BLOG : ज्युलिया डुकार्नोचा डार्क हॉरर
BLOG : जगभरातल्या फ़िल्म फ़ेस्टिवल सर्कलमध्ये ज्युलिया डुकार्नो हे नाव गाजतंय. तिला कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये टिटान (2021) साठी सर्वोत्कृष्ठ दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला. नावाचा डंका होण्यामागे हे एक कारण आहेच. पण याही पेक्षा महत्त्वाचं कारण ठरलंय तिच्या सिनेमांचे विषय. सुरुवातीपासून सिनेमा दिग्दर्शनात पुरुषांची मक्तेदारी होती. जगभरातल्या काही महिला दिग्दर्शकांनी त्याला छेद दिला. एग्नेस वार्दा, शांताल आकेरमन, कॅथरीन बिगलो सारख्या असंख्य महिला दिग्दर्शकांनी सिनेसृष्टी गाजवली. यातल्या शांताल आकेरमननं आपल्या सिनेमातून महिलांची सेक्सुएलिटी आणि त्याचा जो ऑनस्क्रिन अविष्कार केलाय त्याला तोड नाही. शांतालच्या सिनेमांवर जगभरात अभ्यास होतोय. ज्युलिया डुकार्नो ही फ्रेंच दिग्दर्शिका ही शांतालच्या पावलांवर पाऊल पुढे जातेय. तिच्या नायिकाप्रधान सिनेमांमधली मुख्यय पात्रं विचित्र-विक्षिप्त असली तरी त्यासाठी ज्युलियाची बाजू स्पष्ट आहे. मग तो रॉ (2016) असो किंवा मग टिटान (2021).
ज्युलियाचे दोन्ही सिनेमे हॉरर जॉन्रात मोडतात. भयपट सिनेमा बघून घाबरायला होते. भयपटांमध्ये साधारणपणे आवाज़ किंवा सिनेमाच्या भाषेत बोलायचं झालं तर साऊंड इफेक्टचा वापरुन भीती तयार केली जाते. यामुळंच फिल्म पाहताना अनेकजण हात डोळ्यावर घेऊ बोटांच्या फटीतून हे भयंकर सीन पाहताना दिसतात. पडद्यावर घडणाऱ्या घडामोडी आणि आवाजानं त्यांच्या मेंदूचा ताबा घेतलेला असतो. तिथं ऑलरेडी केमिकल लोचा सुरु झालेला असतो. मनातून घाबरलेला हा प्रेक्षक आवाजामुळं थरथर कापू लागतो. त्याला भीती ही वाटत असते आणि त्याचबरोबर सिनेमा पाहण्याचा आनंद ही तो लुट असतो. असं परस्पर विरोधी भावना त्याच्या मनावर राज्य करु लागतात.
भयपटाचे हे नियम ज्युलियाच्या सिनेमांना लागू होत नाही. त्यातली घाबरण्याची प्रक्रिया पाहणारा प्रेक्षक आणि सिनेमाची नायिका यांच्यात तयार झालेल्या भन्नाट रिलेशनशीपमधून होते. रॉ आणि टिटान बारकाईनं पाहिला तर हे स्पष्ट होतं. ज्युलिया आधी आपल्या सिनेमाच्या हिरॉईन सोबत प्रेक्षकांना भावनिक गुंतवते आणि त्यानंतर भीतीची इकोसिस्टम तयार करते. या दोन्ही सिनेमांमध्ये ज्युलियानं भीतीचं जे जग तयार केलं आहे त्याला तोड नाही. सिनेमाच्या कथेत ती प्रेक्षकांना अशी काही गुरफटून टाकते की त्यातून मनाची कित्येक तास सुटका होणं शक्य नसतं. या पात्राच्या प्रेमात पडण्याची प्रक्रिया तिच्या स्क्रिनप्लेची खासियत आहे. याच्याच जोरावर ज्युलियानं जगभरात आपला फॅनफॉलोवर वाढवला आहे.
ज्युलियाचं म्हणणं आहे की माझ्या सिनेमांचं कथानक डार्क असतं हे मान्य आहे. आपण सर्वच या डार्क फेजमधून जात असतो. डार्कला आणखीन गडद बनवताना मी तिथं प्रकाशाची ही संधी निर्माण करते. त्यामुळं प्रेक्षकांना या कथानकांशी जुळवून घ्यायला, माझ्या पात्रांशी एकरुप व्हायला मदत होते. लेट देअर बी लाईट म्हणताना तो त्या पात्राच्या डार्कर जगाचा भाग होतो. त्याचा विचार करायला लागतो आणि त्यातून पात्राची आणि स्वताची सुटका करुन घेण्याची धडपड करायला लागतो. मला वाटतं हे असं घडणं म्हणजेच माझ्या सिनेमाचं यश आहे.
या आधी जेन कॅम्पीयन या महिला दिग्दर्शिकेला द पियानो (1993) या सिनेमासाठी कान्स फ़िल्म फेस्टिवलचा पाम दो पुरस्कार मिळाला होता. तो 28 वर्षांनी ज्युलियाला टिटान (2021) सिनेमासाठी मिळाला. टिटानकडे या वर्षभरातला महत्त्वाचा सिनेमा म्हणून पाहिला जातोय. कान्ससोबत जगभरातले सर्वच महत्त्वाचे फिल्म फेस्टिवल टिटानने गाजवले.
हॉरर जॉन्रा आणि महिला दिग्दर्शिका असा जेव्हा विचार होतो तेव्हा सध्या ज्युलियाचा नंबर सर्वात वरचा लागतोय. तिच्या सिनेमातले स्त्री-पुरूष संबंध ही अगदी सहज नाहीयत. त्यात एक टेन्शन आहे. सिनेमातली नाती ते मग कुठलीही असोत. ती एकमेकांना समजावून घेण्याची प्रक्रिया ही किचकट पण प्रभावी आहे. रॉ (2016) सिनेमातली अलेक्सिया आणि जस्टीन या दोघी बहिणींचा प्रवास परस्पर उलटा सुरु असतो. माणसातल्या हिंस पशूगत स्थितीतून जाताना ही दोन्ही पात्रं अगदी परस्पर विरोधी दिशेने पुढे सरकतात. इथं जनावरांपासून माणूस बनण्याची आणि थेट त्या उलटी प्रक्रिया होते. टिटानमधल्या एलेक्सियाचं कॅरेक्टर ही माणूसपणातून यांत्रिक आणि नंतर पुन्हा माणूसपणाकडे जातं. या सर्व प्रकारात तिच्यातला डार्कनेस हा तिला सिरीयल किलर बनवतो आणि पुढे तोच यातून बाहेर पडण्यासाठी मदत ही करतो. या दोन्ही सिनेमाच्या कथा या पठडीत न बसणाऱ्या पण त्याच बरोबर अस्सल सिनेमॅटीक करताना ज्युलियानं दिग्दर्शक म्हणून आपली जी कसोटी लावलेय ती प्रचंड आहे.
ज्युलियाचे सिनेमे न आवडणारे लोकही तिला भेटतात. या सिनेमांना आणि त्यातल्या कॅरेक्टर्सना अवाजवी हिंसक असं ही ते म्हणतात. ज्युलियाचं यावर एकच म्हणणं आहे. ‘हा माझ्या विचारांमधून घडणारा सिनेमा आहे. हे माझं विचारविश्व आहे. यात तुमचं स्वागत आहे. ते प्रत्येकाला आवडायलाच हवं असा काही आग्रह नाही.’ज्युलिया सांगते, ‘एका सिनेमाकडून दुसऱ्या सिनेमाकडे जाण्याची तिची प्रोसेस फार सोपी आहे. जिथं पहिला सिनेमा संपतो तिथं सोडलेले कॅरेक्टर, प्रसंग आणि विचार आणखी प्रगल्भ कसे होतील, पुढे कसे जातील याची प्रक्रिया सुरु होते. अशावेळी रॉ आणि टिटानच्या मुळ संकल्पनेत समानता दिसत असेल. पण टिटान रॉच्या पुढचा आहे. त्यातला थॉट हा वेगळा आणि वेगळ्या पार्श्वभूमीचा आहे. यानंतर ही जे सिनेमे घडतील ते माझ्या विचारांना आणि दिग्दर्शक म्हणून मला विचारांच्या एका प्रवाहातून दुसऱ्या प्रवाहात नेताना त्यांची गती आणि कमी किंवा जास्तपण असाच फक्त फरक असू शकेल. प्रत्येक डायरेक्टर हा याच प्रक्रिएतून जात असतो. तो विचारांवर थांबतो किंवा मग त्यांना ल् चौफेर उधळवून टाकतो. हीच सिनेमा या माध्यमाची गम्मत आहे.