एक्स्प्लोर
BLOG | कोरोनाने हिरावला आंतरराष्ट्रीय जलवैज्ञानिक, डाॅ. जेम्सच्या निधनाने जलवैज्ञानिक क्षेत्राला मोठी हानी
स्वप्नातही वाटले नव्हते की जगातील हा थोर जलपुरूष वाॅशिंग्टन येथील कोरोनाचा पहिला जलविज्ञान अर्थशास्रज्ञ बळी ठरेल म्हणून. मित्रहो! शासनाचे आदेश मानणे, घरात राहणे आणि सार्वजनिक ठिकाणी गेलात तर सुरक्षित अंतर ठेऊन कोरोनामुक्त भारत करणे हीच डाॅ. जेम्स यांना खरी आदरांजली ठरेल.
अमेरिकेतील वाॅशिंग्टनस्थित आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जलवैज्ञानिक आणि अमेरिकेतील नॅशनल सायन्स फाऊंडेशनच्या जलविज्ञान कार्यक्रमाचे प्रथमपासून निवृत्तीपर्यंतचे संचालक डाॅ. एल. डगलस जेम्स यांचे 83व्या वर्षी कोरोनाने निधन झाले. कोरोना संसर्गाशी एक महिना लढत त्यांचं रूग्णालयात निधन झाले. हा जगातील कृषी आणि जलवैज्ञानिक क्षेत्राला कोरोनाचा पहिला मोठा धक्का बसला आहे.
डाॅ. जेम्स यांचा जागतिक बॅंकेचे महनीय सल्लागार म्हणून जगातील अनेक देशांबरोबर संपर्क होता. त्यांचं भारताशी नातं ३७ वर्षापासूनचं. केंद्रीय जल- उर्जा आयोगाचे संशोधन तसेच “नर्मदा सागर” धरणाच्या डिझाईनचे प्रमुख आधार आणि माझ्यासारख्या वयाची 42 वर्षे पूर्ण झालेल्यांना कृषी सिंचनमध्ये मार्गदर्शन तसंच अनेकांना पी. एच. डी. शिक्षण-संशोधनासाठी प्रमुख मार्गदर्शन करण्यापासून त्यांनी मदत केलीय. त्याचप्रमाणे डाॅ. मनोहर सावंत यांनाही त्यांनी संधी दिली. किंबहुना भारताला ते आपले सर्वात अधिकदा भेट दिल्यामुळे दुसरं घर संबोधत असत.
अमेरिकेतील कॅलिफोर्निया या शेतीप्रगत राज्यातील 'मोडेस्टो ( Modesto)' गावात प्रगत बदाम उत्पादक व बदाम प्रक्रिया उद्योगाचे सल्लागार, पण स्टॅनफोर्ड विद्यापीठाचे वाणिज्य पदवीधर कै. जेम्स हे त्यांचे वडील. त्याचप्रमाणे आपल्या घराण्यातील 6 जण स्टॅनफोर्ड विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहेत, असे नेहमी अभिमानाने सांगणारे डाॅ. जेम्स हे स्टॅनफोर्ड विद्यापीठातून पंचविशीत स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये बीएस एमएस आणि पीएच.डी. पदवी घेणारे त्यावेळी एकमेव असतील.
शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी अमेरिकेतील केन्टकी विस्वविद्यालय व जाॅर्जिया तंत्र शिक्षण संस्थेमधील पर्यावरण रिसोर्स केंद्रामधे सहयोगी प्राध्यापक म्हणून संशोधन व शिक्षणाचे काम केले. केन्टकी विश्वविद्यालयात त्यांनी धरणांची प्रतीकृती(डिझाइन) करतेवेळी पावसामुळे धरणात जे पाणी पाणलोट क्षेत्रातून वाहून येऊ शकेल याचा प्रथमच शास्त्रोक्त संगणक माॅडेलची निर्मिती केलेल्या 'स्टॅंडफोर्ड वाॅटरशेड माॅडेलचा' आधार घेऊन 'केन्टकी वाॅटरशेड माॅडेलची' निर्मिती केली.
जगातील बहुतेक धरणनिर्मितीत (डिझाईनमधे) याच संगणक माॅडेलचा वापर करतात. शेती-पाणी-पीक-हवामान-माती ही एकमेकावर अवलंबून असतात. त्यामुळे जलसिंचनासाठी संगणक माॅडेल वापरताना ठराविक गणिती ढांचा वापरून बरोबर उत्तर येईल असे नाही. म्हणून त्यांनी सिंचनासाठी जलविज्ञान ( हायड्राॅलाॅजी)-परिमाणाचा पॅरामीटर वापरून जगात प्रथमच आमच्यापुढे निरनिराळ्या प्रकारची पीक-माती-हवामान-कार्यक्षम सिंचन पद्धती ( उदा. वाफा-सरी-तुषार-ठिबक-सर्ज फ्लो) यांचा वापर वरच्या शेतकऱ्यांनी केल्यास ओढा-नदी वा भूगर्भ यांच्या जलपुरवठ्यावर काय परिणाम होईल, यासाठी संगणक माॅडेल निर्माण करण्याची कल्पना मांडली आणि ती 45 महिन्यातच पूर्ण करून घेतली. तेही 37 वर्षांपूर्वी.
डाॅ. जेम्स हे एक जलशास्त्र-तंत्रातील अजब रसायन होते. 29 व्या वर्षी त्यांनी 'माणूस आणि पाणी' यावर लिहिलेल्या पुस्तकाचे, चीनी भाषेत त्यावेळी भाषांतर केले होते. सुमारे 45 वर्षांपूर्वी त्यांनी 'जलसंपदा नियोजनाचे अर्थशास्त्र' हे गणिती सिद्धांताचा आधार घेत लिहिलेले 600 पानी लिहिलेले पुस्तक अजूनही अमेरिकेतील विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात वापरले जाते. शिवाय जगांतील धरणांचे डिझाईनमधे हे पुस्तक प्रमाण मानले जाते.
अमेरिकेतील उटाह राज्यातील 'लोगन' शहरातील 'उटाह स्टेट युनिव्हर्सिटी' ही जगामध्ये गेली 60 वर्षे सिंचन शिक्षण व संशोधन क्षेत्रात अग्रणी आहे. सिंचन संशोधनासाठी 'उटाह वाॅटर रिसर्च लॅबोरेटरी' ही विद्यापीठाचा मानबिंदू होती व आहेच. पण जगातील सिंचन संशोधन व सिंचन प्रशिक्षण यांचे केंद्रबिंदू देखील आहे. भारतासह जगातील अनेक धरणांची डिझाईन व त्याची माॅडेल करून प्रत्यक्ष चाचणी याच प्रयोगशाळेत होते.
डाॅ. जेम्स याचे 20 वर्षे संचालक होते. 2 एकर प्रशस्त जागेत लोगन नदीकाठावर 3 मजली 250 संशोधन शास्त्रज्ञ असलेली ही भव्य जल संशोधन प्रयोगशाळा जगातील जलसंशोधन व विकासाचा आधार आहे. येथेच आम्हाला 45 महिने डाॅ. जेम्स यांचेबरोबर संशोधन करता आले. त्या काळात आमच्या रसायनशास्त्र पदवीधर सौ. शालिनीदेवी, चार वर्षीय संग्रामसिंह यांना घेऊन रसायन विभागात श्रीमती डाॅ. बर्ट यांना मदत करायच्या.
लोगन नदीचा प्रवाहच प्रयोगशाळेत धरणाचे माॅडेल चाचणीसाठी घेतला आहे. आम्ही सहकुटुंब तेथे होतो. भारतीय व विशेषत: शालिनीदेवींचे जेवण, भारतप्रवास, वर्षअखेरीस वर्षभर घडलेल्या घटनांचा स्वहस्ते लिहिलेला अहवाल पाठविणे हे त्यांच्या विशेष आवडीचे. आमचे संबंध कौटुंबिकही होते. ज्याप्रमाणे मी त्यांच्या गावी गेलो होतो. त्याप्रमाणे ते माझ्या शिरोळ गावी आले व ते आजीचे समाधीनिमित्त त्यांनी आमचे शेतही पाहिले.
आमच्या अमेरिकास्तित कन्या शिल्पाराजे व डाॅ. क्रांती यांचे गेली 23 वर्षे ते वडिलकीचे मार्गदर्शक होते. जानेवारी 2019 मध्ये डाॅ. जेम्स व डाॅ. झीदा जेम्स खास मुळीक-सावंत-सन्नारेड्डी-सेंन्ट्रल वाॅटर ॲंड पाॅवर कमिशन खडकवासलाचे जल शास्त्रज्ञ यांना भेटण्यासाठी पुण्यात आले होते.
स्वप्नातही वाटले नव्हते की जगातील हा थोर जलपुरूष वाॅशिंग्टन येथील कोरोनाचा पहिला जलविज्ञान अर्थशास्रज्ञ बळी ठरेल म्हणून. मित्रहो! शासनाचे आदेश मानणे, घरात राहणे आणि सार्वजनिक ठिकाणी गेलात तर सुरक्षित अंतर ठेऊन कोरोनामुक्त भारत करणे हीच डाॅ. जेम्स यांना खरी आदरांजली ठरेल.
टीप- लेखक डाॅ. बुधाजीराव मुळीक हे कृषीतज्ञ आहेत. त्यांना महाराष्ट्र शासनान कृषीरत्न- कृषीभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
क्राईम
राजकारण
Advertisement