एक्स्प्लोर

BLOG | आयुर्वेद अ‍ॅलोपॅथी वाद नको!

आमच्या allopathy बंधुनो आयुर्वेदाला मागासलेले न समजता, थोडा अहंकार, दंभ, कमी करून भारतीय चिकित्सा पद्धतीचा सन्मान करा, हातात हात घालून, एकमेकांच्या पॅथीजच्या मर्यादा नि बलस्थाने याचा सदुपयोग करून रुग्णांना केंद्रबिंदू मानून, सामान्य गोरगरिबांना उत्तम आरोग्य देऊ!

जगातलं सर्वात प्राचीन वैद्यक आयुर्वेद आहे, अष्टांग आयुर्वेद म्हणजे (बालरोग, शल्यतंत्र, शालाक्य, अगदतंत्र, कायचिकित्सा इत्यादी) आज ज्या पद्धतीने Speciality Branch Paediatrics Medicine Surgery Forensic Opthalmology ENT etc... तसा अष्टांग आयुर्वेद 8 speciality अस्तित्वात होत्या, आचार्य चरक आणि त्यांची शिष्य परंपरा म्हणजे medicine... Branch तर आचार्य सुश्रुत आणि त्यांची शिष्य परंपरा म्हणजे Surgery Branch ज्यांनी जगातील पहिली plastic surgery Rhinoplasty, cataract पासून अनेक 100 प्रकारच्या surgeries केल्याच्या नोंदी आहेत. अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणात नालंदा, तक्षशीला विद्यापीठाला जाळण्यात आलं, बरीच ग्रंथ संपदा नष्ट झाली, परिणामी जंतूशास्त्र, भूलशास्त्र, या महत्त्वाच्या बाबी त्यानंतर कालौघात हळूहळू बाजूला झाल्या. ऋषींमुनींनी केलेले वैद्यक संशोधन हे काय कोणतं नोबेल घेण्यासाठी केलेले नव्हते तर ...निःस्वार्थी बुद्धीने मानवी कल्याणासाठी, निरामय शतायुषी जीवनासाठी निर्माण केलेले शास्त्र म्हणजे आयुर्वेद होय.

आयुर्वेदाचं महत्व अबाधित राहील. 85% आजार हे Non emergency असतात तिथे आयुर्वेद उत्तम पद्धतीने प्रभावी ठरतो, हे माझ्या स्वतःच्या रुग्णचिकित्सेच्या अनुभवावरून सांगतो. आणि 15% आजारात अगदी मृत्यूच्या दारातून परत आणण्याची क्षमता, Allopathy ची आहे, त्यामुळे या pathy चा सुद्धा कमालीचा आदर सर्वांनी ठेवलाच पाहिजे. प्रत्येक pathyची बलस्थाने आणि मर्यादा याची जाणीव अहंभाव न ठेवता स्वीकारली आणि केवळ रुग्णहित केंद्रबिंदू ठेवले. तर निश्चितच मानवाचं कल्याण होईल, e media वर आयुर्वेदाला unscientific म्हणणे, शस्त्रक्रियेच्या परवानगीवरून आयुर्वेदाची हेटाळणी करणारे मिम्स बनविणे, अशी अवमानना ते कायम करीत असतात, खास त्यांच्यासाठी... खरं म्हणजे आयुर्वेद हा कोणाचा copy right नाही तर प्रत्येक भारतीयांचा आहे, किंबहुना असं अशास्त्रीय म्हणून कोणी हेटाळणी भविष्यात कोणी करू नये यासाठी पाठपुरावा करणार आहोत तर त्यालाही बहुसंख्य भारतीयांचे समर्थन राहील.

Allopath असतानाही भारतीय चिकित्सा पद्धतीचा अभिमान आणि ममत्व असणारे बोटावर मोजण्याइतके Allopaths आहेत. त्यांच्यात अहंकार नाही हे संस्काराचं प्रतिबिंब आहे आणि आयुर्वेद संशोधनात आणि आयुर्वेद प्रभावी चिकित्सा पद्धती आहे हे सिद्ध करण्यात MBBS, MD असलेल्या स्व.डॉ. शरदिनी डहाणूकर, डॉ.संजयजी ओक पासून अनेक सुसंस्कृत, निगर्वी allopath चे आयुर्वेदात योगदान आहे, त्यांच्याविषयी मनात कृतज्ञता आहे. कोणी कितीही वाकडे तिकडे वागले तरीही आम्ही आयुर्वेद चिकित्सक कधीही Allopathy चा अनादर करीत नाहीत, कारण आयुर्वेद हे अध्यात्म आधारित शास्त्र असल्याने सर्वांचा आदर संस्कारातच ओघाने येतोच!

सर्जरीचा अधिकार कोणाला?

Royal Australian, College of Surgeons Melbourne येथे father of Surgery म्हणून आचार्य सुश्रुतांचा पुतळा बसवून सन्मान केला आहे! मग आम्हाला बापालाच बाप म्हणायची लाज का वाटावी?

आयुर्वेदातील फक्त BAMS ला नव्हे तर त्यानंतर Surgery (शल्य) विषयांत 3 वर्षे पुर्ण करून त्या विषयात (MS) कौशल्य प्राप्त केलेल्यांनाच 58 निवडक सर्जरी करण्याचाच अधिकार, अधिकृतपणे राजपत्राद्वारे केंद्र सरकारने दिल्याबरोबर IMA या अॅलोपॅथीच्या सर्वोच्च संघटनेने 11/12/2020 ला बंद पुकारला, खरं म्हणजे.. देशभरातील आयुर्वेद महाविद्यालय संलग्नित हॉस्पिटल्समध्ये 40वर्षांपासून पूर्वीपारपासूनच या शस्त्रक्रिया कमी अधिक प्रमाणात केल्या जातातच, (उदा: पुण्यातील टिळक आयुर्वेद कॉलेजशी संलग्नित शेठ ताराचंद रुग्णालयात, मोतीबिंदूपासून ते Laprotomy बहुतांश सर्व सर्जरी यशस्वीपणे कित्येक दशकांपासून आयुर्वेदात MS असणारे बहुतांश सर्जन आहेत हे ध्यानात घेतले पाहिजे.

(आज चिंचवड भागात डॉ. अशोक लांडगे BAMS, MS असून एन्डोस्कोपिक सर्जरीमध्ये यशस्वी निष्णात आहेत, तर राहुरी आयुर्वेद महाविद्यालयात स्त्रीरोग विभागप्रमुख कोल्हार येथील डॉ. रमेश वाव्हळ यांनी Normal डिलिव्हरी, सिझर, Hystrectomy गर्भाशय काढणे अशा हजारो शस्त्रकर्म निष्णातपणे यशस्वी केले आहेत. शेवंगावच्या PMT Ayurved College मध्ये यशस्वीपणे Anorectal Surgeries करणारे डॉ. सुमेध वासनिकही BAMS, MS आहेत, अशी काही प्रातिनिधिक उदाहरणे दिली आहेत. अशी देशभरातील हजारो उदाहरणे आयुर्वेद सर्जनची सांगता येतील)

मुळात प्रगत शोध लावलेले बहुतांश शास्त्रज्ञ हे भौतिकशास्त्र किंवा अभियांत्रिकीच्या तज्ज्ञांनी लावलेले असल्याने त्यावर कुठल्याही पॅथीचा एकाधिकार असण्याचे कारण नाही. उलट हे शोध मानवी कल्याणासाठीच शोधल्या गेले आणि Surgery is the part of Skill & Techniques and not the property of any pathy.

शोधाचे काही उदाहरणे जे अॅलोपॅथीने शोधले नाहीत Surgical Scalpel by Morgan parker, 1914 (Engineer)

CTscan Allan Cormack 1971 (South African Physicist)

Xray Wilhelm Roentgen, 1895 (German Professor - Physics)

Medical LASER Theodore Maiman 1960 Physics Professor, America

जगातील पहिली plastic surgery Rhinoplasty आचार्य सुश्रुतांनी भारतात 600 BC वर्षापुर्वी केली, एवढेच नाही तर मोतीबिंदु, (आजही शस्त्रक्रिया करताना छेद सुश्रुत method नेच घेतला जातोय) Laprotomy Intestinal Obstruction (बद्धोदर) Perforation of Intestine (छिद्रोदर) Ascitic Tapping (जलोदर-पोटात साठलेले पाणी काढणे) GastroIntestinal surgeries Anastomosis म्हणजे तुटलेले दोन भाग एकत्र जोडणे, सुश्रुतांनी जखमी मानवी तुटलेल्या आतड्याला प्राण्यांच्या आतड्याचा धागा वापरून शिवून तो भाग जोडल्याची नोंद आहे. Ref Text book of Love and Bailey Chapter42 Anastomoses, page Implantation of Teeth in Pushana in toothless mouth

Sushrut performed many urological surgeries including ProstateSurgeries Perineal method as being used today also

अशा प्रकारच्या असंख्य सर्जरी सुश्रुत संहितेत वर्णित 300 शस्त्रकर्मे आहेत. 120 Surgical instruments (शस्त्रांचे विविध प्रकार) अगदी 20 प्रकारचे नाडीयंत्र Endoscope (Vinkshan Yantra) Endo म्हणजे "आत" Scope म्हणजे "बघणे" (भलेही...Optic Fiber technology शिवाय) Proctoscope पासून सर्वच यंत्र आयुर्वेदात वर्णीत आहेत.

पीपलिकादंश म्हणजे ऑपरेशन केल्यावर आतील अवयवांना टाके घालण्यासाठी चवताळलेले मुंगळे clamp सारखे लावून, suturing केल्या जायचे. BioAbsorbable म्हणजे घेतलेला छेद भरून आल्यावर त्यात विलीन होणारे द्रव्य, After wound healing, Bioabsorbable Material...is important. आजचे प्रगत विज्ञान सुद्धा Catgut म्हणजे मांजराच्या आतड्यापासून निर्माण केलेला धागा वापरतात, कालपरत्वे साधनं बदलली परंतु, Technique is same! याउलट हजारो वर्षांपूर्वी उपलब्ध साधन सामुग्रीचा उपयोग करणारे ऋषींमुनी अप्रगत कसे असू शकतात? तेंव्हा, जरा सोच बदलो Aseptic Precaution म्हणजेच निर्जंतुकीकरण.. रक्षोघ्न द्रव्यांच्या धुपनसह शस्त्र अग्नीवर तापवून ऑपरेशन करणे (To avoid sepsis/pus formation,infection),

हळद, यष्टीमधु, गोघृत इत्यादि सारख्या व्रणरोपकांचा (Wound Healing) Dressing साठी वापर करणे अशा अनेक बाबींचे वर्णन आहे. आजही कित्येक रुग्णांचे Diabetic Wound मुळे, पाय तोडण्याचा (Amputation) "सर्जन"शील सल्ला दिल्या गेलेले कित्येक, रुग्णांचे पाय आयुर्वेद Wound Healing पद्धतीने वाचविल्याचे कित्येक व्हीडिओ पुरावे आमच्याकडे आहेत. Diabetic Nephropathy कित्येक रुग्णांचे डायलिसिस टळून आयुर्वेदावर नॉर्मल केल्याचे Patho Parameter पुरावे माझ्याकडे आहेत. प्राचीनकाळी काय लोकांच्या किडनी फेल होतच नव्हत्या का? आणि झाल्या असतील तेव्हा उपचार ज्या वनस्पतींद्वारे झाला, त्याचाच तर आम्ही वापर करतो ना! आता काही रुग्ण भोंदू, पदवी नसलेल्या कोणाकडूनही उपचार घेत असतील आणि त्यांचा वाईट अनुभव असेल तर हा शास्त्रदोष असत नाही, त्यामुळे आयुर्वेदाचे चुकीचे मूल्यमापन कोणी करू नये. प्रत्येकवेळी आपण आणि आपली पॅथी जगात सर्वश्रेष्ठ आणि आयुर्वेद "किस झाड की पत्ती" अशा पद्धतीचा अहंभाव कायमच IMA कडून अॅलोपॅथीकडून केला जातोय. हे थांबलं पाहिजे, आयुर्वेद ही भारतीय चिकित्सा पद्धती आहे आणि याच चिकीत्सा पद्धतीचा आणि प्रतारणा कायम होत असल्याने भारतातील लाखो BAMS पदवीधारकांत असंतोष आहे.

देशात खेड्यापाड्यांत जिथे MBBS जायला तयार नसतात तिथे BAMS सेवा देतात. आजही कोरोना काळात आणि सर्वच वेळी प्राथमिक आरोग्य केंद्रापासून, 108 Ambulance आणि मेळघाट आदिवासी पाड्यापर्यंत BAMS medical officer हाच सामान्यांना सेवा देतो, एवढेच काय तर.. देशभरातील मोठमोठ्या हॉस्पिटल्समध्ये ICU समर्थपणे सांभाळणारे, तेथील इमरजन्सी हाताळुन रूग्णांना जीवदान देणारे BAMS आहेत. हे विसरून चालणार नाही .

कोरोना संकटात सामान्य गोरगरिबांची लाखो रुपये ब्लॅक मार्केटकडून आणि काही हॉस्पिटलकडून लुट होत असताना, रेमडीसिवीर सारख्या अनेक औषधाचा रोल सिद्ध झाला नाही, हे WHO ने मान्य केलेले असताना, Corona मुळे की औषधीच्या side effect मुळे झालेले मृत्यू जास्त यावर अजून वाद सुरू असताना, आणि केरळमध्ये मार्च 20 पासूनच AyurvedTaskForce स्थापन करून मृत्युदर सर्वात कमी केल्याने आणि देशातील अनेक आयुर्वेद चिकित्सेत कोपरगावचे जागतिक ख्यातीचे आयुर्वेदतज्ञ वैद्य रामदास आव्हाड, वैद्य सर्वश्री समीर जमदग्नी, विनयजी वेलनकर, परीक्षित शेवडे, सुविनय दामले, मुंबईतील अमर बनसोडे असे असंख्य.. मी स्वतः कित्येक कोरोना रुग्णांना आयुर्वेदाने बरं केलंय, त्यात मंत्री बच्चूभाऊ कडू यांच्यासह कुटुंबियांना, आयुर्वेदाने कोरोनामुक्त केलं आहे. (हे त्यांनी माध्यमानाही सांगितलंय ते Print. डिजिटल मिडियात आलंय)

उशिरा का होईना! कोरोना चिकित्सेत, आयुर्वेद उपचाराचा प्रोटोकॉल केंद्रिय मंत्री हर्षवर्धनजी यांनी 6/10/2020 ला घोषित केला. त्याचे स्वागत करणे सोडा, परंतु IMA ने याला विरोध करीत आयुर्वेदाला चक्क Placebo म्हणून केंद्रिय मंत्र्याला निवेदन दिले. यापेक्षा अजुन भारतीय चिकित्सा पद्धतीचा अपमान तो कोणता!

अजुन किती सहन करायची अवहेलना! ज्या भारतात आयुर्वेद निर्माण झालं, त्याच देशात IMA ने सातत्याने आयुर्वेदाला अपमानित करायचं! याची खदखद आणि उद्विग्नता समस्त आयुर्वेद जगतात आहे, अमेरिकेपासून ते पाश्चात्यांनी पळविलेले हळद कडुनिंब पासूनचे पेटेंट शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकरांनी वाचविले. तेच मुळात हजारो वर्षांपासूनच आम्ही भारतीय हे आयुर्वेदात वापरत आलोय, हे ग्रंथातील पुरावे सादर करून आणि याचा अभिमान हा प्रत्येक भारतीयांबरोबरच अॅलोपॅथीच्या तज्ञास ही वाटलाच पाहिजे!

शाळेत रोज प्रतिज्ञा म्हणत असताना भारतीय परंपरेचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन हे रोज म्हणतच आपण सर्व भारतीय मोठं झालो आहोत. मग आयुर्वेद हे जगातील प्राचीन वैद्यकशास्त्र ही भारतीय परंपराच आहे व त्याचा अभिमान व सन्मान न राखणं (अॅलोपॅथ्स कडून आयुर्वेदाची हेटाळणी) ही प्रतिज्ञेची पायमल्लीच ते करीत आहेत. मानवाच्या कल्याणासाठी अहंभाव बाजुला ठेवून अॅलोपॅथ्सने हातात हात घालुन काम करावं या मानवीय हेतूने आयुर्वेदात भगंदर Fistula ची प्राचीन सुश्रुत परंपरेतील शस्त्रक्रिया ही क्षारसुत्र पद्धत आहे, (तो धागा बनवायला अनेक दिवस खुप कष्ट घ्यावे लागतात, पहिले 15 layer, रूईचा चिक, नंतर अपामार्ग क्षार, नंतर हळदीचे 3 layer) ज्यात कापाकापी न करता, भगंदरच्या छिद्रातून क्षारसुत्राचा धागा टाकला टाकला जातो आणि प्रत्येक आठवड्यात तो विशिष्ट कौशल्याने बदलला जातो. ज्यामुळे भगंदर शस्त्र न चालविता heal होतो. Allopathy मध्ये Fistulectomy म्हणजे सर्वच भाग कापतात, त्यातून Recurrence चं प्रमाण जास्त असल्याने आयुर्वेदातील पद्धतीला जगभरात मान्यता मिळाली. म्हणून आयुर्वेदाचं मोठं मन BHU वाराणसीत MBBS, MS सर्जंन्सना आयुर्वेदातील सर्जन्सनी ही क्षारसुत्र टेक्निक खास कार्यशाळा घेऊन शिकविली.

हा कॉपीराइट केवळ आयुर्वेदाचा न समजता सर्वे भवन्तु सुखिन: सर्वे सन्तु निरामया. समस्त मानवाच्या कल्याणाचा ऋषींमुनींचा आयुर्वेदातील अध्यात्मि़क विचार आयुर्वेदातील डॉक्टरांना उदात्त बनवितो, असे असताना आयुर्वेदाला आता कुठे या सरकारनेस्वतंत्र AYUSH मंत्रालय स्थापून केंद्रीय मंत्री श्रीपादजी नाईक सारखे कर्तव्यदक्ष मंत्री दिले, ज्यांनी प्रामाणिकतेने AIIMS च्या धर्तीवर आयुर्वेदाचे सुपरस्पेशालिटी, संशोधन आधारित हॉस्पिटल्स प्रत्येक राज्यात सुरू करणे आरंभिले आहे. जेणेकरून भारतीयांसोबतच जगभरातून अॅलोपॅथीत बरे न झालेले रुग्ण, आजार बरे करून घेण्यासाठी भारतात यावेत, यामुळेच AIIA All India Institute of Ayurved भव्यदिव्य आयुर्वेदाचे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल दिल्लीत 2017 ला सुरू झाले, गोव्यात प्रगतीपथावर आहे आणि प्रत्येक राज्यात होणार आहे.

खरं म्हणजे जगभरात चीन (Acupuncture) Thai पासून इतर देशामध्ये त्यांच्या देशी चिकित्सेला प्राधान्य आणि सन्मान दिला जात असताना, इथे 2014 पर्यंत आमच्या ताटात पंचपक्वान्न सोडा, साधे अन्न जेमतेम होते. आज सरकारकडून आमच्या ताटात पक्वान्न सन्मानाने वाढणे सुरू केले तर वर्षानुवर्षे पक्वान्ने जेवणाऱ्यांच्या पोटात का दुखावे? स्वातंत्र्यानंतर खऱ्या अर्थाने आताशी आयुर्वेदाला सरकारद्वारे सन्मानाची वागणूक नी अधिकार मिळायला लागले की Allopaths ची पोटदुखी कायम सुरू असते. सवाल साधा आहे. स्वदेशी चिकित्सा आयुर्वेदाला मान आणि प्रतिष्ठा जन्मदात्या भारतात मिळणार नाही? तर काय ही अपेक्षा अमेरिका, ऑस्ट्रेलियाकडून करणार का आम्ही? किती दिवस आपल्याच भारतात आयुर्वेदाला तुम्ही हिणवणार? सातत्याने होणाऱ्या अपमानामुळे आयुर्वेदजगतात कमालीचा असंतोष आहे, म्हणूनच भारतीय देशी चिकित्सापद्धतीला (आयुर्वेद) विरोध म्हणजे ही द्रोहच हा शब्द आयुर्वेद जगताच्या दृष्टिने होता आणि द्रोह या शब्दाच्या अनेक अर्थापैकी अनिष्ट चाहना दुष्मन या शत्रू होने की अवस्था या भाव द्वेषवश षड्यंत्र रचकर किसीको हानी पहुचाने की क्रिया या भाव असे अनेक अर्थ आहेत.

प्राचीन भारतीय शास्त्र आयुर्वेदाची आज ठरवून चाललेले प्रतिमाहनन! पेशंट आयुर्वेद उपचार घेतोय हे त्यांनी सहज सांगितल्याबरोबर कशाला ते झाडपाला घेताय? म्हणून प्रेसक्रिपशन भिरकावून आयुर्वेदद्वेष पेशंटच्या मनात रुजविणारे ऍलोपॅथस वरील व्याख्येस पात्रच ठरतात ना! (अर्थात काही सन्माननीय अपवाद), जे आयुर्वेद केवळ लक्षणेच बरे करीत नाही तर व्यक्तीच्या मनाचा (Mind)विचार करून, पंचकर्मद्वारे शरीर शुद्धी करून (जगात इतर कोणत्याही पॅथीमध्ये Body&Mind Cleansing Methods नसल्याने अनेक फॉरेनर भारतात केरळमध्ये आयुर्वेद उपचारासाठी येतात) आजार मुळासकट निर्मूलन करण्याचे शास्त्र आहे, त्या शास्त्राचा पदोपदी अपमान करणारे कोणत्या व्याख्येत बसवावेत? जे भारतीयशास्त्राचा सन्मान ठेवू शकत नाहीत ते कोणत्या व्याख्येत बसवावेत? म्हणून तो द्रोह शब्द काही कोणत्या व्यक्ती, संघटना किंवा पॅथीच्या विरोधात तर नव्हताच नव्हता! आणि हो राजकीय सध्या प्रचलित प्रवाहातील "देशद्रोह" या संकल्पनेशी तर त्याचा दुरान्वये संबंध नाही, परंतु कुठेतरी प्रसन्नजी जोशी यांनी शब्दाचा राजकीय किंवा कायद्यांन्वये अर्थ लावण्याची घाई केलीय, मुळात सातत्याने आपल्याच देशांत, allopaths कडून होणारी अवहेलना त्याचा निषेध समस्त आयुर्वेद जगतातील खदखद म्हणून प्रकट झालेला सात्विक संताप होता! त्यामुळं यापुढं अशी अवहेलना त्यांनी बंद करावी, कोणीही कठोर शब्दांत एकाएकी प्रत्युत्तर देत नाही, हे सर्वांनी लक्षात ठेवावे!

2000 वर्षापूर्वी केवळ शस्त्रक्रियेचे ज्ञान ऋषींनी आम्हाला दिले नाही तर वादसंभाषा ही शिकविली त्यामुळे शस्त्रक्रियेसोबतच शास्त्ररक्षणार्थ वाकशस्त्र प्रयोग करावाच लागतो, जेंव्हा सहनशीलतेचा कडेलोट होतो तेंव्हा Now enough! हा सात्विक संताप प्रकट होतोच! त्यामुळे प्रसन्नजीकडून विषयांतर होतेय आणि मुद्दा भरकटल्या जातोय, लोकशाहीत प्रसन्नजीसह कोणीही माझ्या मताशी असहमत असू शकतात, त्यांचाही मी सन्मानच करतो, मी मुळात आक्रमक प्रतिक्रिया का दिली, त्यामागचे आयुर्वेद जगतात सातत्याने अवहेलनेमुळे असलेली मानसिकता लक्षात घेणे अभिप्रेत असते, शब्दशः अर्थापेक्षाही भावार्थ आणि हेतुशुद्धता समजून मूल्यमापन व्हावे असे माझे मत आहे. नंतर फोनवर प्रसन्नजीबरोबर चर्चा झाल्यानंतर त्यांनी मोठ्या मनाने, गैरसमज दूर झाले असे स्वतःच्या पोस्टमध्ये करेक्शन केले हीच तर खरी लोकशाही आहे, "मुळातच राष्ट्र प्रथम या विचाराने महाराष्ट्रातील लाखो तरूणांना किल्लेभ्रमंतीच्या माध्यमातून व्यसनमुक्तीपासून पर्यावरण रूजवून खरे शिवछत्रपतीचे आचरणकर्ते घडविणाऱ्या, शिवचरित्रातील समतोल व्याख्याता शिव आचरणकर्त्या डॉ. शिवरत्न शेटे यांनी आयुर्वेद जगतातील खद्खद, कठोर शब्दांत प्रकट केली" त्यामुळे त्यांच्या वक्तव्याला प्रसन्न जोशी समजू शकले नाहीत, अशा अनेक मान्यवरांच्या प्रतिक्रिया समाजमाध्यमावर पडल्या, हेच माझ्या कार्याचे तटस्थ मूल्यमापन आहे. आणि एखाद्याचा आजवरचा ट्रॅक रेकॉर्ड न बघता, व्यक्तीचे एखाद्या शब्दावरून, घाईघाईने निष्कर्ष काढून मूल्यमापन करणे अयोग्यच! असो!

SnakeBite&Ayurved जंगलात आजही कोब्रा सारख्या विषारी सर्पदंशानंतरही सरकारी दवाखान्यात न नेता, जाणकार वैद्याकडून आयुर्वेद उपचाराद्वारे रुग्णाचे प्राण आजही वाचविले जाते, किंवा High Blood Pressure किंवा heart Attack (Angina) येत असल्याच्या अवस्थेत अनुक्रमे Nefidepine व Sorbitrate ही औषधी जिभेखाली दिली जातात, यालाच Sub Lingual Route असे म्हणतात हा मार्ग इमर्जन्सीत सर्वात fast acting असतो, आणि रुग्णाचा प्राण वाचविला जातो, मग आदिवासी बांधव किंवा आयुर्वेद तज्ञ अशी इमर्जन्सी औषधी ,जिभेखाली चाटवितो तो अप्रगत आणि हॉस्पिटलमध्ये जिभेखाली औषधी देणारे प्रगत?

जरा सोच बदलो सर्पदंश होतो म्हणजे त्याच्या विषात कोणते तरी Amines असतात, आणि त्याला प्रति उतारा असणाऱ्या वनस्पतींची मुळांचा रस जिभेखाली चाटविल्याने त्यात विषाला neutralise करणारी Anti~Amines असतात हे विज्ञान का मानत नाहीत! हेमगर्भपोट्टली सारखे अनेक औषधी ह्या emergency मध्ये जीभेखाली चाटविल्याने प्राणरक्षक म्हणून गणल्या जातात. (आयुर्वेदाच्या डॉ. गीता पवार यांनी सर्पदंशविरोधी पिनाक नावाची टॅबलेट बनविली ज्याला मान्यता आहे, ASVS ही allopathy चे इंजेक्शन चुकून, बिनविषारी सर्पदंश रुग्णाला दिल्यास रिऍकॅशन येऊन रुग्णाचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो, तसे दुष्परिणाम या आयुर्वेद टॅब्लेटसला नाहीत हे ध्यानात घ्यावे)

Nobody is Superior

बारावीला सारखाच अभ्यासक्रम नीट परीक्षेत, Physics, Chemistry, Biology यापैकी एखाद्या विषयात अपघाताने कमी अधिक होऊन, MBBS च्या खालोखाल BAMS ला प्रवेश घेतल्या जातो, याचा अर्थ बुध्दीमत्तेत फरक नसतो, दोन्ही कोर्स साडेपाच वर्षाचे, त्यातही दुर्दैवाने MBBS ला आयुर्वेदाचे ज्ञान त्यांच्या अभ्यासक्रमात नाही, मात्र BAMS ला आयुर्वेदासोबतच Integrated course Allopathy च्या जवळपास सर्वच विषयाची अत्यावश्यक Physiology Pathology, Pharmacology पासून ते सर्व विषयाचा महत्वाचा syllabus ज्याचे पेपर विद्यापीठ घेते, त्यामुळेच आयुर्वेद सोबतच शिकविलेल्या मर्यादेपर्यंत Allopathy प्रॅक्टिसचा अधिकार महाराष्ट्र राज्यात BAMS ला आहे. त्यानंतर Post Graduate, MD/MS साठी All india PG~CET स्पर्धा परीक्षा दोन्ही faculty ला, द्यावीच लागते आणि त्यानंतर MD/MS व्हायला 3 वर्ष ,दोघांनाही सारखीच! त्यामुळे कोणी Super Natural मानायचे कारण नाही, कालावधी सारखाच आहे फक्त औषधोपचाराच्या पद्धतीत फरक आहे, लोकांच्या आयुर्वेदावरील विश्वासामुळे

Vishwaraj andar Borkar 614/720, 2020All india NEET Rank14070 या मुंबईतील विद्यार्थ्यांने, शासकीय महाविद्यालयात सहज प्रवेश मिळण्याइतपत मार्क्स असताना, RA PODAR Ayu Medical College मुंबई मध्ये ठरवून प्रवेश घेतला, हे बदलणारे चित्र आयुर्वेदाच्या उज्ज्वल भवितव्य असणारा आत्मविश्वासाची साक्ष देते आहे. आयुर्वेदाच्या चिकित्सेला जसा जनाधार आणि राजाश्रय वाढेल तसा बारावीनंतर पहिले प्राधान्य MBBS ऐवजी BAMS देण्याचा ट्रेंड वाढेल, अर्थातच याला अनेक दशके वाट बघावी लागेल, सुरुवात झालीय ही सकारात्मकता आहे.

Burn Cases&Ayurved बर्न केसेस मध्ये भाजलेल्या त्वचेवर ड्रेसिंग करण्यासाठी, आयुर्वेद शास्त्रातील जखमांना न चिटकणारे केळीचे पान, गोघृत, हळदी सारखे व्रणरोपकांचा वापर हा, Allopathy तील सोफ्राटुली पेक्षाही सरस ठरल्याने त्याचा वापर अनेक allopathic हॉस्पिटलमध्ये केला जातोय, हे रुग्णांच्या हिताचेच आहे.

NeuroSurgery in Ayurveda आचार्य जीवकांनी अनेक NeuroSurgeries केल्याचे पुरावे आहेत, अर्बुद (ट्युमर) चिकित्सेत Onchosurgeries आयुर्वेदात झालेल्या आहेत. रक्तस्त्राव थांबविण्यासाठी सर्वोत्तम Haemostatics औषधी असून, शस्त्रक्रियेत शलाकाद्वारे अग्नीकर्म करून रक्तवाहिन्याना चटका देऊन रक्तस्राव बंद केला जायचा, आजही Electrical Cauterization ही समान पद्धती वापरली जाते, छत्रपती शिवाजी महाराजांनी गद्दार खंडोजी खोपडेचे हात पाय कलम केल्यानंतर रक्तस्राव थांबविण्यासाठी कान्होजी जेधे यांनी "तळाविले" हा शब्दप्रयोग इतिहासात आढळतो. (उकळत्या तेलात कापलेला पाय बुडवून,रक्तस्राव थांबवुन प्राण वाचविण्यासाठी रक्तवाहिन्या ब्लॉक करतात, तलवारीने कापलेल्या वेदनेमुळे उकळत्या तेलाची वेदनेची तीव्रता जाणवत नसावी)

Body Dissection वाहत्या नदीच्या पाण्यात प्रेताचे (Dead Bodies Dissection) कुंचल्याने डीसेकशन करून Anatomy म्हणजे शरीर रचनाशास्त्राचा अभ्यास व्हायचा. तुमचा Microscope चा आणि Skin Dermis, Epidermis चा शोध लागण्यापूर्वी, आचार्यांनी त्वचेच्या 7 स्तरांचा शोध लावला, अवभासिनी,लोहिता, श्वेता, ताम्रा, वेदिनी, रोहिणी, मांसधरा अशी नावे आणि त्यांची जाडी सुद्धा वर्णन केली. नावे भलेही संस्कृतमधील असतील तर काय फरक पडतो? Terms इंग्लिश काय की इतर भाषेतील काय!

Knowledge is Knowledge..!! जे आयुर्वेदशास्त्र Without Microscope 7 layers of Skin वर्णन करते, ते प्रगतच होते, म्हणूनच म्हणतोय जरा सोच बदलो. Ascitis जलोदर म्हणजे पोटात पाणी भरणे यात औषधोपचारासोबतच, पोटावर सूक्ष्म छेद घेऊन, कमळनालद्वारे (stem of Lotus) Tapping करण्याचे यशस्वी प्रयोगाची नोंद आहे, आजही तीच technique वापरतात फक्त कमळनाळऐवजी रबर कॅथेटर वापरतात, म्हणून काय आयुर्वेद ऍडव्हान्स नव्हता व्हय! म्हणूनच म्हणतोय जरा सोच बदलो.

गर्भचिकित्सेपासून प्रसूती पासून ते बाल रोग चिकित्सेपर्यंत आणि अगदतंत्र (forensic Science), सुश्रुत कल्प स्थानात आठव्या अध्यायात, गर्भिणी मूषक Female pregnant Mouse, चावल्यास तसेच अष्टांग संग्रहात मादी सापाचा जेष्ठात ऋतुमती Ovulation होण्याच्या Life Cycle पासून ते,गर्भिणी असलेल्या सर्पदंशाची, तसेच अनेक कीटक व जीवांकडून चावा झाल्यास व्यक्तीमध्ये दिसणारे विषलक्षणे आणि त्यावरचे उपाय (Anti-Tode)एवढे बारकावे वर्णन करणारे आयुर्वेदास अप्रगत म्हणून हेटाळणी करता? अहो! प्रगत म्हणवणारे तुम्ही आज एखादी महिला गरोदर आहे का? हे कन्फर्म करण्यासाठी

Urine Pregnancy Detection Kit किंवा सोनोग्राफी करून ठरविता? तेंव्हा आयुर्वेदाबद्दलचा कोणताही अभ्यास न करता, शास्त्राचा अपमान करणं बंद करा! आणि आमचंच शास्त्र हे जगातील प्रगत? अशी आत्मप्रौढी बंद करा, जरा जमिनीवर या! भारतीय चिकित्साशास्त्रनिंदा आणि तुच्छ लेखणे थांबवा! Now Enough

लेखन मर्यादा असल्याने सर्वच लिहिणे शक्य होणार नाही. अनेक मालिका लिहाव्या लागतील, तर आमच्या allopathy बंधुनो आयुर्वेदाला मागासलेले न समजता, थोडा अहंकार, दंभ, कमी करून भारतीय चिकित्सा पद्धतीचा सन्मान करा, हातात हात घालून, एकमेकांच्या पॅथीजच्या मर्यादा नि बलस्थाने याचा सदुपयोग करून रुग्णांना केंद्रबिंदू मानून, सामान्य गोरगरिबांना उत्तम आरोग्य देऊ!

अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हिरवा निसर्ग हा भोवतीने, 'राऊतवाडी धबधब्याची सफर' करा मस्तीने; पाणी प्रवाही झाल्याने पर्यटकांची गर्दी
हिरवा निसर्ग हा भोवतीने, 'राऊतवाडी धबधब्याची सफर' करा मस्तीने; पाणी प्रवाही झाल्याने पर्यटकांची गर्दी
Vanchit Bahujan Aghadi : विधानसभा निवडणुकीत वंचित पूर्ण ताकदीने उतरणार; महायुती, महाविकास आघाडीचे पुन्हा टेन्शन वाढवणार?
विधानसभा निवडणुकीत वंचित पूर्ण ताकदीने उतरणार; महायुती, महाविकास आघाडीचे पुन्हा टेन्शन वाढवणार?
Pune News : अल्पवयीन मुलांचे नको ते प्रताप, पालकांनी उचलले मोठं पाऊल;  लेकरांच्या मागे लावले चक्क 'डिटेक्टिव्ह'
अल्पवयीन मुलांचे नको ते प्रताप, पालकांनी उचलले मोठं पाऊल; लेकरांच्या मागे लावले चक्क 'डिटेक्टिव्ह'
सेमीफायनलआधी सूर्याला मोठा धक्का, टी20 तं अव्वल स्थान गेलं! 
सेमीफायनलआधी सूर्याला मोठा धक्का, टी20 तं अव्वल स्थान गेलं! 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vijay Wadettiwar : मराठीच्या मुद्द्यावर मविआ विधानसभा लढवणार? वडेट्टीवारांचं मोठं वक्तव्य!Kolhapur Radhanagri Dam : राधानगरी धरण परिसरात रिमझिम पाऊस, पर्यटकांनी केली गर्दीABP Majha Headlines : 06 PM : 26 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सOm Birla Elected as Speaker : आवाजी पद्धतीने मतदानात ओम बिर्लांचा विजय

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हिरवा निसर्ग हा भोवतीने, 'राऊतवाडी धबधब्याची सफर' करा मस्तीने; पाणी प्रवाही झाल्याने पर्यटकांची गर्दी
हिरवा निसर्ग हा भोवतीने, 'राऊतवाडी धबधब्याची सफर' करा मस्तीने; पाणी प्रवाही झाल्याने पर्यटकांची गर्दी
Vanchit Bahujan Aghadi : विधानसभा निवडणुकीत वंचित पूर्ण ताकदीने उतरणार; महायुती, महाविकास आघाडीचे पुन्हा टेन्शन वाढवणार?
विधानसभा निवडणुकीत वंचित पूर्ण ताकदीने उतरणार; महायुती, महाविकास आघाडीचे पुन्हा टेन्शन वाढवणार?
Pune News : अल्पवयीन मुलांचे नको ते प्रताप, पालकांनी उचलले मोठं पाऊल;  लेकरांच्या मागे लावले चक्क 'डिटेक्टिव्ह'
अल्पवयीन मुलांचे नको ते प्रताप, पालकांनी उचलले मोठं पाऊल; लेकरांच्या मागे लावले चक्क 'डिटेक्टिव्ह'
सेमीफायनलआधी सूर्याला मोठा धक्का, टी20 तं अव्वल स्थान गेलं! 
सेमीफायनलआधी सूर्याला मोठा धक्का, टी20 तं अव्वल स्थान गेलं! 
निवडणुकीला गालबोट, मतदान केंद्राबाहेर पैशाच्या पाकिटांसह एकास पकडलं; ठाकरेंचे कार्यकर्ते संतप्त
निवडणुकीला गालबोट, मतदान केंद्राबाहेर पैशाच्या पाकिटांसह एकास पकडलं; ठाकरेंचे कार्यकर्ते संतप्त
Wardha Crime News : अवैध दारू विक्रीसाठी चक्क देवघराचा वापर! जिल्ह्यात दारूबंदी असताना नवनवीन शक्कल
अवैध दारू विक्रीसाठी चक्क देवघराचा वापर! जिल्ह्यात दारूबंदी असताना नवनवीन शक्कल
Karan Johar Koffee With Karan : करण जोहरनं 'कॉफी विथ करण'च्या 9 व्या सिझनमधून घेतला ब्रेक; निर्णय घेताना केला सनसनाटी खुलासा!
करण जोहरनं 'कॉफी विथ करण'च्या 9 व्या सिझनमधून घेतला ब्रेक; निर्णय घेताना केला सनसनाटी खुलासा!
IND vs ENG : इंग्लंडचा 'हा' गोलंदाज ठरतोय डोकेदुखी, 2022 सेमीफायनलमध्ये विराट-रोहित-हार्दिकला केलेय बाद 
IND vs ENG : इंग्लंडचा 'हा' गोलंदाज ठरतोय डोकेदुखी, 2022 सेमीफायनलमध्ये विराट-रोहित-हार्दिकला केलेय बाद 
Embed widget