एक्स्प्लोर

फूड फिरस्ता : ९० वर्ष जुनं साऊथ इंडियन कॅंटीन

इथल्या सर्व्हिसला तर १०० पैकी १०० मार्क्स. वर्षानुवर्षे काम करणारे स्त्री-पुरुष वेटर्स घरातल्या लोकांना वाढावं, इतक्या आत्मीयतेने आणि हसतमुखाने वाढप करत असतात. हे सगळं मिळून सध्याच्या काळात फक्त १३० रुपयात!

मराठी आणि तामिळ ह्या दोन 'द्रविडीयन' संस्कृतींची जवळीक फार पूर्वीपासून. शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू एकोजीराजे हे तर तंजावर प्रांताचे 'राजे'च होते. त्यावेळेच्या तंजावर प्रांतातल्या जिंजी किल्यावर अनेक वर्ष मराठी साम्राज्याचा भगवा फडकत होता. मूळच्या मराठी पण जन्माने तामिळी असलेल्या अनेक लोकांनी तामीळनाडूत आपले नाव कमावलंय. कर्मभूमी तामिळनाडू असलेल्या रजनीदेवाची किर्ती तर ह्या पामराने ब्लॉगमध्ये काय वर्णावी? भोसले घराण्यासोबत जशी अनेक मराठी कुटुंब तंजावर प्रांतात स्थायिक झाली, तशीच अनेक तामिळ कुटुंबही महाराष्ट्रातही येत राहिली. एकंदरीतच दक्षिण भारतीय समाज हा सहसा पापभीरु. शिक्षणाचं प्रमाण पहिल्यापासूनच चांगलं; जिथे जातील तिथे आपल्या सौजन्यपूर्ण वागण्याने लोकांना आपलेसे करुन, मुख्यत्वे सरकारी ऑफिसात कारकुनीसारख्या पांढरपेशा नोकऱ्या करुन शांततेत आपले आयुष्य जगणारी माणसं. पूर्वापार पुण्यात आलेले तामिळी लोक प्रामुख्याने सोमवार पेठ, रास्ता पेठेत राहायला लागले. इंग्रजांच्या नोकरीच्या निमित्ताने आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात आलेल्यांनी खडकी, रेंजहिल्स भागात आपला डेरा जमवला. तामिळी लोकांनी कार्तिकस्वामींच्या मंदिरांसारखी द्रविडी संस्कृतीत प्रचलित असलेली मंदिरे बांधली, काही कॅथॉलिक चर्च सुरु केली, तामिळ भाषा शिकवणाऱ्या शाळाही सुरु केल्या. पण त्याचवेळी तामिळ भाषेसोबतच मराठी भाषाही शिकले. मूळचे तामिळ असलेले माझे अनेक मित्र तामिळ एवढीच, मराठी भाषाही शुद्ध बोलतात.पण शेवटी दुसऱ्या संस्कृतीशी एकरुप झाला तरी आपले मूळ विसरेल तो माणूस कसला? तामिळनाडूमधून इकडे शिक्षण आणि नोकऱ्यांच्या निमित्ताने येणाऱ्या तामिळी मुलांच्या/बॅचलर्सच्या राहण्याच्या सोयीसाठी काही तामिळी लोकांनी सहकारी तत्वावर साऊथ इंडियन हॉस्टेल अर्बन को ऑप.सोसायटी सुरु केली. त्याच्याचबरोबर ह्या मुलांना पुण्यात तामिळी पद्धतीचे शाकाहारी खाणं मिळावं म्हणून इथेच कॅन्टीन सुरु केलं. साल होतं १९२८! म्हणजे बरोब्बर ९० वर्षांपूर्वी पुण्यात पहिले शुद्ध शाकाहारी "साऊथ इंडियन कॅन्टीन" सुरु झालं. माझी माहिती चुकत नसेल तर, त्याकाळी पुण्यात साऊथ इंडियन नावाचे म्हणावे असे कुठले उडपी उपाहारगृहही नव्हते. आज धो-धो गर्दी खेचणाऱ्या उडपी हॉटेल्सपैकी तर एकही त्यावेळी नव्हतं हे नक्की. 'साऊथ इंडियन जॉईंट' म्हणून कौतुकाने पहिल्यांदा गेलेल्यांच्या समजुतीला तर तडाच जाईल असे हे ठिकाण आहे. एखाद्या मोठ्या खोलीएवढा पण साधासा हॉल, त्यात ७-८ टेबल्स आणि प्लॅस्टिकच्या खुर्च्या बसवून खाण्यासाठी तयार केलेली जागा. हॉटेलसारखा 'अँबियन्स' वगैरेला महत्त्व देणाऱ्यांनी तर इथल्या वाटेला न गेलेलंच चांगलं. पण ज्यांना अस्सल मद्रासी पदार्थांची चव चाखायला आवडते/आवडेल, त्यांनी इथे नक्कीच भेट द्यायलाच पाहिजे. फूड फिरस्ता : ९० वर्ष जुनं साऊथ इंडियन कॅंटीन गेल्या जवळपास २० वर्षांत इथे अनेकदा गेलोय. तेवढ्यात इथल्या दोन मॅनेजमेंटही बदलल्या पण पदार्थांची चव मात्र तेवढीच ऑथेंटिक 'मद्रासी' राहिलीय. ह्याचे कारण म्हणजे सोसायटी 'अय्यर' लोकांनी स्थापन केलेली असल्याने इथली चव जपण्यासाठी फक्त 'अय्यर ' लोकांनाच ह्या कॅन्टीनची मॅनेजमेंट दिली जाते. उगाचच तिखट किंवा गुळचट चव असल्या, चवी न देता फक्त पारंपरिक तामिळी 'अय्यर स्टाईल' सांबार आणि इतर पदार्थ देण्याची काळजी त्रिचीच्या आसपासच्या भागातून आणलेले आचारी घेतात. पुण्याच्या 'निवांत' संस्कृतीच्या मानाने तसे लवकरच म्हणजे सात वाजताच इथल्या नाश्त्याची सुरुवात होते. इडली, उपमा ह्या 'स्टार्टर्स' पाठोपाठ दरबारातील एकेक मानकऱ्यांप्रमाणे मेदूवडा, पोंगल (नमकीन) आणि २-३ प्रकारचे डोसा. त्याबरोबर तोंडी लावायला अस्सल मद्रासी सांबार आणि हिरव्या चटणीची एकेक वाटी. ह्यातले मेदूवडा ,"घी रोस्ट ओनियन"  किंवा "घी रोस्ट मसाला डोसा" आणि पानात कडेला वाढली जाणारी टोमॅटो, कांद्याची ओली चटणी माझ्या स्वतःच्या विशेष पसंतीची. ही चटणी त्यामानाने लवकर संपते त्यामुळे त्याचा आस्वाद घ्यायला मात्र सकाळी लवकर जायला लागते. घरगुती तुपावर भाजल्या जाणाऱ्या आणि जंगी आकारात मिळणारा हा 'घी रोस्ट' शिकायला तर पुण्यातल्या भल्याभल्या हॉटेलीयर्सनी इथल्या अय्यर आचाऱ्यांची शिकवणी लावावी. इथलं कुठल्याही वेळेचं खाणं झाल्यावर स्टीलच्या भांड्यात मिळणाऱ्या इथल्या मद्रासी 'कापी'चा आस्वाद घेतला नाहीत, तर ते सगळ्यात मोठं फाऊल ठरतं. डायरेक्ट चेन्नईवरुन होलसेलमध्ये येणाऱ्या 'पद्मा कॉफी' पावडरनेच इथली फिल्टर कॉफी बनवली जाते. त्यातही इथली 'विदाऊट शुगर कॉफी' घेतली की त्यापुढे पुण्यात मिळणाऱ्या इतर सगळ्या कॉफी झूट वाटायला लागतात. चव थेट मुंबईच्या रुईया नाक्यावरच्या 'मणीज' सारख्या काही साऊथ इंडियन हॉटेल्सची याद देऊन जाते. फूड फिरस्ता : ९० वर्ष जुनं साऊथ इंडियन कॅंटीन दुपारी आणि रात्रीच्या जेवणात सांबार, भात, तामिळी पद्धतीनी केलेल्या दोन भाज्या, रसम, दही, आता इथे भरपूर संख्येने येणाऱ्या 'नॉन-तामिळी' लोकांसाठी म्हणून काही पोळ्या (चपात्या) असा साधा, मोजका पण पोट भरणारा 'मेन्यू' असतो. वरती स्वीट डिश म्हणून "व्यंकटरमणा गोविंदा बालाजी"च्या प्रसादात मिळतो तसा कापूर घातलेल्या, युनिक चवीचा भलामोठा लाडू (एक्स्ट्रामध्ये) हजर असतो. संध्याकाळी इडली, डोस्यासोबत उत्तपा मिळतो (तो मी कधी खाल्लेला नाही) पण इथल्या खऱ्या जेवणाची मजा येते ती दर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी दुपारी असते. त्यावेळी असणारी 'फिस्ट' म्हणजे "मद्रासी लोकांच्या चैनीची परमावधी" वगैरे असते. फिस्टच्या ताटात मात्र चपातीला जागा नसते. साधा भात, मसाला राईस (मद्रासी उच्चार रैस), सांबार, रसम म्हणजे 'नुस्तं येउंद्या'! दही, पापड, लोणचं असतंच. त्यावरती 'पायसम' म्हणजेच तांदुळाची खीर, दालवडा, गुलाबजाम आणि हे कमी म्हणून की काय, त्यावर 'अमीट्टी' म्हणजेच उडीद डाळीची तामिळी पद्धतीने केलेली जिलबी. इथल्या सर्व्हिसला तर १०० पैकी १०० मार्क्स. वर्षानुवर्षे काम करणारे स्त्री-पुरुष वेटर्स घरातल्या लोकांना वाढावं, इतक्या आत्मीयतेने आणि हसतमुखाने वाढप करत असतात. हे सगळं मिळून सध्याच्या काळात फक्त १३० रुपयात! मुळात हॉस्टेलची मेस हा उद्देश असल्याने इथल्या सगळ्याच पदार्थांचे दर अगदीच माफक. पुण्यातल्या नामांकित हॉटेलात १३०-१५० च्या आसपास मिळणाऱ्या डोस्याच्या वरताण चव असलेला डोसा इथे केवळ ६०-७० रुपयात मिळतो. त्यातही किमतीपेक्षा सेवाभावच जास्ती. फूड फिरस्ता : ९० वर्ष जुनं साऊथ इंडियन कॅंटीन असं जेवण झाल्यावर घरी न जाता, वरच्या होस्टेलमध्येच डुलकी काढण्यापुरती एखादी खाट तात्पुरती मिळेल का?हे विचारायचा मोह इथे टाळायलाच लागतो. ह्या फिस्टसाठी महिन्याचा (फक्त) तिसराच रविवार का निवडलाय,ह्याच नेमकं कारण मात्र मला अजूनपर्यंत तरी समजलेलं नाही) आर.वेम्बन अय्यर हे गेले दहा वर्षे हे कॅन्टीन चालवतायत. पण हा माणूस तुम्हाला कधी कॅन्टीनमध्ये दिसेल तर शप्पथ! उघडेबंब, कमरेला धोतर, खांद्यावर पंचा कम उपरणं, ह्या अवतारात लोकांच्या खाण्याची वेळ संपल्यावर फक्त कॅन्टीनमध्ये ओझरती चक्कर मारणार. त्यामुळे त्यांना अनेकदा बघितलं असंल तरी हेच ह्या कॅन्टीनचे कंत्राटदार ऊर्फ 'मालक' हे पहिल्याप्रथम ओळखूच येत नाही. पुढच्या खाण्याच्या तयारीचा अंदाज आपल्या सहकाऱ्यांकडून घेण्यापुरताच आपला आणी कॅन्टीनचा संबंध असल्यासारखे संन्यस्त भाव. कॅशसारख्या इतर क्षुल्लक(?)व्यवस्था आपल्या विश्वासू लोकांवर सोपवून हे आपलं दुसऱ्या खोलीत असलेल्या भटारखान्यात पदार्थ स्वतः बनवण्यात मग्न. हाडाचा आचारी माणूस! अनेकदा गेल्यामुळे आपल्याला ओळखलेच तर चेहऱ्यावर पुसटसे हास्य, वणक्कम! विषय कट! असे लोक म्हणजे भांड्यात ओतलेल्या मद्रासी फिल्टर कॉफीसारखे. दोन भांड्यात अनेकदा वरखाली केल्याशिवाय, ह्यांची खरी चव समजत नाही.

संबंधित बातम्या

फूड फिरस्ता : साईछाया मिसळ

खादाडखाऊ : दिवाळीनंतरचे ‘ओरीजनल’ मराठी चटकदार पदार्थ

खादाडखाऊ : दिवाळीची खरेदी अन् पुण्यातील खवय्येगिरी!  

खादाडखाऊ : अटर्ली बटर्ली पण फक्त डिलीशअस?

खादाडखाऊ : जखमा उरातल्या खादाडखाऊ : चायनीज गाड्यांवरचे खाणे आणि अर्थकारण वडापाव -काही आठवणीतले, काही आवडीचे खादाडखाऊ : मराठी पदार्थांसाठी फक्कड खादाडखाऊ : गणेशोत्सवातली खाद्यभ्रमंती आणि बदलत चाललेलं पुणं खादाडखाऊ : गणेशोत्सव आणि मास्टरशेफ खादाडखाऊ : पुण्यातला पहिला ‘आमराई मिसळ महोत्सव’ खादाडखाऊ : खाद्यभ्रमंती मुळशीची खादाडखाऊ : मंदारची पोह्यांची गाडी खादाडखाऊ : आशीर्वादची थाळी खादाडखाऊ : पुण्यातील महाडिकांची गाडी खादाडखाऊ : पुन्हा एकदा लोणावळा खादाडखाऊ : ‘इंटरव्हल’ भेळ आणि जय जलाराम खादाडखाऊ : ‘तिलक’चा सामोसा सँपल खादाडखाऊ : प्रभा विश्रांतीगृहाचा अस्सल पुणेरी वडा ब्लॉग : खादाडखाऊ : हिंगणगावे आणि कंपनी खादाडखाऊ : पुण्यातील 106 वर्षं जुनी ‘वैद्यांची मिसळ’! खादाडखाऊ: खाद्य इतिहास पुण्याचा
View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dagdu Sakpal : मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
Share Market Crash : सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
ABP Premium

व्हिडीओ

Shinde vs Nashik Navi Mumbai :जुनं वॉर,आरोपांना धार;MMRमध्ये दोन राजकीय वाघांची झुंज Special Report
Eknath Shinde Devendra Fadnavis : शिंदेंसोबतची युती, फडणवीसांची सायकोलॉजी Special Report
Ajit Pawar Sharad Pawar NCP : 'आधी लगीन कोंढाण्याचं'मग तोरण एकीचं? Special Report
BJP Vs Shivsena : मुंबईचा कोण सिंकदर? BMC कोणाचा भगवा झेंडा फडकणार? Special Report
Ajit Pawar VS Murlidhar Mohol : पिंपरी-चिंचवड जिंकण्यासाठी दोन पैलवान रिंगणात Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dagdu Sakpal : मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
Share Market Crash : सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
ABP Majha Top 10 Headlines :  ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले,  ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
Sangli Municipal Corporation Election: सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
Embed widget