एक्स्प्लोर

राहुलची खिचडी : मुख्यमंत्र्यांची भाषणबाजी आक्रस्ताळी का झालीय?

राहुलची खिचडी! खिचडी हे माझं आडनाव, म्हणून माझ्या ब्लॉगचं नाव खिचडी, राहुलची खिचडी... खिचडींचा राहुल हे सरधोपट झालं, पण मी मांडणाराय राहुलची खिचडी, माझी खिचडी खिचडी ही शुद्ध भारतीय डिश, खिचडी म्हणजे संगम, जरा तरूणांच्या भाषेत सांगायचं तर फ्युजन, नवनिर्मिती... आपल्याकडे बिरबलाची खिचडी प्रसिद्ध आहेच, पण माझी खिचडी तशी नाही, पटकन, सहज होणारी डिश, माझ्या अभिव्यक्तीची, मतांची आणि विचारांचीही, पाहा चाखून आणि आवडली तर आवर्जून दाद द्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंत्रालयाच्या सहाव्या मजल्याला आग लागल्यासारखं ओरडत भाषण का करतात? काल महामेळाव्यातल्या फडणविसांच्या भाषणाने हा प्रश्न सारखा डोकावतोय! खरं तर चार पाच वर्षांपूर्वी फडणवीस सार्वजनिक कार्यक्रमात असं बोलत नव्हते! याची सुरुवात २०१४ च्या निवडणूक प्रचारापासून झाली! फडणवीस यांनी प्रचारात जेव्हा पहिल्यांदा हा सूर लावला तेव्हा सगळेच अवाक झाले! बऱ्याच लोकांनी त्यांच्या या शैलीला अतिरंजित असा शिक्का मारला! मलाही त्यांचं बेंबीच्या देठापासून ओरडणं पटलं नाही! पण त्यानंतर त्यांच्या प्रत्येक सभेतल्या प्रत्येक वाक्याच्या शेवटचा हेल मात्र ऐकावा लागला! उदा: आम्ही सिंहाचे बछडे आहोssssssत! आता संवाद कौशल्याचा विचार केला तर आपल्या या आधीची भाषणेही फडणवीस यांची चांगली आणि मुळात त्याचा कंटेंट चांगला असायचा! पण ती प्रभावशाली ठरत नव्हती... म्हणजे भाषणातला गाभा, विचार चांगला असणे आणि तो प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचणे या दोन भिन्न गोष्टी आहेत! फिल्ममध्ये ज्या नायकांनी संवादफेकीची वेगळी शैली अवलंबली... तेच हिट झाले! साक्षात अमिताभपासून अक्षय कुमारपर्यंत प्रत्येकाला शैली आहे... आणि त्यामुळेच त्यांच्यातला हिरोईजम जिवंत आहे! अर्थात आताचा हिरो हा सर्वसामान्यातला असावा असा मतप्रवाह होत असला, तरी मास किंवा मेजॉरिटी पब्लिक या अशा स्टाईलला किंवा अतिरंजितपणाला भुलते! फडणवीसांनी आपल्या वक्तृत्व शैलीतला हा बदल जाणीवपूर्वक केल्याचं दिसतय! कारण विचार मांडणाऱ्या संयत व्याख्यात्यांची फळीही आता इतिहासजमा झाली! शिवाजीराव भोसले यांचा आवाज कधीही टिपेला पोहोचत नसे, पण त्यांचे विचार नेमकेपणाने पोहोचायचे! पण अलिकडे बहुदा ओरडून सांगितल्याशिवाय लोकंच्या डोक्यात विचार घुसणारच नाही, अशी काहीशी समजूत झाली आहे! आपल्या आजूबाजूलाही सगळं काही भडक आहे! लाऊड आहे! गाणीही कर्कश्श आहेत! त्यामुळे या कोलाहलात आपला आवाज लोकांपर्यंत पोहोचवण्याची ही धडपड आहे! शिवाय आपल्या समाजात मोठ्याने बोलणाऱ्याचे खरे असे एक अकारण परिमाण बनले आहे! सभेत समोर बसलेल्या कार्यकर्त्यालाही भुलवण्यासाठी हा आवेश सध्या गरजेचा वाटू लागला आहे! त्यामुळे भाषणाचा आवाज जितका मोठा तितके भाषण प्रभावी हे समीकरणच झाले आहे! क्रिकेटच्या कॉमेंट्रीचेच उदाहरण घ्या! पूर्वी रिची बेन्यो हे अत्यंत संयमी कॉमेंट्री करायचे... पण कालांतराने क्रिकेटचा स्पीड वाढला, आणि कॉमेंटेटर्सच्या डेसीबलची मर्यादाही वाढली! रॉबिन जॅकमन, टोनी ग्रेग, जेफ्री बॉयकोट यांच्या गगनभेदी आवाजांनी सामन्यात रोमांच उभे रहायचे! राजकारणाचंही थोडं तसच झालय! मतदात्यांना रोमांचित करण्यासाठी डेसिबल्सची मर्यादा वाढत आहे! मध्यंतरी कॉमेडी चॅंपियन्स या शोमध्ये एहसान कुरेशी नावाचा स्टॅंडअप कॉमेडियन भाव खाऊन गेला! मुख्यमंत्रांची शैली मला त्याच्या जवळ जाणारी वाटते! तोही मुख्यमंत्र्यंसारखाच वाक्यातल्या शेवटच्या शब्दावर हेल काढायचा! अर्थात सुरुवातीला त्याची शैली इरिटेटिंग वाटायची पण नंतर त्याची लोकांना सवय झाली! कदाचित मुख्यमंत्र्यांच्या शैलीचीही आपल्याला सवय होईल! कारण आपल्या समाज हा बराच ॲडजेस्टेबल आहे! अर्थात मुख्यमंत्र्यांनी इतकं ओरडत असताना आपल्या आवाजाची काळजी घेणंही तितकच गरजेचं आहे! महापालिका निवडणुकीच्या प्रचारात मुख्यमंत्र्यांचा आवाज भर सभेतच बसला! "आमचा आवाज कुणी दाबू शकत नाही असं म्हणत फडणवीस यांनी वेळ मारु नेली! महामेळाव्यातही त्यांचा आवाज, जवळपास गेलाच होता!  त्यामुळे भाषण प्रभावी करण्याच्या नादात वाचा गमावण्याची वेळ त्यांच्यावर आली होती! पूर्वी गावाकडे घरोघरी भाज्या, फळे, किंवा भांडी कुंडी विकण्यासाठी फेरीवाले यायचे! त्यांच्या पुकाऱ्यातही एक हेल असायचा! ते काय विकताहेत याचा पत्ता त्यांच्या बोलण्यातून लागायचा नाही! पण लोकांना कळायचं की काही तरी विकायला आणलेलं आहे! आजची स्थितीही अशीच आहे! भाषण करणारा बेंबीच्या देठापासून ओरडून लोकांना आकर्षित करत आहे! त्याने आपल्यासाठी काय आणलं आहे, हे गौण आहे! पण आम्ही तुमच्यासाठी आहोत, हा सांगण्याचा हा आटापिटा आहे! वैयक्तिक म्हणाल, तर मला ही शैली पटत नाही! पण ती जेव्हा तुमचा उद्देश पूर्ण करते, तेव्हा शैलीला कोण विचारतय! विचार पोहोचला म्हणजे झालं! फक्त अध्यक्षमहोदय... आपल्या आवाजाची काळजी मात्र घ्या, म्हणजे झालं!
अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Munde: पक्ष संकटकाळात खंबीरपणे पाठीशी उभा, धनुभाऊंना गलबलून आलं; म्हणाले, माझ्या देहावरील अग्नीच्या धुरानेही उपकारांची परतफेड होणार नाही
पक्ष संकटकाळात खंबीरपणे पाठीशी उभा, धनुभाऊंना गलबलून आलं; म्हणाले, माझ्या देहावरील अग्नीच्या धुरानेही उपकारांची परतफेड होणार नाही
Video : हायस्कूलच्या ऑफिसमध्येच चारी कोपऱ्यात शिक्षक शिक्षिकेचा 'इम्रान हाश्मी' अन् 'ओयो'ला सुद्धा लाजवेल असा दररोज सीनवर सीन
Video : मिठ्या, किसिंग अन् बरंच काही! हायस्कूलच्या ऑफिसमध्येच शिक्षिकेचा 'इम्रान हाश्मी' अन् 'ओयो'ला सुद्धा लाजवेल असा दररोज सीनवर सीन
Nawab Malik : एका जिल्ह्यातील प्रकारामुळे राज्यात पक्ष अन् पक्ष नेतृत्वाची बदनामी, हे पक्षहिताचं नाही; नवाब मलिकांनी पक्षाला घरचा आहेर
एका जिल्ह्यातील प्रकारामुळे राज्यात पक्ष अन् पक्ष नेतृत्वाची बदनामी, हे पक्षहिताचं नाही; नवाब मलिकांनी पक्षाला घरचा आहेर
Dhananjay Munde : पालकमंत्रिपद जाताच धनंजय मुंडेंचं खळबळजनक वक्तव्य, म्हणाले, 'मी अजितदादांना सांगत होतो भाजपसोबत जाऊ नका, हे षडयंत्र...'
पालकमंत्रिपद जाताच धनंजय मुंडेंचं खळबळजनक वक्तव्य, म्हणाले, 'मी अजितदादांना सांगत होतो भाजपसोबत जाऊ नका, हे षडयंत्र...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Attacker Arrest सैफचा आरोपी 'या' लेबर कँपमध्ये लपला होता, 'माझा'चा Exclusvie ReportBharat Gogawale : रायगड पालकमंत्री पदाबाबतचा निकाल न पटणारा,भरत गोगावलेंची प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11 AM 19 January 2024Dhananajay Munde Shirdi : शिर्डीमध्ये अजित पवार आणि धनंजय मुंडे एकाच हॉटेलमध्ये मुक्कामी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Munde: पक्ष संकटकाळात खंबीरपणे पाठीशी उभा, धनुभाऊंना गलबलून आलं; म्हणाले, माझ्या देहावरील अग्नीच्या धुरानेही उपकारांची परतफेड होणार नाही
पक्ष संकटकाळात खंबीरपणे पाठीशी उभा, धनुभाऊंना गलबलून आलं; म्हणाले, माझ्या देहावरील अग्नीच्या धुरानेही उपकारांची परतफेड होणार नाही
Video : हायस्कूलच्या ऑफिसमध्येच चारी कोपऱ्यात शिक्षक शिक्षिकेचा 'इम्रान हाश्मी' अन् 'ओयो'ला सुद्धा लाजवेल असा दररोज सीनवर सीन
Video : मिठ्या, किसिंग अन् बरंच काही! हायस्कूलच्या ऑफिसमध्येच शिक्षिकेचा 'इम्रान हाश्मी' अन् 'ओयो'ला सुद्धा लाजवेल असा दररोज सीनवर सीन
Nawab Malik : एका जिल्ह्यातील प्रकारामुळे राज्यात पक्ष अन् पक्ष नेतृत्वाची बदनामी, हे पक्षहिताचं नाही; नवाब मलिकांनी पक्षाला घरचा आहेर
एका जिल्ह्यातील प्रकारामुळे राज्यात पक्ष अन् पक्ष नेतृत्वाची बदनामी, हे पक्षहिताचं नाही; नवाब मलिकांनी पक्षाला घरचा आहेर
Dhananjay Munde : पालकमंत्रिपद जाताच धनंजय मुंडेंचं खळबळजनक वक्तव्य, म्हणाले, 'मी अजितदादांना सांगत होतो भाजपसोबत जाऊ नका, हे षडयंत्र...'
पालकमंत्रिपद जाताच धनंजय मुंडेंचं खळबळजनक वक्तव्य, म्हणाले, 'मी अजितदादांना सांगत होतो भाजपसोबत जाऊ नका, हे षडयंत्र...'
Chhagan Bhujbal : बीडचं पालकत्व अजितदादांकडे, भुजबळांची तीन शब्दात प्रतिक्रिया; पक्षांतर्गत बदलांवरही ठेवलं बोट 
बीडचं पालकत्व अजितदादांकडे, भुजबळांची तीन शब्दात प्रतिक्रिया; पक्षांतर्गत बदलांवरही ठेवलं बोट 
Gulabrao Patil : दादा भुसे, भरत गोगावलेंचा पालकमंत्रिपदावरून पत्ता कट; मंत्री गुलाबराव पाटील कडाडले, म्हणाले...
दादा भुसे, भरत गोगावलेंचा पालकमंत्रिपदावरून पत्ता कट; मंत्री गुलाबराव पाटील कडाडले, म्हणाले...
Dhananjay Munde : ...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
Embed widget