एक्स्प्लोर

Music Composer Khayyam | पलके उठा के आप ने जादू जगाये है!

खय्याम साहेबांनी संगीत दिलेल्या 'थोडीसी बेवफाई' या चित्रपटातील 'आंखो मे हमने आपके सपने सजाये है' हे गाणे मला खूप आवडते. प्रणयाची ही उत्कटता आपल्याला स्वत: अनुभवाविशी वाटते. किंबहुना प्रत्येकाच्या आयुष्यात हे क्षण कधी तरी येतातच. या गाण्याशी एक योगायोग जुडलेला आहे.

>> शेखर पाटील

महान संगीतकार खय्याम साहेब गेले. बातमी तशी अनपेक्षित नव्हती. मात्र क्षणार्धात हृदयातून कळ उठली. कोणत्याही कलावंताची प्रत्येक कृती वा रचना ही उच्च दर्जाची असेलच असे नव्हे. म्हणजे महानायक अमिताभचे अनेक चित्रपट व त्यातील भूमिका या भिकार आहेत; मास्टर ए.आर. रहेमानची अनेक गाणी कर्णकर्कश्य आहेत. खरं तर, अशी अनेक उदाहरणे देता येतील. प्रतिभेला ओहोटी लागल्याची चाहूल अचूकपणे ओळखणे; काळाच्या ओघात बदल स्वीकारणे वा आपली सद्दी संपल्याचे लक्षात घेऊन बाजूला होणे या महत्वाच्या बाबी बरेच प्रतिभावंत विसरून जातात. यातूनच बहुतेकांची शोकांतिका होत असते. मात्र आपल्या करिअरमध्ये सूर, ताल, लय आणि गेयता याबाबत कोणत्याही प्रकारची तडजोड न करणारे संगीतकार म्हणून खय्याम ख्यात आहेत. आपल्या प्रदीर्घ कालखंडात त्यांनी मोजके चित्रपट केले. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ते योग्य वेळी थांबले. आता तर त्यांचा जीवनप्रवासही थांबलाय. मात्र त्यांनी रसिकांना जे आनंदाचे क्षण दिलेय ते पाहता खय्याम हे कधीच अजरामर झाले आहेत.

जे आपल्याला नेहमी गुणगुणावेसे वाटते ते गीत सर्वोत्तम अशी माझी सरळसोपी व्याख्या आहे. याचा विचार करता, खय्याम हे माझे सर्वाधिक आवडते संगीतकार आहेत. त्यांची अगदी अनेक डझनवारी गाणी माझ्या हृदयाला स्पर्श करतात. सर्वात महत्वाचे म्हणजे माझ्या सर्व प्ले-लिस्टमध्ये खय्याम यांची बहुतेक गाणी आहेत. वास्तविक पाहता, त्यांचे जवळपास प्रत्येक गीत हे मास्टर पीस आहे. यावर बरेच काही लिहता येण्यासारखे आहे. कभी कभी, नूरी, उमराव जान, बाजार, रझिया सुल्तान आदी चित्रपटांमधील गाणी ऐकतांनाच भावविभोरपणा आपण सर्वांनी नक्कीच अनुभवला असेल. आज खय्याम साब जाण्याची वेदना असली तरी त्यांनी आपल्याला जे काही भरभरून दिले त्याबद्दल कृतज्ञता निश्‍चित व्यक्त करावी लागेल. खय्याम काळाच्या पडद्याआड गेल्यानंतर क्षणार्धात अनेक गाणी आणि त्याच्याशी संबंधीत भावना डोळ्यासमोर तरळून गेल्या. यातील एक गीत हे आपोआप ओठांवर आले.

खय्याम साहेबांनी संगीत दिलेल्या 'थोडीसी बेवफाई' या चित्रपटातील 'आंखो मे हमने आपके सपने सजाये है' हे गाणे मला खूप आवडते. प्रणयाची ही उत्कटता आपल्याला स्वत: अनुभवाविशी वाटते. किंबहुना प्रत्येकाच्या आयुष्यात हे क्षण कधी तरी येतातच. या गाण्याशी एक योगायोग जुडलेला आहे. हे गाणे गुलजार यांनी लिहले असून किशोरकुमार व लता मंगेशकर यांनी गायले आहे. तर नेत्रपल्लवीतल्या प्रेम संकेताबाबत गुलजार यांनीच लिहलेले व किशोर-लता यांनी अमर केलेले दुसरे गाणे ''आप की आंखो मे कुछ महके हुवे से राज है...'' हेदेखील तितकेच सरस गाणे असले तरी याला आर.डी. बर्मन या दुसर्‍या महान कलावंताने संगीत दिले आहे. दोन्हीही गाणी तितक्याच तोलामोलाची....तर या गाण्याकडे वळूया.

या गाण्यासाठी निवडण्यात आलेले स्थान हे स्वप्नातील असून ते स्वाभाविक आहे. नेत्रांमधील जादू अनुभवण्यासाठी स्वप्नाळूपणाच हवा. व्यावहारिक पातळीवर कुणाच्या डोळ्यात डोकावून पाहिले असता आपल्याला काहीही मिळणार नाही. मात्र नायक हा नायिकेला अगदी हळूवारपणे 'पलके उठा के आपने जादू जगाये है...' म्हणतो तेव्हा आपण प्रत्यक्ष ही जादू अनुभवतो हीच खय्याम यांची महत्ता. तर पुढे नायिका 'सपना भी आप ही है...हकीकत भी आप है' असे म्हणून याला नव्या पातळीवर नेऊन ठेवतो. हे गाणे प्रेमाचे विलोभनीय रंग अतिशय मनमोहक पद्धतीत ऐकवणारे/दर्शविणारे आहे. कुणालाही क्वचितच जीवनातील निस्सीम प्रेमाचा हा रंग गवसतो. या क्षणांमधील आसुसलेपण ज्यांना उमगले अन् जे जगले ते भाग्यवान! या गाण्यातील ''ठहरे हुवे पलो मे जमाने बिताये है'' हे वाक्य तर प्रतिभेचे शिखर होय. आता एखाद्या क्षणात फार मोठा कालखंड व्यतीत होईल यावर कुणाचा विश्‍वास बसणार नाही. तथापि, आयुष्यातील हा अत्यल्प विराम आणि यातील स्वप्नश्रुंखलांना या गाण्यातून अजरामर करण्यात आले आहे. यामुळे ''सपनो मे भी ना छुटेगा ये साथ अब कभी'' हे वाक्य फक्त नायिका ही नायकाला म्हणत नाही; तर रसिकही खय्याम साहेबांना म्हणणार आहेत. ते आज शरीराने आपल्यातून गेले असले तरी त्यांचे संगीत हे चिरकाल टिकणारे आहे यात शंकाच नाही. थँक्स खय्याम साब...आमच्या आयुष्यात विलोभनीय रंग भरल्याबद्दल!

(http://shekharpatil.com  वेबसाईटवरून)
View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate : चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि  24 कॅरेटचे दर
चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
PVC Aadhaar Card : PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
ABP Premium

व्हिडीओ

Ravindra Chavan on Vilasrao Deshmukh : आधी टीका जहरी , मग दिलगिरी Special Report
Santosh Dhuri Join BJP : संतोष धुरी यांचा राज ठाकरेंना 'जय महाराष्ट्र' Special Report
Ajit pawar Sinchan Scam : अजितदादांना आतापर्यंत कोणत्या आरोपांत क्लिनचीट? Special Report
Shivaji Maharaj Politics :  नाही कुणा एकाचे, शिवराय सर्वांचे, सी.आर, पाटलांच्या वक्तव्याने नवा वाद Special Report
BJP VS NCP : भाजप-राष्ट्रवादीच्या विचारधारेची वादावादी Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate : चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि  24 कॅरेटचे दर
चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
PVC Aadhaar Card : PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
T20 World Cup 2026 : बांगलादेशनं तडकाफडकी पत्र पाठवलं, आयसीसीची मध्यस्थी, बीसीबी एक पाऊल मागं, भारतात टी 20 वर्ल्ड कप खेळणार? 
BCCI अन् बांगलादेश क्रिकेट बोर्ड यांच्यात आयसीसीची मध्यस्थी, BCB नं वेळ मागितला पण एक अट ठेवली 
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
Embed widget