एक्स्प्लोर

राजस्थानची इकॉनॉमी ट्रिप : जैसलमेर भाग दोन

जैसलमेर.. तसं लहान शहर. पण कला आणि सौंदर्यदृष्टी इथल्या कणाकणात सामावलीय. पिवळसर रंगाच्या दगडांपासून निर्मित भव्य घरं, सुंदर हवेल्या, बाजारपेठांनी गजबजलेले रस्ते, प्राचीन मंदिरं आणि थरच्या वाळवंटातला गडिसर तलाव. या अद्भूत सुंदर भूमीवरच्या त्रिकुटा पर्वतावर स्वर्णमुकुटासमान भासणारा हा सुवर्ण किल्ला.

तनोटहून निघालो. बस वेगानं जैसलमेरकडे निघाली होती. अडीच तासाचं अंतर दोन तासातच पूर्ण करु की काय असं वाटत होतं. तसंही लवकर पोहोचलो तर दिवसभर जैसलमेर फिरण्यासाठी मला जास्त वेळ मिळणार होता. मुंबई-पुण्यात जशा रस्त्यावर गाड्याच गाड्या असतात, तसं इथे नसतं. मी ड्रायव्हरच्या सीटजवळ बसलो होतो. त्यामुळे बसमधून आजूबाजूचा परिसर बारकाईनं न्याहाळता येत होता. जैसलमेर आता अगदी जवळ आलं होतं. अर्ध्या तासात पोहोचूच, असं ड्रायव्हरने मोठ्या ठामपणे सांगितलं खरं. पण पुढच्या पाच मिनिटात माशी शिंकली. जे व्हायला नको होतं, तेच झालं. सकाळी नऊच्या सुमारास अचानकच वाऱ्याचा जोर वाढला. काही मिनिटांपूर्वी मोकळ्या असलेल्या रस्त्यावर वाळूचे डोंगर तयार झाले. पुढे एक किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या. ती वाळू हटवण्याठी जेसीबी बोलवण्यात आली होती. ट्रॅफिक आपल्याला काही नवीन नसतं. पण हे असं ट्रॅफिक मी तरी पहिल्यांदाच बघत होतो. बसच्या दारं खिडक्या बंद कराव्या लागल्या. कारण वाळूचं ते वादळ इतकं भयानक होतं, की समोर दोन गाड्यांनंतरची तिसरी गाडीसुध्दा पुसटशी दिसत होती. छोट्या कारही वाळूमध्ये फसत होत्या.

राजस्थानची इकॉनॉमी ट्रिप : जैसलमेर भाग दोन

बस आणि ट्रकसारखी जड वाहनं तर पुढे जाऊच शकत नव्हती. मग कळलं, की वादळ जर असंच सुरू राहिलं, तर बस हलायला किती तास लागतील हे सांगता येत नाही. माझ्याकडे तर जैसलमेरसाठी फक्त आजचा दिवस होता. तो पण या वाळूच्या वादळात जातोय की काय, असं वाटू लागलं. अर्धा पाऊण तास असेच अडकून पडल्यावर शेवटी एकदाची बस हलली. तोपर्यंत आमच्या अंगावर वाळूच वाळू झाली होती. पण जेसीबीनं रस्ता मोकळा केला होता. बस तिथून बाहेर पडली आणि माझ्या जीवात जीव आला. जैसलमेरच्या बस स्टॉपवर बस आली, तेव्हा सकळचे दहा वाजून गेले होते. मी पटकन किल्ल्यातलं माझं होस्टेल गाठलं. सगळं आवरुन अकरा वाजता बाहेर पडलो. मी तसा किल्ल्यातच असल्यानं सुरुवात अर्थातच सुवर्ण किल्ल्यापासूून झाली. जैसलमेर.. तसं लहान शहर. पण कला आणि सौंदर्यदृष्टी इथल्या कणाकणात सामावलीय. पिवळसर रंगाच्या दगडांपासून निर्मित भव्य घरं, सुंदर हवेल्या, बाजारपेठांनी गजबजलेले रस्ते, प्राचीन मंदिरं आणि थरच्या वाळवंटातला गडिसर तलाव. या अद्भूत सुंदर भूमीवरच्या त्रिकुटा पर्वतावर स्वर्णमुकुटासमान भासणारा हा सुवर्ण किल्ला.

राजस्थानची इकॉनॉमी ट्रिप : जैसलमेर भाग दोन

जेव्हा 1965 आणि 1971 साली भारत पाकिस्तानचं युद्ध झालं, त्यावेळी जैसलमेरची सीमा धगधगत होती. या युद्ध समयी, सीमा भागातल्या लोकांना याच किल्ल्यानं आश्रय दिला. आजही किल्ल्यात पाच हजार लोकसंख्या असलेली बाराशे कुटुंबं राहतात. आता तर किल्ल्यातच मार्केटही बनलंय. अनेक हॉटेल्स, रेस्टॉरंटस् या किल्ल्यात आहेत. लोक राहत असलेला असा किल्ला माझ्या बघण्यात तरी नाही. सुवर्ण किल्ल्यात मी तुम्हाला फिरवणार आहेच. पण त्याआधी जैसलमेर शहाराच्या आणि या किल्ल्याच्या निर्मितीविषयी.. पश्चिमी राजस्थानमधला जैसलमेर हा जिल्हा पूर्णतः थरच्या वाळवंटानं व्यापलाय.. इ.स. 1156 साली राजपूत सरदार रावल जैसल यांनी सुवर्ण किल्ल्याची उभारणी केली. त्यांच्या नावावरूनच या शहराला 'जैसलमेर' असं नाव पडलं. पिवळे दगड आणि पिवळ्याच वाळूने निर्मित हा किल्ला सूर्यकिरणं त्याच्या अंगावर पडली, की सोन्यासारखा चमकतो. म्हणूनच या किल्ल्याला 'गोल्डन फोर्ट' किंवा 'सुवर्ण किल्ला' या नावानं ओळखलं जातं. विशेष म्हणजे या किल्ल्याच्या उभारणीत चुन्याचा वापरच केलेला नाही. दगडांवर दगड ठेवून उभारण्यात आलेला हा किल्ला वास्तूकलेच्या अभ्यासकांसाठी विद्यापीठच आहे.

राजस्थानची इकॉनॉमी ट्रिप : जैसलमेर भाग दोन

सुवर्ण किल्ल्यानंही अनेक आक्रमणं झेलली. 1293-94 मध्ये दिल्लीचा सुलतान अल्लाऊद्दीन खिलजीने हा किल्ला काबीज केला. तब्बल नऊ वर्षं खिलजीने या किल्ल्यावर शासन केलं. दुसरं आक्रमण 1541 साली मुगल सम्राट हुमायूंने केलं. त्यावेळी राजा रावलने मुघलांशी मैत्री करत आपल्या मुलीचा विवाह सम्राट अकबरशी लावून दिला. 1762 पर्यंत या किल्ल्यावर मुगलांचं शासन होतं. त्यानंतर महाराज मूलराज यांनी किल्ला काबीज केला, त्यानंतर 1820 साली गज सिंह यांनी किल्ला ताब्यात घेतला. आज किल्ल्याच्या बहुतांशी भागात लोकांची घरं जरी असली तरी पर्यटकांसाठी भव्य राजमहाल, हवेल्या आणि मंदिरं खुली असतात. किल्ल्यामधल्या बहुमजली हवेल्या आपला शाही अंदाज आजही टिकवून आहेत. यामध्ये खिडक्या आणि दरवाज्यांवर आकर्षक कलाकृती रेखाटलेल्या आहेत. काही महत्वाच्या हवेल्यांचं आता म्युझिअम करण्यात आलंय.

राजस्थानची इकॉनॉमी ट्रिप : जैसलमेर भाग दोन

किल्ल्यातली जलनिस्सारण पद्धती अत्यंत कुशलतेनं डिझाईन केली आहे. त्यामुळेच किती ही पाऊस पडला, तरी किल्ल्यात पाणी साचत नाही. याला 'घुंटियाली पद्धती' म्हणतात. म्युझिअम आणि किल्ला बघून झाल्यावर मी किल्ल्यातल्याच जैन मंदिरात गेलो. हे मंदिर बघून मला माऊन्ट अबूच्या दिलवारा जैन मंदिराचीच आठवण आली. 12 व्या ते 15 व्या शतकाच्या दरम्यान या मंदिराची उभारणी झाली. इथली शिल्पकला कमाल आहे.

राजस्थानची इकॉनॉमी ट्रिप : जैसलमेर भाग दोन

किल्ल्यात बऱ्यापैकी फिरून झालं होतं. दुपारचा दीड वाजला काहीतरी खावं, म्हणून मी किल्ल्याच्या बाहेर पडलो. मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरच गोपा चौकात 'सवेरा ठेला' लागलेला दिसला. जैसलमेरच्या खाद्यसंस्कृतीमध्ये दाल पकवान हे अग्रस्थानी आहे. त्यातही सवेरा ठेल्यावरचा दाल पकवान म्हणजे विशेष प्रसिद्ध! दाल पकवान मी आयुष्यात पहिल्यांदाच खाणार होतो. आपल्याकडच्या कडक भाकरीसारखी गव्हाची तळलेली पोळी आणि त्यावर झणझणीत डाळ घालून हा पदार्थ खाल्ला जातो. राजस्थानची इकॉनॉमी ट्रिप : जैसलमेर भाग दोन सौ. फेसबुक ते मला नीट खायला जमेना. शेवटी, शेजारच्या माणसाने न राहावून मला दाल पकवान कसा खायचा ते सांगितलं. "पहली बार खा रहा हुँ ना...तो मालूम नही कैसे खाते हैं I" मी जरा खजील होऊनच त्याला सांगितलं. पण मोठ्या उत्साहानं तो म्हणाला, "अरे, कोई बात नही, लेकिन आप सही जगह पे आये होI जैसलमेर आये और खत्री साहब का दाल पकवान खाना ही चाहिएI वैसे कहा से आये हो आप?" मी थोडंसं हसत दाल पकवानचा घास घेत "मुंबई! " एवढंच उत्तर दिलं. तुम्हाला सांगतो, काय अप्रतिम चव होती! भूक कडाक्याची लागली असल्यामुळे असेल कदाचित, पण ती चव अजूनही माझ्या जिभेवर रेंगाळतीय. माझ्या चेहऱ्यावरचं समाधान बघून शेजारचा मित्र खुश झाला. खाता खाता मला म्हणाला, "क्यों? कैसा लगा?" मी म्हणालो "अच्छा हैI" "तभी तो खत्री साहब को सोनम कपूर की शादी में दाल पकवान परोसने बंबई ले गये थे अनिल कपूर!" तो हे सगळं अतिशय अभिमानानं सांगत होता. मी एक प्लेट संपण्याआधीच आणखी एक ऑर्डर दिली. पोटभर जेवल्यावर बरं वाटलं. दोन वाजत आले होते. जैसलमेर शहरामध्ये 19 आणि 20 व्या शतकात अनक हवेल्या बांधल्या गेल्या. त्यात नथमल की हवेली, सलीम की हवेली, पटवों की हवेली अशा अनेक हवेल्या बघण्यासारख्या आहेत. पटवों की हवेली किल्ल्यापासून एक ते दीड किमीवर आहे. पण त्याच रस्त्यावर जैसलमेरचं मार्केटही आहे. त्यामुळे मार्केटमध्ये फेरफटका मारत मी निघालो.. रस्त्याच्या दुतर्फा साडी, दुपट्टे, चादरी, शोभेच्या वस्तू, बारीक कोरीव काम असलेल्या वस्तू यांची दुकानं आहेत. हीच दुकानं किल्ल्यातही आहेत, पण तिथे याच वस्तू महाग मिळतात, असा माझा अनुभव आहे. ज्या चादरीची किंमत मला किल्ल्यात 700 रुपये सांगितली, तीच चादर इथे 500 रुपयात मिळत होती. घासाघीस केल्यावर किंमत आणखीही कमी झाली असती. मी चादरी वगैरे घेऊन फिरु शकत नसल्याने खरेदी करणं टाळलं. पण इथलं मार्केट फिरल्यावर तुम्हाला खरेदीचा मोह आवरणं केवळ अशक्य आहे. विशेषत: महिलांना...

राजस्थानची इकॉनॉमी ट्रिप : जैसलमेर भाग दोन

मार्केटमधून वाट काढत आतल्या गल्लीत शिरलो. इथल्या सामान्य लोकांची घरंही एखाद्या राजवाड्यापेक्षा कमी नाहीत. आणखी एक महत्वाचं म्हणजे, ज्या घरात लग्न होणार आहे, त्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर गणपतीचं चित्र आणि शेजारी नवरा- नवरीचं नाव आणि त्यावर दोन्हीकडच्या कुटुंबीयांची नावं लिहिलेली आढळतात. समजून जायचं यंदा या घरात कर्तव्य आहे.

राजस्थानची इकॉनॉमी ट्रिप : जैसलमेर भाग दोन

आपल्याकडे शहरात फार नाही, पण गावाकडे 'शुभ लाभ' वगैरे लिहिलं जातं. पण एवढं सविस्तर नसतं. असो, तर गल्ली बोळातून मी पटवोंकी हवेलीपर्यंत पोहोचलो. पटवों की हवेली ही गुमन चंद पटवा यांनी 1805 मध्ये आपल्या पाच मुलांसाठी उभारली. यामध्ये पाच हवेली असून त्या एक सारख्याच आहेत. ही हवेली तयार होण्यासाठी 50 वर्षं लागली. पिवळ्या दगडांमध्येच ही हवेली उभारण्यात आलीय. इथली स्थापत्यकला आणि घरांची रचना बघण्यासारखी आहे. सध्या भारतीय पुरातत्व खात्याचं कार्यालय या हवेलीत आहे. वरच्या काही मजल्यांवर छताला उलट्या लटकलेल्या वटवाघळांचं राज्य आहे. सर्वांत वरच्या मजल्यावरुन सुवर्ण किल्ला आणि जैसलमेर शहर मी नजरेत सामावून घेतलं. राजस्थानची इकॉनॉमी ट्रिप : जैसलमेर भाग दोन दुपारचे तीन वाजले. आकाशात काळे ढग होते. पण पाऊस पडेल, असं वाटत नव्हतं. पटवों की हवेलीपासून मी गडिसर लेकला निघालो. खरंतर गडिसर लेकला संध्याकाळी जायचं, असं ठरवलं होतं. पण आता लवकर सगळं बघून झालं होतं. मग मी गडिसर तलावाकडे जायला निघालो. तेवढ्यात मला जैसलमेरजवळ एक भूतांचं गाव असल्याचं आठवलं. त्याबद्दल आधी वाचनात आलं होतं. मी रिक्षावाल्याला सहज विचारलं. " भैया, भूतवाले गांव ले कर चलोगे?" रिक्षावाल्याला हसायला आलं. तो म्हणाला "आपको गडिसर तालाब जाना है ना?" मी म्हटलं, "हां.. तालाब तो शाम को भी जा सकते है! अभी भूतवाले गाव चलते हैI " रिक्षा बाजूला लावत तो म्हणाला, "देखो आजतक किसीने मुझे भूतवाले गाव जाने के बारे मे नहीं पुंछाI" मी म्हटलं, "चलो ना, दिन ढलने से पहले वापस आ जायेंगे.." त्यावर तो म्हणाला, "नही भैया, यहां से 20 किमी है! बहोत टाईम जायेगाI" मी म्हटलं, "आपको जो पैसे लेनेे हैं लिजिएI और हम बाहर से ही 10 मिनिट मे लौट आयेंगेI" त्यावर तो म्हणाला, "200 रु. लुंगाI" मी म्हटलं, "चलो, कोई बात नहीI लिजिए 200 रु.I" त्याने रिक्षा उलट्या दिशेला वळवली. जैसलमेर एअरपोर्टजवळच्या रस्त्यावरून रिक्षा पुढे आली. मी म्हटलं "भैया, लोग जाते हैं क्या वहां?" त्यावर तो म्हणाला, "आते है, पर शाम से पहेले निकलना पडता हैI" या कुलधरा गावात आधी इतकी दहशत होती, की या गावाच्या आसपासही कोणी फिरकायचं नाही. आता राजस्थान सरकारने कुलधरा गावाला पर्यटन स्थळाचा दर्जा दिलाय. तरीही मोजके लोक सोडले, तर इथे येण्याची हिंमत कोणी करत नाही. आम्ही कुलधरा गावाजवळ पोहोचलो तर तिथे दोनच मुलं होती. बहुदा ती गावाजवळचीच असावीत. या गावात आता फक्त पडलेली घरं आहेत. जीर्ण भींती आणि अस्ताव्यस्त पडलेले घरांचे दगड..

राजस्थानची इकॉनॉमी ट्रिप : जैसलमेर भाग दोन

कधी काळी हेच कुलधरा सुखी संपन्न पालिवाल ब्राह्मणांचं गाव होतं. पण जैसलमेरचा मंत्री सलीम सिंहची नजर गावप्रमुखाच्या मुलीवर पडली. तिच्याशी लग्न करण्यासाठी त्यानं साम दाम दंड भेद वापरला. गावाला दिलं जाणारं पाणीही त्यानं तोडलं. तरीही या गावातील लोक शरण गेले नाहीत. एक दिवस रात्री सभा घेऊन या गावातील सर्वांनी रातोरात गाव सोडलं. या गावात कोणीही राहू शकणार नाही, असा श्शाप दिल्याची दंतकथाही आहे. म्हणूनच राजस्थानमध्ये या गावाला शापीत गाव म्हणूनही ओळखलं जातं.. आम्ही लांबूनच या गावाचा फेरपटका मारला. हिवाळ्यात पर्यटक जास्त असतात. त्यावेळी इथे गर्दी होते, असं त्या दोन मुलांनी सांगितलं. कुलधरा गावातून संध्याकाळी 5 वाजता आम्ही निघालो शेवटचं ठिकाण गडिसर तलावाकडे.. साडे पाचच्या सुमारास सूर्य बऱ्यापैकी खाली झुकला होता. मुख्य गेटच्या थोडं अलीकडे रिक्शावाल्यानं मला सोडलं. तलावाकडे जात असताना मला जे दिसलं तो फोटो मला तुम्हाला दाखवायचा आहे.. राजस्थानची इकॉनॉमी ट्रिप : जैसलमेर भाग दोन हे गडिसर तलावाच्या समोरचं सार्वजनिक शौचालय आहे. जैसलमेरच्या स्थापत्य, कलाकुसर, कल्पकतेची मी खूप स्तुती केली. त्याचं हे उदाहरण आहे. जिथे अशी शाही सार्वजनिक शौचालयं आहेत, तिथली घरं कशी असतील, याचा विचार करा. असो, तर वाळवंटातल्या जैसलमेर शहराला पाणी मिळावं, यासाठी 14 व्या शतकात या कृत्रिम गडिसर तलावाची निर्मिती राजा रावल जैसल यांनी केली. त्यानंतर 14 व्या शतकात महारावल गडसी सिंह यांनी या तलावाला पुनरुज्जीवित केलं. जुलै महिन्यातही या तलावात भरपूर पाणी होतं. सध्या पर्यटक नसल्यामुळे बोटिंग बंद होतं. पण या तलावाच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत आल्यावर आजूबाजूच्या रम्य परिसरात मनःशांती मिळते. तुम्हाला फोटो, सेल्फीची आवड असेल तर गडिसर लेक सर्वोत्तम..

राजस्थानची इकॉनॉमी ट्रिप : जैसलमेर भाग दोन

मी मात्र चौथऱ्यावर शांत बसून राहिलो. तलावाच्या काठावर असलेल्या मंदिरातून सुरेल भजनं ऐकत मी अंधार पडेपर्यंत तिथेच बसून होतो.. जैसलमेरमध्ये दोन दिवस कसे गेले कळलंच नाही. संध्याकाळी साडे सातला मी किल्ल्यात पोहोचलो. किल्ल्यातल्या रहिवासी भागात मी रात्री सहज फेरफटका मारला. आपल्या गावी जशी संध्याकाळी लगबग असते, तसंच चित्र किल्ल्यातल्या घरांमध्येही होतं. अंगणात खाटेवर बसलेले आजी आजोबा, लहान मुलांचा किलबिलाट, घराघरांतून ऐकू येणाऱ्या कूकरच्या शिट्ट्या, सगळं तसंच... पण त्यांची भल्या मोठ्या पाषाणातली घरं , गडावरचं गार वारं अनुभवतांना मला या सगळ्यांचा हेवा वाटला. आपलंही असंच किल्ल्यात घर असायला हवं होतं, असं मनात येऊन गेलं.

राजस्थानची इकॉनॉमी ट्रिप : जैसलमेर भाग दोन

रात्री पायथ्याशी उतरून राजस्थानी जेवण केलं आणि हॉस्टेलला परतलो. दिवसभर फिरल्याने थकवा होताच. त्यात दुस-या दिवशी सकाळी ट्रेनने जोधपूरला निघायचं होतं. झोप पटकन लागली. सकाळी 7 वाजता जोधपूरला जाणारी इंटरसिटी गाठली. गाडी निघाली.. प्रसिद्ध कवी विपुल यांच्या ओळी आठवत पुढचा प्रवास सुरू झाला.. "मन नहीं था, जानते हो! था मगर जाना जरूरी...I जानते हो यूं ठहर होती नहीं है साध पूरीII फिर कभी मिट्टी तुम्हारी चूम पाउंगा दुलारेI याद आते है मुझे सोने सरीखे सब नजारेII स्वर्णनगरी ! गीत में पाती तुम्हें लिखता रहूंगाI भावनाएं जो उठेंगी सब तुम्हें आगे कहूंगाII तुम बुलाओगे तो आने में लगाऊंगा न देरीI याद जैसलमेर तेरी ! -------------------------- आजचा खर्च जैसलमेर किल्ला म्युझियम तिकिट - 100 रु दुपारचं जेवण (दाल पकवान) - 120 रु पटवों की हवेली तिकिट - 50 रु रिक्षा (कुलधरा गांव) - 200 रु. रात्रीचं जेवण - 100 रु जैसलमेर-जोधपूर एक्स्प्रेस तिकीट 120 --------------------------- एकूण खर्च - 690 रु

तळटीप- भटकंतीचा अर्थ कुठलाही विचार न करता बॅग उचलून बाहेर पडणं. जग बघण्याची भूक असलेल्यांना पोटाच्या भुकेची चिंता नसते, त्यामुळे कधी राहण्याचे तर कधी खाण्याचे हाल होऊ शकतात. जाडजूड गादीवर झोपणाऱ्यांनी भटकंती करणं टाळावं. तुम्ही टूरिस्ट होऊ शकता ट्रॅव्हलर नाही. तुम्ही पक्के ट्रॅव्हलर असाल तर हा ब्लॉग तुमच्यासाठीच..

संबंधित ब्लॉग

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

शरद पवार व्हीलचेअरवर, ज्योती वाघमारे सावित्रीमाईंच्या पेहरावात; राज्यसभेत 19 नवनिर्वाचित राज्यसभा खासदारांनी घेतली शपथ
शरद पवार व्हीलचेअरवर, ज्योती वाघमारे सावित्रीमाईंच्या पेहरावात; राज्यसभेत 19 नवनिर्वाचित राज्यसभा खासदारांनी घेतली शपथ
Mumbai Goregaon Crime: मुंबईच्या गोरेगावमध्ये शोभायात्रेवर हल्ला, दंगलखोरांची घरं पाडण्यासाठी बुलडोझर आणला, पोलिसांकडून 8 जणांना अटक
मुंबईच्या गोरेगावमध्ये शोभायात्रेवर हल्ला, दंगलखोरांची घरं पाडण्यासाठी बुलडोझर आणला, पोलिसांकडून 8 जणांना अटक
राहुरीत शिंदेंच्या शिवसेनेतून बंडखोरी, युवा नेत्यानं भरला उमेदवारी अर्ज; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून कोण?
राहुरीत शिंदेंच्या शिवसेनेतून बंडखोरी, युवा नेत्यानं भरला उमेदवारी अर्ज; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून कोण?
Ashok Kharat and Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांच्या अपघाताच्या दिवशी अशोक खरातच्या मोबाईलवर धडाधड मेसेज, अंजली दमानियांचा खळबळजनक दावा
अजित पवारांच्या अपघाताच्या दिवशी अशोक खरातच्या मोबाईलवर धडाधड मेसेज, अंजली दमानियांचा खळबळजनक दावा
ABP Premium

व्हिडीओ

Sunetra Pawar Speech Baramati : दादांना श्रद्धांजली वाहण्याची बारामतीकरांना संधी,सुनेत्रा पवार भावूक
Dhananjay Munde Speech Baramati : दादांच्या जाण्याने महाराष्ट्राचे नुकसान, वहिनीसाहेब विनविरोध येतील
Sunetra Pawar Baramati Election : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामती पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करणार
Ashok Kharat CDR : दमानियांकडे खरातचा सीडीआर, विरोधकांचा प्रहार Special Report
Donald Trump Warning Iran : Hormuz Strait Crisis : होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा नाहीतर नरकात जाल, डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शरद पवार व्हीलचेअरवर, ज्योती वाघमारे सावित्रीमाईंच्या पेहरावात; राज्यसभेत 19 नवनिर्वाचित राज्यसभा खासदारांनी घेतली शपथ
शरद पवार व्हीलचेअरवर, ज्योती वाघमारे सावित्रीमाईंच्या पेहरावात; राज्यसभेत 19 नवनिर्वाचित राज्यसभा खासदारांनी घेतली शपथ
Mumbai Goregaon Crime: मुंबईच्या गोरेगावमध्ये शोभायात्रेवर हल्ला, दंगलखोरांची घरं पाडण्यासाठी बुलडोझर आणला, पोलिसांकडून 8 जणांना अटक
मुंबईच्या गोरेगावमध्ये शोभायात्रेवर हल्ला, दंगलखोरांची घरं पाडण्यासाठी बुलडोझर आणला, पोलिसांकडून 8 जणांना अटक
राहुरीत शिंदेंच्या शिवसेनेतून बंडखोरी, युवा नेत्यानं भरला उमेदवारी अर्ज; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून कोण?
राहुरीत शिंदेंच्या शिवसेनेतून बंडखोरी, युवा नेत्यानं भरला उमेदवारी अर्ज; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून कोण?
Ashok Kharat and Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांच्या अपघाताच्या दिवशी अशोक खरातच्या मोबाईलवर धडाधड मेसेज, अंजली दमानियांचा खळबळजनक दावा
अजित पवारांच्या अपघाताच्या दिवशी अशोक खरातच्या मोबाईलवर धडाधड मेसेज, अंजली दमानियांचा खळबळजनक दावा
Rahul Gandhi on PM Modi: मोदींनी गॅसचे संकट कोरोनासारखं हाताळण्याचे वचन दिलं आणि त्यांनी तेच करून दाखवलं, प्रत्येक संकटात सर्वात आधी गरीबच का मरतात? राहुल गांधींचा प्रहार
मोदींनी गॅसचे संकट कोरोनासारखं हाताळण्याचे वचन दिलं आणि त्यांनी तेच करून दाखवलं, प्रत्येक संकटात सर्वात आधी गरीबच का मरतात? राहुल गांधींचा प्रहार
Mohammed Shami: 'मी काही मशीन नाही...' धडाकेबाज कामगिरीनंतर मोहम्मद शमीचा टीकाकारांवर हल्लाबोल, भविष्यातील प्लॅनही सांगितला
'मी काही मशीन नाही...' धडाकेबाज कामगिरीनंतर मोहम्मद शमीचा टीकाकारांवर हल्लाबोल, भविष्यातील प्लॅनही सांगितला
अमेरिकेची मुख्य अट, इराणच्या सुद्धा अटी अन् 45 दिवस युद्धबंदीचा प्रस्ताव! पाकिस्तान, इजिप्त, तुर्कीच्या पडद्यामागून निकराच्या हालचाली, उद्या संध्याकाळपर्यंत तोडगा निघणार? नेमकं काय घडतंय??
अमेरिकेची मुख्य अट, इराणच्या सुद्धा अटी अन् 45 दिवस युद्धबंदीचा प्रस्ताव! पाकिस्तान, इजिप्त, तुर्कीच्या पडद्यामागून निकराच्या हालचाली, उद्या संध्याकाळपर्यंत तोडगा निघणार? नेमकं काय घडतंय??
Arvind Kejriwal: सीएम ममता बॅनर्जीनंतर आता माजी सीएम अरविंद केजरीवाल हायकोर्टात स्वत: बाजू मांडणार; कथित मद्य धोरण केसमध्ये 'त्या' न्यायमूर्तींना हटवण्याची मागणी करणार
सीएम ममता बॅनर्जीनंतर आता माजी सीएम अरविंद केजरीवाल हायकोर्टात स्वत: बाजू मांडणार; कथित मद्य धोरण केसमध्ये 'त्या' न्यायमूर्तींना हटवण्याची मागणी करणार
Embed widget