एक्स्प्लोर

BLOG : बाजारातील तेजीचा फायदा उचलण्यास सज्ज व्हा! 

Share Market Investment: बाजारात साधारण गेल्या काही महिन्यांपासून जरा हिरवळीचे वातावरण बघायला मिळते आहे. म्युच्युअल फंडात मागील तीन वर्षात इक्विटीचा गल्ला प्रामुख्याने वाढलेला आहे. मोठ्या प्रमाणात स्माल कॅपची चलती सगळ्यात जास्त आहे असे काही जाणकार सांगतात. रिटेलचा सतत ओघ आणि त्याउपर मागील चार महिन्यात सातत्याने एफपीआय ज्याला आपण परकीय संस्थात्मक गुंतवणूकदार म्हणतो त्यांनी मार्च ते जून या कालावधीत जवळपास दीड लाख कोटी रुपये भारतीय बाजारात गुंतवले आहेत. याचाच परिणाम हा की निफ्टी 20 हजाराककडे, तर सेन्सेक्स 67 हजारांच्या पलीकडे पोहोचला आहे. आपण केलेली गुंतवणूक ही आता बऱ्यापैकी हिरवळीकडे आलेली आहे. 

2019 च्या आधी ज्यांनी कुणी शेअर बाजारात किंवा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केली असल्यास आज त्यांना बऱ्यापैकी मोठा फायदा झालेला आहे. त्यामुळे 2019 नंतर किंवा कोविडनंतर म्हणा, एक्झिस्टिंग गुंतवणूकदारांना फायदा अधिक झालेला असून,  ज्यांनी ही रॅली मिस केली त्या आणि कोविड नंतरच्या गुंतवणूकदारातली दरी मात्र मोठ्या प्रमाणात वाढली आहे. स्मॉल कॅप कॅटेगरीने मागील पाच वर्षात साधारण 18%, तीन वर्षात साधारण 25%, आणि एका वर्षात 28% टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे. पण लार्ज कॅपबाबत अशी परिस्थिती नाही. एका म्युच्युअल फंड कंपनीने तर थेट मायक्रो कॅप फंड सुद्धा बाजारात आणला आहे. जाणकारांच्या मते ही जी काही रॅली स्मॉल कूप ने पाहिली आहे, ती भविष्यातही पुढे कायम राहू शकते. मग असं असेल तर आपणही आपल्या गुंतवणुकीचा किंवा सिपचा छोटा भाग स्मॉल कॅपमध्ये टाकायला काय हरकत आहे. 

मागील पाच ते सहा सत्रात सातत्याने डीआयआयने विक्री करून नफा बुक केलाय तरीसुद्धा बाजारात तेजीचे घन निनादत आहेत. पहिल्या तिमाहीचे बँकांचे आणि आयटीचे निकाल हे सकारात्मक आणि चांगले लागतील हे बाजाराने आधीच कदाचित विचारात घेतले असूनही हिरवळ बघायला मिळते आहे. त्यात रिलायन्स जियोची बातमी ही एकूण प्रकाराला पूरक ठरली. त्यात आयटीसीसारख्या कंपन्यांनी सेन्सेक्सला अजून गती दिली. येणाऱ्या दिवसात जवळपास  19 वर्षांनी टाटा समूह कुठला आयपीओ घेऊन येतो आहे. तारीख अद्याप निश्चित झालेली नसून चर्चेला मात्र उधाण आलेलं आहे. टाटा टेक्नॉलॉजीस ही टाटा मोटर्सची उपकंपनी आहे. 2030 पर्यंतचा ईव्ही मोटर्सकेंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी ध्यास आहे तो बघून या कंपनीला सुगीचे दिवस असतील असं जाणकार सांगतात. ग्रे मार्केटमध्ये त्याची चर्चा जोरावर आहे. या कंपनीच्या शेअर्ससाठी ग्रे मार्केटची मोठा प्रीमियम मोजायची सुद्धा तयारी आहे. त्यामुळे येणाऱ्या चार पाच महिन्यात हा आयपीओ येणार असेल तर सगळ्यांचे लक्ष त्या आयपीओकडे नक्कीच आहे. 

युक्रेन, रशिया, तेलाच्या किमती, अमेरिका, युरोप ह्या सगळ्यांकडे दुर्लक्ष करत बाजाराची तेजी चालू आहे. पण एक फॉल हा येणाऱ्या दिवसात मिळू शकतो आणि आपण सामान्य गुंतवणुकदार म्हणून आपापल्या सिप मात्र चालूच ठेवल्या पाहिजेत.  फॉल कधी येईल, किती येईल याकडेही लक्ष ठेवावे लागेल  आणि ते आपले दैनंदिन जीवन समजून करणे थोडे फार कठीण जाते. तेव्हा एसआयपी ज्याला आपण सिप (SIP) म्हणतो तो सुरुच ठेवायचा. थेट शेअर बाजारातले गुंतवणूकदार असू तर त्या फॉलसाठी हातात कॅश तयार असू द्या. आपल्या पोर्टफोलिओला साफ करायची संधी ही मिळालेली आहे. तेजीतल्या बाजारात आपल्या पोर्टफोलिओमध्ये जे खराब स्टॉक आहेत ते चांगल्या किंमतीत काढून टाकणं, चांगले समभाग आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेवणं आणि योग्य संधी आली की त्याचा फायदा उचलण्यासाठी तयार असलं पाहिजे. सोनेपण जवळपास साठ हजारांच्या उच्चांकाला पोहचलं असून तिथे सुद्धा झळाळी बघू शकतो. 

तेव्हा एक टर्म प्लॅन, एक हेल्थ प्लॅन, आपल्या सिप, थेट समभाग आणि काही अंशी सोने हा एक परफेक्ट प्लॅटर असू शकतो गुंतवणूकदारांसाठी. यंदाच्या पावसाळ्यात आपला पोर्टफोलिओ रिबिल्ड करून भविष्याची पायाभरणी करायची संधी सोडू नका म्हणजे झालं. तसंही हे निवडणुकांचे वर्ष आहे. त्यात आपल्या कष्टाने कमावलेल्या पैशासोबत योग्य न्याय करणं आपलीच जवाबदारी आहे. बघा पटतंय का?

या लेखिकेचे इतर लेख वाचा: 



अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed : बीडच्या 'त्या' महिलेचा खून? सरपंच हत्या प्रकरणाचे गूढ वाढलं
Beed : बीडच्या 'त्या' महिलेचा खून? सरपंच हत्या प्रकरणाचे गूढ वाढलं
Jail Rules : पती-पत्नी तुरुंगात एकत्रित राहू शकतात का? काय आहेत नियम? 
पती-पत्नी तुरुंगात एकत्रित राहू शकतात का? काय आहेत नियम? 
EPFO चं मोठं पाऊल, ऑटो-सेटलमेंटची मर्यादा 1 लाखांवरुन 5 लाखांवर नेणार, यूपीआय अन् एटीएममधून पैसे काढता येणार
ईपीएफओचे दोन क्रांतिकारी निर्णय, ऑटो-सेटलमेंटची रक्कम 5 लाखांवर नेणार तर....
Indian Army : इंडियन आर्मीमध्ये अग्नीवीर म्हणून काम करण्याची संधी, अर्ज करण्यासाठी राहिले शेवटचे काही दिवस
इंडियन आर्मीमध्ये अग्नीवीर म्हणून काम करण्याची संधी, 21 ते 28 हजार रुपये दरमहा मिळणार, जाणून घ्या प्रक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 60 Superfast News : टॉप 60 बातम्यांचा वेगवान आढावा : 31 March 2025 : ABP MajhaDisha Salian Case : दिशा सालियन प्रकरण 2 माजी सहाय्यक पोलीस आयुक्तांनी वकील ओझांना पेनड्राईव्ह दिलाMahadev Gitte :कराडच्या लोकांनी महादेव गित्तेसह इतरांना मारहाण केली, गित्तेच्या पत्नीनं फेटाळला आरोपJob Majha | भारतीय रेल्वे मध्ये भरती | नोकरीची संधी | 31 March 2025 | ABP Majha

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : बीडच्या 'त्या' महिलेचा खून? सरपंच हत्या प्रकरणाचे गूढ वाढलं
Beed : बीडच्या 'त्या' महिलेचा खून? सरपंच हत्या प्रकरणाचे गूढ वाढलं
Jail Rules : पती-पत्नी तुरुंगात एकत्रित राहू शकतात का? काय आहेत नियम? 
पती-पत्नी तुरुंगात एकत्रित राहू शकतात का? काय आहेत नियम? 
EPFO चं मोठं पाऊल, ऑटो-सेटलमेंटची मर्यादा 1 लाखांवरुन 5 लाखांवर नेणार, यूपीआय अन् एटीएममधून पैसे काढता येणार
ईपीएफओचे दोन क्रांतिकारी निर्णय, ऑटो-सेटलमेंटची रक्कम 5 लाखांवर नेणार तर....
Indian Army : इंडियन आर्मीमध्ये अग्नीवीर म्हणून काम करण्याची संधी, अर्ज करण्यासाठी राहिले शेवटचे काही दिवस
इंडियन आर्मीमध्ये अग्नीवीर म्हणून काम करण्याची संधी, 21 ते 28 हजार रुपये दरमहा मिळणार, जाणून घ्या प्रक्रिया
धक्कादायक! भावी नवऱ्यालाच संपवण्याची सुपारी दिली; नवरी फरार, मारहाण करणाऱ्या 5 जणांना अटक
धक्कादायक! भावी नवऱ्यालाच संपवण्याची सुपारी दिली; नवरी फरार, मारहाण करणाऱ्या 5 जणांना अटक
Dattatray Bharne : पुण्यात पवार,पाटील-देशमुखांना न मिळालेली पदं मला नशिबाने मिळाली; मंत्री झाल्यानंतर दत्तामामा भरणेंना अजितदादांचा विसर? 
पुण्यात पवार,पाटील-देशमुखांना न मिळालेली पदं मला नशिबाने मिळाली; मंत्री झाल्यानंतर दत्तामामा भरणेंना अजितदादांचा विसर? 
Kunal Kamra : 10 वर्षांपासून जिथं राहत नाही तिथं, जाऊन येणं म्हणजे...कुणाल कामराची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत
10 वर्षांपासून जिथं राहत नाही तिथं, जाऊन येणं म्हणजे...कुणाल कामराची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत
संतोष देशमुखांना अडकवण्याचा प्लॅन असलेल्या कळंबच्या महिलेची हत्या? धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
संतोष देशमुखांना अडकवण्याचा प्लॅन असलेल्या कळंबच्या महिलेची हत्या? धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
Embed widget