एक्स्प्लोर
चालू वर्तमानकाळ (44) : माणसं मरणार असतात...!
पती-पत्नी वा प्रियकर-प्रेयसी यांचं नातं अधिक अपेक्षांचं. अशा नात्यांमध्ये लैंगिक संबंध असतात/असू शकतात. तो एक अभाव वैवाहिक नात्यात जोडीदाराच्या मृत्यूने निर्माण होतो. इतर गोष्टींसाठी पर्याय सापडतात, स्वीकारले जातात, सुचवले जातात; काही ना काही व्यवस्था होतात, पण समाजातले लैंगिक निर्बंध समाजागणिक निराळे असतात. खासकरुन स्त्रियांबाबत तर ते टोकाचे कठोर असतात. त्याचा उच्चारही त्यांनी करणं घृणास्पद मानलं जातं.

माणसं मरणार असतात, हे माहित असतं; तरीही आपली माणसं अमर असल्यासारखंच वागत असतो आपण. ती कधीच मरणार नाही, अशीकशी मरतील, मरुच कशी शकतील–असे लहान मुलांसारखे विचार मनात येतात.
जवळच्या माणसांचा मृत्यू किती असुरक्षितता निर्माण करतो मनात की, कल्पनाही करवत नाही त्या गोष्टीची.
काहीवेळा माणसं आजारी असतात, कधी कोणताही आजार नसताना केवळ वृद्धापकाळाने शरीर जर्जर होऊन अंथरुणाला खिळलेली असतात… तेव्हा पूर्वकल्पना आलेली असते. त्या व्यक्तींना व आसपासच्यांनाही. जे समाधानानं आयुष्य जगलेले असतात, ते हे चांगुलपणानं स्वीकारतात. ज्याचं जगणं असमाधानी असतं, त्यांना रुखरुख लागून राहिलेली असते अनेक गोष्टींची व जगण्याची वासना तीव्र होत जाते. काहींना आपल्या मागे राहणार्या माणसांची काळजी पोखरत असते… खासकरून जे त्यांच्यावर अवलंबून असतात, त्यांची काळजी. अगदी लहान मुलं, परावलंबी असतील अशाच अपंग व्यक्ती (कारण सारे अपंग परावलंबी नसतात) आणि वृद्ध यांच्याबाबतच अशी काळजी वाटावी खरंतर; कारण ते खरेखुरेच परावलंबी असतात. बाकीच्यांनी स्वावलंबी असायलाच हवं. तशी प्रत्येकानं स्वावलंबी बनण्याची तरतूद स्वतःसाठी व इतरांसाठी सर्वांनी केलीच पाहिजे.
अवलंबन कुठे कुठे असतं? आर्थिक अवलंबन सगळ्यात अवघड. पैशांचं सोंग आणता येत नाही असं आपण म्हणतोच. त्या खालोखाल भावनिक, मग काही मोजक्या जणांबाबतच वैचारिकही. बाकी अवलंबनं ही अवलंबनं नसतात तर सवयी असतात.
घरात कुणीतरी वावरणारं होतं आणि आता नाही. ती व्यक्ती अमुक कामं करत होती, ती कामं आता अडणार. दुसर्या कुणी केली तरी तशी होणार नाहीत. घरातली वा घराबाहेरची वा कार्यालयीन कामं.
नियमित संवाद होता, फोन होत, पत्रं लिहिली जात. सल्ले देणं-घेणं, चांगल्या-वाईट गोष्टी शेअर करणं, दिलासा-प्रोत्साहन-पाठबळ इत्यादी देणं, यासाठी ‘तसं समजून घेण्याची क्षमता असणारी’ दुसरी व्यक्ती नाही… हा अभाव जाणवतो.
रक्ताच्या या नात्यांपाठोपाठ कायद्याची नाती येतात. लग्नामुळे निर्माण झालेली नाती. नवर्याच्या वा बायकोच्या परिवारातील अनेक माणसं जोडली जातात. काहींशी जिव्हाळ्याचं नातं जुळतं, काहींशी आपुलकी, काही मत्सर-द्वेष-संशय व संतापाचीही नाती. इथं जबाबदार्या लादलेल्या असतात बरेचदा. काहीजण त्या झटकतात, काहीजण मनापासून पार पाडतात. मृत्यूशय्येवरची माणसं अशावेळी बदलत जाताना दिसतात. खासकरुन सासवांना अशावेळी सुना चांगल्या वागणार्या असल्या तर उपरती होते, पस्तावा होतो. असा एक सुरेख प्रसंग मे. पु. रेगे यांनी आपल्या आई व पत्नीच्या नात्यातला रंगवला आहे एका लेखात.
पती-पत्नी वा प्रियकर-प्रेयसी यांचं नातं अधिक अपेक्षांचं. अशा नात्यांमध्ये लैंगिक संबंध असतात/असू शकतात. तो एक अभाव वैवाहिक नात्यात जोडीदाराच्या मृत्यूने निर्माण होतो. इतर गोष्टींसाठी पर्याय सापडतात, स्वीकारले जातात, सुचवले जातात; काही ना काही व्यवस्था होतात, पण समाजातले लैंगिक निर्बंध समाजागणिक निराळे असतात. खासकरुन स्त्रियांबाबत तर ते टोकाचे कठोर असतात. त्याचा उच्चारही त्यांनी करणं घृणास्पद मानलं जातं.
व्यावहारिक सुविधा गमावणं इथपासून ते लैंगिक, शारीरिक, भावनिक, वैचारिक सोबत गमावणं इथपर्यंत हा प्रवास असू शकतो.
यावर काही माणसं उत्तरं शोधतात, अनेकदा ती वरवरची असतात आणि त्यामुळे असमाधान, तुलना, वाद, अपेक्षाभंग असं सगळं होत राहतं. खरी उत्तरं वेगळीच आणि वेगळीकडेच असतात. मृत्यू आपण कसा स्वीकारतो आणि पर्यायांकडे पर्याय म्हणून न बघता स्वतंत्र न्याय देतो का, यावर ते अवलंबून असतं.
जवळच्या माणसांच्या मृत्यूनंतर रक्ताची नाती व कायद्याची नाती असलेल्या व्यक्तींनी ‘कसं वागायचं’ आणि ‘कसं वागायचं नाही’ याचे काही निश्चित संकेत प्रत्येक समाजात आहेत. तो सर्व विचार अत्यंत बारकाईने केलेला आहे, हे ध्यानात येतं. अन्न शिजवणं, खाणं, कपडे, दैनंदिन कामकाज, बोलण्याचे विषय, प्रवास इथपासून ते कुटुंबातील इतर व्यक्तींचे लैंगिक संबंध इथपर्यंत हे निर्बंध असतात. काळानुसार यात सुयोग्य बदल करण्याऐवजी आहे त्या गोष्टी तशाच ठेवून त्याचा ‘शॉर्टकट’ शोधला गेला आणि त्यामुळे यातल्या अनेक गोष्टी निरर्थकच नव्हे, तर हास्यास्पदही होऊन बसल्या. टीकेचा आणि टिंगलीचाही विषय बनल्या. नातेसंबंधांचं बदलतं स्वरुप, त्यातले नवे गुंते, कुटुंब व लग्नसंस्थेतील बदल यामुळे या गोंधळात अजूनच भर पडली.
जी जोडपी लग्न करता लिव्ह इन राहतात त्यांनी अशा प्रसंगी काय करायचं? जे एकत्र राहत नव्हते, पण ज्यांचे प्रेमसंबंध होते, त्यांनी काय करायचं? याबाबत अर्थातच काही संकेत नाहीत. कारण हे संबंध, निनावी नाती, मैत्र्या यांना मुळी समाजात मान्यताच नाही. त्यामुळे ज्या व्यक्तींच्या आयुष्यात अशी नाती असतात, त्यांच्या मृत्यूनंतर एक मोठं ‘नाट्य’ निर्माण झालेलं दिसतं.
अनेक कथा, कादंबर्या, नाटकं यांनी हे नाट्य वापरलं आहे. एखाद्या पुरुषाच्या मृत्यूनंतर त्याचे प्रेमसंबंध घरातल्यांना समजतात आणि मग नाट्य फुलतं. मृत्यूच्या पार्श्वभूमीवरचं प्रेम, त्यातल्या नैतिक-अनैतिकतेच्या चर्चा, त्यातले आरोप-प्रत्यारोप आणि मृत व्यक्तीचं वेगळ्या माणसांच्या वेगळ्या दृष्टिकोणातून घडणारं दर्शन. मेलेली माणसं फार वेगळी दिसू लागतात, वेगळी कळू लागतात.
सुषमा देशपांडेनं एक नाटक लिहिलंय. प्रेयसीच्या घरी एका गृहस्थाचा आकस्मिक मृत्यू होतो. नंतर त्याची बायको आपल्या मुलाला तिकडे पाठवते की, जिथं मृत्यू घडलाय तिथं एक दिवा लावून ये!
प्रतिमा जोशी यांच्या एका कथेत वेश्येच्या खोलीत मरुन गेलेल्या वृद्ध गृहस्थाला त्याची मुलं घेऊन जातात… याचं एक ओशाळं वर्णन आहे. पण त्याला त्या वेश्येचा जुन्या व्यक्तिगत अनुभवांच्या सूड-संतापाची जोड असल्याने संदर्भ फार वेगळे बनतात.
जी.ए. कुलकर्णींच्या ‘प्रदक्षिणा’ या कथेत मृत्यूनंतर सापडलेली पत्रं आणि इतर माणसांच्या आठवणी यातून एक निराळाच माणूस समोर येतो, जो त्याच्या पत्नीला आयुष्यभर दिसलाच नव्हता आणि एक फसवणुकीची भावना मनात निर्माण होते.
काही जागी अशी नाती कुटुंबीयांना आधीच माहीत असतात, तरी त्यातलं नाट्य कमी होतं असं नाही.
मृत्यूची वार्ता कळल्यानंतरच्या अशा व्यक्तींच्या प्रतिक्रिया, घरी वा स्मशानात येऊन त्यांनी केलेला आक्रोश… हे सारं एका विचित्र कणवेनं, हे धाडस या माणसांनी केलं कसं या विचाराच्या भयमिश्रित दडपणानं, अनैतिक वागलात तर मग भोगा आता–अशा कुत्सित हेटाळणीच्या हास्यानं, टिंगलीनं पाहिलं जातं. त्याचवेळी कुटुंबीयांकडे ‘तुम्हाला तुमचा माणूस ताब्यात ठेवता आला नाही, तुम्ही त्यात कमी पडलात’ अशा तुच्छतेनं पाहिलं जातं आणि त्यामुळे कुटुंबातली माणसं ओशाळी होतात. संतापतात.
प्रवीण बर्दापूरकर यांनी ‘आई’ या विषयावरचं एक पुस्तक संपादित केलंय. त्यात स्वतः एक लेख आईवर लिहिला आहे. त्यात एक असा अनुभव आहे. वडलांचा मृत्यू झाल्यावर काही दिवसांनी एक बाई अंधार पडल्यावर चोरट्याने या आईला भेटायला येते व पहाटे लवकर निघून जाते. दिव्याच्या उजेडात रात्रभर दोघी कुजबुजत्या आवाजात बोलत बसलेल्या असतात. तो संवाद अर्थातच त्या मृत व्यक्तीविषयी असणार, हे गृहित आहे. ते न पाहिलेलं दृश्य आणि तो न ऐकलेला संवाद मला अनेकदा आठवतो. किती विलक्षण समजूत असेल त्या दोघींमध्ये हे मनात येतं.
एका मैत्रिणीच्या सासर्यांनी एक बाई ठेवलेली होती. त्यांच्या वाड्यावरच ती एका खोलीत राही. स्वतंत्र स्वयंपाक करुन जेवे. ते वारले, तेव्हा आता या वयात कुठं जायचं असा पेच तिला पडला. मैत्रीण सुस्वभावी आहे, तिनं ते नातं स्वीकारलं आणि तुम्ही शेवटपर्यंत इथंच राहणार आहात; ते नसले तरी ते असताना तुम्हाला ज्या सुविधा मिळत होत्या त्या सर्व मिळतील असं सांगितलं. आणि हा शब्द ती आजही पाळते आहे. ‘यात तिनेही सासूवर अन्याय केला’, असं एक मत कानी पडलं. ‘ही नसती ब्याद घरातून हाकलावी आणि अनैतिकतेला थारा देऊ नये’ असं दुसरं मत. अशीच अजून काही मतं. सासर्यांनी मृत्यूपत्र केलेलं नव्हतं. नवरा तिच्या ऐकण्यात होता. अशावेळी तिनं एक बाई म्हणून त्या बाईकडे पाहिलं, माणूस म्हणून पाहिलं आणि सासूकडे जसं लक्ष दिलं, तसंच या बाईंकडेही लक्ष देते आहे.
‘अन्या ते अनन्या’ या आत्मचरित्रात प्रभा खेतान यांनी आपला अनुभव पिळवटून मांडलेला आहे. ‘प्रेयसी’ असं काही नातं आपल्याकडे मानलं जात नाहीच. त्यातही ही विवाहित पुरुषाची प्रेयसी. त्याच्या कुटुंबाच्या जबाबदार्या घेते, गरजा ती भागवते, ती सुशिक्षित आहे, स्वतंत्र अर्थार्जन करणारी आहे, त्यांचे संबंध जगजाहीर आहेत; पण डॉ. सराफ यांच्या मृत्यूनंतरही समाजाकडून मिळणारी वागणूक त्यांना दुखावून जाते. कुटुंबीयांना मिळणारं सांत्वनही आपल्याला मिळत नाही असं वाटतं. ही मजेशीर तेढ आहे वैचारिक गोंधळाची.
कुणाच्याही सांत्वनाने दु:ख कमी होणार नसतं.
अस्सल दु:खाला समाजमान्यतेच्या शिक्क्याची गरज नसते.
आपलं सुख जसं आपल्यातच असतं, तसं आपलं दु:खही आपल्यातच असतं. त्याचा स्वीकार शांतपणे करुन त्याच्यासह जगता आलं पाहिजे… हे समजून घ्यायला वेळ लागतोच.
संबंधित ब्लॉग :
चालू वर्तमानकाळ (४३). रताळे, केळे, आंबा, खीर वगैरे
चालू वर्तमानकाळ (42) : कॅज्युअल सेक्सची पहिली गोष्ट
चालू वर्तमानकाळ (४१) : वय स्वीकारण्यातली सहजता चालू वर्तमानकाळ : मनातल्या मनात मी
चालू वर्तमानकाळ (39) : लेदर करन्सीच्या पायघड्या
चालू वर्तमानकाळ : 38. आमचं काड्यामुड्यांचं घर रं या सरकारा...
चालू वर्तमानकाळ : 37. वंचितांच्या यशाची शिखरं
चालू वर्तमानकाळ : 36. अजून कशा- कशासाठी कोर्टात जायचं?
चालू वर्तमानकाळ 35. त्या पळाल्या कशासाठी?
चालू वर्तमानकाळ 34. बघे, सेल्फीटाके आणि पायकाढे
चालू वर्तमानकाळ : 33. अभ्यासकाचे जाणे!
चालू वर्तमानकाळ : 32 आमचा काय संबंध!
चालू वर्तमानकाळ : (31) आमचा काय संबंध!
चालू वर्तमानकाळ (31) : शेवटचा दिस गोड व्हावा
चालू वर्तमानकाळ (30) : बाई, आई, स्तनपान, चर्चा... वगैरे
चालू वर्तमानकाळ (29) : बरी या (अकलेच्या) दुष्काळे पीडा केली!
चालू वर्तमानकाळ (28) : सुंदर, सजलेल्या, तरुण बाहुल्या
चालू वर्तमानकाळ (27) : दुसरी बाजू… तिसरी, चौथी, पाचवी बाजू वगैरे चालू वर्तमानकाळ (26) : द आदिवासी विल नॉट डान् चालू वर्तमानकाळ : 25 : कौमार्य चाचणीचा खेळ व पुरुषार्थ चाचणीचं दिव्यचालू वर्तमानकाळ (24) : पॅनिक बटण आणि इ–संवाद वगैरे
चालू वर्तमानकाळ (23) : पितात सारे गोड हिवाळा? चालू वर्तमानकाळ २२. लहानग्या सेक्स डॉल हव्यात की नकोत? चालू वर्तमानकाळ (21) : आनंदाची गोष्ट चालू वर्तमानकाळ (20) : एका वर्षात अनेक वर्षं चालू वर्तमानकाळ (19) : रोशनी रोशनाई में डूबी न हो… चालू वर्तमानकाळ (18) : मुखवटे घातलेल्या बातम्या चालू वर्तमानकाळ (17) : पशुपक्ष्यांत ऐसे नाही… चालू वर्तमानकाळ (16) : असं क्रौर्य कुणाच्याही वाट्याला येऊ नये! चालू वर्तमानकाळ (15) : दीपिकाचं नाक, रणवीरचे पाय आणि भन्साळीचं डोकं चालू वर्तमानकाळ (१४) : दुटप्पीपणाचं ‘न्यूड’ दर्शन चालू वर्तमानकाळ (13) : ‘रामायण’ आणि ‘सुहागरात’ व ‘रमणी रहस्य’ चालू वर्तमानकाळ (१२). लोभस : एक गाव – काही माणसं चालू वर्तमानकाळ (11) : सूट घातलेली बाई आणि वस्तुरुप नग्न नर चालू वर्तमानकाळ (10) दंशकाल : गूढ, विज्ञान आणि तत्त्वज्ञानाची सांगड चालू वर्तमानकाळ (९) : बाईच्या थंडगार मांसाचे अजून काही तुकडे चालू वर्तमानकाळ (8) : बिनमहत्त्वाचे (?) प्रश्न आणि त्यांची हिंस्र उत्तरं चालू वर्तमानकाळ (7) : अरुण साधू : आपुलकीच्या उबदार अस्तराचं नातं चालू वर्तमानकाळ : 6. उद्ध्वस्त अंगणवाड्या चालू वर्तमानकाळ (5) : अनेक ‘कुत्र्या’ आहेत या देशात… चालू वर्तमानकाळ (4) : जन पळभर म्हणतील… चालू वर्तमानकाळ (3) : आईचा घो आणि बापाची पत चालू वर्तमानकाळ (२) – अब्रू : बाईची, गायीची आणि पृथ्वीची! चालू वर्तमानकाळ (1) : स्वातंत्र्याचं सावळं प्रतिबिंबView More
Advertisement
Advertisement

























