एक्स्प्लोर

महापुरात होतं नव्हतं सगळं गेलं, उरल्या फक्त वेदना!

लोकांच्या रोजगाराचे साधन शेतीतील ऊस आणि शेतीवर आधारित दूध होत. पीक तर गेले पण जनावरं पण दगावली. जी जनावर वाचली त्यांची आता तब्येत खराब आहे. त्यामुळे लोक चिंताग्रस्त आहेत. कुरुंदवाडमधील सैनिक शाळा तर इथे सर्वांसाठी घर बनली होती. आजही विविध सामाजिक संस्था या शाळेच्या माध्यमातून आसपास मदतकार्य करत आहेत.

कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातील पुराला आता एक महिना उलटून गेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून या जिल्ह्यांना मदत मिळाली. पूरग्रस्तांना कपडे, अन्नधान्य, औषधांपासून सामान्य नागरिक, एनजीओ, नगरपालिका, महापालिका येथील डॉक्टर ते सफाई कर्मचारी हे सगळे गेल्या एक महिन्यात या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी उभे राहिले, त्यांना आधार दिला. एक महिन्यानंतर आता पूरग्रस्त भागात काय परिस्थिती आहे, किती मदत पोहोचली, अजून काय मदतीची आवश्यकता आहे, हे पाहण्यासाठी शिरोळ तालुक्यात जाण्याची संधी मिळाली. या तालुक्यतील आलास आणि बस्तवड गावात फिरले.

या गावात कुरुंदवाडमधून जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला ऊसाचे मळे दिसले. पण संपूर्ण पीक चिखलात. आसपास हिरवळ होती, पीके मात्र सगळी चिखलाच्या गाळाने सुकली आहे. जागोजागी पूर आल्याच्या खुणा होत्या. मोठे मोठे विजेचे खांब पडले, तारांवर चारा, झाड झुडपांमधील कचरा, प्लास्टिक दाखवत होता की भागात किती पाणी भरलं होतं. कुरुंदवाडमध्ये पडलेली घरंही पाहायला मिळाली. इथे तर पावसाने मंदिराला पण झोडपले. देव पण मंदिरात उरला नाही. लोक पाणी ओसरल्यामुळे आपल्या घरात गेले तरी कुठे पडलेली घरं, कुठे घराला पडलेल्या भेगा यामुळे गावात निराशा जाणवली.

महापुरात होतं नव्हतं सगळं गेलं, उरल्या फक्त वेदना!

आलास गावातील सरपंच त्यांना विशेष माहिती नाही. तिथले उपसरपंच मखमल्ला हे माजी सैनिक. आता गावासाठी तेच काम करतात. ते म्हणाले "सरकारने सांगावं आम्ही पूरग्रस्त की धरणग्रस्त? अलमट्टी धरणातील पाण्यामुळे पूर आला, कोणी वेळीच काळजी घेतली नाही. राजकारणामुळे सामान्य जनतेला फटका बसला." या गावात सरपंच, उपसरपंच सगळ्यांच्या घरात पाणी शिरलं. डोळ्यासमोर शेतातील पीके गेली.

या गावाची लोकसंख्या साधारण आठ हजार, गावातील 168 घर पडल्याची माहिती उपसरपंचनी दिली. सरकारने सांगितलं की, लोकांना घरभाडे देणार, घरांसाठी मदत मिळणार पण पूर झाल्यावर सरकारकडून जी प्राथमिक पाच हजार रुपयांची मदत मिळाली ती तेवढीच. घरांबाबत अजूनही चित्र स्पष्ट नाही. या पूर भागात गेले एक महिना मदतकार्य करणारे मैत्री संस्थेचे राजेश वारंगे सांगतात, "इथल्या लोकांना घर ही आता प्राथमिक गरज आहे आणि त्याबाबत सरकारकडून वेळीच माहिती मिळत नसल्यामुळे गोंधळाचे वातावरण आहे. काही गावात व्हॉट्सअॅपवरुन मेसेज आले की घर बांधायला सरकार एक लाख देणार, कुणी सांगतं 20 हजार देणार म्हणून लोकांमध्ये संभ्रम आहे."

सरकारकडून जे घरांचे पंचनामे झाले त्यातही कोणाच्या घराला किती नुकसान झालं, हा आढावा घेण्यात आला आहे. काही घरांची एक भिंत पडली किंवा काही घराना तडे गेले. पण मदत मिळेपर्यंत घराचं अधिक नुकसान होण्याची शक्यता आहे. 'मैत्री'च्या विनिता तटके ज्यांनी केरळ आणि कोल्हापूर पुरामध्ये मदत करण्याचा अनुभव आहे, त्यांनी सांगितले "पंचनामे झाले तरी तेव्हा घराची परिस्थिती आणि मदत मिळेपर्यंत कदाचित घराचे नुकसान वाढलं असणार त्यामुळे या पंचनाम्यामुळे लोकांना योग्य ती मदत मिळेल का हा प्रश्न आहे. सरकारने पंचनामे आणि त्या आधारित घरांना मदत दिली तर ते योग्य असू शकणार नाही."

या गावात अडीच ते तीन हजार एकर उसाचे पीक होते. ते सगळे पीक आता चिखलात गेले. लोकांकडे आता रोजगार नाही, या गावातील 250-300 तरुण जवळच्या जयसिंगपूर MIDC मध्ये काम करतात. पण आता मंदीमुळे त्यांनाही कामावर येऊ नका, असं सांगण्यात आल्याची माहिती उपसरपंच मखमल्ला यांनी दिली. त्यामुळे डोळ्यासमोर पडलेले घर, हातात आलेलं पण आता वाया गेलेलं पीक यामुळे लोकांपुढे पुढे करायचं काय हा प्रश्न आहे.

महापुरात होतं नव्हतं सगळं गेलं, उरल्या फक्त वेदना!

बस्तवड गावात हीच स्थिती. घरं पडली आहेत. गावातील 30 जनावर दगावली आहेत. जनावर अनेक दिवस पावसात उभी राहिल्याने त्यांना त्रास झाला आणि आता ते बसले तर उठत नाही. या जनावरांची तब्येत सुधारण्याची शक्यता देखील कमी असल्याचे इथले ग्रामसेवक यांनी सांगितलं. गावाच्या बाहेर एक खड्डा खणून त्यात मेलेल्या जनावरांना पुरण्यात आले आहे. गावाबाहेर दूर गावातील लोकांचे बिछाने, कपडे, वस्तू जाळण्यात येत आहेत. गावातील गाळ काढला असला तरी पुरात वाहून गेलेल्या वस्तूंची विल्हेवाट लावणे हे मोठं आव्हान आहे. याबाबत सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे. अजून गावात रोगराई दिसली नाही, पण गावातील या कुजलेल्या गोष्टींची विल्हेवाट नीट लावली नाहीतर लोकांना त्रास होऊ शकेल. अजून ही काही ठिकाणी पाणी तुंबलेले दिसते.

या भागातील लोकांच्या रोजगाराचे साधन शेतीतील ऊस आणि शेतीवर आधारित दूध होत. पीक तर गेले पण जनावरं पण दगावली. जी जनावर वाचली त्यांची आता तब्येत खराब आहे. त्यामुळे लोक चिंताग्रस्त आहेत. कुरुंदवाडमधील सैनिक शाळा तर इथे सर्वांसाठी घर बनली होती. आजही विविध सामाजिक संस्था या शाळेच्या माध्यमातून आसपास मदतकार्य करत आहेत. या शाळेतील शिक्षक सांगत होते की आम्ही मुलांच्या घरी गेलो, घर पडली आहेत, पालक आणि मुलं तशीच पडलेल्या घरात किंवा इतरांच्या घरात राहतात. प्राथमिक चाचणी आता झाली पण विद्यार्थी विशेष मनस्थितीत नव्हते. घरच्या परिस्थितीचा परिणाम त्यांच्यावर झालाय, पण मुलांना तरी आम्ही शाळेत पाठवण्याची विनंती पालकांना करतो. त्यामुळे काही प्रमाणात विद्यार्थी इथे रमतील.

इतकं असूनही गावात घरात गणपती आले आहेत. सार्वजनिक गणपतींची पूजा होत आहे. यावेळी उत्साह जरी कमी असला तरी गावातील लोक त्यांच्याकडे गेल्यावर अगत्याने चहा विचारत होते. पडलेली घर दाखवताना त्यांना वेदना होत्या. कुणी आपलं घर बांधून देईल, हीच अपेक्षा त्यांना आहे. पूर आला तेव्हा भरघोस मदत लोकांनी दिली. आता पूर ओसरला, लोक घरात गेली पण रोजच्या जगण्याचे प्रश्न त्यांच्यासमोर आहेत. घर गेलं, रोजगार गेला त्यामुळे आम्ही 10-15 वर्षे मागे फेकलो गेल्याची भावना अनेकांनी बोलवून दाखवली.

नेमकी मदत कोणती?

सरकारकडून घरं बांधून देणे, त्याबाबत करण्यात येणारी आर्थिक मदत आणि तोपर्यंत दिले जाणारे भाडे याबाबत प्रचंड गोंधळ आहे. याबाबत सरकारी यंत्रणांनी गोष्टी स्पष्ट केल्या तर लोकांना दिलासा मिळेल. सामाजिक संस्था किंवा मोठ्या कंपन्यांनी आपल्या CSR फंडातून घरं बांधायला मदत केली तर येथील लोकांना खूप मदत होईल.

रोजगाराची खूप मोठी समस्या या भागात आता निर्माण झाली आहे. ऑक्टोबरमध्ये साखर कारखान्याला ऊस गेला असता आता लोक करणार काय? MIDC मध्ये पण काम नाही त्यामुळे तरुणांनी जायचे कुठे हा प्रश्न आहे. गावातील जुनं सामान, जनावर यांची विल्हेवाट अशीच लावली जात आहेत, त्याबाबत राज्य सरकारने ठोस कृती कार्यक्रम आखला पाहिजे. गावपातळीवर सरपंच आपल्या पद्धतीने विल्हेवाट लावत आहेत, ती शास्त्रीय पद्धत नाही.

या गावातून फिरताना एक पोलीस आमच्या मागावर होते, कळेना की ते आम्ही जिथे जातो तिथे का येत होते. आम्ही गावातून निघणार तेव्हा ते पुढे आले आणि म्हणाले. माझं घर कुरुंदवडीला आहे, बघाल का? मी ड्युटीवर होतो, दोन दिवसांनी घरी संपर्क झाला. तेव्हा कळलं घर पडलं. मला सुट्टी नाही, मी ड्युटीवर आहे. पण काही मदत मिळाली तर बरं होईल. 34 वर्ष होमगार्डमध्ये नोकरी करणाऱ्या त्या काकांना पाहून मन हेलावून गेलं. पुराने परिस्थिती अशी आणली की श्रीमंत, गरीब सुशिक्षित-अशिक्षित, कोण कुठल्या जातीचा सगळेच संकटात आहेत. त्यांना आता आपल्या पायावर उभे करण्याची, आत्मविश्वास देण्याची गरज आहे. ही मदत समाज म्हणून आपण करणार का?

अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aaditya Thackeray : धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यापासून मुख्यमंत्र्यांना कोण अडवतंय? ABP MAJHAABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 7 AM : 18 Jan 2025 : ABP MajhaTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : Maharashtra News : ABP MajhaABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 6.30 AM : 18 Jan 2025 : ABP Majha : Maharashtra

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Embed widget