एक्स्प्लोर

MI vs DC IPL 2025: सुर्याचा धीर, गोलंदाजीत बुमराह-सँटनर वीर

MI vs DC IPL 2025: काल अखेर या आय पी एल मधील ४ संघावर शिक्का मोर्तब झाले...पावसाची शक्यता असलेल्या सामन्यात आणि झाकलेली खेळपट्टी मनात ठेवून प्रथम गोलंदाजीचा निर्णय डुप्लेसी ने घेतला... हा निर्णय मुंबई संघाच्या १९ व्या षटक आधी योग्य होता...पण 19 व्या आणि विसाव्या षटकात आधी नमन आणि नंतर सूर्या यांनी त्या निर्णयालाच सुरुंग लावला...आणि खराब खेळपट्टीवर १८० धावांचा डोंगर उभा केला..सूर्यकुमार हा कधी कधी जनता गॅरेज सिनेमातील आनंद वाटतो..त्याच्याबद्दल बोलताना पोलीस म्हणतो वेरी बॅलन्सेड, बट मोर डेंजरस. त्या सिनेमात पर्यावरणावर चालून येणाऱ्या प्रत्येकाला हा आनंद नडतो...मुंबई संघावर वानखेडेवर चालून येणाऱ्या प्रत्येकाला हा सूर्यकुमार नडतो...किती शांत पणे तो आपले काम करून जातो...प्रथम फलंदाजी करताना तो आधी शांतपणे तिलक सोबत ४९ चेंडूत ५५ धावांची भागीदारी करतो...आणि शेवटी नमन धीर सोबत २१ चेंडूत ५७ धावांची भागीदारी करतो...इतके करत असताना अत्यंत निर्विकार चेहऱ्याने तो मैदानात वावरत असतो...या खेळपट्टीवर मुंबई संघ किती धावांचा बचाव करू शकेल हे गणित पक्के ठेवून तो डावाची आखणी करीत असतो...आणि बहुतेक वेळा तो त्यात यशस्वी होतो..अर्थात काल त्याला नमन धीर याने देखील मोलाची साथ दिली...चेंडूला जमिनीवरून आणि हवेतून सीमापार धाडण्याचे त्याचे कौशल्य मोठे आहे..त्याने काल ८ चेंडूत २४ धावांची विस्फोटक खेळी करून मुंबई संघाच्या विजयात हातभार लावला...

१८१ धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या दिल्ली संघ खेळपट्टीचा बाऊ मनात ठेवून खेळला... डुप्लेसी मोठा फटका खेळताना बाद झाला...तर राहुल त्याचा एकदिवसीय संघाचा कर्णधार रोहित च्या पावलावर पाऊल ठेवून बाद झाला...खरेतर या महत्त्वाच्या सामन्यात राहुल ने एका बाजू ने नांगर टाकणं अपेक्षित होते.. जो तो आतपर्यंत करीत आला आहे...पण बोल्ट चा चेंडू आता येईल या अँटीसेपेशनवर मोठा फटका खेळताना तो बाद झाला... मधल्या फळीत अक्षर नसताना दिल्ली संघ कोसळणार होताच...पण मधल्या फळीला सुरुंग लावला तो सॅटनर आणि बुमरहा या दोघांनी...वेगवान गोलंदाजीत बुमरा हा भारतीय संघाकडे असलेला ब्रह्मोस क्षेपणास्त्रच आहे...शिस्त. बुद्धिमत्ता आणि अचूक वेध हे त्याचे गुण....पण काल गोलंदाजीत कमाल केली ती सॅटनर याने.. २०/२० क्रिकेट मधे ४ षटकात केवळ ११ धावा आणि ३ बळी... यालाच भीमपराक्रम म्हणतात.

जागतिक क्रिकेट मधील सॅटनर हा का मोठा गोलंदाज आहे हे पाहायचे असेल तर त्याची कालच्या सामन्यातील गोलंदाजी पहा... एकाच टप्प्यावर गोलंदाजी केली...त्याच टप्प्यातून चेंडू आत आणला..त्याच टप्प्यावर चेंडू बाहेर काढला आणि त्याच टप्प्यावर चेंडू सरळ ठेवला...ही करीत असताना वेगात बदल केला आणि ऍक्शन तीच ठेवली..म्हणूनच काल समालोचक त्याची स्तुती करताना थकत नव्हते... बिपराज साठी चेंडू हळुवार पणे आत आणला..रिझवी साठी चेंडू सरळ ठेवला...आणि आशुतोष साठी बाहेर काढला..आणि या तिन्ही चेंडूची लाईन लेन्थ तीच होती....काल मुंबई संघाच्या विजयात हातभार लावणारी आणखीन एक व्यक्ती म्हणजे यष्टिरक्षक रिकलटण..पोरेल आणि आशुतोष यांना बाद करताना त्यांनी दाखविलेली चपळाई महत्त्वाची ठरली..आता मुंबई संघ प्ले ऑफ साठी पात्र ठरला आहे...आणि ही गोष्ट इतर संघांसाठी धोक्याची आहे..कारण बाद फेरीतील सामान्यांचा मुंबई संघाच्या गाठीशी खूप मोठा अनुभव आहे....त्यातून जर पुढील सामना जिंकून मुंबई संघ दुसऱ्या स्थानावर जर पोहोचला तर हा धोका आणखीन वाढणार आहे....पण सध्यातरी आर सी बी समोर असलेले आव्हान पाहता जैसे थे ही स्थिती कायम राहील असे दिसते.....आयपीएलच्या इतिहासात  सलग पहिले चार सामने जिंकून प्ले ऑफ च्या शर्यतीत नसणे हा सुद्धा एक इतिहास आहे.. तो आज दिल्ली संघाने घडविला..इतिहास नेहमी पहिल्यांदाच कोणीतरी घडवीत असतो...कदचित पंजाब आणि आरसीबी... नवा इतिहास घडविण्याच्या तयारीत असतील..जस्ट वेट अँड वॉच....

संबंधित बातमी:

MI vs DC IPL 2025 : आयपीएलच्या टॉप-4 संघांवर शिक्कामोर्तब! हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली 'मुंबई इंडियन्स'ची प्लेऑफमध्ये धडक, दिल्ली बाहेर

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Chandrapur : चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
ABP Premium

व्हिडीओ

Chandrapur Mayor : चंद्रपुरात पक्षाअंतर्गत कुरघोडीला उधाण  Special Report
Solapur Praniti shinde Vs Jaykumar gore : निकालानंतरचे शोले टीका, टोमणे, टोले Special Report
Samadhan Sarvankar : सरवणकरांचं अ 'समाधान' भाजपवर शरसंधान Special Report
NCP on ZP Election : महापालिकेच्या पराभवानंतर पवारांनी कोणता धडा घेतला? Special Report
BJP on Samadhan Sarvankar : समाधान सरवणकर यांना जी मत मिळाली ती फक्त भाजपमुळे

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrapur : चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
NCP : शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
Embed widget