एक्स्प्लोर

BLOG : आजमाले...

स्वाती महाडिकांना भेटून एवढं नक्की माहित झालं की कधी वेळ पडलीच तर आयुष्य आजमवायला मी मागे-पुढे पाहणार नाही!

खरं तर मला ब्लॉग वगैरे लिहायचा नव्हता पण, खूप वेळ निघून गेल्यावर समजतं की आपल्या हातातून, मनातून गोष्टी निसटत जातात. काही गोष्टी पुन्हा आठवतांना, इतरांना सांगतांना त्या नव्याने कळत जातात. मोलाच्या क्षणांची नोंद नोंदवहीत करुन ठेवायलाच हवी. नाईट शिफ्ट संपल्यानंतर दुपारी तीन वाजता जाग आली. घरातला पोरका झालेला पसारा आता तरी आमच्याकडे बघ म्हणत होता. एकंदर, पुन्हा एकदा ताणून द्यावी असं वाटलं. आळस अशा वेळी वेळेवर धावून येणारा मित्र होतो. पण, संध्याकाळनंतर हा आळस जबरस्तीनं झटकावा लागला. ऑफिसनं सांगितलं स्वाती महाडिकांची मुलाखत करण्यासाठी चैन्नईला जायचं आहे. लगेच निघ, आवर पटकन. झालं... पुन्हा एकदा पसारा पोरका करुन मी निघाले. जाता-जाता स्वाती महाडिकांविषयी जमेल तेवढी माहिती घेतली. पण, मुंबईहून निघण्याआधी त्यांच्याशी पाचेक मिनिटं फोनवर बोलले तेव्हाच जाणवलं ही बाई जबरदस्त आहे. या आधीही अनेकांना हे जाणवलं. जेव्हा कर्नल संतोष महाडिक शहीद झाले तेव्हा पतीला श्रद्धांजली देतांना तिनं निर्धार केला की मी सुद्धा पतीच्याच जागेवर जाऊन त्याचं अपूर्ण काम पूर्ण करणार. आज तिनं दिलेला शब्द पाळल्याची पावती तिला मिळणार होती. आता स्वाती महाडिक- लेफ्टनंट स्वाती महाडिक होणार होती. मला स्वाती महाडिकांना भेटल्यावर बऱ्याचदा गडबडायला झालं. हिला अगं म्हणू की लेफ्टनंट स्वाती महाडिक मॅडम म्हणू, की आणखी काही. कारण, स्वाती प्रत्येक बाईत सापडणारं एक अजब मिश्रण आहे. हे मिश्रण एकाच वेळी एखादी अवखळ मुलगी, समंजस स्त्री, कर्तबगार बाई, आणि हळूवार आई अशी अनेक रुपं तुमच्यासमोर घेऊन येतं आणि हमखास समोरच्याचा गोंधळ उडवतं. परेड दरम्यान कॅमेरामन अजित कदमनं स्वाती महाडिकना फोकस केलं, कॅमेऱ्यातल्या झूमनं पहिल्यांदा मी स्वाती महाडिक या झळाळत्या चेहऱ्याला पाहिलं. खरं तर सुरुवातीला ३१ महिला कॅडेट्सपैकी नेमकी स्वाती महाडिक कोण? हे लक्षातच येईना. फोटो पाहिला होता, पण सगळ्यांचाच एकसारखा मिल्ट्री कट, कडक युनिफॉर्ममधली एकसारखी संयमीत, शिस्तबद्ध हालचाल. मुलाखत देतानाही हा संयमीतपणा स्वाती महाडिकांच्या शब्दाशब्दांत जाणवत होता. खरं तर आजचा दिवस स्वाती महाडिकांनी स्वत:हून आयुष्याला दिलेला मोठा टर्निंग पॉईंट. त्यात नवऱ्याच्या आठवणीची ठसठसणारी जखम, दोन गोंडस मुलांचे आई दिसली की फुलून जाणारे चेहरे हे सगळं एकाच वेळी सांभाळणं अवघड होतं. पण, या मुलाखतीत जाणिवांशी प्रामाणिक राहणं म्हणजे काय हे मला शब्दश: कळलं. स्वाती मुलाखत देताना खंबीर होतीच पण प्रचंड प्रामाणिक होती. मला पहिल्यापासून लग्नं करण्याचीच हौस होती. लग्नं, घर, संसार हेच माझं स्वप्नं होतं. हे लेफ्टनंट पदाला पोहोचलेल्या तिनं किती सहजपणे सांगून टाकलं. स्त्रीमुक्तीचं वारं कदाचित उगाच तिच्या आयुष्यात पिंगा घालत बसलं नसेल. करिअरिस्टीक असणं म्हणजे नेमकं काय हा प्रश्न तिला कधी सुटलाच नसेल. पण, तरीही ती आता जगातली सर्वात मुक्त आणि ध्येयवादी स्त्री होती. मला तेव्हा कळलं की कुठल्याही स्त्रीनं, पुरुषानं स्त्रीवादी, पुरोगामी, अहिंसावादी, राष्ट्रवादी, असं काय-काय असण्याआधी जाणिवांशी प्रामाणिक असायला हवं. माणसाची प्रामाणिकता हाच सर्वात मोठा ईझम आहे. चेन्नईतल्या ओटीए मध्ये ३२२ जण ऑफिसर झाले होते. या सर्वांच्याच चेहऱ्यावर ऊन-पाऊस झळकत होता. कुणी हरयाणा, कुणी आसाम, कुणी मध्य प्रदेश कुठून कुठून आलेले खेड्यापाड्यातले आईबाप आपल्या पोराचं, पोरीचं कौतुक पाहायला आलेले. हरियाणाची एक मुलगी तर गीता-बबिताची आठवण करुन देणारी. घुंघट घेतलेल्या, अगदी लग्नाला जावं तशा सजूनधजून आलेल्या आया आपल्या वंशाच्या दिव्याची नजर काढत कानशिलावर बोटं मोडून घेत होत्या. जगातली सगळी श्रीमंती त्या परेड ग्राऊंडवर अवतरल्यासारखी वाटत होती आणि या श्रीमंतीला काचेबाहेरुन पाहणारी मी कफल्लक. वाटलं की तिथे त्यांच्यासोबत मी का नाही? त्यांच्याजागी जर मी असते तर माझाही बाप तिथे आनंदानं नाचला असता. आईनं जगभर फोन केले असते. आपल्या कामानं आईबापाच्या चेहऱ्यावर अभिमानाचं, समाधानाचं हसू बघणं हे ही करिअरच. मी जेव्हा स्वाती आणि तिच्यासोबत ट्रेनिंग करणाऱ्या मुलींशी बोलले तेव्हा मला या सगळ्या मुलींचा प्रचंड हेवा वाटला. ग्राऊंडभर ट्रायपॉड उचलून इकडे तिकडे धावतांना माझी दमछाक झालेली. पण या पोरी वर चांदणं पडल्यासारख्या बागडत होत्या. आवाज बसेपर्यंत ओरडत जल्लोष करत होत्या. फर्मान येताच क्षणात आपापल्या भूमिकेत शिरत होत्या. वाटलं की लेफ्टनंट झाल्या आहेत बोलतील की नाही? पण, मी त्यांच्याशी बोलायला गेले आणि त्या अक्षरश: सुटल्या. प्रत्येक मुलीनं सीमेवर जाऊन लढावंच असं नाही. पण, यांच्याकडे बघून मला वाटलं की, आपण पोरी कधीकधी फारच रडतो. पिरीयडच आलाय, सुट्टीच पाहिजे, नाईटशिफ्ट नको, मुलगी असून एवढं हार्डवर्क,  घरदार सांभाळून नाही बाई होत. अशा सवलतीच आपल्याला स्वत:पर्यंत पोहोचू देत नाही. पण, या पोरी त्याक्षणी जगातल्या सर्वात सुंदर मुली होत्या. स्वाती महाडिक ही सुद्धा त्याच सौंदर्याचं एक मूर्तीमंत रुप होती. स्वातीनं स्वत:च्या निर्णयानं फक्त स्वत:चंच आयुष्य बदललं नाही तर. तिनं दृष्टीकोन बदलला आहे. साताऱ्यातल्या एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातली सून नवरा गमावल्यानंतर त्याच्यासारखंच सीमेवर जायचं म्हणते. तेही पदरात दोन लहान पोरं असतांना. आपल्याकडे नवरा गमावलेल्या बाईला पाहतांना नजरेत कित्येक छटा असतात- सहानुभूतीच्या, संधीसाधूपणाच्या, शकुनअपशकुनाच्या. पण या सगळ्या नजरांना नजर देत स्वाती उभी राहिली. अवघ्या एका वर्षात ती लेफ्टनंट झाली. तिच्या सासूनं तर चक्क माझी सून विधवा नाही तर माझ्या मुलाला अमर करणारी म्हणून ती आजही सौभाग्यवतीच आहे असं अभिमानानं सांगितलं. एका स्त्रीनं दुसऱ्या स्त्रीच्या स्त्रीत्वाचा केलेला हा सन्मान म्हणायला हवा. समाजाची मानसिकता बदलली पाहिजे असं आपण नुसतंच म्हणतो. पण, स्वातीनं त्याची सुरुवातच स्वत:पासून केली. म्हणूनच ९० वर्षाची आज्जी नातीचं कौतुक पाहायला आली. डोळ्यांतलं आभाळ केव्हाही बरसेल असं असतांनाही बाप पहाडासारखा खंबीर होऊन पाठिशी उभा राहिला. तिची दोन्ही मुलं आईचं बदलेलं रुप समजून घेत राहिली. सातवीतल्या कार्तिकीनं तर आईसाठी येणारा प्रत्येक फोन अटेन्ड करत आईच्या जनसंपर्क अधिकाऱ्याचीच भूमिका बजावली. स्वातीनं काय कमावलं याचं उत्तर शब्दात देणं खरंच अशक्य आहे. खरं तर स्वातीनं नाही आपण सगळ्यांनीच स्वातीच्या रुपात बरंच काही कमावलं आहे. ही वळलेली निश्चयाची मूठ आता आणखी घट्ट व्हायला हवी. मला अशी मूठ कधी वळता येईल का? वळलीच तर तिला टिकवण्याची ताकद माझ्यात आहे का? मला माहित नाही. पण, स्वातीला भेटून एवढं नक्की माहित झालं की कधी वेळ पडलीच तर आयुष्य आजमवायला मी मागे-पुढे पाहणार नाही.
अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raigad Guardian Minister : भरत गोगावले की अदिती तटकरे, पालकमंत्रिपदाच्या वादात रायगड जिल्ह्याच्या विकासाचा खोळंबा, माजी आमदाराचा प्रहार
भरत गोगावले की अदिती तटकरे, पालकमंत्रिपदाच्या वादात रायगड जिल्ह्याच्या विकासाचा खोळंबा, माजी आमदाराचा प्रहार
Harshit Rana Concussion Substitute Controversy : टीम इंडियावर 'बेईमानीचा' आरोप! इंग्लंडचा कर्णधार संतापला; भारताच्या स्टार खेळाडूने सुद्धा उपस्थित केला 'गंभीर' प्रश्न
टीम इंडियावर 'बेईमानीचा' आरोप! इंग्लंडचा कर्णधार संतापला; भारताच्या स्टार खेळाडूने सुद्धा उपस्थित केला 'गंभीर' प्रश्न
Beed: मध्यरात्री भरधाव वेगात येणाऱ्या दोन कार समोरासमोर आदळल्या, 3 ठार, अहमदपूर -अहमदनगर महामार्गावर भीषण अपघात
मध्यरात्री भरधाव वेगात येणाऱ्या दोन कार समोरासमोर आदळल्या, 3 ठार, अहमदपूर -अहमदनगर महामार्गावर भीषण अपघात
Union Budget 2025: आयकरपासून, पेन्शन, वंदे भारत, शेतकऱ्यांपर्यंत; आज केंद्रीय अर्थसंकल्पात होणार मोठ्या घोषणा
आयकरपासून, पेन्शन, वंदे भारत, शेतकऱ्यांपर्यंत; आज केंद्रीय अर्थसंकल्पात होणार मोठ्या घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 80 at 8AM Superfast 01 February 2025 सकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्याSanjay Shirsat Interview : दोन 'शिवसेना' झाल्या याचं दुःख, दोघांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करेनABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8AM 01  February 2024 सकाळी ८ च्या हेडलाईन्सTop 70 at 7AM Superfast 01 February 2025 सकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्या

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raigad Guardian Minister : भरत गोगावले की अदिती तटकरे, पालकमंत्रिपदाच्या वादात रायगड जिल्ह्याच्या विकासाचा खोळंबा, माजी आमदाराचा प्रहार
भरत गोगावले की अदिती तटकरे, पालकमंत्रिपदाच्या वादात रायगड जिल्ह्याच्या विकासाचा खोळंबा, माजी आमदाराचा प्रहार
Harshit Rana Concussion Substitute Controversy : टीम इंडियावर 'बेईमानीचा' आरोप! इंग्लंडचा कर्णधार संतापला; भारताच्या स्टार खेळाडूने सुद्धा उपस्थित केला 'गंभीर' प्रश्न
टीम इंडियावर 'बेईमानीचा' आरोप! इंग्लंडचा कर्णधार संतापला; भारताच्या स्टार खेळाडूने सुद्धा उपस्थित केला 'गंभीर' प्रश्न
Beed: मध्यरात्री भरधाव वेगात येणाऱ्या दोन कार समोरासमोर आदळल्या, 3 ठार, अहमदपूर -अहमदनगर महामार्गावर भीषण अपघात
मध्यरात्री भरधाव वेगात येणाऱ्या दोन कार समोरासमोर आदळल्या, 3 ठार, अहमदपूर -अहमदनगर महामार्गावर भीषण अपघात
Union Budget 2025: आयकरपासून, पेन्शन, वंदे भारत, शेतकऱ्यांपर्यंत; आज केंद्रीय अर्थसंकल्पात होणार मोठ्या घोषणा
आयकरपासून, पेन्शन, वंदे भारत, शेतकऱ्यांपर्यंत; आज केंद्रीय अर्थसंकल्पात होणार मोठ्या घोषणा
Budget 2025 Income Tax Slab: मध्यमवर्गीयांना खुशखबर मिळणार, टॅक्स स्लॅबमध्ये महत्त्वपूर्ण बदलांची शक्यता, 10 लाखांपर्यंतच उत्पन्न करमुक्त?
मध्यमवर्गीयांना खुशखबर मिळणार, टॅक्स स्लॅबमध्ये महत्त्वपूर्ण बदलांची शक्यता, 10 लाखांपर्यंतच उत्पन्न करमुक्त?
Budget 2025 Home Loan: गृहकर्जाचे हप्ते फेडणाऱ्यांना आनंदाची बातमी मिळणार? निर्मला सीतारामन अर्थसंकल्पात महत्त्वाचा निर्णय घेणार?
गृहकर्जाचे हप्ते फेडणाऱ्यांना आनंदाची बातमी मिळणार? अर्थसंकल्पात मोठ्या घोषणेची शक्यता
फेब्रुवारीपासूनच उन्हाचा चटका वाढणार, IMD चा तापमानवाढीचा इशारा, थंडी कितपत राहणार? वाचा सविस्तर
फेब्रुवारीपासूनच उन्हाचा चटका वाढणार, IMD चा तापमानवाढीचा इशारा, थंडी कितपत राहणार? वाचा सविस्तर
Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Embed widget