एक्स्प्लोर

घुमक्कडी (48) : मस्तवाल मेघ आणि सावुरीचा देहगंध

पाऊस माणसाला कन्फ्यूज करतो. शांत चित्तानं काम करत असताना मध्येच मनात उलटसुलट विचार येत राहतात. कधी वाटतं की, ‘प्रेम केलं नसतं, तर आपल्या हातून अजून पुष्कळ काम झालं असतं’; तर दुसऱ्या क्षणी मनात येतं की, ‘प्रेम केलं म्हणून आजवर इतकं तरी काम करून झालं.’ पाऊस म्हणजे अश्रू अशा कथांच्या सोबतच पाऊस म्हणजे प्रेम हे सांगणाऱ्या कथाही आहेतच. पाऊस नसला की दुष्काळ, ‘मापा’त पडला की सुकाळ आणि अति पडला की वाताहत; प्रेमाचंही तसंच. तर आज दक्षिण आफ्रिकेतली एक गोष्ट वाचूया. दुष्काळाने सर्वत्र रखरखाट झाला होता. या भूमीवर चुकून ढग आलेच, तर ते इतके उंचावर असत की त्यांना ही भूमी दिसायचीच नाही आणि ते आपल्याच नादात पुढे सरकत दूर निघून जायचे. पाऊस नाही म्हणजे पाणी नाही, पाणी नाही म्हणजे अन्नही नाही. भूकतहानेने सारे व्याकूळ होऊन मरायला टेकले. सगळ्या प्रार्थना व्यर्थ जाऊ लागल्या. सगळ्या उपाययोजना थकल्या. काय करावं हे काही कुणाला सुचेनासं झालं. अशात एक नवल घडलं. एक पुष्ट, मस्तवाल आणि पाण्यानं गच्च भरलेला काळा मेघ आकाशातून जाताना जोराचे वारे वाहू लागल्याने गडबडून उंचावरून थोडा खाली आला. इथंही उष्ण वारे होतेच, पण त्या लहान झुळुका होत्या. त्यातली एक झुळूक विलक्षण वेगळा गंध घेऊन आली होती. मेघ त्या गंधाने अगदी वेडावून गेला. त्यानं त्या झुळुकीला विचारलं, “जीव कासावीस करणारा हा कसला गंध आहे, ते मला सांगशील का?” इतका मस्तवाल मेघ नम्रपणे विचारतोय म्हणून झुळूक खुशालली. ती म्हणाली, “अजून थोडा खाली जा आणि धरतीवर नीट वाकून पहा. तिथं तुला सावुरी नावाची तरुणी दिसेल, हा तिचाच देहगंध आहे.” मेघ हलकेच खाली आला. त्याला पृथ्वीकन्या सावुरी दिसली. तिची काळी कांती एखाद्या चमकदार ओलेत्या कणखर खडकासारखी घट्टमुट्ट दिसत होती. तिचे कुरुळे केस दवबिंदू ल्यालेल्या तुतीच्या फळांसारखे दिसत होते. या दुष्काळी औदासीन्यात देखील ती ताठ कण्याने आणि आत्मविश्वासाने आकाशाकडे बघत उभी होती. मेघानं पृथ्वीवर आयुष्यात कधी इतकं देखणं काही पाहिलं नव्हतं. तो तिच्या प्रेमात वेडावून अजून अजून खाली खाली उतरत आला, तसतसा तिचा देहगंध त्याला अधिक तीव्रतेने जाणवू लागला. मग एकाएकी त्याला भान आलं की, तो असाच धरतीवर उतरला तर पाणी होऊन नष्ट होईल. मग त्यानं एका बैलाचं रूप धारण केलं आणि विजेचा दोरखंड करून तो उतरू लागला. आपले चारी पाय धरतीवर टेकवून, पायांत वीज भरून तो सावुरीच्या दिशेने निघाला. Ghumakkadi 1- मेघ खाली येताना सूर्य झाकोळला आणि वातावरण काळोखं बनलं. विजांच्या कडकडाटाने धरती कापू लागली. सगळे प्राणीपक्षी आपापल्या गुहांमध्ये, बिळात, ढोलीत, घरट्यांत दडले. माणसं आपापल्या झोपड्यांमध्ये शिरली. पाऊस येणार याचा आनंद वाटतोय की भय वाटतेय, हेच काही कुणाला कळेनासं झालं. सावुरीही आपल्या झोपडीत गेली आणि एकाएकी तिला गाढ झोपेनं घेरलं. बैलरूपी मेघ सावुरीच्या झोपडीजवळ येऊन थबकला. त्यानं खिडकीतून डोकावून पाहिलं, तर एवढ्या वाऱ्यावावदानात, विजांच्या धिंगाण्यात देखील सावुरी शांत झोपून गेलेली दिसली. धावून आलेल्या मेघाच्या नि:श्वासांनी, तो इतक्या जवळ आल्यानं, धरती दवाने ओली झाली. मृदगंध दरवळू लागला; त्याने जादू झाली. मातीच्या सुगंधाने सावुरीची झोपडी भरून गेली आणि सावुरी जागी झाली. सावुरीनं पाहिलं की, एक काळभोर देखणा बैल आपल्या झोपडीच्या दारात उभा आहे. त्यानं शरणागतासारखे कान पाडलेत, उंचावलेली गोंडेदार शेपटी तो खाली घेतोय आणि पुढचे दोन्ही पाय गुडघ्यांवर टेकवून तिच्यासमोर खाली बसतोय. ( पारंपरिक कारोस ) ( पारंपरिक कारोस ) तिनं मऊ केसाळ कातडीपासून बनवलेलं, धाग्यांनी सुंदर रेशीमकाम केलेलं  ‘कारोस’ अंगाभोवती घट्ट लपेटून घेतलं. तरी बैलाच्या घामाचा गंध तिच्या नाकात घुसलाच. ती वश झालेली पाहून बैलाने धरतीवर आपले खूर जोरानं आपटले आणि दमदार मेघगर्जनेचा हुंकार भरला. त्यांच्या काळ्याभोर डोळ्यांत, सावुरीला आपल्यासोबत घेऊन जाण्याच्या इच्छेची वीज नाचत होती. सावुरीला कळलं की, बैलाचा आकार आणि पुरुषाचं मन यांच्यात मेघ दडलेला आहे. पाऊसपाण्यानं गच्च दाटून भरलेला काळाभोर मेघ! त्याचा गंधच सांगतोय हे सारं!! तिला आपल्या परिसरातला इतक्या वर्षांचा दुष्काळ आठवला. अन्नपाण्यासाठी व्याकूळ झालेले, पावसासाठी आसावलेले सगळे जीव आठवले. त्यांच्यासाठी देखील आता पावसाचं आगमन गरजेचं होतं आणि त्यासाठीही आता मेघाचं स्वागत प्रेमानं करणं आवश्यक होतं. ती हसली आणि झेपावून उडी घेत बैलाच्या पाठीवर स्वार झाली. ( आफ्रिकन रॉक आर्ट मधील एक नमुना ) ( आफ्रिकन रॉक आर्ट मधील एक नमुना ) बैल वेगाने दौडत निघाला, त्याच्या दौडण्याचा आवाज सर्वदूर पसरला. तो शेतांमधून, रानावनातून, डोंगरदऱ्यांमधून... जिथून जिथून जात होता तिथं तिथं मुसळधार पाऊस कोसळू लागला. मातीत पडलेल्या भेगा पावसाच्या पाण्यानं भरून गेल्या. सुकलेले ओढे, नद्या, झरे, धबधबे पुन्हा नव्यानं वाहू लागले. पावसानं पृथ्वीची कन्या तर नेली, पण वधूदक्षिणा देऊन तिला समृद्ध केलं. लोक आजही सावुरीची आठवण काढतात आणि पाऊस आला की, त्याच्यासोबत तीही माहेरपणाला येईल म्हणून वाट बघतात. (Giorgio De Chirico या इटालियन चित्रकाराचं एक गाजलेलं चित्र ‘Nude Woman on a Bull’ ) (Giorgio De Chirico या इटालियन चित्रकाराचं एक गाजलेलं चित्र ‘Nude Woman on a Bull’ ) प्रेम आणि लैंगिकता, प्रेम आणि कामकाज, प्रेम आणि जगणं, प्रेम आणि पाऊस म्हणूनच अनेकदा वेगळे करून पाहता येत नसावेत. फक्त त्या मेघावर स्वार होऊन जगभर दौडत जाण्याचं मनमुक्त धैर्य दाखवावं लागतं. फोटो सौजन्य: कविता महाजन

घुमक्कडीमधील याआधीचे ब्लॉग :

घुमक्कडी (47) : पाऊस आणि अश्रू

घुमक्कडी : (46) चिमूटभर मिठाच्या समुद्राएवढ्या गोष्टी!

घुमक्कडी (45) : समुद्राचं पाणी खारं का झालं?

घुमक्कडी (44) : कोळ्याच्या जाळ्यात पृथ्वी!

घुमक्कडी (43) : बिघडलेलं दुरुस्त करणारे जादूगार बैगा

घुमक्कडी (42) : कासवकथांचे अनेक अवतार

घुमक्कडी (41) : समुद्राची निर्मिती आणि सूर्यचंद्राची वाटचाल

घुमक्कडी (40) : न्युवाची भलीबुरी लेकरं

घुमक्कडी (39) : दाट काळं धुकं आणि फान्गु

घुमक्कडी (38) : धरतरी माझी मायु रं, तिच्यावं पाय कसा मी ठेवू रं

घुमक्कडी (37) : कार्तिकेयाचं मंदिर आणि चैत्रातली जत्रा

घुमक्कडी (36) : इसामई काला लगी सोना

घुमक्कडी (35) : सुपारी माझी आईबाई !

घुमक्कडी (34) : लोकल दारवा आणि चखणे!

घुमक्कडी (33) : रहिमन पानी राखिये, बिन पानी सब सून…

घुमक्कडी (32) : सर्वांत स्वच्छ गावं…

घुमक्कडी (31) : जीवट डोकऱ्या माशाची गोष्ट!

घुमक्कडी (30) : पलाश… धगधगती अग्निफुले…

घुमक्कडी (29) : एको आणि नार्सिसस

घुमक्कडी (28) : तू-ती आणि रेशमी प्रेमाचा लोचा

घुमक्कडी (27)  भई जब लाखो उदला वायरो

घुमक्कडी (26): महुआ बीने दोहर होये जाय

घुमक्कडी (25): साकाचं बेट

घुमक्कडी (24) : कार निकोबार आणि नारळ

घुमक्कडी (23) लावण्याची देवता आणि प्रलय

घुमक्कडी (22) : त्यांना दुसरे हृदय दे, वा मला वेगळी भाषा!

घुमक्कडी (21) : सतगुरु सिंवरो मोवण्या, जिण ओ संसार उपायो

घुमक्कडी (20): सात जिभांचा अग्नी आणि पुलोमाचे अश्रू

घुमक्कडी : (19) : जे तुमच्याकडे नाही, ते माझ्याकडे आहे!

घुमक्कडी : (18) : जिवंत होणारी चित्रं

घुमक्कडी : (17) : कुरजां ऐ म्हारा भंवर मिला दीजो ऐ

घुमक्कडी (16) : निंदिया सतावे मोहे

घुमक्कडी (15) : बगळ्या बगळ्या कवडी दे

घुमक्कडी : (14) उडणाऱ्या देवदूतांचा महाल!

घुमक्कडी (13) : सांवरे अई जइय्यो जमुना किनारे

घुमक्कडी (12) : आईच्या आधी लेकीला न्हाण आलं हो…!

घुमक्कडी (11) : इज्जत जाईल, पण प्रियकर राहील!

घुमक्कडी (10) : तुमच्या हातात एक फूल दिलं, तर… 

घुमक्कडी (9) : सासू-सुनांच्या विहिरी आणि तळी

घुमक्कडी (8) : फूल जंगल मे खिले किन के लिये

घुमक्कडी (7) : हुंकारकुपातले हरिण

घुमक्कडी (6) : वेगळ्या जागेवरून पाहताना

घुमक्कडी (5) : मिठाचा शुभ्र खारट खडा!

घुमक्कडी (4) साता प्रश्नांची कहाणी

घुमक्कडीः (3) न नींद नैना, ना अंग चैना

घुमक्कडी : (2) सीतेची तहान

घुमक्कडी : आभाळाचा कागद, समुद्राची शाई

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Beed News : बीडमध्ये ग्रामसेवकाला लोखंडी रॉडने काळं-निळं, रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं, गेवराईतील गावगुंडांचा प्रताप
बीडमध्ये ग्रामसेवकाला लोखंडी रॉडने काळं-निळं, रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं, गेवराईतील गावगुंडांचा प्रताप
Video : विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? व्हिडिओ तुफान व्हायरल
विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? Video तुफान व्हायरल
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
ABP Premium

व्हिडीओ

Pune Bibtya : बिबट्या आला रे आला...पुणेकरांची तारांबळ Special Report
Hapus Mango Konkan vs Gujarat Valsad Mango: कोकणच्या हापूसला वलसाडच्या हापूसचं आव्हान Special Report
Mumbai Chunabhatti Riksha:चुनाभट्टीतील वादानंतर भीमसैनिकांनी रिक्षा सोडल्या,रिक्षानं जाण्यास परवानगी
Chunabhatti : चुनाभट्टीजवळ रिक्षा रोखल्याने आंबेडकर अनुयायी आक्रमक, पोलिसांसोबत बाचाबाची
Alaknanda Galaxy Vastav 250 : अलकनंदा : नव्या दिर्घिकेचा शोध; विश्वाचे रहस्य उलगडण्यास होणार मदत

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed News : बीडमध्ये ग्रामसेवकाला लोखंडी रॉडने काळं-निळं, रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं, गेवराईतील गावगुंडांचा प्रताप
बीडमध्ये ग्रामसेवकाला लोखंडी रॉडने काळं-निळं, रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं, गेवराईतील गावगुंडांचा प्रताप
Video : विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? व्हिडिओ तुफान व्हायरल
विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? Video तुफान व्हायरल
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
धक्कादायक! बीडमध्ये चोरट्यांचा नवा फंडा, ट्रॅव्हल्सवर आधीच चढून बसतात, चढ येताच उड्या ठोकतात
धक्कादायक! बीडमध्ये चोरट्यांचा नवा फंडा, ट्रॅव्हल्सवर आधीच चढून बसतात, चढ येताच उड्या ठोकतात
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Elon Musk : युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
Embed widget