एक्स्प्लोर

BLOG : नकारात्मकतेची होळी, उत्साहाचा रंग!

अखेर एका वर्षाच्या ब्रेकनंतर चेहरे उत्साहाने रंगले आणि मनंही ऊर्जेने भरली. गेले दोन दिवस म्हणजे होळी आणि धुळवडीच्या दिवशी वातावरणातली जान आणि सणांची शान भरभरुन अनुभवायला मिळाली. ती प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी मी काल आणि आज गिरगावच्या रस्त्यांवर फेरफटका मारला. त्या वेळी लोकांच्या मनात डोकावून पाहण्याचाही प्रयत्न होता. कालच्या होळीपासूनच त्या एनर्जिटिक वातावरणाची कल्पना आली. अगदी होळीच्या तयारीपासूनच मंडळी कामाला लागली होती. लहानगे, तरुण यात अर्थातच आघाडीवर होते. पण, त्याच वेळी ज्येष्ठांचाही उत्साह वाखाणण्यासारखा होता. कोरोना काळामुळे गेल्या दोन वर्षांमध्ये आपण सर्वात जास्त बंधनं कुणाला घातली असतील तर ती ज्येष्ठ नागरिकांना. त्यांच्या आरोग्याचा प्रश्न खरोखरच जिकिरीचा होता. त्या ज्येष्ठांच्या चेहऱ्यावरही समाधानाचं हसू होतं. सुस्कारा होता. सुटकेचा नि:श्वास होता. अगदी काठी टेकत टेकत जिने उतरणारी आजोबा मंडळी सण साजरा करण्याच्या हुरुपाचा, उत्साहाचा हात धरत पायऱ्या चढत आणि उतरत होते. गिरगावात काही ठिकाणी चाळींचे टॉवर होण्याच्या मार्गावर आहेत. अशा ठिकाणी एक वेगळाच इमोशनल टच या सणामध्ये होता. म्हणजे यावेळची चाळीतली ही कदाचित शेवटची होळी. पुढच्या वर्षी या काळात चाळीचा पुनर्विकास बहुदा सुरु झालेला असेल, त्यामुळे आपण कुठेतरी दुसऱ्या तात्पुरत्या निवाऱ्यात असणार. त्यामुळे ही होळी पेटल्यानंतरच्या उजेडामध्ये या सर्वांच्या डोळ्यातलं अगदी लख्ख दिसत होतं. गेल्या अनेक वर्षांमधल्या सणांच्या आठवणी त्यांच्या डोळ्यात फेर धरुन नाचताना पाहायला मिळाल्या. त्याच वेळी चाळीतील सणांची मजा, आपलेपणा टॉवरच्या आलिशान घरातही आपल्याला तशीच अनुभवायचीय, त्यासाठी आपण साऱ्यांनी असंच एकत्र यायचंय, असा निर्धारही त्यांच्या डोळ्यात साठलेला.

चाळीतले सण आणि उत्सव याबद्दल लिहायला गेलो तर शब्द आणि तासही अपुरे पडतील. पण, गेल्या दोन वर्षांमधली आपण साऱ्यांनीच अनुभवलेली भयंकर मनोवस्था, खास करुन चाळीच्या वातावरणात जिथे घराला बिलगून घरं आणि मनाला बिलगलेली मनं राहत असतात. तिथेही कोरोना काळामुळे काहीसा थंडपणा आला होता. एरवी आपल्या सर्वांनाच माहिती आहे, चाळीतला जल्लोष काही औरच असतो. आपलं मूळ घर सोडून गेलेले काही जण खास या सणांची मजा घेण्यासाठी, तर काही आपल्या पुढच्या पिढीलाही सणांच्या या गोडीची मजा कळावी, चाळीतला ओलावा समजावा म्हणून खास या दिवसांमध्ये इथे आपल्या कुटुंबासकट येतात. रिले शर्यतीत जशी बॅटन दुसऱ्या धावपटूच्या हातात दिली जाते, त्याचप्रमाणे सणसंस्कृती जोपासण्याची ही बॅटन पुढच्या पिढीकडे सोपवणं किंवा ती सोपवण्यासाठी त्यांना मानसिकदृष्ट्या तयार करणं किती महत्त्वाचं आहे, हे यानिमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झालं. माझे असे काही मित्र असं नियमित करतात. माझी खात्री आहे, आपल्यापैकी अनेकांचा हा अनुभव असेल.

होळीसोबत इथली धुळवडही खास असते. इथे फक्त माणसांचे चेहरेच नव्हे तर चाळींचे जिने, घरं, दरवाजे सारं काही रंगत असतं. चौकाचौकात रंगांची मुक्त उधळण होत असते. अर्थात गेल्या काही वर्षांमध्ये नैसर्गिक रंगांवर देण्यात आलेला भर. पर्यावरण तसंच आपल्या आरोग्याच्या प्रश्नामुळे होळी खेळताना हे भान पाळलं जातं. अनेक ठिकाणी होळी खेळून झाल्यावर साऱ्यांनी त्या परिसराची साफसफाई, स्वच्छता मोहीमही हाती घेतली. हे चित्र सुखावणारं होतं. हे सण आपल्याला एकत्र आणतात, त्यावेळी ते आनंद तर देतातच शिवाय सामाजिक जाणीवही कशी अधोरेखित करतात, याचं हे उत्तम उदाहरण.

या दोन दिवसांच्या निमित्ताने चेहऱ्यावर एक खुलेपणा जाणवत होता. मोकळेपणा होता, मुक्त विहार करण्याचा आनंद होता. कोरोनामुळे बंधनातलं आयुष्य आपण जगत होतो. सणांना, उत्सवांना बंधनं होती, ती साजरी करण्याच्या पद्धतीलाही नियमांची चौकट होती. साहजिकच कुठेतरी घुसमट होत होती, कदाचित थोडी निगेटिव्हिटीही होती. यामुळे ते खुलेपण साऱ्यानाच पुन्हा हवं होतं, ते मिळालं. ऑनलाईन शिक्षण घेणारा विद्यार्थी वर्ग, वर्क फ्रॉम होम करणारी युवा तसंच मध्यम वयीन पिढी आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे आरोग्याची सर्वात धास्ती असल्याने जबरदस्तीने घरात बसावं लागलेले सीनीयर सिटिझन्स. साऱ्यांसाठीच हा सण आपल्याला भावनांना, मोकळेपणाला वाव देणारा मंच ठरला. दोन वर्षांमधली मरगळ, ते साचलेपण मागे सारत आपण उत्साहाच्या लाटेवर स्वार होऊन पुढे जाऊया. त्याच वेळी कोरोनासारख्या आरोग्याच्या शत्रुला चारीमुंड्या चीत करण्यासाठी योग्य ती खबरदारीही घेऊया. मग, ती स्वच्छतेच्या रुपात असेल वा लसीचे शिल्लक डोस घेण्याच्या माध्यमातून असेल. हे नक्की करायचंय. कारण, आपल्या आयुष्यातला चैतन्याचा रंग असाच बहरत जाण्यासाठी ते गरजेचं आहे.

अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाच्या बेड्या; खासदारसोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाच्या बेड्या; खासदारसोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
आयशरच्या धडकेत 15 जण बसलेली वडाप टॅक्सी 20 फुट हवेत उडाली अन् पुढे उभ्या एसटीवर आदळली; सीटाही बाहेर फेकल्या, प्रत्यक्षदर्शीने सांगितली भयावह कहाणी
आयशरच्या धडकेत 15 जण बसलेली वडाप टॅक्सी 20 फुट हवेत उडाली अन् पुढे उभ्या एसटीवर आदळली; सीटाही बाहेर फेकल्या, प्रत्यक्षदर्शीने सांगितली भयावह कहाणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Attacked Update : सैफला रुग्णालयात नेणाऱ्या ऑटोवाल्याने सांगितला घटनेचा थरारSaif Ali Khan Attcked Update : सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी पोलिसांकडून 35 पथकांची स्थापना, 20 लोकल तर 15 क्राईम ब्रांच पोलिसांची पथकंSaif Ali Khan Doctors : फक्त 2MM ने वाचला ⁠सैफ अली खान! हल्ल्याबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?ABP Majha Marathi News Headlines 4PM TOP Headlines 4 PM 17 January 2025

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाच्या बेड्या; खासदारसोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाच्या बेड्या; खासदारसोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
आयशरच्या धडकेत 15 जण बसलेली वडाप टॅक्सी 20 फुट हवेत उडाली अन् पुढे उभ्या एसटीवर आदळली; सीटाही बाहेर फेकल्या, प्रत्यक्षदर्शीने सांगितली भयावह कहाणी
आयशरच्या धडकेत 15 जण बसलेली वडाप टॅक्सी 20 फुट हवेत उडाली अन् पुढे उभ्या एसटीवर आदळली; सीटाही बाहेर फेकल्या, प्रत्यक्षदर्शीने सांगितली भयावह कहाणी
Santosh Deshmukh Case : CM फडणवीस-उज्ज्वल निकमांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांच्या भावाचं मोठं वक्तव्य; म्हणाले, लवकरच त्यांची...
CM फडणवीस-उज्ज्वल निकमांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांच्या भावाचं मोठं वक्तव्य; म्हणाले, लवकरच त्यांची...
नांदेडचा बीड करायचा नाही, मुंडे बंधु-भगिनींना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद नको; सकल मराठा समन्वयकाचा इशारा
नांदेडचा बीड करायचा नाही, मुंडे बंधु-भगिनींना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद नको; सकल मराठा समन्वयकाचा इशारा
Khel Ratna And Arjuna Awards : मनु भाकर, डी गुकेशसह चार खेलरत्न पुरस्काराने सन्मानित, स्वप्निल कुसाळेसह 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार प्रदान
मनु भाकर, डी गुकेशसह चार खेलरत्न पुरस्काराने सन्मानित, स्वप्निल कुसाळेसह 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार प्रदान
Ahilyanagar Crime :  नऊ वर्षीय चिमुकलीवर दबा धरून बसलेल्या बिबट्याचा हल्ला; वडिलांच्या डोळ्यादेखत चिमुरडीचा अंत
नऊ वर्षीय चिमुकलीवर दबा धरून बसलेल्या बिबट्याचा हल्ला; वडिलांच्या डोळ्यादेखत चिमुरडीचा अंत
Embed widget