एक्स्प्लोर

राजस्थानची इकॉनॉमी ट्रिप : उदयपूर

अरवलीच्या या पर्वतरांगांमध्ये पिछोला तलावाच्या जवळ महाराणा उदयसिंह शिकारीसाठी भटकत होते. त्याचवेळी या पहाडावर त्यांना एक साधू तपश्चर्या करताना दिसले. महाराणानी साधूचे आशीर्वाद घेतले. साधूने त्यांच्या चेहऱ्याकडे बघून सांगितलं की, "तुमचे वाईट दिवस सुरू होणार आहे. तुमची राजधानी चित्तोडगडावरुन तत्काळ इथे हलवा." राणा उदयसिंह यांनी ही गोष्ट मनावर घेऊन लगेचच चित्तोडहून आपली राजधानी उदयपूरला हलवली.

दिवसभरच्या प्रवासाने गाडीत बसल्या बसल्या डोळा लागला. पण अचानक लक्षात आलं की, आज तर भारत-न्यूझीलंड यांची सेमीफायनल सुरु आहे. पटकन हॉट स्टारवर मॅच लावली. 60 चेंडू 90 रन अशा फरकानं मॅच सुरु होती. जडेजा एका बाजूनं फटकेबाजी करत होता. पण दुसऱ्या बाजूला धोनीच्या बॅटला बॉल लागतही नव्हता. मी मॅच सुरु करताच मागच्या सीटवरचे, शेजारच्या सीटवरचे चार पाच जण माझ्या मोबाईलमध्ये डोकावले. त्यातला एक म्हणाला, "देखो भाई, आज तो धोनी का दिन है।" लगेच दुसरा म्हणाला, "आज धोनीने कुछ नही किया तो धोनी का करियर खतम!"

मी पटकन त्याच्याकडे बघितलं. चेहऱ्यावरुन तरी तो बेरोजगार वाटत होता. मॅच पुढे सरकत होती. प्रेशर वाढत होतं, तेवढ्यात जडेजा आऊट झाला. सामना आपल्या हातातून निसटत होता. काही वेळाने धोनीही बाद झाला. तिथेच आपण सामना हरलो आणि वर्ल्डकपमधून बाहेर पडलो, हे सगळ्यांनी मान्य करुन टाकलं. मोबाईल बंद करून मी ही खिडकीबाहेर डोकावलो. अरवलीच्या लहान मोठ्या हिरव्यागार टेकड्या, मधेच दिसणारे..अर्धे भरलेले पाण्याचे तलाव आणि संध्याकाळचा गार वारा सगळा थकवा दूर करत होता. साडे आठशे वर्ष मेवाडची राजधानी चित्तोडगड होती. पण नंतर ती याच हिरव्यागार टेकड्यांवर वसवण्यात आली. मेवाडची ही नवी राजधानी माझं स्वागत करत होती. 'वेलकम टू व्हेनिस ऑफ द इस्ट' अर्थात तलावांची नगरी उदयपूर!

राजस्थानची इकॉनॉमी ट्रिप : उदयपूर

उदयपूरमध्ये पोहोचलो. इथे ज्या हॉस्टेलमधे राहणार होतो, ते साधारण दीड ते दोन किमी वर होतं. रिक्षावाल्याला विचारलं, तर एकजण 150 रुपये म्हणाला, तर दुसरा थेट 200! शेवटी गूगल मॅपवर लोकेशन सेट करुन पायीच चालत जायचं ठरवलं. तसंही कोणतंही शहर पायी चालल्यावर जास्त आपलंसं वाटतं. रस्त्यातच मार्केट लागलं, चौकाचौकात कुल्फी, कचोरी, पाणी पुरीच्या गाड्या...अगदी गजबजलेलं शहर. गूगल मॅपचं एक बरं असतं, कुणालाही रस्ता विचारण्याची फार गरज पडत नाही. छोट्या-छोट्या गल्ल्यांमधून मी अर्ध्या तासात हॉस्टेलवर पोहोचलो.

तर आता अत्यंत महत्वाची गोष्ट. ट्रिपला आलो, की सामान्यपणे राहण्यावरच आपला निम्मा खर्च होतो. पण आता प्रत्येक शहरात विशेषत: सोलो ट्रॅव्हलर्ससाठी हॉस्टेल डॉर्मिटरीज् उपलब्ध आहेत. अगदी दीडशे-दोनशे रुपयांपासून या एसी किंवा नॉन एसी डॉर्मिटरीज सहज मिळतात. इथे आपल्याला बेड आणि लॉकर मिळतो. एका रुममध्ये 4, 6, 8 या संख्येत लोक राहू शकतात. त्याच रुममध्ये वॉशरुम बाथरुम असतं. अर्थातच, शेअरिंगमधे! www.booking.com या साईटवर तुम्ही याचं कधीही बुकिंग करू शकता. यासाठी पैसे अॅडव्हान्स भरायची गरज नसते. विशेष म्हणजे, या सगळ्या डॉर्मिटरीज् महत्वाच्या लोकेशनपासून अगदी दीड-दोन किमीच्या आत असतात, असा अनुभव मला राजस्थानच्या प्रत्येक शहरात आला. उदयपूरमधली डॉर्मिटरी ही प्रसिद्ध सिटी पॅलेसपासून अवघ्या 400 मीटरवर होती.

रात्री 9.30 च्या सुमारास आवरुन मी बाहेर पडलो. जेमतेम दोनशे मीटरवर पिछोला तलाव होता. गणगौर घाटावरुन रात्रीच्या लख्ख प्रकाशात तलाव उजळून निघाला होता. उदयपूर शहरात पाणी आणि सिंचनाच्या व्यवस्थेसाठी पिछोली गावात या तलावाची निर्मिती करण्यात आली. पुढे महाराणा उदयसिंग (द्वितीय) यांनी या तलावाचा विस्तार केला. पिछोला तलावात दोन महाल आहेत. पहिला महाल-जग निवास! इथे आता हॉटेल बनवण्यात आलंय. तर दुसरा महाल आहे जग मंदिर.. हे दोन्ही महाल रात्री दिव्यांच्या प्रकाशात आणखीच खुलून दिसतात.

राजस्थानची इकॉनॉमी ट्रिप : उदयपूर

याच घाटावर होणारा गणगौर उत्सव आणि इथून दिसणारा सुर्यास्त उदयपूरचे राणाही चुकवत नसत. आताही पाण्यात पाय सोडून बसल्यावर सगळा थकवा काही क्षणांतच निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून नऊच्या आत हॉस्टेलवरच नाश्ता केला. 260 रुपयात राहणं आणि त्यात इंग्लिश ब्रेकफास्टसुद्धा इन्क्लूड होता. असो, तर दही पराठा, पकोडा, सॅन्डविच, फ्रूट्स आणि नंतर दूध असा व्यवस्थित ब्रंच करून मी जवळचं सिटी पॅलेस गाठलं. सकाळी 9 वाजता पहिलं तिकीट काढणारा मीच होतो. अगदी सहा महिने-वर्षभरापूर्वी सिटी पॅलेसचं तिकीट साधारण 110 रुपये होतं. आता मात्र ते थेट 300 रुपये केलंय. पण एकदा तुम्ही या उदयपूर पॅलेसमध्ये पाय ठेवला की मोजलेले 300 रुपये क्षणात विसरून जाता.

राजस्थानची इकॉनॉमी ट्रिप : उदयपूर

400 वर्षांचा म्हातारा 25 वर्षांच्या तरूणासारखा ताजातवाना दिसावा, तसा हा देखणा सिटी पॅलेस. राजस्थानच्या भव्य महालांमध्ये सगळ्यात मोठा महाल म्हणून सिटी पॅलेसची ओळख आहे.

राजस्थानची इकॉनॉमी ट्रिप : उदयपूर

अरवलीच्या या पर्वतरांगांमध्ये पिछोला तलावाच्या जवळ महाराणा उदयसिंह शिकारीसाठी भटकत होते. त्याचवेळी या पहाडावर त्यांना एक साधू तपश्चर्या करताना दिसले. महाराणानी साधूचे आशीर्वाद घेतले. साधूने त्यांच्या चेहऱ्याकडे बघून सांगितलं की, "तुमचे वाईट दिवस सुरू होणार आहे. तुमची राजधानी चित्तोडगडावरुन तत्काळ इथे हलवा." राणा उदयसिंह यांनी ही गोष्ट मनावर घेऊन लगेचच चित्तोडहून आपली राजधानी उदयपूरला हलवली. त्याच ठिकाणी उदयपूरचा हा भव्य महाल बांधण्यात आला.

राजस्थानची इकॉनॉमी ट्रिप : उदयपूर

1572 साली महाराणा उदयसिंह यांच्या मृत्यूनंतर महाराणा प्रताप यांनीही या महालाचं निर्माणकार्य सुरू ठेवलं त्यानंतर पुढे अनेक राजांनी हा महाल असाच वाढवत नेला. 18 व्या शतकात मराठ्यांनी मेवाडवर आक्रमण करत उदयपूरची लूट केली. त्यानंतर इंग्रजांची नजर उदयपूर पॅलेस आणि खजिन्यावर पडली. इंग्रजांनी या पॅलेसला संरक्षण दिलं. आता असलेली भव्यदिव्यता ही काही अंशी इंग्रजांची देन आहे. 1949 साली सरदार वल्लभभाई पटेल यांनी गणराज्याची स्थापना करत सर्व राजांना संघराज्यात सम्मिलित केलं. त्यानंतर राजेशाही संपुष्टात आली खरी; पण कोर्टात हा खटला अनेक वर्षं चालला. आता ट्रस्ट बनवून राजाच्या वंशजांना पॅलेसचे अधिकार पुन्हा मिळाले आहेत. सध्या उदयपूर पॅलेस राणा उदय सिंह यांच्या वंशजांच्या ताब्यात आहे.

राजस्थानची इकॉनॉमी ट्रिप : उदयपूर

पॅलेसच्या आत महिलांसाठी जनाना महाल आणि पुरुषांसाठी मर्दाना महाल बनवण्यात आले आहेत. उदयपूर पॅलेस हा महालांचा समूह आहे, असंही म्हणता येइल. कारण इथे प्रत्येक राजाने वेगवेगळे महाल बनवत त्याचा भव्य विस्तार केला. राजा अमर सिंह यांचा अमर महल.. राजा भोपाल सिंह यांचा भोपाल महल इत्यादी इत्यादी.

राजस्थानची इकॉनॉमी ट्रिप : उदयपूर

महाराणा प्रताप यांचं चिलखत आणि शस्त्रास्त्रांचं जतन पॅलेसमध्ये करण्यात आलंय. हे सगळं बघणं हा अत्यंत प्रेरणादायी अनुभव आहे.

राजस्थानची इकॉनॉमी ट्रिप : उदयपूर

महालातलं स्वयंपाकघर, विश्रामगृह, समारंभात वापरल्या जाणाऱ्या पालख्या असं सगळं या पॅलेसमध्ये आजही संग्रहित आहे. हे सगळं बघताना आपणही काही वेळ तो राजेशाही थाट अनुभवतो.

राजस्थानची इकॉनॉमी ट्रिप : उदयपूर

एव्हाना, जेवढं फिराल तेवढं कमीच आहे, हे लक्षात येऊ लागतं. साधारण तीन तास पॅलेस बघून झाला, तरी बराचसा भाग पर्यटकांसाठी बंद होता. शेवटी, 12 च्या सुमारास मी सिटी पॅलेसमधून बाहेर पडलो.

सिटी पॅलेसपासून थोडं चालत गेलो की, जगदीश मंदीर आहे. विष्णू अर्थात लक्ष्मी नारायणाचं हे मंदिर मारू गुर्जर स्थापत्य कलेचा (मेवाडची प्राचीन स्थापत्यकला) नमुना आहे. 1651 साली राणा जगत सिंह यांनी हे मंदिर उभारलं. त्याकाळी या मंदिराच्या निर्मितीला 15 लाख रुपये खर्च आला होता.

राजस्थानची इकॉनॉमी ट्रिप : उदयपूर

मंदिराच्या भिंतींवरची स्थापत्यकला बघून आपल्याला क्षणभर खजुराहोमध्ये असल्यासारखंच वाटतं.

राजस्थानची इकॉनॉमी ट्रिप : उदयपूर

मंदिराच्या बाहेर पडताच रिक्षावाले तुम्हाला नेहमीप्रमाणे गराडा घालतातच. आता मी मोती मगरीच्या स्मारकाला जाण्यासाठी रिक्षा घेतली. रिक्षावाल्यानं मोठ्या अभिमानानं मला विचारलं, "क्यों साब, कैसा लगा पॅलेस?" मी म्हटलं "बहोत बढियां" तो लगेच सांगू लागला, "आपको मालूम है? सलमान खान की पिच्चर 'प्रेम रतन धन पायो' इसी पॅलेस मे बनीं. आजकल यहां फिल्मे बहोत बनती हैं। वो 'धडक' पिच्चर भी यही...उदयपूरमें बनी है। वैसे आप कहां से आए हो?" मी म्हटलं, "मुंबई, महाराष्ट्र " त्यावर दिलखुलास हसत तो म्हणाला, "तो फिर मैं आपको फिल्मों के बारे में क्यों बता रहां हूं? आपके यहाँ तो गली गली में शूटिंग चलती है" आमचं हे संभाषण चालू असतानाच फतेह सागर तलाव लागला. महाराणा फतेह सिंह यांनी या तलावाचं पुनर्निर्माण केलं. इथेच सुंदर नेहरु उद्यान आहे. सोबतच सौर वेधशाळा स्थापन करण्यात आली आहे.

राजस्थानची इकॉनॉमी ट्रिप : उदयपूर

फतेह सागर तलावाच्या शेजारीच पहाडावर मोती मगरी आहे. 1948 साली मोती मगरीची स्थापना करण्यात आली. आतमध्ये जाण्यासाठी 90 रुपये तिकीट आहे. छोट्याशा पहाडावर जाणारा मार्ग एक सुंदर बगीच्यातून जातो. आपल्या प्रिय अश्वावर... चेतकवर विराजमान झालेल्या महाराणा प्रताप यांचा पुतळा या पहाडावर मोठ्या डौलात उभा आहे.

राजस्थानची इकॉनॉमी ट्रिप : उदयपूर

इथेच मेवाड सैन्याची शस्त्रं आणि त्यांच्या वजनाची माहिती सांगणारं छोटंसं संग्रहालय आहे.

राजस्थानची इकॉनॉमी ट्रिप : उदयपूर

सहेलीओं की बाडी जवळच आहे, असं मला इथे एका दुकानदारानं सांगितलं. "आप यहां से पैदल जा सकते हो " असं त्याने अगदी छातीठोकपणे सांगितलं. मी पण निघालो. उन्हाचा पारा चढला होता. दुपारचा 1 वाजून गेला होता. फतेह सागर तलावाच्या किनाऱ्यावरूनच पुढे चालत जायचं होतं. तिथे चौपाटीवर मस्त कुल्फी घेतली. मेवाड की कुल्फी मस्त मलाईदार असते. त्या गर्मीत कुल्फीनं फारच आधार दिला. कुल्फीवाला म्हणाला, "यहाँ से बहोत दूर नही है सहेलीओं की बाडी, पैदल जाईए." पुन्हा मी आपला निघालो.. पण आता अंगात त्राण उरलं नव्हतं. इतक्यात मागून एक ट्रॅक्टर आला. त्याला हात दाखवला तर तो बिच्चारा थांबला. त्याला विचारलं " सहेलीओं की बाडी की तरफ जा रहें हो?" त्यानं नुसती मान हलवली. मी पटकन बसलो. एकही शब्द न बोलता त्याने मला चौकात उतरवलं आणि डावीकडे जा, असा इशारा केला. हसत त्याचा निरोप घेतला..पाच मिनिटांतच मी पोहोचलो सहेलीओं की बाडी मधे.

राज्यकन्येचा विवाह झाल्यावर तिच्यासोबत ज्या सेविका आणि मैत्रिणी हुंड्यात पाठवल्या जायच्या, अशा 48 सेविकांना हे स्मारक समर्पित करण्यात आलंय. महाराणा भोपाल सिंह यांच्या हुंड्यामध्ये आलेल्या सेविकांसाठी त्यांनी या मनोरंजनस्थळाची निर्मिती केली. आता तेच एक प्रेक्षणीय स्थळ बनलंय.

राजस्थानची इकॉनॉमी ट्रिप : उदयपूर

इथून बाहेर पडलो तोपर्यंत 3 वाजून गेले होते. भूकही लागली होती. तेवढ्यात समोर एक पाणीपुरीवाला देवासारखा धावून आला. मी काही बोलायच्या आत त्याने माझ्या हातात प्लेट दिली. मी फक्त 'तिख्खा' एवढंच म्हणालो.. त्याने दिलेली झणझणीत पाणीपुरी खरंच तिखट लागली... पण होती अप्रतिम. चांगल्या दोन प्लेट खाल्यावर मन तृप्त झालं. तेवढ्यात कुल्फीवाला आला आणि मग दिल और खुश हो गया..

यापुढचं आणि शेवटचं ठिकाण बागोर की हवेली. लगेच रिक्षा केली आणि हवेलीत पोहोचलो कारण 5 वाजता ती बंद होते. सुदैवानं 4 वाजेपर्यंत मी पोहोचलो होतो. यासाठी 90 रुपये तिकीट लागतं. पिछोला तलावाच्या काठावर मेवाडचे मंत्री अमर चंद बडवा यांनी 18 शतकात ही हवेली बनवली. तब्बल 100 खोल्या असलेल्या या हवेलीमध्ये जुन्या वस्तू आणि सुंदर पेंटिंग्जही आहेत.

संध्याकाळी 7 वाजता याच हवेलीमध्ये राजस्थानच्या पारंपरिक नृत्याचा कार्यक्रम रोज सादर केला जातो. त्यासाठी 90 रुपयांचं वेगळं तिकिट घ्यावं लागतं. पण 7 ते 8 असा तासभर चालणारा हा नृत्याविष्कार तुम्ही अज्जिबात चुकवू नका.

राजस्थानची इकॉनॉमी ट्रिप : उदयपूर

बागोर की हवेलीच्या जवळच माझं राहण्याचं ठिकाण होतं. मी हॉस्टेलमधे येऊन फ्रेश झालो. तिथल्याच एका मुलाला विचारल्यावर कळलं की शेजारीच छान घरगुती जेवण मिळतं. समोरच्या इमारतीत तिसऱ्या मजल्यावर. जुलैमध्ये फारसे पर्यटक नसल्याने तिथे जेवणासाठी कोणीही नव्हतं. तिथे एक काका होते. मी विचारलं "चाचा, खाना मिलेगा अभी?" त्यावर काका म्हणाले "हाँ मिलेगा" त्यांनी मेन्यूकार्ड माझ्या हातात ठेवलं. मी म्हटलं, "ये रहेने दो, आप मेरे लिए दाल बाटी चुरमा बनाइए" ते हसत म्हणाले "अरे नही बेटा, अकेले के लिए तो नही बना सकता। और यह मौसम भी इतना हेवी खाने का नही है। दाल बाटी ठंडी के दिनों में ठीक है। तुम चाहो तो थाली बना के दूं।"

मी लगेच हो म्हटलं .. काकांनी खालच्या मजल्यावर जाऊन काकूंना जेवण बनवायला सांगितलं. तेवढ्यात आणखी एक परदेशी कपल आलं.. त्यांच्याकडून तोडक्या मोडक्या इंग्रजीतून त्यांनी ऑर्डर घेतली. बहुधा माझ्यासारखीच.. थोडा वेळ लागणार होता.. मग काका गप्पा मारत बसले. "इस टाईमपे लोग कम होते हैं, तो जब ऑर्डर आती है तब ही खाना बनाते हैं" त्यांची अडचण अगदीच योग्य होती. मग इकडच्या तिकडच्या गप्पा मारत काका राजकारणात घुसले.

"जबसे काँग्रेस सरकार आई है, हर रोज कभी भी बिजली चली जाती है। वसुंधराके टाईम ऐसा नही होता था. मी म्हटलं, "वसुंधराजीने अगर काम किया होता, तो लोग उन्हे चुनके देते." त्यावर काका म्हणाले, "अरे नही, यह सब पॉलिटिशन एक जैसे है। काम कोई नहीं करता। लेकिन पहेले बिजली तो नही जाती थी।" गप्पांच्या ओघात काका मोदी आणि नंतर ट्रम्पपर्यंत पोहोचले. तेवढ्यात जेवण आलं. बटाटा फ्लॉवर, मसालेदार भेंडी, तिखट पुदिन्याची चटणी, दही, डाळ, सोबतीला गरमागरम फुलके आणि शेवटी भात... अन्नदाता सुखी भव।

जेवल्यावर बरीच उर्जा आली. खाली उतरलो तोपर्यंत 10 वाजून गेले होते. पुन्हा एकदा गणगौर घाटावर पिछोला तलावात पाय टाकून बसलो. हल्दीघाटी, सज्जनगड आणि कुंभलगड हे या भेटीत बघायचं राहून गेलं. या सगळ्यासाठी किमान 1 दिवस हवाच.. पण तेवढा वेळ नव्हता.. तसंही उदयपूरला पुन्हा येण्यासाठी बहाणा हवाच ना?

उद्या मला माऊंट अबूला जायचंय... त्यामुळे झोपलं पाहिजे. झोप झाली तरच आपण फिरु शकतो. शुभरात्री

दिवस दुसरा ( आजचा खर्च ) हॉस्टेल (2 दिवस) - 520 रु. सिटी पॅलेस तिकिट - 300 रु. दिवसभरात रिक्षा 250 रु. मोती मगरी तिकिट - 90 रु सहेलीओं की बाडी तिकिट - 20 रु बागौर की हवेली म्युझियम -90 रु फोक डान्स - 90 रु जेवण - 150 रु दिवसभरातला इतर खर्च - 200 रु. ---------------------- एकूण खर्च - 1710

तळटीप- भटकंतीचा अर्थ कुठलाही विचार न करता बॅग उचलून बाहेर पडणं. जग बघण्याची भूक असलेल्यांना पोटाच्या भुकेची चिंता नसते, त्यामुळे कधी राहण्याचे तर कधी खाण्याचे हाल होऊ शकतात. जाडजूड गादीवर झोपणाऱ्यांनी भटकंती करणं टाळावं. तुम्ही टूरिस्ट होऊ शकता ट्रॅव्हलर नाही. तुम्ही पक्के ट्रॅव्हलर असाल तर हा ब्लॉग तुमच्यासाठीच...

अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : राहुल गांधी अमेरिकेत ज्या तरुणाला भेटले तो मायदेशी परतला; घर गहाण ठेवत 'डंकी' मार्गाने अमेरिकेत गेला, पण.. परतून येताच सांगितली भयावह कहाणी
राहुल गांधी अमेरिकेत ज्या तरुणाला भेटले तो मायदेशी परतला; घर गहाण ठेवत 'डंकी' मार्गाने अमेरिकेत गेला, पण.. परतून येताच सांगितली भयावह कहाणी
Chandrashekhar Bawankule : बावनकुळेंचा थाटच न्यारा! 'तो' सोन्याचा मुकुट अमरावती भाजपकडे केला सुपूर्द; म्हणाले...
बावनकुळेंचा थाटच न्यारा! 'तो' सोनेरी मुकुट अमरावती भाजपकडे केला सुपूर्द; म्हणाले...
Beed:नामदेव शास्त्रींच्या वादग्रस्त वक्तव्यावरून मोठा खल, धनंजय देशमुख पुराव्यांसकट जाणार भगवानगडावर, मस्साजोग प्रकरणाला नवे वळण
नामदेव शास्त्रींच्या वादग्रस्त वक्तव्यावरून मोठा खल, धनंजय देशमुख पुराव्यांसकट जाणार भगवानगडावर, मस्साजोग प्रकरणाला नवे वळण
Budget 2025 Live Updates : बजेट सादर होण्यापूर्वीच दिलासा, गॅस सिंलिंडर किती रुपयांनी स्वस्त झाला? आजपासून 4 मोठे बदल
बजेट सादर होण्यापूर्वीच दिलासा, गॅस सिंलिंडर किती रुपयांनी स्वस्त झाला? आजपासून 4 मोठे बदल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10 AM 01 February 2025Nirmala Sitharaman Budget 2025 : निर्मला सीतारामण आठव्यांदा मांडणार अर्थसंकल्प; सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळणार?ABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 01 February 2025Top 80 at 8AM Superfast 01 February 2025 सकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्या

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : राहुल गांधी अमेरिकेत ज्या तरुणाला भेटले तो मायदेशी परतला; घर गहाण ठेवत 'डंकी' मार्गाने अमेरिकेत गेला, पण.. परतून येताच सांगितली भयावह कहाणी
राहुल गांधी अमेरिकेत ज्या तरुणाला भेटले तो मायदेशी परतला; घर गहाण ठेवत 'डंकी' मार्गाने अमेरिकेत गेला, पण.. परतून येताच सांगितली भयावह कहाणी
Chandrashekhar Bawankule : बावनकुळेंचा थाटच न्यारा! 'तो' सोन्याचा मुकुट अमरावती भाजपकडे केला सुपूर्द; म्हणाले...
बावनकुळेंचा थाटच न्यारा! 'तो' सोनेरी मुकुट अमरावती भाजपकडे केला सुपूर्द; म्हणाले...
Beed:नामदेव शास्त्रींच्या वादग्रस्त वक्तव्यावरून मोठा खल, धनंजय देशमुख पुराव्यांसकट जाणार भगवानगडावर, मस्साजोग प्रकरणाला नवे वळण
नामदेव शास्त्रींच्या वादग्रस्त वक्तव्यावरून मोठा खल, धनंजय देशमुख पुराव्यांसकट जाणार भगवानगडावर, मस्साजोग प्रकरणाला नवे वळण
Budget 2025 Live Updates : बजेट सादर होण्यापूर्वीच दिलासा, गॅस सिंलिंडर किती रुपयांनी स्वस्त झाला? आजपासून 4 मोठे बदल
बजेट सादर होण्यापूर्वीच दिलासा, गॅस सिंलिंडर किती रुपयांनी स्वस्त झाला? आजपासून 4 मोठे बदल
Pushpa 2 : रिलीजच्या 50 दिवसांनंतरही 'पुष्पा 2' चा धमाका कायम, अल्लू अर्जूनच्या नावावर नवा विक्रम
रिलीजच्या 50 दिवसांनंतरही 'पुष्पा 2' चा धमाका कायम, अल्लू अर्जूनच्या नावावर नवा विक्रम
Sujay Vikhe : बाळासाहेब थोरातांच्या पराभवावर राज ठाकरेंना संशय; आता सुजय विखेंचा जोरदार पलटवार; म्हणाले, 'मी त्यांचा फार मोठा फॅन, पण...'
बाळासाहेब थोरातांच्या पराभवावर राज ठाकरेंना संशय; आता सुजय विखेंचा जोरदार पलटवार; म्हणाले, 'मी त्यांचा फार मोठा फॅन, पण...'
आम्ही आंबेडकरवादी संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांबरोबर खंबीरपणे उभे आहोत; नामदेवशास्त्रींच्या वक्तव्यानंतर 'या' नेत्याचा पलटवार
आंबेडकरवादी संतोष देशमुख कुटुंबीयांच्या खंबीरपणे उभे आहेत, नामदेवशास्त्रींच्या वक्तव्यानंतर 'या' नेत्याचा पलटवार
Delhi Election :  यमुना वादात अडकलेल्या केजरीवालांना भर निवडणुकीत जबर हादरा; एकाचवेळी 8 आमदारांचा पक्षाला रामराम
यमुना वादात अडकलेल्या केजरीवालांना भर निवडणुकीत जबर हादरा; एकाचवेळी 8 आमदारांचा पक्षाला रामराम
Embed widget