एक्स्प्लोर

फूडफिरस्ता : राजा आईसेस 

काळ बदलतो तसे व्यवसायाचे स्वरूप बदलायला लागतं. जे काळाप्रमाणे बदलतात ते(च) टिकतात, बदलत नाहीत ते तिथेच थांबतात हे कुठल्याही व्यवसायाचे सूत्र आहे. दोनतीन पिढ्या टिकून पुढे जाणाऱ्या जुन्या ब्रँडचे मला कौतुक वाटते ते येवढ्याचसाठी. त्यातूनही सदाशिव पेठेसारख्या अस्सल पुणेरी ग्राहकांपुढे टिकणे हे कर्मकठीण काम. लिमयेंनी ते यशस्वीपणे साध्य केलंय.

साधारण 1990 मध्ये जन्माला येऊन ज्यांच्या सुट्टीच्या आठवणीत पॉट आईस्क्रिम सामील नसेल, त्यांचे लहानपण कुठेही गेले असेल पण पुण्याच्या तेही मध्यमवर्गात नक्की गेलं नाही हे खुशाल समजून चालावं. उन्हाळ्याच्या सुट्टीत एकदा(च) पण ‘पॉटभर’ आईसक्रिम खाणे म्हणजे पुणेरी शाळकरी मुलांच्या सुट्टीतल्या चैनीची परमावधी असायची, कदाचित पुलंच्या मटार उसळ आणि शिकरणीपेक्षाही जास्ती. कोपऱ्यावरच्या वाण्याच्या दुकानातून खडेमीठ, सायकल हाणत कुठेतरी लांब जाऊन बैलगाड्यावर किलोवर मिळणारा बर्फ, पॉटच्या कडेला ते पसरून घरी केलेलं ताज्या दुधाचं बासुंदीसदृश मिश्रण ओतून ज्यांनी दंडाला रग लागेस्तोवर पॉट ढवळला नसेल, त्यांच्यावर अस्सल पुणेरीपणाचा शिक्का बसणे तर केवळ अशक्य. अनुभवांती ज्यांनी सुरुवातीलाच पॉट ढवळून नंतर इतर भावंडांची गंमत बघितली असेल, त्यांना कालांतराने ह्या प्रकारात पीएचडी दिली जायची. माझ्या लहानपणापासून हाताला रग लागलेल्या अश्या शेकडो जीवांना, थेट  घरच्यासारख्या तयार ‘पॉट आईसक्रिमचा’ आधार देणारे सर्वात विश्वासार्ह नाव म्हणजे राजा आईसेस. फूडफिरस्ता : राजा आईसेस  1947 साली सुरु झालेल्या राजा आईसेसचा इतिहास रंजक आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात मुंबई विद्यापीठातून मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल अश्या दोन इंजिनियरिंगच्या डिग्र्या घेऊन श्री. मनोहर लिमये बाहेर पडले. अॅम्युनेशन फॅक्टरीच्या नोकरीत त्यांना विविध प्रयोगांकरता अनेक मानाची पारितोषिके मिळाली. पण ब्रिटीश सरकारच्या एका चुकीच्या फतव्यामुळे त्यांच्यावर बेकारी आली, घरची जवाबदारी अंगावर होती. त्याच सुमारास पुण्याच्या इंजिनियरिंग कॉलेजच्या ग्राऊंडवर भरलेल्या एका औद्योगिक प्रदर्शनात ‘मार्को’ नावाच्या विदेशी कंपनीचे आईसकँडी बनवायचे मशीन त्यांनी पाहिले. नोकरी करून बचत केलेले थोडेफार पैसे खर्च करून सदाशिव पेठेत भाड्याने घेतलेल्या जागेत धाकट्या भावावाबरोबर आईसकँडीचा व्यवसाय सुरु केला. आईसकँडी लोकांना आवडायला लागल्या, दुकान चालायला लागलं. पण माल उधारीवर विकायला द्यायचा हा व्यवसाय, फेरीवाल्यांना दिलेल्या उधारीच्या गणितामुळे लवकरच फसला. मशीनचे पैसे तर वसूल झालेले नव्हतेच. त्यावेळी आईसक्रिम खाणे म्हणजे शक्यतो कुठल्यातरी हॉटेलात जाऊन खाणे ही संकल्पना होती. मग आपणच चांगलं आईसक्रिम लोकांना बनवून घरी दिलं तर? ही कल्पना त्यांच्या डोक्यात आली आणि मशीनमध्ये बदल करायला त्यांच्यातला इंजिनियर जागा झाला. आईसकँडीचेच मशीन प्रयोगाअंती ‘पॉट आईसक्रिमकरता तयार केलं. १९४८ सालापासून पॉट आईसक्रिम बनवून पार्सल द्यायचा नवा व्यवसाय सुरु झाला. लोकांकडून दुधाचे तयार मिश्रण, फळं घेऊन त्यांना आपल्या रेसिपीप्रमाणे आपल्याच दुकानात पॉटमधलं फळांचं आईसक्रिम तयार करून देण्याची त्यांची भन्नाट कल्पना पुणेकरांना आवडली. त्यातही पहिल्यापासूनच उन्हाळी सुट्टीत मिळणारे ‘आंबा’ आईसक्रिम जास्ती लोकप्रिय होत गेले. कै. मनोहर लिमयेंच्या निधनानंतर बीएस्सी झालेले त्यांचे पुत्र श्री.सदानंद लिमये ह्यांनी सुरुवातीला केमिकल कंपनीतली शिफ्टची नोकरी सुरु ठेऊन, वर्षभरात जेमतेम ४-५ महिने चालणारा हा व्यवसाय सांभाळायला सुरुवात केली. १९९३ नंतर मात्र नोकरी सोडून पूर्णपणे ‘राजा आईसेस’लाच वाहून घेतलं आणि ‘राजा आईसेस’ बाराही महिने आईसक्रिम बनवून लोकांना द्यायला लागले. आईसक्रिमची रेंज वाढत गेली. पण वाडा पाडून बिल्डींग होण्याच्या मधल्या काळात जवळपास ४-५ वर्ष दुकान पूर्णपणे बंद ठेवायला लागलं. फूडफिरस्ता : राजा आईसेस  तोपर्यंत देशविदेशातल्या अनेक ब्रँडनी शिरकाव केलेल्या व्यवसायात वर्षभर पॉट आईसक्रिम बनवून विकणेही अवघड झालं होतं. पण श्री.सदानंद ह्यांनी बदलत्या पुण्याचे स्वरूप ओळखून फक्त पॉटमध्ये आईसक्रिम देण्याच्या पलीकडे जाऊन लोकांच्या सोयीकरता स्वतः उत्तम दर्जाचे दुध, फळं वापरून पॉटमधलेच तयार ‘पॅक आईसक्रिम’ विकणे सुरु केलं. त्यामुळे दुकान पुन्हा सुरु झाल्यावर जाणकार लोकांनी इतर ‘पॅक आईसक्रिम’पेक्षा चांगल्या दर्जाचे पॉट आईसक्रिम ‘पॅक’मध्ये विकत घेणे पसंत केलं. फक्त सदाशिव पेठेतल्या दुकानापुरते मर्यादित न रहाता बाहेर पडून लिमये ह्यांनी काही केटरिंगवाल्यांना, नामवंत दुकानात आपले पॉट आईसक्रिमचे ‘पॅक’ देणे सुरु केलं. पण किमतीच्या बेसुमार स्पर्धेत दर्जेदार मालाची किंमत समजणारे कमी होत जातात (हा स्वानुभव आहे). राजा आईसेसचा येवढा जुना व्यवसाय असूनही त्यांना त्याचा अजूनही फटका बसतोच. फूडफिरस्ता : राजा आईसेस  विषयांतर म्हणून नाही पण मध्यंतरी ‘अमूल’ आईसक्रिमनी भारतातल्या काही कंपन्यांचे आईसक्रिम हे डेअरी प्रॉडक्ट नसल्याची दीर्घकाळ चाललेली न्यायालयीन लढाई जिंकली. त्याचा परिणाम म्हणून बदललेल्या भारतीय कायद्याप्रमाणे आता इतर कंपन्यांना (ज्यात अनेक देशीविदेशी कंपनीजचा समावेश आहे). आपले आईसक्रिम हे ‘डेअरी प्रॉडक्ट’ नसून ‘फ्रोझन डेझर्ट’ आहे हे आपल्या ‘पॅक’वर लिहिणे अश्या कंपनीजना आता बंधनकारक आहे. ह्या कंपनीज आईसक्रिम जास्ती काळ टिकावे म्हणून त्यात वनस्पती तुपाचा वापर करतात. अश्या आईसक्रिममधे (प्रमाणाबाहेर) असलेल्या ‘ट्रान्स फॅटी अॅसीड’चे अनेक दुष्परिणाम पेशंट्स आणि निरोगी व्यक्तींवरही दीर्घकाळ होत रहातात. केवळ ‘पॅक’ मधला आईसक्रिमचा साईझ मोठा दिसावा म्हणून त्यात वेगळे स्टॅबिलायझर्स वापरून अनेक कंपनीज आईसक्रिम बनवतात, त्यातले दूरगामी धोके वेगळेच असतात. राजा आईसेसमध्ये हे प्रकार कधीच होत नाहीत. म्हणूनच जेव्हापासून जाणकार लोकांकडून ‘फूड कंटेंट’मधले थोडेफार समजायला लागलं, तेव्हापासून स्वतःच्या घरी आईसक्रिम आणताना, इतरांच्या घरी द्यायला मी फक्त इथलेच आईसक्रिमच घेऊन जातो. त्यातही माझी पसंती इथल्या आंबा, अंजीर ह्या फळांच्या ‘नॅचरल’ आईसक्रिमला असते. पॉटमध्ये केलेल्या रवाळ आईसक्रिमच्या एकेक घासागणिक ‘आईसक्रिम प्लँट’ मध्ये केलेल्या आणि पॉट मध्ये केलेल्या आईसक्रिममधला फरक जाणवत राहतो. त्यात त्या फळाची केमिकल्स विरहित अस्सल चव लागते आणि क्या बात है! ही दाद इथल्या आईसक्रिमला मिळते. इतरही काही आईसक्रिम,मस्तानी खात असलो तरी दर्जाच्या बाबतीत इथे मिळणारी खात्री इतर ठिकाणी क्वचितच मिळते. गेले अनेक वर्षे मी इथले आईसक्रिम, मस्तानी खातोय पण त्याच्या दाटपणात आणि गोडपणात मात्र काडीमात्रही बदल नाही. फूडफिरस्ता : राजा आईसेस  श्री.सदानंद आणि त्यांच्या पत्नी ह्यांच्या सोबत त्यांचा मुलगा रोहितही आता त्यांच्या व्यवसायात काम करतोय. तो आल्यामुळे पुण्याच्या निरनिराळ्या भागातल्या दुकानात ‘राजा’चे आईसक्रिम मिळायला सुरुवात झाल्ये. पूर्वी रात्री लवकर बंद होणारे दुकान आता रात्री १२ वाजेपर्यंत उघडे ठेवायला सुरु केलंय. त्यामुळे माझ्यासाठी जमेल तेव्हा रात्री उशिराच्या पुण्यात मनमुराद भटकून झाल्यावर राजाच्या दुकानात बसून शांतपणे पॉट आईसक्रिम खाणे,हा दिवसभराचा शिणवटा घालवायचा एक उत्तम उपाय असतो. काळ बदलतो तसे व्यवसायाचे स्वरूप बदलायला लागतं. जे काळाप्रमाणे बदलतात ते(च) टिकतात, बदलत नाहीत ते तिथेच थांबतात हे कुठल्याही व्यवसायाचे सूत्र आहे. दोनतीन पिढ्या टिकून पुढे जाणाऱ्या जुन्या ब्रँडचे मला कौतुक वाटते ते येवढ्याचसाठी. त्यातूनही सदाशिव पेठेसारख्या अस्सल पुणेरी ग्राहकांपुढे टिकणे हे कर्मकठीण काम. लिमयेंनी ते यशस्वीपणे साध्य केलंय. व्यवसायात कितीही अडथळे आले तरी उत्तम दर्जाशी कधीही तडजोड न करणारे ‘राजा आईसेस’ हे रोजच्या कॅश काऊंटरमधे इतर अनेक नामवंत ब्रँडपेक्षा कमी असेल. इतर दुकानांचा चकचकीतपणा भलेही इथे नसेल. पण मशीनची,दुकानातली स्वच्छता आणि आईसक्रिमचा दर्जा मात्र कायम एखाद्या ‘राजा’ ला शोभेल असाच राहिलाय. आपल्या मालाच्या दर्जावर कै.मनोहर लिमयें ह्यांचा विश्वास होता. त्यामुळेच घरातल्या कोणाचंही नाव ‘राजा’ नसतानाही दुकानाला मात्र त्यांनी ‘आईसेसचा राजा’ म्हणून, “राजा आईसेस” नाव दिलं, हे अनेकांना माहिती नसतं. काही नावं देताना दृष्ट्या लोकांची चूक होत नाही. फूडफिरस्ता अंबर कर्वे  राजा आईसेसचा पत्ता चिमण्या गणपतो चौक ते बाजीराव रस्ता लेन,सदाशिव पेठ पुणे ३०   संबंधित ब्लॉग :

फूडफिरस्ता - नेवरेकर हेल्थ होम

 
View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
आम्ही महायुतीसोबच, पण..; रामदास आठवलेंचं बंड झालं थंड; देवेंद्र फडणवीसांकडून मिळाला शब्द
आम्ही महायुतीसोबच, पण..; रामदास आठवलेंचं बंड झालं थंड; देवेंद्र फडणवीसांकडून मिळाला शब्द
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे-पवारांच्या युतीला दे धक्का; उमेदवाराने परस्पर अर्ज माघारी घेतला; निवडणुकांपूर्वीच 1 जागा झाली कमी
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे-पवारांच्या युतीला दे धक्का; उमेदवाराने परस्पर अर्ज माघारी घेतला; निवडणुकांपूर्वीच 1 जागा झाली कमी
साडेतीन वर्षांनी नवाब मलिक मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर, म्हणाले, काहींनी बोंबाबोंब केली, तरी अजितदादा माझ्या पाठिशी उभे राहिले! निवडणूक आयोगाच्या कारभारावर सडकून प्रहार
साडेतीन वर्षांनी नवाब मलिक मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर, म्हणाले, काहींनी बोंबाबोंब केली, तरी अजितदादा माझ्या पाठिशी उभे राहिले! निवडणूक आयोगाच्या कारभारावर सडकून प्रहार
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik PC BMC Election : नवाब मलिक 3 वर्षांनी मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर UNCUT PC
Parbhani Election : परभणी शहरातील एकनाथ नगरवासीयांनी टाकला मतदानावर बहिष्कार
Ravi Landge Nagarsevak : दबाव, अर्थकारण अन् डावपेच? दोन वेळा बिनविरोध; रवी लांडगेंनी सगळं सांगितलं?
Sanjay Raut VS Rahul Narvekar : अध्यक्ष प्रचारात, राजकारण जोमात; राऊतांचे राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप Special Report
Nashik Sudhakar Badgujar : एबी फॉर्मची मारामार बडगुजरांनी लाटले चार? Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
आम्ही महायुतीसोबच, पण..; रामदास आठवलेंचं बंड झालं थंड; देवेंद्र फडणवीसांकडून मिळाला शब्द
आम्ही महायुतीसोबच, पण..; रामदास आठवलेंचं बंड झालं थंड; देवेंद्र फडणवीसांकडून मिळाला शब्द
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे-पवारांच्या युतीला दे धक्का; उमेदवाराने परस्पर अर्ज माघारी घेतला; निवडणुकांपूर्वीच 1 जागा झाली कमी
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे-पवारांच्या युतीला दे धक्का; उमेदवाराने परस्पर अर्ज माघारी घेतला; निवडणुकांपूर्वीच 1 जागा झाली कमी
साडेतीन वर्षांनी नवाब मलिक मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर, म्हणाले, काहींनी बोंबाबोंब केली, तरी अजितदादा माझ्या पाठिशी उभे राहिले! निवडणूक आयोगाच्या कारभारावर सडकून प्रहार
साडेतीन वर्षांनी नवाब मलिक मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर, म्हणाले, काहींनी बोंबाबोंब केली, तरी अजितदादा माझ्या पाठिशी उभे राहिले! निवडणूक आयोगाच्या कारभारावर सडकून प्रहार
ITC : केंद्राच्या निर्णयाचा सलग दुसऱ्या दिवशी ITC ला फटका, दोन दिवसात 72300 कोटी स्वाहा, LIC चे 11460 कोटी पाण्यात
ITC चा स्टॉक सलग दुसऱ्या दिवशी कोसळला, दोन दिवसात 73200 कोटी स्वाहा, LIC चे 11460 कोटी बुडाले
Parbhani : जेलच्या शौचालयात शालच्या सहाय्याने गळा आवळून कैद्याने जीवन संपवलं; आई-मावशीसह तिघांच्या हत्या प्रकरणात होता आरोपी
जेलच्या शौचालयात शालच्या सहाय्याने गळा आवळून कैद्याने जीवन संपवलं; आई-मावशीसह तिघांच्या हत्या प्रकरणात होता आरोपी
Kolhapur Municipal Corporation: इकडं कोल्हापूर महानगरपालिकेत महायुतीला पहिला धक्का, तिकडं आत्मदहनाचा इशारा दिलेल्या धनश्री तोडकरांचं अखेर काय ठरलं?
इकडं कोल्हापूर महानगरपालिकेत महायुतीला पहिला धक्का, तिकडं आत्मदहनाचा इशारा दिलेल्या भाजप धनश्री तोडकरांचं अखेर काय ठरलं?
Pune BJP : पुण्यात भाजपचे दोन उमेदवार बिनविरोध; मंजुषा नागपुरे आणि श्रीकांत जगताप विजयी
पुण्यात भाजपचे दोन उमेदवार बिनविरोध; मंजुषा नागपुरे आणि श्रीकांत जगताप विजयी
Embed widget