एक्स्प्लोर

आटपाट नगरातील गणेशोत्सवाचा 'आँखोदेखा' हाल

एक आटपाट नगर होते. दरवर्षी आटपाट नगरात गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा केला जायचा. याहीवर्षी आटपाट नगर गणेशोत्सव जल्लोषात साजरा करत आहे. नगरातील प्रत्येक चौकात पाच पाच गणेश मंडळे आहेत. कसा साजरा होतोय आटपाट नगराचा गणेशोत्सव? याचा हा एक ताजा ताजा रिपोर्ट.. ठिकाण -नगरातला मुख्य चौक. वेळ - दुपारची. एका चौकात पाच गणपती मंडळे. पैकी चार मंडळांसमोर कर्णकर्कश आवाजात डॉल्बीवर/लाऊड स्पीकरवर गाणी वाजतायत. मंडळ क्रमांक 1 - छत्रपती शिवाजीराजे गणेशोत्सव मंडळ. शिवाजी महाराजांच्या रूपातील सहाफुटी गणपती मूर्ती. मूर्तीच्या आजूबाजूला शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची महती सांगणारे पोस्टर्स अडकवलेले आहेत. थर्माकोलचं डेकोरेशनही केलेलं आहे. स्टेजच्या समोरच 'आम्ही शिवबाचे मावळे' नावाचा मोठा बॅनर लावलेला आहे. त्यावर वयवर्षे 10 ते 25 पर्यंतच्या तरूणांचे फोटो छापलेले आहेत. त्यातील बऱ्याच मावळ्यांनी डोळ्यांवर गॉगल लावलेला आहे. रात्री चालू केलेल्या रंगीबेरंगी लायटिंगच्या माळा तशाच चालू आहेत. लाईटसाठी समोरच्याच विद्युत मंडळाच्या खांबावर आकडा टाकलेला दिसतोय. गणपतीच्या समोरच चार तरूण पत्ते खेळत बसले आहेत. प्रत्येकाच्या गळ्यात भगव्या माळा उठून दिसातायत. चौघांच्याही कपाळावर भगवे नाम ओढलेले आहेत. पत्ते खेळण्यात तल्लीन झालेल्या चौघांपैकी एकजण उठतो आणि 'प्रथम तुज वंदिता कृपाळा गजानना' हे भक्तीगीत बदलून 'पोरी जरा जपून दांडा धर' हे गाणं प्ले करतो. या मंडळासमोरच बसस्टॉप आहे. बससटॉपवर बसलेले एक आजोबा त्या शिवप्रेमी तरूण मावळ्यांना 'ये पोरानू जरा कमी करा की आवाज गाण्याचा. तुमच्या असल्या आवाजानं गणपती पळून जाईल की गाबड्यांनू' असं म्हणून येणाऱ्या बसची वेळ विचारतात. पण काही केल्या डॉल्बीच्या कर्कश आवाजामुळे आजोबांचा आवाज त्यातील एकाही तरूणापर्यंत पोहचत नाही. मंडळ क्रमांक 2- फाईव्ह स्टार गणेशोत्सव मंडळ काळ्या रंगाच्या बुलेटवर बसलेल्या गणपतीची मूर्ती दिमाखात स्थापन केली आहे. गणपतीच्या डोळ्यांवर काळ्याच रंगाचा गॉगल आहे. बुलेटवर नंबर म्हणून पाच स्टार दिसतायेत. तिथल्या मंडळाच्या स्पीकरवर मध्यम आवाजात गाणं वाजतय " जरा जरा टच मी टच मी जरा जरा किस मी किस मी." 17 ते 20 वयोगटातली पाच-सहा मुले बुलेटधारी गणपतीसमोर आपापल्या मोबाईलमध्ये काहीतरी बघण्यात बिझी दिसतायेत. क्षणाक्षणाला प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलत चाललेले आहेत. त्यांच्यामध्ये पुढीलप्रमाणे संवाद चालू आहे. "अरे ये बघा ना यार कसला आयटम हाय हा. काय फिगरय राव हिची" "व्हय की लगा. नुसता आयटम बघून काय उपयोग यार" "ये दाखव की भावा आमालापण. का तू एकटाच मजा घेणार. ये बहोत नाईन्साफी है जानी" "ही ऊसाचं चिपाड होय. माझ्याकडचं व्हिडीओ बघचाल तर ***** " "दाखव की लगा दाखव. सगळं वाटून खायचं अस्तय नाहीतर देव पाप करतोय" आणि शेवटी घोळक्यातून खोखो हसल्याचा आवाज येतो. या मंडळाच्या पाठीमागे शंभर मीटर अंतरावर जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. मधली सुट्टी झाल्याने बरीचशी मुलं गणपती बघायला आलेली आहेत. बुलेटवर बसलेला गणपती बघून लहाणग्या मुलांमध्ये आपापसात काहीतरी चर्चा चाललेली आहे. मंडळ क्रमांक 3- जय हनुमान गणेशोत्सव मंडळ हनुमानाच्या रूपातील गणपतीची भव्य मूर्ती उभी आहे. गणपतीच्या एका हातात गदा आहे. दुसऱ्या हाताने पर्वत उचललेला आहे. बाकी हातांमध्ये मोदक आणि विविध प्रकारची शस्त्रं आहेत. गणपतीच्या आजूबाजूला पर्वतरांगांचा आणि जंगलाचा देखावा आहे. तिथेच समोर एका फळ्यावर मंडळाकडून दोन दिवसांनी घेतल्या जाणाऱ्या रक्तदान शिबीराबद्दलची माहिती लिहिलेली आहे. मंडळाच्या उजवीकडे हाकेच्या अंतरावर प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या मंडळाच्या लाऊड स्पीकरवर फुल्ल वॉल्युममध्ये ‘पॅन्ट फाटून तुटले जोडे, गिरक्या घेतो काढून सदरा, देतो सोडून लाजेला, डॉल्बीवाल्या बोलाव माझ्या डिजेला’ हे गाणं वाजतय. मळक्या कपड्यातील एक मध्यमवयीन पुरूष स्टेजच्या काही अंतरावर स्वतः भोवती गिरक्या घेतोय. मधूनच भेलकांडतोय, पडतोय.. पुन्हा उठतोय… गिरक्या घेतोय... गणपतीसमोर दोन तरूण पाय पसरून बसलेत. एकाने कानात हेडफोन घातलेला आहे तर दुसरा समोर एक वही ठेऊन मोबाईलमधील कॅलक्युलेटरवर कसलीतरी आकडेमोड करत असल्याचं दिसतंय. तोंडात काहीतरी चघळत असलेलं तो उठून कोपऱ्यातल्या सुकलेल्या फुलांच्या ढिगावर थुंकतो आणि गणपतीसमोर ठेवलेला पाटावरचा तांब्या घेऊन चूळ भरतो. 'बोलावं माझ्या डिजेला'  हे गाणं संपून तिथे पुढचं गाणं वाजतंय, 'मोना मोना मोना मोना मोना डार्लिंग गेली कुठं?' मंडळ क्रमांक 4- मुजरा कर व्हॉट्सअप ग्रुप गणेशोत्सव मंडळ. एका हातात स्मार्टफोन घेतलेल्या तर दुसऱ्या हाताचं एक बोट मोबाईल स्क्रीनवर ठेवलेल्या बाल गणेशाची लोडाला टेकून असलेली मूर्ती. बालगणेशाच्या कानात हेडफोन्स आहेत. जणू मंडळाच्या डिजेवर वाजत असलेली ' ईमेल काल इंटरनेटवर केला , राया मला डेटवर घेऊन चला हे ' हे गाणं तोच ऐकतोय. व्हॉट्सअपवर उपलब्ध असलेल्या इमोजी एनलार्ज करून फुग्यासारख्या संपूर्ण मंडपात अडकवलेल्या आहेत. स्टेजच्या डाव्या बाजूला मोबाईलस्क्रीनसारखा एक सूचनाफलक उभा केलेला आहे. त्यावर 'आपल्या व्हाट्सअप ग्रुपची शान असलेले ग्रुपचे अडमीन आणि मंडळाचे अध्यक्ष श्री. ------ यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे तरी गावातील महिलांनी सायंकाळी सात वाजता मंडळाजवळ उपस्थित राहायचे आहे.' स्टेजवर गणपतीशिवाय कुणीही उपस्थित नाही. स्टेजखाली तीन कुत्रे आरामात झोपले आहेत. ' ईमेल काल इंटरनेटवर केला' हे गाणं संपून ' सुखकर्ता दुखकर्ता वार्ता विघ्नाची,नूरवी पूरवी प्रेम कृपा जयाची' ही गणपतीची आरती दुपारच्या तीन वाजता प्ले झाली आहे. मंडळ क्रमांक  - जय जवान जय किसान गणेशोत्सव मंडळ. छोटासा मंडप बांधलेला आहे. फारशी सजावट नाही. तीन फुटाच्या पारंपरिक पद्धतीच्या गणेशमूर्तीची स्थापना केलेली आहे. मुर्तीच्या आजूबाजूला शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक महात्मा फुले, महात्मा गांधी, आण्णा भाऊ साठे, जिजाऊ, सावित्रीबाई फुले, झाशीची राणी, कल्पना चावला फोटो आणि त्याच्या कामाची माहिती लिहिलेले हँडमेड तक्ते अडकवलेले आहेत. मंडळाचा स्पीकर शांत आहे. गणपतीसमोर काही अंतरावर एक लहाणशी पैशाची पेटी आहै त्यावर ' कृपया स्वेच्छेने काही देणगी द्यायची असेल तर या पेटीत टाकावी.' अशी सूचना लिहिली आहे. स्टेजच्या समोर डाव्या बाजूला दोन खुर्च्यांवर दोन वीस-बावीशीतले तरूण हातात पुस्तक घेऊन वाचत बसलेले आहेत.  उजव्या बाजूला फळ्यावर सुंदर हस्ताक्षरात गणेशोत्सवातील व्याख्यानमालेसंबंधी माहिती लिहिलेली आहे. तिथेच एका कोपऱ्यात प्रश्नमंजुषा,वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा यांचीही माहिती दिसतेय. स्टेजच्या वरती सर्वांना दिसेल असे दोन सूचनाफलक दिसतायेत त्यातील एकावर ' येथे शासनाच्या सर्व योजनांची माहिती दिली जाईल.' तर दुसऱ्यावर ' स्पर्धा परिक्षांच्या माहितीसाठी संपर्क' असे लिहून त्याखाली दोन मोबाईल नंबर लिहिलेले आहेत. स्टेजच्या खाली लहान लहान काळ्या पिशव्यांमध्ये बरीचशी रोपटी आहेत. पुढील एक दोन दिवसांत मंडळाकडून होणाऱ्या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी रोपटी आणलेली असावीत. इती आटपाट नगरातील गणेशोत्सवाचा ताजा ताजा रिपोर्ट सुफळ संपूर्ण.
अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ranjitsinh Mohite Patil: रणजीत सिंह मोहिते पाटलांनी सोडली भाजपची साथ?  मंगळवेढा, सोलापूरमधील फडणवीसांच्या दौऱ्याला दांडी, नेमकं काय घडलं?
रणजीत सिंह मोहिते पाटलांनी सोडली भाजपची साथ? मंगळवेढा, सोलापूरमधील फडणवीसांच्या दौऱ्याला दांडी, नेमकं काय घडलं?
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा लाभ हवा असेल तर मला 500 रुपये द्या; भाजप आमदाराच्या मुलावर चिरीमिरीचा आरोप
लाडकी बहीण योजनेचा लाभ हवा असेल तर मला 500 रुपये द्या; भाजप आमदाराच्या मुलावर चिरीमिरीचा आरोप
KANGUVA सह 'हे' 7 साऊथचे अपकमिंग ब्लॉकबस्टर चित्रपट, बॉक्स ऑफिसवर घालणार धुमाकूळ!
KANGUVA सह 'हे' 7 साऊथचे अपकमिंग ब्लॉकबस्टर चित्रपट, बॉक्स ऑफिसवर घालणार धुमाकूळ!
Nagpur News : काँग्रेस नेते सुनिल केदार यांना चौकशी समितीकडून समन्स; जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा वसुली प्रकरणी सक्त निर्देश
काँग्रेस नेते सुनिल केदार यांना चौकशी समितीकडून समन्स; जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा वसुली प्रकरण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha  Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स :  Marathi News Headlines : 11 AM 09 October 2024Cooking Chef Smita Abhinay Dev : सुप्रसिध्द पाककला तज्ज्ञ स्मिता अभिनय देव यांची मुलाखत9 Seconds Superfast News : 9 सेकंदात सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 09 October 2024Vidhan Sabha Election: जागावाटपाबाबत महायुती, मविआत जोरदार हालचाली; भाजपची स्ट्रॅटेजी 'माझा'च्या हाती

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ranjitsinh Mohite Patil: रणजीत सिंह मोहिते पाटलांनी सोडली भाजपची साथ?  मंगळवेढा, सोलापूरमधील फडणवीसांच्या दौऱ्याला दांडी, नेमकं काय घडलं?
रणजीत सिंह मोहिते पाटलांनी सोडली भाजपची साथ? मंगळवेढा, सोलापूरमधील फडणवीसांच्या दौऱ्याला दांडी, नेमकं काय घडलं?
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा लाभ हवा असेल तर मला 500 रुपये द्या; भाजप आमदाराच्या मुलावर चिरीमिरीचा आरोप
लाडकी बहीण योजनेचा लाभ हवा असेल तर मला 500 रुपये द्या; भाजप आमदाराच्या मुलावर चिरीमिरीचा आरोप
KANGUVA सह 'हे' 7 साऊथचे अपकमिंग ब्लॉकबस्टर चित्रपट, बॉक्स ऑफिसवर घालणार धुमाकूळ!
KANGUVA सह 'हे' 7 साऊथचे अपकमिंग ब्लॉकबस्टर चित्रपट, बॉक्स ऑफिसवर घालणार धुमाकूळ!
Nagpur News : काँग्रेस नेते सुनिल केदार यांना चौकशी समितीकडून समन्स; जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा वसुली प्रकरणी सक्त निर्देश
काँग्रेस नेते सुनिल केदार यांना चौकशी समितीकडून समन्स; जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा वसुली प्रकरण
लवकरच मोठा नेता शरद पवारांसोबत येणार? सुप्रिया सुळेंच्या गाडीतून जाताना चेहरा लपवणारा ‘तो’ नेता कोण?
लवकरच मोठा नेता शरद पवारांसोबत येणार? सुप्रिया सुळेंच्या गाडीतून जाताना चेहरा लपवणारा ‘तो’ नेता कोण?
तिकडे वडील फडणवीसांच्या खांद्याला खांदा लावून स्टेजवर, पण इकडे दोन्ही मुलांनी शरद पवार गटाच्या उमेदवारीसाठी इंटरव्ह्यू दिला
तिकडे वडील फडणवीसांच्या खांद्याला खांदा लावून स्टेजवर, पण इकडे दोन्ही मुलांनी शरद पवार गटाच्या उमेदवारीसाठी इंटरव्ह्यू दिला
Sharad Pawar: अक्कलकोटमधून 'तुतारी'साठी एकही उमेदवार इच्छुक नाही; शरद पवारांच्या बैठकीत काय घडलं?
अक्कलकोटमधून 'तुतारी'साठी एकही उमेदवार इच्छुक नाही; शरद पवारांच्या बैठकीत काय घडलं?
फडणवीस मतदारसंघात मात्र भाजपचा माजी आमदाराची दांडी; गडी थेट सोलापुरात उगवला, अजितदादांच्या शेजारी बसून केली चर्चा, नक्की काय घडलं?
फडणवीस मतदारसंघात मात्र भाजपचा माजी आमदाराची दांडी; गडी थेट सोलापुरात उगवला, अजितदादांच्या शेजारी बसून केली चर्चा, नक्की काय घडलं?
Embed widget