एक्स्प्लोर

खान्देश खबरबात : मिसाबंदीजनांच्या मानधनाचे घोंगडे भिजतच

इंदू सरकार हा चित्रपट अलिकडेच प्रदर्शित झाला आहे. त्यात आणीबाणीचा आणि स्व. इंदिराजींच्या कार्याचा कालावधी इंदू सरकार म्हणून उल्लेखित आहे, असा दावा करीत काँग्रेसजनांनी चित्रपटाला ठिकठिकाणी विरोध केला आहे. म्हणजेच, आणीबाणीचा विषय आजही काँग्रेससाठी अप्रिय आहे.

सन 1975/77च्या दरम्यान तत्कालीन पंतप्रधान व काँग्रेसच्या नेत्या स्व. इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली होती. मिसा (मिसा मेन्टेनन्स ऑफ इंटर्नल सिक्युरिटी 1971) कायद्याचा गैरवापर करीत सरकारने हजारो राजकीय विरोधक तथा सामाजिक संघटनांचे नेते तथा कार्यकर्त्यांना तुरूंगात डांबले होते. आणीबाणीचा 21 महिन्यांचा तो काळ आजही भारतीय लोकशाहीच्या इतिहासात काळाकुट्ट कालावधी म्हणून गणला जातो. या विषयावर जाहीर चर्चा सुरू झाली तरी काँग्रेसची पिछेहाट होते. अलिकडे इंदू सरकार हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्यात आणीबाणीचा आणि स्व. इंदिराजींच्या कार्याचा कालावधी इंदू सरकार म्हणून उल्लेखित आहे, असा दावा करीत काँग्रेसजनांनी चित्रपटाला ठिकठिकाणी विरोध केला आहे. म्हणजेच, आणीबाणीचा विषय आजही काँग्रेससाठी अप्रिय आहे. एकनाथ खडसेंच्या मागणीमुळे मिसाबंदीजनांचा विषय पुन्हा चर्चेत आला. मिसाबंदीजनांना मानधन देण्याचा राज्य सरकार विचार करीत असल्याचे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. आता मिसाबंदीजनांना मानधन मिळण्याचा मार्ग मोकळा होईल असे दिसते आहे. यापूर्वी मिसाबंदीजनांना उत्तरप्रदेश, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आदी राज्यात यापूर्वीच दरमहा 20 ते 25 हजार रुपये मानधन मिळणे सुरू झाले आहे. महाराष्ट्रात मात्र अजूनही मागणीच सुरू आहे. खान्देशातील जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील अनेक ज्येष्ठ आणि युवा मंडळींनी नाशिकच्या तुरुंगात 21 महिन्यांचा कालावधी पार पडल्याच्या अनेक कहाण्या आहेत. त्यात संघ परिवारातील बुजुर्ग मंडळी होती. शिवाय, स्व. जयप्रकाश नारायण यांच्या समाजवादी विचारांची मंडळीही संघाच्या नेत्यांसोबत होती. तेव्हाच्या तुरुंगातील कथा आज जेव्हा सांगितल्या जातात तेव्हा, संघाच्या शिस्त आणि विचारांना अनेक समाजवाद्यांनी आतून सहमती दर्शविल्याचेही सांगितले जाते. असे विषय स्व. डॉ. अविनाश आचार्य, स्व. उत्तमराव नाना पाटील आदींच्या स्मृतीलेख किंवा ग्रंथातून समोर येतात. त्यामुळे एकनाथ खडसे यांनी मिसाबंदीजनांना मानधन देण्याची केलेली मागणी ही निश्चित काही बुजुर्गांना प्रतिष्ठा देणारी ठरणार आहे. हे जरी खरे असले तरी आज त्यापैकी अनेकजण हयात नाही, हेही वास्तव आहे. सन 1974/75 मध्ये स्व. जयप्रकाश नारायण यांनी केंद्रातील स्व. इंदिरा गांधी सरकारविरोधात आंदोलन सुरू केले होते. त्यांच्या आंदोलनाला संपूर्ण भारतातून प्रतिसाद मिळत होता. सरकार उलथवून टाकले जाईल अशी भीती पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांना होती. त्यामुळे त्यांनी मिसा (मेन्टेनन्स ऑफ इंटर्नल सिक्युरिटी 1971) हा कायदा लागू करीत दि. 26 जून 1975 च्या रात्रीपासून आणीबाणी घोषित केली होती. त्यानंतर अमानुषपणे विरोधी पक्ष, संघटना नेत्यांची धरपकड करण्यात आली होती. देशभरातून जवळपास 40 हजार प्रमुख नेत्यांना व कार्यकर्त्यांना अटक करुन तुरुंगात डांबले होते. तसेच जवळपास 1 लाख लोकांना स्थानबद्ध करण्यात आले होते. यात महाराष्ट्रातील बंदीजनांची संख्या 9,500 होती. आज या पैकी निम्मे लोक हयात नाहीत. मध्यंतरी लोकतंत्र सेनानी संघ माध्यमातून महाराष्ट्रातील 500 मिसाबंदीजन एकत्र आले होते. त्यांनी नाशिक येथे मेळावा घेतला होता. त्यात मध्यप्रदेश व राजस्थान राज्यात मिसाबंदीजनांना दिलेल्या मानधनाप्रमाणे महाराष्ट्रातही मानधन मिळावे अशी मागणी करण्यात आली होती. या मेळाव्यात नाशिक तुरुंगात बंद असलेल्या उत्तर महाराष्ट्रातील 85 मिसाबंदीजनांची अधिकृत माहितीही देण्यात आली होता. नागपूर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही लोकतंत्र सेनानी संघाने मानधनाबाबत विनंती केली होती. देशातील 8 राज्यात मिसाबंदीजनांना विविध सवलती लागू आहेत. मध्य प्रदेशात सत्याग्रहींना मोठ्या प्रमाणात सवलती दिल्या आहेत. याच धर्तीवर राज्यात देखील सवलती लागू कराव्यात अशी मागणी करण्यात आली होता. तेव्हा गडकरी यांनी आश्वासन दिले होते की, मिसाबंदीजनांना मानधन देण्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी माझी चर्चा देखील झाली असून ते देखील याबाबतीत सकारात्मक आहेत.  मात्र, त्यानंतर जवळपास सहा महिन्यांचा कालावधी झाला तरी मानधनाचा विषय पुढे सरकलेला नाही. एकनाथ खडसे यांनी हा विषय पुन्हा एकदा विधी मंडळात समोर आणल्यामुळे आता तरी त्यावर मार्ग निघेल अशी आशा निर्माण झाली आहे. खान्देश खबरबात’ सदरातील याआधीचे ब्लॉग : 

खान्देश खबरबात : भविष्य अंधारलेल्या बाजारपेठा

खान्देश खबरबात : खान्देशातील नदीजोड प्रकल्प मार्गी लागावेत!

खान्देश खबरबात : जळगावात जिल्हाधिकाऱ्यांचे ऊलगुलान!

खान्देश खबरबात : बदनामीच्या फेऱ्यात धुळे, जळगाव जिल्हा परिषदा

खान्देश खबरबात : जीएसटीसह व्यापारही बाळसे धरणार !

खान्देश खबरबात : खडसेंच्या वापसीची तूर्त आशा!

खान्देश खबरबात : शिवसेना खान्देशात नक्कीच वाढू शकते…

खान्देश खबरबात : कागदोपत्री आपत्ती व्यवस्थापन उघडे !

खान्देश खबरबात : शेतकरी संपाने खान्देशला काय दिले ?

खान्देश खबरबात : आदिवासींचा विकास घोटाळ्यातच!

खान्देश खबरबात : हैदोस घालणारा “दादा” समर्थक!

खान्देश खबरबात : खान्देश होणार मेडिकल हब !

ब्लॉग : जळगाव जिल्हा परिषदेत ‘काँग्रेसयुक्त’ भाजप

आमदार निलंबन की मॅच फिक्सिंग !

खान्देश खबरबात : डॉक्टरांना सामाजिक व कायदेशीर संरक्षण हवेच !

यशवंतराव ते पर्रिकर व्हाया पवार !

खान्देश खबरबात : जलसंपदा मंत्र्यांच्या तालुक्यात होणार विक्रमी शेततळी 

खान्देशवासी मोकाट कुत्र्यांनी त्रस्त

खानदेश खबरबात: जळगावात समांतर रस्त्यांचा प्रश्न सार्वजनिक अजेंड्यावर

खान्देश खबरबात : जळगावसह धुळ्यात हॉकर्सचा प्रश्न कळीचा !!

खान्देश खबरबात : खान्देशात वाढतेय रनिंग, सायकलिंग कल्चर

खान्देश खबरबात : अवैध धंद्यांसाठी खान्देश नंदनवन

खान्देश खबरबात : पालकत्व हरवलेले तीन जिल्हे

खान्देश खबरबात : खान्देशातील आरोग्य यंत्रणा सुधारणार

खान्देश खबरबात : वाघुर, अक्क्लपाडा प्रकल्पांची कामे गती घेणार

खान्देश खबरबात : खान्देशात भूजल पातळीत वाढ

खान्देश खबरबात : खान्देशच्या औद्योगिक विकासाकडे लक्ष हवे!

खान्देश खबरबात : जळगाव, धुळे मनपात अमृत योजनांचे त्रांगडे

खान्देश खबरबात : कराच्या रकमेत धुळे, जळगाव मनपा काय करणार?

खान्देश खबरबात : करदाते वाढवण्यासाठी गनिमीकावा

खान्देश खबरबात : खान्देशात पालिका निवडणुकांत खो खो…

खान्देश खबरबात : ‘उमवि’त डॉ. पी. पी. पाटील यांची सन्मानाने एन्ट्री

खान्देश खबरबात: उसनवारीच्या पालकमंत्र्यांमुळे प्रशासन खिळखिळे… !!!

खान्देश खबरबात: मुख्यमंत्री जळगावसाठी उदार झाले…

खान्देश खबरबात: खान्देशात डेंग्यूचा कहर

खान्देश खबरबात : सारंगखेडा फेस्टिव्हल

खान्देश खबरबात : जळगावच्या राजकारणात अस्वस्थ खामोशी!

खान्देश खबरबात : खान्देशी काँग्रेस गलितगात्र

खान्देश खबरबात : गाईंना कत्तलखान्यात पाठवणारे कोण असतात?

खान्देश खबरबात : पोषण आहार घोटाळ्याचे रॅकेट

खान्देश खबरबात : वैद्यकीय सेवा महागणार, IMA चा इशारा

खान्देश खबरबात : पर्यटन विकासाला संधी

खान्देश खबरबात : पावसाची पाठ, शेतकरी चिंतेत

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
ABP Premium

व्हिडीओ

Sachin Sawant : फडणवीसांचा मेट्रोमध्येबसून मुलाखत,निवडणूक आयोग कारवाई करणार का?
Nawab Malik PC BMC Election : नवाब मलिक 3 वर्षांनी मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर UNCUT PC
Parbhani Election : परभणी शहरातील एकनाथ नगरवासीयांनी टाकला मतदानावर बहिष्कार
Ravi Landge Nagarsevak : दबाव, अर्थकारण अन् डावपेच? दोन वेळा बिनविरोध; रवी लांडगेंनी सगळं सांगितलं?
Sanjay Raut VS Rahul Narvekar : अध्यक्ष प्रचारात, राजकारण जोमात; राऊतांचे राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
Ajit Pawar : मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
Embed widget