एक्स्प्लोर

खान्देश खबरबात : बदनामीच्या फेऱ्यात धुळे, जळगाव जिल्हा परिषदा

धुळे आणि जळगाव जिल्हा परिषदा विभिन्न आरोपांमुळे चर्चेत आहेत. ग्रामीण भागाच्या या मिनी मंत्रालयात अनेक प्रकार मनमानी करुनच चालत असल्याचीच वरील दोन उदाहरणे आहेत.

पंचायत राज समितीतील सदस्य आमदाराला लाच देताना धुळे जिल्हा परिषदेचे उपमुख्याधिकारी पकडले गेले. त्यामुळे जिल्हा परिषदेची महाराष्ट्रभर बदनामी सुरु आहे. कधी काळी भास्कर वाघाने केलेल्या गैरव्यवहारांमुळे धुळे जिल्हा परिषद बदनाम झाली होती. लाच प्रकणामुळे त्या आठवणी ताज्या झाल्या. जळगाव जिल्हा परिषदेचीही सध्या दोन गोष्टीत बदनामी सुरु आहे. उपाध्यक्षांकडील नियमित सभापतीपदे काढून त्यांना केवळ नामधारी उपाध्यक्ष करण्याचा ठपका भाजप पक्षश्रेष्ठींवर आहे. बदनामीचे दुसरे कारण शालेय पोषण आहारातील गैरप्रकार हेच आहे. जिल्हा परिषदेच्या पहिल्या सभेत अनेक सदस्यांनी निकृष्ट पोषण आहार पदाधिकारी व अधिकारी यांना दाखवून गदारोळ केला. राज्यातील जिल्हा परिषदांच्या कामकाजावर सत्ता बाह्य लक्ष ठेवणारे केंद्र म्हणून पंचायत राज समित्यांचा दौरा आयोजित केला जातो. या समित्यांमध्ये विधानसभा व विधान परिषदेचे आमदार असतात. जिल्हा परिषदेमार्फत केल्या जाणाऱ्या विकास कामातील गैरप्रकार, अनियमितता, अधिकाऱ्यांची मनमानी असे विषय काही आमदारांकडे असतात. त्यामुळे पंचायत राज समिती अशा विवादीत ठिकाणी भेट देण्याची शक्यता असते. हाच अंदाज बांधून जिल्हा परिषदांचे पदाधिकारी किंवा अधिकारी समितीचे आदरातिथ्य करुन बडदास्त ठेवतात. बहुतेक वेळा समिती सदस्यांना भेट देण्याच्या नावे रोखीने फाळा गोळा होतो. यातून प्रत्येक सदस्याला काहीना काही भेट मिळते. पंचायत राज समितीच्या भेटीची ही सर्वसाधारण पद्धत आहे. धुळ्याच्या दौऱ्यावर येऊन गेलेल्या पंचायत राज समितीच्या बडदास्तसाठी सुमारे 35 लाख रुपयांचा फाळा गोळा केल्याची चर्चा होती. समिती सदस्यांना प्रत्येकी दीड लाख रुपये वाटपाचे टार्गेट उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुषार माळी यांना दिले होते. हिच रक्कम समितीचे एक सदस्य व नांदेडचे शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांना देण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपात माळींना एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले. येथे तक्रारदार आमदार पाटील होते. माळी यांच्यावर लाच देण्याचा रिव्हर्स ट्रॅप यशस्वी ठरला. असे झालेले असले तरी समितीच्या एकूणच नैतिकतेविषयी चर्चा वेगळी आहे. धुळे जिल्ह्यात 5 ते 7 जुलै दरम्यान पंचायत राज समितीचे 23 आमदार आणि मंत्रालय स्तरावरील 11 अधिकारी, कर्मचारी असे एकूण 34 जण दौऱ्यावर होते. पंचायत राज समितीच्या नेहमीच्या दौऱ्याच्या शिरस्त्याने भेटीसाठी फाळा गोळा झाला. कोणाला किती द्यायचे हेही ठरले. पण काही आमदार 5 लाख रुपये मागणीवर अडून बसले होते. तसे शक्य नसल्याने अधिकारी ठरलेल्या हिश्शाचीच रक्कम द्यायला तयार होते. घेणाऱ्यांना जास्त हवे होते, ते मिळत नाही असे पाहून रिव्हर्स ट्रैप झाला अशी आता चर्चा आहे. अजून एक शंका आहे. माळी यांच्या नेतृत्वात गोळा झालेला फाळा समितीच्या इतरही सदस्यांना पोहचला आहे. त्याविषयी इतर कोणी वाच्यता केलेली नाही. व्यवहार झाले की नाही हा प्रश्न अधांतरिच आहे. पण, धुळे जिल्हा परिषद आता लाखांची लाच देणाऱ्या उप मुख्याधिकाऱ्यांमुळे बदनाम झाली हे नक्की ! धुळे जिल्हा परिषद ही काँग्रेसच्या ताब्यात आहे. त्यामुळे भाजपचे स्थानिक आमदार आणि इतरांना टीका करायला विषय सुध्दा मिळाला. जळगाव जिल्हा परिषदेची बदनामी थोडी वेगळी आहे. ही जिल्हा परिषद भाजपच्या ताब्यात असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या 3 फुटीर सदस्यांचा भाजपला टेकू आहे. भाजप अंतर्गत सध्या जलसंपदा व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन व माजी मंत्री एकनाथराव खडासे यांचे गट आहेत. याचाच परिपाक म्हणून जिल्हा परिषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांच्याकडील यापूर्वीचा बांधकाम व अर्थ समितीचे सभापती पदाचा भार काढून घेण्यात आला आहे. आता उपाध्यक्ष केवळ नामधारी बनले असून ते खडसेंचे निकटवर्तीय मानले जातात. अर्थ समितीचे सभापतीपद पोपट भोळे व बांधकाम सभापतीपद रजनी चव्हाण यांना स्वतंत्रपणे दिले आहे. हे दोघे मंत्री महाजन यांचे निकटवर्तीय मानले जातात. जिल्हा परिषदेत मंत्री महाजन गटाने खडसे गटावर वरकडी केल्याचे दिसते आहे. मंत्री महाजन यांच्या निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या सौ. रजनी जगन्नाथ चव्हाण यांची महिला बालविकास समिती सभापतीपदी निवड करण्यात आली होती. विषय समिती सदस्य निवडतांना उपाध्यक्षांकडे असलेले बांधकाम समिती सभापतीपद काढून ते चव्हाण यांना देण्यात आले आहे. चव्हाण यांचे पती जे. के. चव्हाण हे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात अभियंता आहेत. चव्हाण यांच्याकडील बांधकाम सभापतीपद नियमबाह्य असल्याचा आरोप होतो आहे. भाजपतही या विषयावर नाराजी आहे. जळगाव जिल्हा परिषद शालेय पोषण आहारातील घोटाळ्यामुळेही गाजते आहे. दि. १४ जुलैला जिल्हा परिषदेची पहिली सर्व साधारण सभा झाली. तीत सदस्यांनी पोषण आहार निकृष्ट दर्जाचा असल्याचे दाखवून देत संबंधीत पुरवठादाराचा ठेका रद्द करुन  पोषण आहार घोटाळ्याची चौकशी सीआयडी ( गुन्हे अन्वेषण) विभागामार्फत करण्यात यावी, अशी मागणी केली. आहार पुरवठादार मंत्र्यांचा निकटवर्ती आहे, असे सांगितले जाते. अशा प्रकारे धुळे आणि जळगाव जिल्हा परिषदा विभिन्न आरोपांमुळे चर्चेत आहेत. ग्रामीण भागाच्या या मिनी मंत्रालयात अनेक प्रकार मनमानी करुनच चालत असल्याचीच वरील दोन उदाहरणे आहेत. खान्देश खबरबातसदरातील याआधीचे ब्लॉग :

खान्देश खबरबात : जीएसटीसह व्यापारही बाळसे धरणार !

खान्देश खबरबात : खडसेंच्या वापसीची तूर्त आशा!

खान्देश खबरबात : शिवसेना खान्देशात नक्कीच वाढू शकते…

खान्देश खबरबात : कागदोपत्री आपत्ती व्यवस्थापन उघडे !

खान्देश खबरबात : शेतकरी संपाने खान्देशला काय दिले ?

खान्देश खबरबात : आदिवासींचा विकास घोटाळ्यातच!

खान्देश खबरबात : हैदोस घालणारा “दादा” समर्थक!

खान्देश खबरबात : खान्देश होणार मेडिकल हब !

ब्लॉग : जळगाव जिल्हा परिषदेत ‘काँग्रेसयुक्त’ भाजप

आमदार निलंबन की मॅच फिक्सिंग !

खान्देश खबरबात : डॉक्टरांना सामाजिक व कायदेशीर संरक्षण हवेच !

यशवंतराव ते पर्रिकर व्हाया पवार !

खान्देश खबरबात : जलसंपदा मंत्र्यांच्या तालुक्यात होणार विक्रमी शेततळी 

खान्देशवासी मोकाट कुत्र्यांनी त्रस्त

खानदेश खबरबात: जळगावात समांतर रस्त्यांचा प्रश्न सार्वजनिक अजेंड्यावर

खान्देश खबरबात : जळगावसह धुळ्यात हॉकर्सचा प्रश्न कळीचा !!

खान्देश खबरबात : खान्देशात वाढतेय रनिंग, सायकलिंग कल्चर

खान्देश खबरबात : अवैध धंद्यांसाठी खान्देश नंदनवन

खान्देश खबरबात : पालकत्व हरवलेले तीन जिल्हे

खान्देश खबरबात : खान्देशातील आरोग्य यंत्रणा सुधारणार

खान्देश खबरबात : वाघुर, अक्क्लपाडा प्रकल्पांची कामे गती घेणार

खान्देश खबरबात : खान्देशात भूजल पातळीत वाढ

खान्देश खबरबात : खान्देशच्या औद्योगिक विकासाकडे लक्ष हवे!

खान्देश खबरबात : जळगाव, धुळे मनपात अमृत योजनांचे त्रांगडे

खान्देश खबरबात : कराच्या रकमेत धुळे, जळगाव मनपा काय करणार?

खान्देश खबरबात : करदाते वाढवण्यासाठी गनिमीकावा

खान्देश खबरबात : खान्देशात पालिका निवडणुकांत खो खो…

खान्देश खबरबात : ‘उमवि’त डॉ. पी. पी. पाटील यांची सन्मानाने एन्ट्री

खान्देश खबरबात: उसनवारीच्या पालकमंत्र्यांमुळे प्रशासन खिळखिळे… !!!

खान्देश खबरबात: मुख्यमंत्री जळगावसाठी उदार झाले…

खान्देश खबरबात: खान्देशात डेंग्यूचा कहर

खान्देश खबरबात : सारंगखेडा फेस्टिव्हल

खान्देश खबरबात : जळगावच्या राजकारणात अस्वस्थ खामोशी!

खान्देश खबरबात : खान्देशी काँग्रेस गलितगात्र

खान्देश खबरबात : गाईंना कत्तलखान्यात पाठवणारे कोण असतात?

खान्देश खबरबात : पोषण आहार घोटाळ्याचे रॅकेट

खान्देश खबरबात : वैद्यकीय सेवा महागणार, IMA चा इशारा

खान्देश खबरबात : पर्यटन विकासाला संधी

खान्देश खबरबात : पावसाची पाठ, शेतकरी चिंतेत

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Video : विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? व्हिडिओ तुफान व्हायरल
विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? Video तुफान व्हायरल
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP Premium

व्हिडीओ

Pune Bibtya : बिबट्या आला रे आला...पुणेकरांची तारांबळ Special Report
Hapus Mango Konkan vs Gujarat Valsad Mango: कोकणच्या हापूसला वलसाडच्या हापूसचं आव्हान Special Report
Mumbai Chunabhatti Riksha:चुनाभट्टीतील वादानंतर भीमसैनिकांनी रिक्षा सोडल्या,रिक्षानं जाण्यास परवानगी
Chunabhatti : चुनाभट्टीजवळ रिक्षा रोखल्याने आंबेडकर अनुयायी आक्रमक, पोलिसांसोबत बाचाबाची
Alaknanda Galaxy Vastav 250 : अलकनंदा : नव्या दिर्घिकेचा शोध; विश्वाचे रहस्य उलगडण्यास होणार मदत

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video : विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? व्हिडिओ तुफान व्हायरल
विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? Video तुफान व्हायरल
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
धक्कादायक! बीडमध्ये चोरट्यांचा नवा फंडा, ट्रॅव्हल्सवर आधीच चढून बसतात, चढ येताच उड्या ठोकतात
धक्कादायक! बीडमध्ये चोरट्यांचा नवा फंडा, ट्रॅव्हल्सवर आधीच चढून बसतात, चढ येताच उड्या ठोकतात
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Elon Musk : युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
The Family Man Season : ‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
Embed widget