्यानुसार शिक्षकांना शाळेत समलैंगिक संबंधांविषयी बोलता येणार नव्हतं. समलैंगिक संबंधांचा संदर्भ असलेल्या कथा कादंबऱ्यांवर बंदी आली. कंजरव्हेटिव पार्टीनं राजकीयदृष्या यात आणखी एक पाऊल पुढे टाकलं. विरोधक लेबर पार्टीने समलैंगिक संबंधांना पाठींबा दिला होता. याबद्दल त्यांना थॅचरनं टारगेट केलं. आपल्या कॅम्पेनमध्ये लेबर पार्टी कशी धर्मविरोधी कृत्य करतेय हे याचा झपाटात कंजरव्हेटिव पार्टीनं लावला. आंदोलन चिघळलं. 

दिग्दर्शक जॉर्जिया ओक्लीचा ब्ल्यू जीन (2022) (Blue Jean) सिनेमा इंग्लंडमधल्या होमोफोबिया काळाचा आढावा घेतो. लेस्बीयन असलेल्या एका पीटी टिचरची ही गोष्ट आहे. सेक्शन 28 संमत  झाल्यानं देशातलं सर्व वातावरण ढवळून निघायलय. रस्त्यावर आंदोलन होतायत. पोलीस आणि मोरल पोलीसांची या लोकांवर नजर आहे. यामुळं लेस्बीयन पीटी टिचर जीन न्यूमनला आपलं समलैंगिक असणं लपवून ठेवावं लागतंय. भिती, असहायता अशा भावनांचा ती रोजच सामना करतेय. शहरात समलैंगिक संबंधांना विरोध करणारी पोस्टर आणि भिंती रंगवलेल्या आहेत. ‘तुमच्या मुलांना शाळेत पारंपारीक मुल्य शिक्षण मिळतंय का? शाळेचा राजकीय आखाडा करु नका’ हा संदेश कंजरव्हेटिव पार्टीनं ठिकठिकाणी भिंतींवर लिहिलाय. रेस्टॉरंट, बियर शॉप, पबमध्ये या LGBTQ+ समुहाला टार्गेट केलं जातंय. त्यामुळं त्यांनी भेटण्याची नवीन ठिकाणं सुरू केली.  अशा परिस्थितीत एक विद्यार्थिनी शाळेत येते. ती ही लेस्बीयन आहे. जीनच्या गे-लेस्बीयन क्लबमध्ये ती पोचते. आपला भांडोफोड होण्याच्या भितीनं जीनची तारांबळ उडालेय. आता जीन आपली लेस्बीयन ओळख लपवण्यासाठी काय-काय करते. नोकरी जाण्याची भिती, अस्वस्थता यातून बाहेर पडून स्वत:ला समाजासमोर लेस्बीयन असल्याचं घोषित करेपर्यंतचं हे कथानक आहे. ते लंडनच्या 80 च्या दशकातल्या प्रत्येक राजकीय आणि सामाजिक स्थितीवर भाष्य करतं. 

थॅचेर यांनी राजकीय फायद्यासाठी LGBTQ+ समुहाला टार्गेट केलं. सेक्शन 28 संमत झाला. 2 फेब्रुवारी 1988 ला या बिलावर सुरू असताना सॅली फ्रान्सिससोबत चार-पाच LGBTQ+  लेस्बीयन एक्टिव्हिस्ट इंग्लंडची संसद, हाऊस ऑफ लॉर्ड मध्ये धडकल्या. तिथं त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. तरीही सरकार ठाम होतं. ते आणि आपण अशी ही लढाई होती. कायदा आला. आंदोलन तापलं. 23 मे 1988 ला बून टेंपल थेट बीबीसी ऑफिसमध्ये घुसल्या. द सिक्स ओक्लॉक न्यूज हे सर्वाधिक पाहिलं बुलेटिन सुरु होतं. आरडाओरड आणि घोषणाबाजी करत त्यांनी  बुलेटिनमध्ये अडथळा आणला. बूनला अटक झाली.  स्टॉप दे क्लॉज लिहिलेलं टिशर्ट त्यांनी घातलं होतं. 

आंदोलनं होत राहिली, LGBTQ+ समुह परेड काढत राहिले. अनेकांचे प्राण ही गेले.  हे सर्व २००१ पर्यंत सुरू होतं. 20 जून 2001 ला अगोदर स्क्वाटलंडमध्ये आणि 18 नोव्हेंबर 2003 ला इंग्लंड देशामधून सेक्शन 28 रद्द करण्यात आला. याचा मोठा जल्लोष झाला. 2009 मध्ये तात्कालिन पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांनी सेक्शन 28 बद्दल जाहीर माफी मागितली. LGBTQ+ समुहला समान हक्क आणि सन्मान देण्याची एक शृंखलाच तयार झाली.  

या आंदोलनात भाग घेणारे LGBTQ+ समुहाचे एक्टिव्हिस्ट सुपर हिरो आहेत, त्यांना ‘सेक्सुअल एव्हेंजर’ म्हटलं जातंय. शहरात ठिकठिकाणी क्वीर हॅरिटेज  ( Queer Haritage) साईट्स तयार झाल्यात. जिथं जिथं प्रमुख आंदोलनं झाली तिथं तिथं क्वीर हॅरिटेजचे फलक लावण्यात आलेत. 2017 मध्ये पहिल्यांदा इंग्लंडची संसद म्हणजेच हाऊस ऑफ लॉर्डच्या भिंतीवर हा क्वीर हॅरिटेज फलक लागला.  सॅली फ्रान्सिस आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा सन्मान म्हणून अनधिकृतपणे हा निळा फलक ( Blue Plaque) लावण्यात आला. तो अजूनही तसाच आहे. आता LGBTQ+ समुहाचं प्रतिनिधित्व करणारा रंग सप्तरंगी झालाय. तो फक्त ब्ल्यू राहिलेला नाही. ग्रीनविच, पेखम, वेस्टमिनस्टर, लॅडब्रोक ग्लोव, हॅरिन्गे या शहरामध्ये हा सप्तरंगी LGBTQ+ फलक आता अधिकृतपणे चमकतो आहे.

मोठ्या आंदोलनानंतर LGBTQ+ समुह ला मान्यता, ओळख आणि सन्मान मिळालाय. हे सेलिब्रेट करण्यासाठी लंडनमध्ये दरवर्षी LGBTQ+ परेड निघते. हजारोच्या संख्येने देशविदेशातले LGBTQ+ समर्थक जमा होतात. नाचतात, गातात, धम्माल करतात. राजकिय आणि सामाजिक विरोध ते अधिकृत LGBTQ+ परेड हा मोठा पल्ला आहे. ब्ल्यू जीन (2022) सिनेमात LGBTQ+ संघर्ष इतिहासाचा बहुतांश भाग आलाय. म्हणून हा सिनेमा फक्त ब्रिटनमध्येच नव्हे तर जागतिक LGBTQ+ संघर्ष समजावून घेण्यासाठी महत्त्वाचा ठरतो. 

https://twitter.com/SexualAvengers 
https://www.facebook.com/groups/1176164992432300

अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM : टॉप 50 न्यूज : 23 May 2024 : ABP MajhaTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 06 PM : 23 May 2024: ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPune Car Accident Rap Song : पैसे मेरे बाप के...दोघांना चिरडल्यानंतर आरोपीचं रॅप साँग

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
Nashik News : बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बुमराहकडे बर्फाच्या खेळपट्टीवरही भेदक मारा करण्याची क्षमता, ब्रेट लीकडून कौतुकाची थाप
बुमराहकडे बर्फाच्या खेळपट्टीवरही भेदक मारा करण्याची क्षमता, ब्रेट लीकडून कौतुकाची थाप
Laapataa Ladies Animal Movie : किरण रावच्या 'लापता लेडिज'ने संदीप वांगा रेड्डीच्या 'अॅनिमल'ला पछाडले
किरण रावच्या 'लापता लेडिज'ने संदीप वांगा रेड्डीच्या 'अॅनिमल'ला पछाडले
आख्ख्यं गाव उपाशी, दोन दिवसापासून चूल पेटली नाही, उजनी बोट दुर्घटनेनंतर झरे गाव स्तब्ध
आख्ख्यं गाव उपाशी, दोन दिवसापासून चूल पेटली नाही, उजनी बोट दुर्घटनेनंतर झरे गाव स्तब्ध
Embed widget