CSK vs PBKS IPL 2025: चेन्नईमध्ये पंजाबच सुपर किंग

CSK vs PBKS IPL 2025: काल झालेल्या सामन्यात इतिहास घडविला तो यजुवेंद्र चहल याने... आय पी एल स्पर्धेत दुसरी हॅटट्रिक त्याने नोंदविली..खरे तर भारतातील लेग स्पिनर मध्ये चहल तसा उजवा...त्याचा आवडीचा खेळ बुद्धिबळ...पण मैदानात सुद्धा तो फलंदाजासोबत हा खेळ खेळत असतो..भारतीय संघात त्याची कामगिरी ही बऱ्यापैकी होत होती...२०१९ मधे इंग्लंडमधील विश्वचषकात तो कुलदीप बरोबर महत्त्वाचा गोलंदाज..प्रसारमाध्यमांनी कुलचां असे नामकरण देखील केले...पण मग तो अचानक मागे पडला..भारतीय संघाची जेव्हा जेव्हा निवड होत असे तेव्हा तेव्हा त्याचे नाव चर्चेस येई पण निवड मात्र क्वचित होत असे...त्याच्या कामगिरी पेक्षा त्याचा स्वॅग बघितला जाई..प्रसारमाध्यमे आणि जाहिरात कंपन्या यांना हवी असलेली आकर्षक पर्सनॅलिटी कदाचित त्याच्या कडे नसेल हे देखील कारण असेल.
गेले सहा महिने त्याच्या आयुष्यात असलेल्या वैयक्तिक गोष्टी मुळे अडचणीचे गेले...आपण सहज म्हणून जातो की " ते काय सेलिब्रिटी आहेत..त्यांच्यात हे रोजच चालते" आपण सर्व जण सेलिब्रिटी आहेत म्हणून त्यांचे माणूस म्हणून असलेली सर्व सामान्य ओळख नाकारतो...यजुवेंद्र हा सुद्धा माणूस होता..त्याला सुद्धा या वादळात कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागल्या...त्याच्या कडे ही मानवी मेंदू आहे...आणि त्या मेंदूत सुद्धा भाव भावनांचे खेळ चालतात...यजुवेंद्र या युद्धाला सामोरे जाऊन पुन्हा मैदानात परतला तो इतिहास घडविण्यासाठी..कारण अर्जुन सिसोदिया यांची ही कविता त्याला माहीत असेल.
युद्ध नहीं जिनके जीवन में
वे भी बहुत अभागे होंगे
या तो प्रण को तोड़ा होगा
या फिर रण से भागे होंगे
दीपक का कुछ अर्थ नहीं है
जब तक तम से नहीं लड़ेगा
दिनकर नहीं प्रभा बाँटेगा
जब तक स्वयं नहीं धधकेगा.
काल त्याच्यातील आतला दिवा त्याने पुन्हा पेटविला आणि जयपूर मध्ये स्वतःचे तेज निर्माण करून इतिहास घडविला...कालच्या सामन्यात श्रेयस जरी सामनावीर असला तरी...इतिहासाचा मानकरी यजुवेंद्र चहल होता..काल झालेल्या सामन्यात चेन्नई मध्ये पंजाब संघ सुपर किंग ठरला... चेन्नई संघाचा बुरुज पुन्हा एकदा ढासळला आहे... चेन्नई च्या मंद खेळपट्टीवर ,त्यांच्याकडे असलेल्या दर्जेदार फिरकी गोलंदाज आणि धोनी चे नेतृत्व यामुळे हा किल्ला बऱ्याच वेळ अजिंक्य राहिला होता..पण आता तसे नाही. काल नाणेफेक जिंकून पंजाब संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि चेन्नई संघाला फलंदाजी साठी आमंत्रण दिले..आज चेन्नई संघाची सुरुवात अडखळत झाली..जेव्हा त्यांच्या २२ धावत २ बळी गेले तेव्हा त्यांचे दोन्ही फलंदाज सॅम करण आणि रवींद्र जडेजा शून्य या धावसंखेवरून सुरुवात करणार होते..पण अशा परिस्थितीत रवींद्र जडेजा याने काही काळ आक्रमण करून धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न केला..पण ज्या षटकात त्याने तीन चौकार मारले त्याच षटकात तो बाद झाला...त्यानंतर सॅम आणि ब्रेव्हिस या दोघांनी मिळून ७८ धावांची भागीदारी केली..आज जेव्हा चेन्नई संघाला गरज होती तेव्हा सॅम ने मोठी खेळी केली...त्याने वैयक्तिक ८८ धावा केल्या त्यात ४ षटकार होते..त्याने सूर्यांश याच्या एकाच षटकात २६ धावा काढून मोठ्या धावसंखेकडे कूच केले..पण त्यांच्या धावसंखेला लगाम लावला तो याहूवेंद्र चहल याने..त्याने १९ व्या षटकात ४ बळी घेऊन चेन्नई संघाला २०० पार होऊ दिले नाही.. चेन्नई एक्सप्रेस १९० धावा करू शकली.
१९१ धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या पंजाब संघाने अपेक्षे प्रमाणे आक्रमक सुरुवात केली. ४४ धावांच्या सलामी नंतर प्रियांश खलील च्या गोलंदाजीवर बाद झाला. पण नंतर कर्णधार श्रेयस आणि प्रभसिमरण यांनी ५० चेंडूत ७२ धावांची भागीदारी केली ...आज पुन्हा एकदा श्रेयस राजासारखा खेळला...फिरकी गोलंदाजी खेळण्याचे त्याचे कौशल्य किती मोठे आहे हे त्याने पुन्हा दाखवून दिले..७२ धावांच्या खेळीत त्याने ४ षटकार मारले...त्याला प्रभ सिमरन याने ५४ धावा काढून मोलाची साथ दिली.आज पंजाब संघाचा पाठलाग चालू असताना ब्रेविस याने सीमारेषेवर शशांक याचा घेतलेला झेल अविश्वसनीय होता..२०/२० विश्वचषकात सूर्यकुमार याने घेतलेल्या झेलाची आठवण देऊन गेला ...पंजाब संघ १० सामन्यात १३ गुणांसहीत दुसऱ्या स्थानावर आहे. ..कोलकाता विरुद्ध मिळालेला एक गुण त्यांना शाप आहे की वरदान हे इतर संघाच्या कामगिरीवर ठरेल..पण पंजाब संघाची देहबोली आता बदलली आहे. कर्णधार श्रेयस रंगात आहे...त्यांचे अजून ४ सामने शिल्लक आहेत दोन विजय त्यांना प्ले ऑफ मध्ये घेऊन जातील. स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात ही स्पर्धा चुरशीची झाली आहे. आता क्रमांक एक आणि दोन चे संघ कधी ही आय पी एल जिंकू शकले नाहीत....जर ही आघाडी अशीच राहिली तर हा हंगाम इतिहास घडवेल एवढे मात्र नक्की..

























