एक्स्प्लोर

घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने

अनेकदा मानहानीचे, निराशादायक प्रसंग येतात तेव्हा यांना दूरदेशी राहिलेल्या आपल्या गावाची, कुटुंबाची, लहान लेकरांची आठवण त्यांना अस्वस्थ करते. दुष्काळाशी दोन हात करणाऱ्या या लढवय्यांच्या डोळ्यांतून नकळत अश्रू येतात. हुंदका गळ्याशी दाटतो... अशावेळी ते काय करत असतील...?

"पहिल्यांदा या तालुक्यात आलो तेव्हा असं वाटलं... ये बिडा उठाके हम ने कौनो गलती तो नही किया" एकदम भुवन स्टाईमध्ये डायलॉगबाजी करणारे समाधान वानखेडे घाटंजी तालुक्याचे समन्वयक.

पाण्याची टंचाई, दुष्काळ वगैरे शब्द या तालुक्यासाठी जुने झाले आहेत. 10 दिवसांनी एकदा पाणी येणं किंवा दूरवरून हंडे डोक्यावर घेऊन पाणी आणणं हाच वर्तमान असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातल्या घाटंजी तालुक्यात पाण्याची कमतरता तर आहेच, पण त्याचबरोबर पाण्याची क्वालिटी हा इथला सगळ्यात मोठा प्रश्न आहे. इथलं फ्लोराईड असलेलं पाणी पिणं म्हणजे स्लो पॉयझनिंग आहे....

"अहो काय सांगू मॅडम, एकदा 10 लिटरचं पाण्याचं कॅंट आम्ही चुकीनं दाराबाहेर विसरलो तर रात्रीत ते टेबलसकट चोरीला गेलं." समाधान आपबिती सांगत होते. समाधान आणि परमेश्वर या दोन्ही तालुका समन्वयकांनी गावंच्या गावं पालथी घातली आणि घाटंजीतला दुष्काळ किमान आपल्या गावाबाहेर ठेवण्यासाठी लोकांना राजी केलं.

घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने

उन्हातान्हात बाईकवरून सतत कोणत्या ना कोणत्या गावात जाणं, लोकांशी बोलणं, गावकरी तोंडावर करत असलेले अपमान गिळून जिभेवर साखर आणत जलसंधारणाची कामं करण्यासाठी त्यांचं मन वळवणं या वाटतात तितक्या सोप्या गोष्टी नाहीत.

"मनभंग गावात आम्ही पोहोचलो तर गावकरी जेवण बिवण करून पत्ते खेळत बसलेले होते. तिथून अगदी दहा फुटावर आम्ही जलसंधारणाच्या व्हिडीओज दाखवत होतो. त्यांना बोलवलं तर आम्हालाच म्हणले, 'तुमचं काय ते आटपा आणि निघा. लई बघितले आमचं कल्याण करणारे'... मॅडम तिथले लोक गावाच्या नावाप्रमाणे मन भंगलेले होते." अशी टिप्पणी करत धनंजयने सायरेने स्वानुभव सांगितला.

घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने

चिखलदरा तालुक्यातली गावं एकमेकांपासून कधी 80, कधी 100 तर कधी 120 किलोमीटर दूर... या गावातून त्या गावात जायचा रस्ताही अभयारण्यातून जाणारा. निर्मनुष्य अशा त्या जंगलातल्या रस्त्यांवरून गेले तीन महिने हा वीर टू व्हिलरवर ये-जा करतो. गावांनी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभाग घ्यावा आणि आपल्या गावात जलसंधारणाची कामं करावी यासाठी त्याची धडपड कौतुकास्पद आहे. कित्येकदा चार चाकी गाडी उपलब्ध झाली नाही म्हणून हायड्रोमार्करच्या पट्ट्या मध्ये धरून अॅक्टीवावर निघालेला धनंजयला पाहण्याची त्या जंगल्यातल्या प्राण्यांनाही सवय झालीय. पानी फाउंडेशनने बनवलेल्या जलसंधारणाबाबच्या डॉक्युमेंटरीज लोकांना दाखवण्यासाठी धनंजयने योजलेली युक्ती निव्वळ लाजवाब होती.

चिखलदऱ्याच्या मुख्य बाजारपेठेत आपली अॅक्टीवा उभी करून त्यावर लॅपटॉप आणि प्रोजेक्टर ठेवला आणि समोर बंद असलेल्या दुकानाच्या शटरला बीग स्क्रिनचा दर्जा देत या पठ्ठ्याने तिथे या फिल्म्स दाखवल्या.

तालुक्यातील सर्व गावांना या स्पर्धेत सहभागी होण्याची समान संधी मिळावी. त्यांच्यापर्यंत सर्व माहिती पोहोचावी यासाठी पानी फाउंडेशनचे तालुका समन्वयक काय एकेक डोकी लावतात हे ऐकलं किंवा पाहिलं तरी विश्वास बसणार नाही.

असेच एक जुगाडू व्यक्ती म्हणजे कारंजा तालुक्याचे समन्वयक श्याम सवाई! पानी फाउंडेशनने पाणलोट विकास उपचारांची माहिती देणारी पुस्तकं छापली. 10 पुस्तकांचा हा सेट तालुक्यातील गावांमध्ये पोहोचवण्याची जबाबदारी अर्थातच तालुका समन्वयकाची.

घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने

एकाच मार्गावर येणाऱ्या गावांना पुस्तकं तर द्यायची आहेत पण सोबत टू व्हिलर आहे, दोनदा फेरी मारणं शक्य नाही. आता काय करायचे? याचा विचार सुरू असेपर्यंत श्यामने यावर तोडगा काढला देखील. पुस्तकांच्या पिशव्या दोन गळ्यात, दोन हातात अडकवत तब्बल 7 पिशव्यांचं चिलखत चढवून हा गडी तय्यार!

घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने

अडचणींवर ताबडतोब तोडगा काढण्याच्या बाबतीत सवाई आहेत श्याम. गावकऱ्यांवर त्यांचा भलताच जीव आहे. भल्या पहाटे उठून आणि रात्री उशीरापर्यंत श्रमदान करणाऱ्या लोकांच्या तब्येतीला काही होऊ नये म्हणून श्याम सतत स्वतः सोबत प्राथमिक उपचाराची पेटी (First aid box) ठेवतात. काम करता करता कोणाला डिहायड्रेशन झालं किंवा ऊन लागून कोणाला चक्कर आली, डोकं दुखलं तर श्यामच्या जादुई खिशातून तत्क्षणी ग्लुकोज डी चा बॉक्स किंवा औषधी गोळी बाहेर पडते.

सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेसाठी जानेवारीपासून तालुक्यातल्या गावांमध्ये आगंतुकासारखे जाणारे, गावात जमिनीचा तुकडाही नसलेले हे तालुका समन्वयक पाणी या एकाच विषयामुळे गावकऱ्यांच्या मनात घर करतात.

"ताई, संभाजी दादा आम्हाला रात्री एक वाजता पण भेटायला यायचे. हे नसते ना तर आम्हाला यात यातलं कायच कळलं नसतं. यांच्या धावपळीकडे बघून असं वाटतं आपण थोडे प्रयत्न करायला कायच हरकत नाही." आष्टी तालुक्यातल्या खडकत गावचे सरपंच तालुका समन्वयक संभाजी इंगळे यांची तोंड भरून स्तूती करत होते. सतत हसरा चेहरा आणि आश्वासक बोलणं असलेल्या बारीक अंगकाठीच्या संभाजी इंगळे यांनी वॉटर कप स्पर्धेसाठी आष्टी तालुका अक्षरशः पिंजून काढला. पायाला चाकं लावल्यासारखे संभाजी गावांगावांमध्ये फिरत होते. प्रत्यक्ष श्रमदान करण्यापासून ते गावकऱ्यांना प्रोत्साहीत करण्यापर्यंत संभाजी कुठेही कमी पडत नव्हते. आष्टीतल्या गावकऱ्यांसाठी संभाजी इंगळे म्हणजे थोरला मुलगाच!

घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने

"माझा धाकला लेक शिवाजी आर्मीत देशसेवा करतोय आणि थोरला संभाजी पानी फाउंडेशनचं काम करून मातीचं ऋण फेडतोय. दोघंबी आमच्या जवळ नसत्यात पण ते जे काम करतायत ते त्यांनी नाय केलं तर कोणी करायचं?" असं म्हणणाऱ्या माऊलीचे सिंधूबाई इंगळे यांचे पाय धरावेत असे वाटते.

आपलं गाव, आपलं घर, आपलं कुटूंब सोडून दुसऱ्या तालुक्यात राहणारे तालुका समन्वयक एकाच ध्येयाकडे नजर ठेवून दिवसरात्र काम करत आहेत. सकाळी पाचला उगवणारा त्यांचा दिवस रात्री एक पर्यंत सतत काही ना काही गोष्टींनी व्यस्त असतो. सकाळी एका गावात श्रमदान करायला जातात, तिथल्या कामाचा आढावा घेऊन, रोपवाटीका, अपूर्ण राहिलेले शोष खड्डे यांच्याविषयी पुन्हा पुन्हा गावकऱ्यांना समजावतात आणि मोर्चा दुसऱ्या गावाकडे वळवतात. अधे मधे फोनवरून इतर गावांतल्या जलसंधारणाच्या कामांचा सतत पाठपुरावा घेणं तर आलंच. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत महत्त्वाचा असलेला लोकसहभाग मिळवण्याची मोठी जबाबदारी तालुका समन्वयकांच्या अंगावर असते.

"इंद्रजित... काय भारदस्त नाव आहे हो तुमचं"

"अवो नाय मॅडम, मला अजिबात आवडत नाय माझं नाव. शाळेत सगळे चिडवायचे. इंग्रजीत मराठीत बोल म्हणून..." नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्याचे समन्वयक इंद्रजित पाटील म्हणजे एक दिलखुलास व्यक्तीमत्त्व! त्यांची लोकांशी संवाद साधायची लकब मजेशीर आहे. लोहा तालुका गेली कित्येक वर्ष दुष्काळाच्या काळोखात चाचपडतोय. त्यांना एक दिशा दाखवण्याचं महत्त्वाचं काम सुगंध आणि इंद्रजित या दोन तालुका समन्वयकांनी मोठ्या जिकीरीने पार पाडली आहे. लोहा तालुक्यातील काही गावांमध्ये चार पाच टाळकी काम करत होती तरी त्या गावात लोकसहभाग नाही म्हणून त्या गावांकडे दुर्लक्ष न करता त्यांना स्पेशल चाईल्डचा दर्जा देत या दोघांनी आपापल्या परीने गावांमध्ये जलसंधारण करण्यासाठी प्रयत्न केले. इंद्रजित यांची फक्त एकच तक्रार आहे. "आमच्या निलंग्यासारखं जेवण या लव्ह्यात मिळत नाही मॅडम. इथं फक्त खाण्याचे हाल होतायत." अस्सल खवय्या असलेले इंद्रजित धबधब्यासारखं बोलतात. त्यांच्या बोलण्यातून पाणलोट विकासासारखा क्लिष्ट विषयही सोपा होऊन जातो.

घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने

"आपल्या गावात टॅंकर आला की आपण काय करतो. घरातल्या जमेल त्या भांड्यात पाणी साठवण्याचा प्रयत्न करतो. मग पाऊस आल्यावर त्याला साठवायला भांडी नकोत? म्हणूनच आपण आपल्या शिवारात सी.सी.टी. डीप सी.सी.टी. अशी भांडी तयार करू." हे चपखल उदाहरण गावोगावच्या बायकांच्या लगेच पटतं आणि त्या काम करायला तयार होतात. पण गावातल्या राजकारणामुळे चार दिशांना तोंडं असलेल्या गावकऱ्यांचा एका मुद्द्यावर मिलाफ घडवून आणणं सगळ्यात कठीण काम! त्यासाठी पानी फाउंडेशनचे तालुका समन्वयक जीवाचं रान करून त्यांचं मनसंधारण घडवण्याचा प्रयत्न करतात.

अनेकदा मानहानीचे, निराशादायक प्रसंग येतात तेव्हा यांना दूरदेशी राहिलेल्या आपल्या गावाची, कुटुंबाची, लहान लेकरांची आठवण त्यांना अस्वस्थ करते. दुष्काळाशी दोन हात करणाऱ्या या लढवय्यांच्या डोळ्यांतून नकळत अश्रू येतात. हुंदका गळ्याशी दाटतो... अशावेळी ते काय करत असतील...?

'घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने' या उक्तीप्रमाणे व्रतस्थपणे काम करणाऱ्या पानी फाउंडेशनच्या 175 तालुका समन्वयकांना मानाचा मुजरा!

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

खेळताना ट्रॅक्टरवर चढला, चुकून गिअर पडला अन् क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; बार्शीत 4 वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू
खेळताना ट्रॅक्टरवर चढला, चुकून गिअर पडला अन् क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; बार्शीत 4 वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू
Shivsena Vs BJP: अंबरनाथमध्ये शिंदे गट-भाजपमध्ये तुफान राडा,  धमकीनंतर भाजप कार्यकर्त्यावर कोयत्याने हल्ला
अंबरनाथमध्ये शिंदे गट-भाजपमध्ये तुफान राडा, धमकीनंतर भाजप कार्यकर्त्यावर कोयत्याने हल्ला
Gautam Gambhir Ind Vs SA: मीच तो ज्याने इंग्लंडमध्ये तरुण संघ घेऊन विजय मिळवला, मीच तो ज्याच्या मार्गदर्शनात भारताने आशिया कप अन् चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली; गौतम गंभीरने पराभवानंतर टीकाकारांना सुनावलं
प्रेस कॉन्फरन्समध्ये अपयशावरुन बोचरे प्रश्न विचारताच गौतम गंभीर चिडला, म्हणाला, 'माझ्यामुळेच संघाला'
Mumbai Wilson Gymkhana: मुंबईतील विल्सन जिमखाना जैन संस्थेच्या घशात घालण्याचा डाव? गिरगावाचा मराठी माणूस एकटवला, जिल्हाधिकाऱ्यांना धाडलं पत्र
मुंबईतील विल्सन जिमखाना जैन संस्थेच्या घशात घालण्याचा डाव? गिरगावाचा मराठी माणूस एकटवला, जिल्हाधिकाऱ्यांना धाडलं पत्र
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nagpur Road ABP Majha Impact : एबीपी माझा'च्या बातमीनंतर नागपूर रस्त्यासाठी सरकारकडून 80 कोटींचा निधी मंजूर
MVA VS Mahayuti : मविआला ठेंगा, महायुतीसाठी रांगा; मनपा निवडणुकीपर्यंत मविआचं काय होणार? Special Report
Special Report MVA Vs Mahayuti पालिका निवडणुकीपर्यंत मविआचं काय होणार? मविआतून लढलेले अनेक महायुतीत
Bollywood Drugs Case : ड्रग्जची नशा, बॉलिवूडची दशा? 252 कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात नवे गौप्यस्फोट Special Report
Chhatrapati Sambhajinagar News : रद्द प्रमाणपत्र, चौकशीचं सत्र; अधिकाऱ्यांची चूक झाकण्यासाठी नागरिक वेठाला? Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खेळताना ट्रॅक्टरवर चढला, चुकून गिअर पडला अन् क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; बार्शीत 4 वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू
खेळताना ट्रॅक्टरवर चढला, चुकून गिअर पडला अन् क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; बार्शीत 4 वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू
Shivsena Vs BJP: अंबरनाथमध्ये शिंदे गट-भाजपमध्ये तुफान राडा,  धमकीनंतर भाजप कार्यकर्त्यावर कोयत्याने हल्ला
अंबरनाथमध्ये शिंदे गट-भाजपमध्ये तुफान राडा, धमकीनंतर भाजप कार्यकर्त्यावर कोयत्याने हल्ला
Gautam Gambhir Ind Vs SA: मीच तो ज्याने इंग्लंडमध्ये तरुण संघ घेऊन विजय मिळवला, मीच तो ज्याच्या मार्गदर्शनात भारताने आशिया कप अन् चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली; गौतम गंभीरने पराभवानंतर टीकाकारांना सुनावलं
प्रेस कॉन्फरन्समध्ये अपयशावरुन बोचरे प्रश्न विचारताच गौतम गंभीर चिडला, म्हणाला, 'माझ्यामुळेच संघाला'
Mumbai Wilson Gymkhana: मुंबईतील विल्सन जिमखाना जैन संस्थेच्या घशात घालण्याचा डाव? गिरगावाचा मराठी माणूस एकटवला, जिल्हाधिकाऱ्यांना धाडलं पत्र
मुंबईतील विल्सन जिमखाना जैन संस्थेच्या घशात घालण्याचा डाव? गिरगावाचा मराठी माणूस एकटवला, जिल्हाधिकाऱ्यांना धाडलं पत्र
Sharad Pawar: पुढील दोन-तीन दिवसांत काय होईल सांगता येत नाही; सुप्रीम कोर्टातील आरक्षणाच्या सुनावणीबाबत शरद पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
पुढील दोन-तीन दिवसांत काय होईल सांगता येत नाही; सुप्रीम कोर्टातील आरक्षणाच्या सुनावणीबाबत शरद पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
Smriti Mandhana Palash Muchhal: 'मी स्मृतीची प्रशंसक, मला फक्त पलाश मुच्छलचा खरा चेहरा समोर आणायचा होता'; मेरी डिकोस्टाच्या नावाने 'ती' पोस्ट व्हायरल
'मी स्मृतीची प्रशंसक, मला फक्त पलाश मुच्छलचा खरा चेहरा समोर आणायचा होता'; मेरी डिकोस्टाच्या नावाने 'ती' पोस्ट व्हायरल
Ambadas Danve Shivsena: आपण बाळासाहेब ठाकरेंचे बछडे आहोत, आपल्या मुळावर उठणाऱ्यांचा हिशेब करायचा; शिवसैनिकांच्या अंगात 10 हत्तीचं बळ भरणारं अंबादास दानवेंचं पत्र
आपण बाळासाहेब ठाकरेंचे बछडे आहोत, आपल्या मुळावर उठणाऱ्यांचा हिशेब करायचा; शिवसैनिकांच्या अंगात 10 हत्तीचं बळ भरणारं अंबादास दानवेंचं पत्र
Nashik News : चंपाषष्टी उत्साहात शोककळा, नाशिकच्या ओझरमध्ये बारागाड्याखाली येऊन भाविकाचा दुर्दैवी मृत्यू
चंपाषष्टी उत्साहात शोककळा, नाशिकच्या ओझरमध्ये बारागाड्याखाली येऊन भाविकाचा दुर्दैवी मृत्यू
Embed widget