एक्स्प्लोर

'पोस्टमन माझा' - कॅरेक्टर रिपोर्टिंगचा अनुभव

इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये नवं, प्रयोगशील असं काहीच होत नाही. सगळं काही एका पॅटर्नप्रमाणे चालतं, अगदी त्याच पॅटर्नप्रमाने करावं लागतं. नाहीतर तुम्ही केलेली बातमी ऑन एअर घेतली जात नाही, असा अनेकांचा चुकीचा समज आहे.

'पोस्टमन माझा निवडणुकीतला सर्वात भन्नाट शो!', 'माझाचा रिपोर्टर बनला पोस्टमन', 'आमदारसाहेब, मतदारांचे प्रश्न ऐका !' हे सगळे अॅस्टन पाहून लोकांचं या कार्यक्रमाकडे पाहण्याचं कुतूहल वाढलं. अगदी प्रोमो तयार झाला त्यादिवसापासूनच हे काहीतरी भन्नाट असणार, काहीतरी वेगळं असणार हे प्रेक्षकांना आधीच कळायला लागलं. तसे फोन, मेसेज आणि अनेकांच्या शुभेच्छा येत होत्या, तसं 'आपला प्रोमो तर मस्त झालाय पण कार्यक्रम लोकांना आवडेल ना?' ही धडकी मनात बसली होती. कारण बऱ्याचदा असं झालेलं मी पाहिलंय. पण काहीतरी वेगळं खरंच होतं म्हणून ही धडकी बाजूला झाली आणि एक वेगळा प्रयोग प्रेक्षकांना आपला वाटायला लागला. त्यामुळे या 'पोस्टमन माझा'भन्नाट शो चा अनुभव तुमच्यासोबत अगदी मोजक्या शब्दात शेअर करावासा वाटला. कारण रोजच्या रिपोर्टिंगपेक्षा खूप काहीतरी देऊन जाणारा, शिकवून जाणारा हा कार्यक्रम माझ्यासाठी होता, असं शूट करताना अनेकदा वाटायचं म्हणूनच हा ब्लॉग लिहण्याचा अट्टहास. इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये 4 वर्षांपासून एक नवखा पत्रकार म्हणून आणि त्याआधी एक शिकाऊ पत्रकार म्हणून काम करत असताना या इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये नवं, प्रयोगशील असं काहीच होत नाही. सगळं काही एका पॅटर्नप्रमाणे चालतं, अगदी त्याच पॅटर्नप्रमाने करावं लागतं. नाहीतर तुम्ही केलेली बातमी ऑन एअर घेतली जात नाही, अशी काही प्रमाणात माझी चुकीची समजूत होती. त्यामुळं तेच शब्द, तीच भाषा, एकाच प्रकारची देहबोली, ज्या आतापर्यंतच्या इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये काम करणाऱ्या रिपोर्टर-अँकरची पाहत आलो होतो, अगदी तसंच आपण केलं पाहिजे हे मी ठरवून घेतलं होतं. कधीतरी वरुन वरिष्ठांचे आदेश आले तर त्यात काहीतरी गंमतीदार करायचं पण त्यात सुद्धा स्वतः चा अतिशहाणपणा अजिबात नाही. पण सगळं करत असताना अनेकदा आपल्यातला अभिनय आपण करावा, असं अनेकदा वाटायचं पण 'बातम्या म्हणजे नाटक नाही, बातम्या म्हणजे सत्यता' हे डोक्यात असायचं. आता हे सगळं मोडीत काढत काहीतरी नवे प्रयोग करायचे हे ठरत असताना, 'आपण निवडणुकीत पोस्टमनला मतदार संघात फिरवू' अशी संकल्पना माझे सहकारी वैभव परब यांनी दिली आणि ती त्याचक्षणी अनेकांना आवडली. पण ती तशीच महिनाभर डायरीत पडून होती त्यावर वरिष्ठांचे विचार सुरू होते. आता हे 'तू करशील का ?' असं आमचे ब्युरो चीफ गणेश ठाकूर यांनी सहज विचारल्यानंतर मी तेव्हा लगेचच 'हो' बोललो, पण तो कार्यक्रम माझ्याऐवजी कोणीतरी चांगल्या अभिनेत्याकडे देतील असं मला वाटत होतं. त्यामुळे मी एकदम निवांत होतो. निवडणूक जशी एकदम तोंडावर आली, तसं आधी एकदा पूर्वकल्पना देऊन आता हा शो लवकर आपण सुरू करू असं आमचे संपादक राजीव खांडेकर सर बोलले. मग कुठेतरी आता आपणच शो करणार! यावर शिक्कामोर्तब झाले. अगदी 2 दिवसात तयारी आणि लगेचच 10 एपिसोड शूट करायचे जरा टेन्शनचं काम होतं. पण मी हिंमत न हरता आमचे ब्युरो चीफ गणेश ठाकूर, भारती सहस्त्रबुद्धे , अभिजीत करंडे, राहुल खिचडी माझे सहकारी रिपोर्टर टीम यांसारख्या ऑफिसमधल्या वरिष्ठ मंडळी या संकल्पनेमागे उभ्या राहिल्या. जब इतनी जबरदस्त टीम अपने साथ हो तो डर किस बात का? असा विचार करत कामाला सुरुवात केली. 'काहीतरी नवं करायचं', 'प्रयोग फसला तर लोक काय म्हणतील?', 'आपण तोंडावर तर पडणार नाही ना?', असे विचार थोडी चिंता वाढवत होते. पण दुसरीकडे आपल्याला जे काहीतरी वेगळं, जे फारसं कोणी करत नाही असं करायला मिळणार त्यामुळं मी अतिउत्साही होतो. संकल्पना समजून घेताना अनेकांनी अनेक गोष्टी सांगितल्या. त्या सगळ्या फॉलो केल्या. पहिला भाग ठाण्यात झाला, मग दादर, वांद्रे हे सुरवातीचे एपिसोड करताना सगळे त्या भागातले प्रश्न बाजूला काढणं, लोकांना बोलतं करणं, त्यात सायकलवर वेगवेगळ्या भागात फिरणं हे सगळं एकट्याला करायचं होतं म्हणून सुरवातीला थोडं हे जरा डोंगराएवढं काम वाटायला लागलं होतं. पण एकदा ठरवलं तर करणारच हे प्रश्न, पत्र, लोकांच्या समस्या वेगळा ढंग वापरून गेल्याच पाहिजेत, तरच त्या आमदाराला आपण काय केलं आणि लोकांच्या मनातल्या त्याच्याबाबतच्या भावना कळतील. यासाठी हे सगळं मला करणं गरजेचं वाटू लागलं. कार्यक्रम करताना एक रांगडी देहबोली ज्या देहबोलीने पोस्टमन आपला जवळचा वाटेल असं काहीतरी करण्यासाठी थोडा आपला नाटकाचा अनुभव मला कामी आला. तो बोलताना ग्रामीण भागातल्या लोकांना सुद्धा आपलसं करण्यासाठी थोडेफार प्रयत्न केले. 'रिपोर्टर असला काहीतरी ढोंगीपणा करतो का?' असे प्रश्न सुद्धा विचारले गेले. पण हे ढोंग, हा प्रयोग लोकांना झोपेतून उठवणारा होता. खूप कमी रिपोर्टर फिल्डवर असे आहेत ज्यांच्यामध्ये शब्द भांडारासोबत काहीतरी प्लस पॉईंट आहेत. कोणाला ती वापरायची संधी मिळते कोणाला नाही. त्यात मी या बाबतीत भाग्यवान राहीलो. पोस्टमनची वेशभूषा परिधान केल्यानंतर 'तुम्ही हुबेहूब पोस्टमन वाटता' असं शूट करताना कोणी बोललं तर अजून मूठभर मास अंगावर चढल्यासारखं वाटायचं. प्रत्येक नव्या रिपोर्टरने रिस्क घेऊन प्रयोग करायला हवे जेणेकरून आपल्याला काहीतरी उदाहरण आपल्या मागच्या ज्युनिअरला देता येईल, असं पोस्टमन माझा पूर्ण झाल्यानंतर वाटतंय. असे कार्यक्रम करताना तुमच्या सोबतचा तुमचा कॅमेरामन पण तेवढाच उत्साही पाहिजे नाहीतर 'पालथ्या घडावर पाणी' अशी तुमची गत होऊ शकते. कार्यक्रम हाती आल्यावरच नाव आधीच ठरवलेलं अरविंद वारगे. या कार्यक्रमात सगळ्यात महत्त्वाचं होतं तो मतदार संघ व्हिजवली दर्शविता येणं, पोस्टमन खुलवता येणं. हे सगळं काम अगदी एखाद्या मास्टर असल्यासारखं अरविंदने केलं. पोस्टमन थोडा जरी थकला किंवा एनर्जी कमी लागली की पुन्हा री शूट केलं. अफलातून शॉट घेणं त्यात तेवढाच अभिनय करून घेणं. हे सगळं काही त्यांनी केलं त्यामुळे या शो चा पडद्यामागचा रिअल हिरो कॅमेरामन अरविंद आहे. आता आपली पॅटर्नवाली रिपोर्टर स्टाइल 10 दिवसासाठी बाजूला ठेवून आपण मतदार आणि उमेदवारांना पोस्टमन होऊन उठवणार हे एकदाच ठरवून टाकलं होतं. नो वॉक थ्रू , नो टिक टॅक. हे पोस्टमन करताना सगळं काही वेगळं आणि ड्रमॅटिक जरी करायचं असलं तरी त्यातली मतदारांची व्यथा ही तितकीच पोटतिडकीने पोहचायला पाहिजे हे सुद्धा तितकंच आव्हानात्मक होतं. लोक भेटायचे, 'साहेब हे बघा! आम्ही माइकमध्ये बोलून काम होईल का?' 'साहेब, आमदाराला हे बोला, आम्ही कसे राहतोय ते सांगा' अशी आशा ठेवून ते बोलायचे. वाटायचं हा पोस्टमन करतोय पण याचा फायदा लोकांना होईल ना? निवडून येणारा उमेदवार यांचे प्रश्न सोडवेल ना? नाही सोडवले तर, पुन्हा रिपोर्टिंग करताना माझ्यावरचा विश्वास आमदारासारखा उडणार तर नाही ना? असं अधून- मधून वाटायचं. योगायोग असा की हा पोस्टमन सरळ मुख्यमंत्र्याकडे जाऊन त्यांच्यासमोर या व्यथा मांडायची संधी मिळाली हे त्यात विशेष होतं. विमानातून झकपक वाटणारी मुंबई आतून खूप वेगळी आहे, रोज जीवमुठीत धरून राहाणं काय असतं? हे हा कार्यक्रम करताना अनुभवायला मिळालं. चांदवलीच्या स्लम भागात पावसाळ्यात गुडघाभर साचणारं, जीव घेणारं महाभयंकर पाणी असू द्या किंवा मग मागाठाणे, मानखुर्द भागात अजूनही शौचालयाला उघड्यावर बसावं लागणं असू द्या किंवा मग पालघर विक्रमगड भागातला कुपोषणाचा न सुटलेला विषय असू द्या. झोपडपट्टी पुनर्वसन, बेरोजगारी, पाणी यांसारखे अनेक प्रश्न असू द्या. या सगळ्या प्रश्नाला वाचा फोडण्याची संधी या कार्यक्रमामुळे मिळाली यात धन्यता मानतो. आमदार 5 वर्ष निवडून येतो, मतदार आस लावून बसतो त्याने सगळे प्रश्न सोडवावे पण त्यात काही आमदार प्रामाणिकपणे प्रयत्न करूनसुद्धा अनेक तांत्रिक अडचणींमुळे ते प्रश्न, समस्या सोडवू शकलेले नाहीत हे सुद्धा कार्यक्रम करताना कळलं. पण ते सोडविण्यासाठी न थकता त्याने आपल्या मतदारांसाठी अथक परीश्रम करणं गरजेचं आहे. ज्यांनी काहीच कामं केली नाहीत त्यांच्यासाठी मतदारराजा हुशार झाला आहे. पण त्याला गरज असते ती मतदान करण्याची. जर मतदार आपला योग्य उमेदवार निवडून देऊन जीवनाशी निगडित समस्या त्या आमदाराकडून सोडवून घेणार असतील आणि उमेदवार पण तितकाच डोळे उघडून प्रश्न, समस्यांकडे लक्ष देणार असेल तर हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने सफल झाला याचं समाधान मिळेल. पोस्टमनने फक्त रिपोर्टरच्या भूमिकेतून पोस्टमन होऊन मतदार आणि उमेदवार यांना उठवायचं काम केलंय. जर हे लोकप्रतिनिधी असेच पाच वर्षे काम करतील, समस्या सोडवतील तर यापुढे रिपोर्टरला पोस्टमनच्या वेशात काम करावं लागणार नाही. आता हा पोस्टमन घेतो तुमचा निरोप! पुढची निवडणूक, पुढचे पत्र,तोपर्यंत रामराम! चलो...
View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election : मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग
संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग
मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता
मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता
झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी
झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी
ABP Premium

व्हिडीओ

Mahapalika Parishad Thane :अंगावर घेऊ नका, 'त्या' नेत्याचं नावं घेतलं तर शिंदेंची शिवसेना बदनाम होईल
Shrikant Shinde Majha Katta : पळवापळवी, राजकीय कलह ते युती, श्रीकांत शिंदेंसोबत माझा कट्टावर चर्चा
Uddhav Thackeray Full Speech : मुंबईचा घास भाजपला गिळू देणार नाही, 20 वर्षानंतर भावासमोर तुफान भाषण
Aaditya Thackeray Speech ShivajiPark: भरसभेत फडणवीसांची मिमिक्री, कोस्टल रोडवरून हल्लाबोल
Praniti Shinde on BJP :  काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेची देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election : मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग
संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग
मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता
मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता
झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी
झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी
Kolhapur ZP Election: कोल्हापूर झेडपी अन् 12 पंचायत समित्यांसाठी निवडणुकीचा धुरळा; अवघ्या 25 दिवसात गावगाड्यातून 'कारभारी' ठरणार! कोणत्या गटात कोणतं आरक्षण?
कोल्हापूर झेडपी अन् 12 पंचायत समित्यांसाठी निवडणुकीचा धुरळा; अवघ्या 25 दिवसात गावगाड्यातून 'कारभारी' ठरणार! कोणत्या गटात कोणतं आरक्षण?
प्रचाराची सांगात होताच रिक्षात आढळली बॅग; अपक्ष उमेदवाराने पकडली 50 लाखांची रोकड
प्रचाराची सांगात होताच रिक्षात आढळली बॅग; अपक्ष उमेदवाराने पकडली 50 लाखांची रोकड
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | मंगळवार
ब्लिंकिटने सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवरून ‘10 मिनिटांत डिलिव्हरी’चा दावा काढला; स्विगी, झेप्टोवरही दबाव वाढला
ब्लिंकिटने सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवरून ‘10 मिनिटांत डिलिव्हरी’चा दावा काढला; स्विगी, झेप्टोवरही दबाव वाढला
Embed widget