एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना अनावृत्त पत्र

अनावृत पत्र आत्महत्यांच्या बातम्यांनी अस्वस्थ झालेल्या प्रत्येक लेकरास प्रिय मित्रा, सुखदु:ख आशानिराशेचा हा खेळ तुला नवा नाही, विसरु नकोस. तुझ्या आगमनाची चाहूल तुझ्या आईला प्रथम लागली तीही चक्कर आणि उलट्यांच्या त्रासातूनच तू पण आख्खे नऊ महिने पोटातल्या त्या एवढ्याशा जागेत स्वत:ला अॅडजेस्ट करत वाढत होतास कित्येकदा हातपाय हलवायला ही जागा कमी पडली असेल, अंग आखडून गेले असेल, गळ्या भोवती नाळ अडकून तू अस्वस्थ झाला असशील आपल्या वाटेचे अन्न मिळवताना तू तेव्हाही धडपडतच होतासच आणि तुझ्या आईला त्रास देत होतासच, आपल्या लेकरांचा कधी आईबापांना त्रास होतो का बाळा? तुझ्या जन्माच्यावेळी जीवघेण्या कळा सोसणारी तुझी आई आणि बाहेर अस्वस्थपणे येरझाऱ्या घालणारा तुझा बाप यांच्या इतकाच तूही त्रासला होतास आणि बाहेर पडायला धडपडत होतास बाहेरच जग तू लुकलुकत्या डोळ्यांनी पहात असतानाचं नर्सने तुला खाली डोके वर पायची शिक्षा केली तेव्हा तु केवढ्या मोठ्यांदा भोकाड पसरलंस आणि जणू मदतीसाठी साद घातलीस, नर्सनेही ही मग माघार घेत तुला अलगद तुझ्या आईच्या कुशीत झोपवलं. बाळा विसरु नकोस आजही संकटकाळी तू साद घातलीस तर तुझ्यासाठी धावून यायला तुझे सगेसोयरे सारे सज्ज आहेत. तू एकटा नाहीस! तुझ्या पाळण्यावर टांगलेल्या चांदव्यावरचे पक्षी तुझ्या हातात येत नाहीत. म्हणून तु जोरजोरात रडत होतास पण नंतर अचानक तुझ्या लक्षात आलं की आपली बोट चोखून बघण्यातही वेगळी मजा आहे. लक्षात आलंय तुझ्या आपल्या आकाशात दिसणाऱ्या प्रत्येक स्वप्नांना आपण प्रत्यक्षात आणू शकलो नाही, तरी आपल्याजवळ आपलं स्वत:च असं काहीतरी खास असतंच आणि तेही आपल्याला आनंद देतंच! बाळा अरे आयुष्य म्हणजे अखंड धडपड असते बाबा…… तू प्रथम पालथा पडायचा प्रयत्न केलास तेव्हा तुझा एक हात तुझ्या पोटाखाली आडकला होता आणि आज्जीने मदत केल्यावर तू दोन्ही हातावर जोर देत मान उंच करुन विजयी नजरेने हसलास तेव्हा आख्खं घर तुझ्याभोवती टाळ्या वाजवत होतं. विसरु नकोस, प्रगतीच्या वाटेवर आपला हात असा आपल्याच काही चुकांमुळे आपल्या पोटाखाली अडकलेला असतो. पण थोड्याशा मदतीने आणि बऱ्याचशा प्रयत्नाने आपण नक्कीच बाहेर पडतो आणि नव शिखर गाठतो. तुझं सरकणं, रांगणं, हात धरुन एक एक पाऊल टाकण्यासाठी धडपडणं, पडणं, रडणं… आणि उठून प्रयत्न करणं… आणि चालायला यायला लागल्याबरोबर सर्वाची नजर चुकवून दरवाजा बाहेर पळणं… प्रगतीचे टप्पे ओलांडताना आणि नाविन्याचा शोध घेताना तू किती उत्साही आणि आनंदी होतास… तोच उत्साह, तोच प्रयत्नवाद आणि बंडखोरपणासुध्दा कायम ठेव… तुझ्या उत्साहाला प्रोत्साहन द्यायला आणि तुझ्या बंडखोरीला योग्यवेळी आवर घालायला, तुझे सगेसोयरे तत्पर आहेत त्यांचावर विश्वास ठेव! तुला आठवतं का? अजून तुला फारसं बोलता येत नव्हतं. तेव्हा तू स्वतंत्र ताटात जेवायचा हट्ट धरलास आणि वरण भाताचं ताट वर करुन स्वत:च्या डोक्यावर अभिषेक करुन घेतलास, त्यानंतर तू स्वत:च हळूहळू व्यवस्थित जेवायला शिकलास. लक्षात आलं का तुझ्या?… तुझ्यावर आईवडिलांच्या पैशाच्या खर्चाचं टेन्शन तू घेऊ नकोस. सुरुवातीलाही वरण भात वाया गेला होताच. पण वाया जाईल म्हणून त्यांनी तुला स्व हातानी जेवायला शिकवायची जिद्द सोडली नाही आणि तुही निट जेवायला शिकायची जिद्द सोडली नव्हतीस. तेव्हा एखाद्या परीक्षेत, स्पर्धेत, इंटरव्ह्यूमध्ये यश मिळालं नाही, खर्च वाया गेला असे म्हणून हातपाय गाळू नकोस. पुन्हा नव्याने तयार हो! तुझे आईबाप सर्वस्व पणाला लावून तुला आयुष्यात उभं करतील याची खात्री बाळग! पेपरमध्ये आणि चॅनलवर दिसणाऱ्या दंगलीच्या, अतिरेकी हल्ल्याच्या खून मारामारीच्या, प्रदूषणाच्या, भ्रष्टाचाराच्या, वाढत्या महागाईच्या, रोगराईच्या, गैरव्यवस्थेच्या, प्रत्येक क्षेत्रातल्या गळे कापू स्पर्धेच्या बातम्या पाहून तू अस्वस्थ होणारच! पण त्याच पेपरमध्ये, चॅनलवर दिसणाऱ्या प्रगतीच्या चिकाटीच्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर अपुऱ्या साधनांसह अशक्य ते शक्य करुन दाखवणाऱ्या वेगवेगळ्या असामान्य लोकांची तू माहिती करुन घे. टीप-कागदासारखे त्यांचे गुण टीपून घे आणि अंगी बाणव. मोठ्या कष्टाने आणि प्रयत्नाने उमलणार हे सुंदर आयुष्य स्वत:बरोबरच समाजासाठी पूर्णपणे फुलवायचं आहे हे नक्की ध्यानात ठेव! स्वत:पासूनच स्फूर्ती घे! सुखदुख:च्या हिंदोळ्यावर झोके घेण्यास सज्ज हो!

                                            तुझाच

                                       वाढत्या आत्महत्यांच्या बातम्यांनी

                                         अस्वस्थ झालेला एक बाप

डॉ श्रीकांत कामतकर drkamatkar@gmail.com 9822215118
अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray & Uddhav Thackeray: राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत खरंच एकत्र येणार का?
राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी खरंच एकत्र येणार का?
विराट अनुष्कानंतर आता शुभमन गिलच्या अन् या अभिनेत्रीच्या डेटींगची चर्चा, म्हणाली, 'जोडी बना दो यार..'
विराट अनुष्कानंतर आता शुभमन गिलच्या अन् या अभिनेत्रीच्या डेटींगची चर्चा, म्हणाली, 'जोडी बना दो यार..'
Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  8 AM : 27 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  27 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaRatnagiti Weather : रत्नागिरीत धुकेच धुके... सोबत कमालीचा गारठाDhananjay Chandrachud : संजय राऊतांच्या आरोपांवर चंद्रचूड यांचं उत्तर

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray & Uddhav Thackeray: राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत खरंच एकत्र येणार का?
राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी खरंच एकत्र येणार का?
विराट अनुष्कानंतर आता शुभमन गिलच्या अन् या अभिनेत्रीच्या डेटींगची चर्चा, म्हणाली, 'जोडी बना दो यार..'
विराट अनुष्कानंतर आता शुभमन गिलच्या अन् या अभिनेत्रीच्या डेटींगची चर्चा, म्हणाली, 'जोडी बना दो यार..'
Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
Bollywood Actor Life: जन्म होताच आईला गमावलं, ड्रग्सच्या नशेनं बालपण हिरावलं, 'या' अभिनेत्याला ओळखलंत का?
जन्म होताच आईला गमावलं, ड्रग्सच्या नशेनं बालपण हिरावलं, 'या' अभिनेत्याला ओळखलंत का?
Maharashtra CM: मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीतून एकनाथ शिंदेंची माघार, देवेंद्र फडणवीसांचा मार्ग मोकळा?
मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीतून एकनाथ शिंदेंची माघार, राज्यात देवेंद्रपर्वाचा मार्ग मोकळा?
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Embed widget