एक्स्प्लोर

DC Vs MI IPL 2025: दिल्ली धावचीत

DC Vs MI IPL 2025: काल झालेल्या दोन राजधानी मधील लढतीत आर्थिक राजधानीने राजकीय राजधानीला १९ व्या षटकात धावचीत करून रोमहर्षक विजय पदरात पाडून घेतला...काल झालेला पराभव हा या स्पर्धेतील दिल्ली संघाचा पहिला पराभव...आजच्या सामन्यात काही नाट्यमय घडामोडी घडल्या..१३ वे षटक चालू असताना मुबई संघाच्या तंबूत पारस म्हांबरे,रोहित शर्मा आणि जय वर्धने यांच्यात चर्चा चालू होते...माजी कर्णधार रोहित शर्मा जयवर्धने यांना लेग स्पिनर करण शर्मा याला गोलंदाजी ला आणायचा सल्ला देतो...जयवर्धने हा सल्ला मानतात...आणि पुढच्याच षटकात करण शर्मा स्टब ची विकेट काढतो....त्यानंतर पुढील षटकात राहुल ची विकेट काढतो..त्यानंतर १९ वे षटक चालू असताना सलग दोन  चौकार वसूल करणारा आशुतोष २ धावांच्या मोहात धावचीत होतो...नंतर पुढील चेंडूवर कुलदीप धावचीत होतो..आणि त्यानंतर मोहित शर्मा धावचीत होतो ....सलग तीन चेंडूवर धावचीत होण्याची बहुदा ही पहिलीच वेळ ...विजयी मार्गावर चाललेली राजधानी मुंबई च्या अचूक चेंडू फेकीमुळे धावचीत होते आणि पहिल्या पराभवाला सामोरे जाते...

नाणेफेक जिंकून दिल्ली संघाने प्रथम क्षेत्र रक्षण स्वीकारले आणि मुंबई संघाला प्रथम फलंदाजीस आमंत्रण दिले..मुंबई संघाने आक्रमक सुरुवात केली..रोहित शर्मा चांगल्या सुरुवाती नंतर स्वीप मारण्याच्या प्रयत्नात पायचीत झाला..त्यानंतर सूर्यकुमार आणि रिकल्टन यांच्यात ६० धावांची आणि नंतर तिलक आणि नमन यांच्या मध्ये ६२ धावांची भागीदारी झाली.. आज तिलक पुन्हा एकदा उत्तम खेळी करून गेला त्याच्या ५९ धावांच्या खेळीत त्याने ३ षटकार मारले..त्याला नमन ने १७ चेंडूत ३८ धावा काढून साथ दिली..मुंबई संघाने आज एकूण १० षटकार मारले आणि धावसंख्या २०० पार नेली...२०६ धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या दिल्ली संघाला पहिल्याच चेंडूवर धक्का बसला...पण नंतर आलेल्या करुण नायर ने खूप दिवसांनी येऊन सुद्धा मुंबई च्या गोलंदाजांना कोणतीही करुणा दाखवली नाही...आज त्याने त्याचा दर्जा सिद्ध केला...आल्या आल्या त्याने जमिनी लगत काही उत्तम ड्राईव्ह मारले...आणि नंतर पावर प्लेचा शेवटचा षटक घेऊन येणाऱ्या बुमरावर त्याने तुफानी हल्ला चढविला...त्याच्या एका चेंडूवर जो लेंथ बॉल होता त्यावर त्याने पिक अप चा फटका खेळून षटकार वसूल केला..त्यानंतर बॅकवर्ड पॉईंट वर एक चौकार ...आणि एका लोफ्टेड ऑफ ड्राईव्ह  वर  पुन्हा एक षटकार वसूल करून आपल्यामधील क्रिकेट अजून जिवंत आहे हे दाखविले...त्याचे तंत्र उत्तम असल्यामुळे आणि भरपूर देशांतर्गत क्रिकेट खेळल्या मुळे आज सुद्धा तो सराईतपणे खेळला...४० चेंडूत ८९ धावांची भागीदारी करताना त्याने अभिषेक पोरेल सोबत ११९ धावांची भागीदारी केली... इथ पर्यंत सामना दिल्ली संघाच्या बाजूने होता.... करुण नायर ज्या कुशलतेने खेळत होता तेव्हा त्याला बाद करण्यासाठी एक ड्रिम डिलिव्हरी ची गरज होती...आणि तो चेंडू सॅटनर ने टाकला...उजव्या यष्टीचा बाहेर जाणाऱ्या चेंडूवर करुण चकला आणि त्याचा त्रिफळा उध्वस्त झाला...त्याच्या नंतर दिल्ली संघाने हातात आलेला विजय मुबई संघाच्या पदरात टाकला...शेवटच्या ३ षटकात ३९ धावांची गरज असताना आशुतोष १४ चेंडूत १७ धावा काढून खेळत होता. पण १९ व्या षटकात विल जॅक च्या एका अफलातून चेंडूफेकीवर तो धावबाद  झाला आणि सामना दिल्ली संघाच्या हातून निसटला...आज सुसाट निघालेल्या राजधानीला ब्रेक लावून मुंबई संघाने आपले आव्हानं कायम राखले..सामानवीरचा बहुमान हा कर्ण शर्मा याला दिला गेला.स्पर्धेच्या मध्यावर सगळ्याच लेग स्पिनर ना गवसलेला सूर स्पर्धेत चुरस निर्माण करेल . मुंबई संघाच्या  तंबूतील वातावरणामुळे ते यापुढे चांगली मजल मारतील यात शंका नाही....

संबंधित बातमी:

IPL 2025, RR vs RCB : शाही सामन्यात बंगळुरुचा शाही विजय

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mohammad Shami : रणजीसाठी फिट वनडेसाठी का नाही? मोहम्मद शमीच्या प्रश्नावर अजित आगरकरकडून थेट उत्तर, म्हणाला... 
रणजीसाठी फिट वनडेसाठी का नाही? मोहम्मद शमीच्या प्रश्नावर अजित आगरकरकडून थेट उत्तर, म्हणाला... 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2025 |शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2025 |शुक्रवार
Yulia Aslamova : सोशल मीडियावर बंगळुरुतील रशियन महिला व्हायरल, कामवाली बाईला दिला 45 हजारांचा पगार
सोशल मीडियावर बंगळुरुतील रशियन महिला व्हायरल, कामवाली बाईला दिला 45 हजारांचा पगार
IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया वनडे सामने मोफत कसे पाहायचे? अतिरिक्त खर्च न करता पाहा लाईव्ह स्ट्रीमिंग, जाणून घ्या
भारत-ऑस्ट्रेलिया वनडे सामने मोफत कसे पाहायचे? अतिरिक्त खर्च न करता पाहा लाईव्ह स्ट्रीमिंग, जाणून घ्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Speech : 1 मिनिटांत Shivaji Park गाजवलं; मनसेच्या Deepotsav त उद्धव ठाकरेंचं भाषण
Raj Thackeray MNS Shivaji Park Deepotsav :Uddhav Thackeray यांच्या च्या हस्ते मनसेच्या दीपोत्सवाचं उद्घाटन
Thackeray Unity : 'ही सगळी भावंडं एका गाडीत', Raj ठाकरे- Uddhav ठाकरे एकत्रित प्रवास
MNS Shivaji Park Deepotsav : दीपोत्सवानिमित्त ठाकरे बंधू पुन्हा एकत्र, राजकीय समीकरणं बदलणार?
Nashik Demolition Drive: 'दत्त मंदिर बुलडोझरने पाडले', पुरोहित संघाचा गंभीर आरोप; Nashik मध्ये तणाव

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mohammad Shami : रणजीसाठी फिट वनडेसाठी का नाही? मोहम्मद शमीच्या प्रश्नावर अजित आगरकरकडून थेट उत्तर, म्हणाला... 
रणजीसाठी फिट वनडेसाठी का नाही? मोहम्मद शमीच्या प्रश्नावर अजित आगरकरकडून थेट उत्तर, म्हणाला... 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2025 |शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2025 |शुक्रवार
Yulia Aslamova : सोशल मीडियावर बंगळुरुतील रशियन महिला व्हायरल, कामवाली बाईला दिला 45 हजारांचा पगार
सोशल मीडियावर बंगळुरुतील रशियन महिला व्हायरल, कामवाली बाईला दिला 45 हजारांचा पगार
IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया वनडे सामने मोफत कसे पाहायचे? अतिरिक्त खर्च न करता पाहा लाईव्ह स्ट्रीमिंग, जाणून घ्या
भारत-ऑस्ट्रेलिया वनडे सामने मोफत कसे पाहायचे? अतिरिक्त खर्च न करता पाहा लाईव्ह स्ट्रीमिंग, जाणून घ्या
Shivajirao Kardile: तब्येत नाजूक, पण लोकांमध्ये मिसळण्याची आस शेवटपर्यंत कायम; निधनाच्या आदल्या दिवशीचा शिवाजीराव कर्डिलेंचा अंतःकरणाला स्पर्श करणारा क्षण
तब्येत नाजूक, पण लोकांमध्ये मिसळण्याची आस शेवटपर्यंत कायम; निधनाच्या आदल्या दिवशीचा शिवाजीराव कर्डिलेंचा अंतःकरणाला स्पर्श करणारा क्षण
Digital Arrest : वृद्ध दाम्पत्याला डिजिटल अरेस्ट, 58 कोटींना लुटलं; सायबर सेलचे यशस्वी यादव काय म्हणाले?
वृद्ध दाम्पत्याला डिजिटल अरेस्ट, 58 कोटींना लुटलं; सायबर सेलचे यशस्वी यादव काय म्हणाले?
Ola Shakti Electric battery: ओला इलेक्ट्रिकची एक घोषणा अन् शेअरमध्ये जोरदार तेजी, ओला शक्ती लाँच, बॅटरीवर एसी, फ्रीज सुरु राहणार
ओला इलेक्ट्रिकचं नव्या क्षेत्रात पदार्पण, ओला शक्तीबाबत कंपनीची मोठी घोषणा, स्टॉकमध्ये तेजी सुरु
Gold Silver Rate : सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा जोरदार तेजी येणार,चांदी सव्वा दोन लाखांचा टप्पा पार करण्याची शक्यता, तज्ज्ञांचा अंदाज
सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा जोरदार तेजी,चांदी सव्वा दोन लाखांचा टप्पा पार करण्याची शक्यता
Embed widget