एक्स्प्लोर

घुमक्कडी (51) : रौद्रभीषण ते प्रेममधुर

क्वूने मोठा बांध बनवण्याचं ठरवलं. अख्खं राज्य पुराच्या पाण्यानं भरलेलं असताना बांधासाठी दगड-माती आणायची कुठून? मग एका दैवी मगरीनं त्याला स्वर्गातून दैवी माती आणण्याचा सल्ला दिला. ही माती क्षणार्धात घट्ट होत जाते आणि तिच्यापासून पहाडांची रांग बनवली गेली, तर पुराचा धोका कायमचा टळेल, असं तिनं सांगितलं.

मुसळधार पावसाचे आवाज ऐकत शांत बसून आहे. मन अशावेळी रिकामं असावं आणि एकही अक्षर ऐकू येऊ नये असं वाटतं. पण असं होत नाही. शब्द आघात करत राहतात उलट दरड कोसळत राहावी कितीतरी वेळ आणि राडा व्हावा जे खाली सापडेल त्याचा, असं होतं. एक उबदार कुस हवी वाटते. माझ्या मऊ टेडीबीअरला जवळ घेऊन मी खिडकीबाहेरचा काळोख बघत बसते. प्रत्येक झाडावर वेगळा वाजतो पाऊस, दगडावर-खडकावर वेगळा, घराच्या प्रत्येक छतावर वेगळा, समुद्राच्या अथांग पाण्यावर वेगळा आणि माझ्या पापण्यांवर वेगळा. पावसाचा नाद डुला- लोलकांसारखा मी अडकवते कानात... पाऊस येऊन उभा माझ्या शेजारी धाराधारांनी बोलत. शांतवत. घुमक्कडी (51) : रौद्रभीषण ते प्रेममधुर तो असा असतो, तोवर त्याचं एखादं रौद्रभीषण रूप असेल याची कल्पनाही येत नाही. माती मिसळून लाल-काळं झालेलं पुराचं पाणी, गावांमध्ये घुसलेल्या नद्या आणि उंच घरांच्या छतांवर, झाडाच्या शेंड्यावर, मंदिराच्या कळसावर आसरा घेतलेले जीव; होड्यांमधून पूर ओलांडू पाहणारी माणसं, मुलांना वाचवू पाहणाऱ्या आया... ही या रम्य दृश्याची दुसरी बाजू असते. घुमक्कडी (51) : रौद्रभीषण ते प्रेममधुर पुराशी निगडित लोककथा, पुराकथा आठवू लागतात. चीनमध्ये प्राचीन काळी सलग बावीस वर्षं प्रचंड पाऊस कोसळून पीतनदीला कल्पनातीत पूर आल्याची एक कथा आहे. गावं जलमय झाली, पिकं वाहून गेली, माणसांना न घरंदारं राहिली ना अन्नपाणी. पाण्यातून मोठाल्या मगरी आल्या, त्या माणसांना अन्न बनवू लागल्या. उंच डोंगरांवर, जंगलाकडे जे धावले; ते पावसाने सैरावैरा झालेल्या, क्रूर तरीही भयभीत अक्राळविक्राळ प्राण्यांच्या तोंडचा घास बनले. माणसांची संख्या वेगानं कमी होऊ लागली. य्यो नामक राजाची चिंता वाढतच गेली; अखेर त्यानं क्वूला बोलावून घेतलं. उपाय शोधून पुरावर नियंत्रण मिळवण्याची जबाबदारी राजसभेनं क्वूवर सोपवली. घुमक्कडी (51) : रौद्रभीषण ते प्रेममधुर क्वूने मोठा बांध बनवण्याचं ठरवलं. अख्खं राज्य पुराच्या पाण्यानं भरलेलं असताना बांधासाठी दगड-माती आणायची कुठून? मग एका दैवी मगरीनं त्याला स्वर्गातून दैवी माती आणण्याचा सल्ला दिला. ही माती क्षणार्धात घट्ट होत जाते आणि तिच्यापासून पहाडांची रांग बनवली गेली, तर पुराचा धोका कायमचा टळेल, असं तिनं सांगितलं. स्वर्गाच्या शोधत क्वू पश्चिमेकडे निघाला. वाटेत अगणित संकटं आली, असंख्य अडथळे आले; ते पार करून तो अखेर स्वर्गातल्या खुनलुन पर्वतावर पोहोचला. स्वर्गसम्राटाकडे त्यानं दिव्य मातीची मागणी केली; पुरामुळे आलेल्या संकटातून माणसांचे प्राण वाचवण्याच्या चांगल्या हेतूने आपण ही मागणी करत आहोत असंही नम्रपणे सांगितलं. पण स्वर्गसम्राटाने स्पष्ट नकार दिला. अखेर एकेदिवशी पहारेकरी पेंगतो आहे हे पाहून क्वूने थोडीशी माती चोरली आणि स्वर्गातून आपल्या राज्याकडे धूम ठोकली. परतल्यावर त्यानं प्रथम पुराच्या पाण्यात ती चोरून आणलेली माती टाकली. पाण्याची पातळी जितकी वाढेल, तितक्या प्रमाणात ती माती वेगानं वाढू लागली. पहाडरांगा निर्माण झाल्या. पूर रोखला गेला. लोकांनी पुन्हा घरं बांधली; पुन्हा शेतीभाती सुरू केली. घुमक्कडी (51) : रौद्रभीषण ते प्रेममधुर चोरीची वार्ता स्वर्गसम्राटाला समजली. संतापून त्यानं सैनिकांना पाठवलं आणि दिव्य माती परत आणायला सांगितली. दिव्य माती नाहीशी होताच पुन्हा पूर आला आणि त्यानं आता कैकपट जास्त नुकसान केलं. क्वूनं सतत नऊ वर्षं प्रयत्न केले, पण त्याला नव्याने बांध बांधता आला नाही. आता राजाही त्याच्यावर वैतागला आणि त्यानं क्वूला युशान पर्वतावर तीन वर्षं कैदेत जखडून ठेवलं आणि अखेर मृत्युदंड दिला. क्वूला आपल्या मरणाची परवा नव्हती; त्याला फक्त बुडून मरणाऱ्या लोकांच्या किंकाळ्या, वाहून जाणाऱ्या लोकांचा आक्रोश ऐकू येत होता. राजा य्यो वृद्ध झाला, तेव्हा त्यानं श्वीनकडे राज्य कारभार सोपवला. श्वीनराजानं पुराचं संकट थोपवण्याचं काम क्वूचा मुलगा युकडे सोपवलं. युनंही आधी वडलांच्या प्रमाणेच बांध बांधण्याचा विचार केला. पण बांधामुळे पाणी अधिक खवळतं, पाऊस त्याचा संताप वाढवतो आणि बांध फोडून आलेलं पाणी कैकपट जास्त नुकसान करतं, हे युच्या ध्यानात आलं. त्यानं पाण्याला थोपवण्याऐवजी वाट काढून देऊन मोकळं करण्याचा मार्ग निवडला. एक भीमकाय ड्रॅगन समुद्राच्या अल्याड पर्वताचं रूप घेऊन अगणित वर्षं सुस्तावून निजलेला होता. त्याला जागं करून युनं त्याच्याशी युद्ध केलं. आपल्या बलदंड हातांनी त्याचे तुकडे केले. त्यामुळे पर्वतात तीन मोठ्या खिंडी निर्माण झाल्या आणि पुराच्या पाण्याला वाटा मिळाल्या. खवळलेली पीतनदी खिंडींच्या तीन वाटांनी आपल्या प्रियकर समुद्राला जाऊन भेटली. आजही ही निसर्गरम्य स्थळं ड्रॅगनद्वार आणि त्रिमार्ग ड्रॅगनपर्वत म्हणून ओळखल्या जातात. असं सांगतात की युकडे हे काम सोपवलं गेलं तेव्हा चारच दिवसांपूर्वी त्याचं लग्न झालं होतं. पुराच्या पाण्याला वाट काढून देण्यासाठी त्याचा संघर्ष त्यानंतर तब्बल तेरा वर्षं अथक सुरू होतं. या काळात कामानिमित्ताने तो तीन वेळा आपल्या घरासमोरून गेला, पण घरात जाण्याचा, आपल्या पत्नीला भेटण्याचा मोह त्यानं टाळला. त्याचं शौर्य आणि त्याचा संयम यांची इतकी वाखाणणी झाली की, अखेर राजा श्वीन राजगादीवरून पायउतार झाला आणि युला राजा बनवण्यात आलं. घुमक्कडी (51) : रौद्रभीषण ते प्रेममधुर पीतनदी समुद्राला भेटून शांत झाली आणि तिचं पाणी एखाद्या मधुर प्रेमगीतासारखं झुळझुळ वाहू लागलं. त्या गाण्यांमध्ये युच्या दीर्घकाळाचा विरह सरलेल्या पत्नीची आणि नव्या घरसंसारात निश्चिंतीनं रमलेल्या प्रजेच्या प्रेमगीतांचे सूरही मिसळले.
फोटो सौजन्य : कविता महाजन

घुमक्कडीमधील याआधीचे ब्लॉग :

घुमक्कडी (50) : पाऊस आणि वाऱ्याचं युद्ध!

घुमक्कडी (49) : उत्तराषाढाची सुफळ संपूर्ण कहाणी!

घुमक्कडी (48) : मस्तवाल मेघ आणि सावुरीचा देहगंध

घुमक्कडी (47) : पाऊस आणि अश्रू

घुमक्कडी : (46) चिमूटभर मिठाच्या समुद्राएवढ्या गोष्टी!

घुमक्कडी (45) : समुद्राचं पाणी खारं का झालं?

घुमक्कडी (44) : कोळ्याच्या जाळ्यात पृथ्वी!

घुमक्कडी (43) : बिघडलेलं दुरुस्त करणारे जादूगार बैगा

घुमक्कडी (42) : कासवकथांचे अनेक अवतार

घुमक्कडी (41) : समुद्राची निर्मिती आणि सूर्यचंद्राची वाटचाल

घुमक्कडी (40) : न्युवाची भलीबुरी लेकरं

घुमक्कडी (39) : दाट काळं धुकं आणि फान्गु

घुमक्कडी (38) : धरतरी माझी मायु रं, तिच्यावं पाय कसा मी ठेवू रं

घुमक्कडी (37) : कार्तिकेयाचं मंदिर आणि चैत्रातली जत्रा

घुमक्कडी (36) : इसामई काला लगी सोना

घुमक्कडी (35) : सुपारी माझी आईबाई !

घुमक्कडी (34) : लोकल दारवा आणि चखणे!

घुमक्कडी (33) : रहिमन पानी राखिये, बिन पानी सब सून…

घुमक्कडी (32) : सर्वांत स्वच्छ गावं…

घुमक्कडी (31) : जीवट डोकऱ्या माशाची गोष्ट!

घुमक्कडी (30) : पलाश… धगधगती अग्निफुले…

घुमक्कडी (29) : एको आणि नार्सिसस

घुमक्कडी (28) : तू-ती आणि रेशमी प्रेमाचा लोचा

घुमक्कडी (27)  भई जब लाखो उदला वायरो

घुमक्कडी (26): महुआ बीने दोहर होये जाय

घुमक्कडी (25): साकाचं बेट

घुमक्कडी (24) : कार निकोबार आणि नारळ

घुमक्कडी (23) लावण्याची देवता आणि प्रलय

घुमक्कडी (22) : त्यांना दुसरे हृदय दे, वा मला वेगळी भाषा!

घुमक्कडी (21) : सतगुरु सिंवरो मोवण्या, जिण ओ संसार उपायो

घुमक्कडी (20): सात जिभांचा अग्नी आणि पुलोमाचे अश्रू

घुमक्कडी : (19) : जे तुमच्याकडे नाही, ते माझ्याकडे आहे!

घुमक्कडी : (18) : जिवंत होणारी चित्रं

घुमक्कडी : (17) : कुरजां ऐ म्हारा भंवर मिला दीजो ऐ

घुमक्कडी (16) : निंदिया सतावे मोहे

घुमक्कडी (15) : बगळ्या बगळ्या कवडी दे

घुमक्कडी : (14) उडणाऱ्या देवदूतांचा महाल!

घुमक्कडी (13) : सांवरे अई जइय्यो जमुना किनारे

घुमक्कडी (12) : आईच्या आधी लेकीला न्हाण आलं हो…!

घुमक्कडी (11) : इज्जत जाईल, पण प्रियकर राहील!

घुमक्कडी (10) : तुमच्या हातात एक फूल दिलं, तर… 

घुमक्कडी (9) : सासू-सुनांच्या विहिरी आणि तळी

घुमक्कडी (8) : फूल जंगल मे खिले किन के लिये

घुमक्कडी (7) : हुंकारकुपातले हरिण

घुमक्कडी (6) : वेगळ्या जागेवरून पाहताना

घुमक्कडी (5) : मिठाचा शुभ्र खारट खडा!

घुमक्कडी (4) साता प्रश्नांची कहाणी

घुमक्कडीः (3) न नींद नैना, ना अंग चैना

घुमक्कडी : (2) सीतेची तहान

घुमक्कडी : आभाळाचा कागद, समुद्राची शाई

 
अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आंदोलनाच्या सुरुवातीपासून आम्ही जरांगे पाटलांसोबत; आमदार धीरज देशमुखांनी घेतली भेट
आंदोलनाच्या सुरुवातीपासून आम्ही जरांगे पाटलांसोबत; आमदार धीरज देशमुखांनी घेतली भेट
अमेरिका नाही, तर सिंगापूरच्या राष्ट्राध्यक्षांना सर्वाधिक पगार; भारतीय चलनानुसार किती?
अमेरिका नाही, तर सिंगापूरच्या राष्ट्राध्यक्षांना सर्वाधिक पगार; भारतीय चलनानुसार किती?
PM Internship : पीएम इंटर्नशीपसाठी 'या' दिवसापासून भरता येणार फॉर्म, तरुणांना दरमहा मिळणार 5 हजार रुपये; कसा कराल अर्ज?
पीएम इंटर्नशीपसाठी 'या' दिवसापासून भरता येणार फॉर्म, तरुणांना दरमहा मिळणार 5 हजार रुपये; कसा कराल अर्ज?
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, चकमक सुरूच; बॉर्डरवर 600 जवान तैनात
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, चकमक सुरूच; बॉर्डरवर 600 जवान तैनात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aadivashi MLA Protest Special Report : आदिवासी आमदारांच्या मागण्या काय ?Top 25 : टॉप 25 न्यूज : 10 PM :4 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaHarshvardhan Patil Special Report : जुना हिशेब, साथीला साहेब; हर्षवर्धन पाटलांच्या हाती तुतारीPune Crime Special Report : सोकोवले गुन्हेगार; पुण्यात पुन्हा अत्याचार

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आंदोलनाच्या सुरुवातीपासून आम्ही जरांगे पाटलांसोबत; आमदार धीरज देशमुखांनी घेतली भेट
आंदोलनाच्या सुरुवातीपासून आम्ही जरांगे पाटलांसोबत; आमदार धीरज देशमुखांनी घेतली भेट
अमेरिका नाही, तर सिंगापूरच्या राष्ट्राध्यक्षांना सर्वाधिक पगार; भारतीय चलनानुसार किती?
अमेरिका नाही, तर सिंगापूरच्या राष्ट्राध्यक्षांना सर्वाधिक पगार; भारतीय चलनानुसार किती?
PM Internship : पीएम इंटर्नशीपसाठी 'या' दिवसापासून भरता येणार फॉर्म, तरुणांना दरमहा मिळणार 5 हजार रुपये; कसा कराल अर्ज?
पीएम इंटर्नशीपसाठी 'या' दिवसापासून भरता येणार फॉर्म, तरुणांना दरमहा मिळणार 5 हजार रुपये; कसा कराल अर्ज?
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, चकमक सुरूच; बॉर्डरवर 600 जवान तैनात
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, चकमक सुरूच; बॉर्डरवर 600 जवान तैनात
Dilip Khedkar : बोगस IAS अधिकारी पूजा खेडकरच्या वडिलांचे राधाकृष्ण विखे पाटलांवर गंभीर आरोप! लेकीच्या विरोधातील कारवाईवरही बोलले
बोगस IAS अधिकारी पूजा खेडकरच्या वडिलांचे राधाकृष्ण विखे पाटलांवर गंभीर आरोप! लेकीच्या विरोधातील कारवाईवरही बोलले
S Jaishankar Pakistan Visit : तब्बल 9 वर्षांनी पहिल्यांदाच मोदी सरकारमधील मंत्री दोन दिवस पाकिस्तान दौऱ्यावर जाणार!
तब्बल 9 वर्षांनी पहिल्यांदाच मोदी सरकारमधील मंत्री दोन दिवस पाकिस्तान दौऱ्यावर जाणार!
तारीख अन् वेळ ठरली, जयंत पाटलांनीच सांगितला; हर्षवर्धन पाटलांसाठी शरद पवारांची इंदापुरात जंगी सभा
तारीख अन् वेळ ठरली, जयंत पाटलांनीच सांगितला; हर्षवर्धन पाटलांसाठी शरद पवारांची इंदापुरात जंगी सभा
तुमच्या सरदाराने सत्तेच्या जाळ्यात उड्या मारल्या होत्या ना?; झिरवळांच्या उडीवर भडकले राज ठाकरे
तुमच्या सरदाराने सत्तेच्या जाळ्यात उड्या मारल्या होत्या ना?; झिरवळांच्या उडीवर भडकले राज ठाकरे
Embed widget