एक्स्प्लोर

तिळगुळाची गोडमिट्ट फॉरमॅलिटी

कम्युनिकेशनच्या अद्ययावत साधनांमुळे जग जितकं जवळ आलंय तितकीच माणसं एकमेकांपासून दूर चालली आहेत. माणसं दुतोंडी आणि अधिकाधिक दांभिक होत चालली आहेत. "तोंडावर एक आणि पाठीमागं भलतंच" असं वागणारे बहुरुपी, तोंडाचं गटार सतत उघडं ठेवून भोवताल दुर्गंधीत करणारी माणसं वाऱ्याच्या वेगानं वाढत आहेत.

"तिळगूळ घ्या गोड गोड बोला"  म्हणत दरवर्षीप्रमाणे याहीवर्षीची  मकरसंक्रांत उत्साहाच्या उधाणात, तिळगुळाच्या धुवांधार वर्षावात न्हाऊन निघाली. व्हॉट्सअप, फेसबुकवर तिळगुळाने भरलेली ताटं, गोडमिट्ट शब्दांच्या शुभेच्छाच्या इमेजेससह या ग्रुपवरुन त्या ग्रुपवर कोलांट्याउडया मारत दिवसभर फिरली. डोळे झाकून इकडचा मजकूर तिकडे आहे तसा कॉपी पेस्ट केला गेला. एकदिवसीय शुभेच्छांची स्टेटसरुपी सुभाषिते तिळगुळांच्या लाडूंच्या सोबतीनं भाव खाऊन गेली. ज्यांनी स्वतःच्या घरातील लाडवांनी भरलेल्या ताटाचा फोटो अपलोडलेला होता त्यांनाच तो फोटो शुभेच्छा रुपात परतही आला. त्या सगळ्या गोडगोड आभासी शुभेच्छांचा आज ई-कचऱ्यात समावेश झाला आहे. ही शुभेच्छांची देवाणघेवाण किती अल्पजीवी आहे हे न कळण्याइतके कुणी दुधखुळे नक्कीच नाही. पण असो. आजच्या फास्ट फॉरवर्ड जमान्याचं हे एक व्यवच्छेदक लक्षणच आहे म्हणा. घराघरातील स्त्रियांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मागचा आठवडाभर खपून तिळगुळाच्या वड्या बनवल्या, लाडू वळले. हात दुखवून घेतले. ज्या स्त्रियांना हा उपद्व्याप जमला नाही त्यांनी रेडिमेड गोडवा खरेदी केला. आप्त स्वकियांच्या, मित्र मैत्रिणींच्या घरी मोठ्या हौसेनं पाठवून दिला. तोच गोडवा दूरच्या नातेवाईकांना ही कुरियर केला गेला. तिळातली स्निग्धता आणि गुळाची गोडी जितक्या हातात पोहोचवता येईल तितकी पोहोचवली.  घराघरातील बरण्या अक्षरशः रिकाम्या केल्या. आपापल्या पाककौशल्याची लाईक्सरुपी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे तारीफही करवून घेतली.  तर तेही असोच. कळीचा मुद्दा हा की कालच्या तिळगुळामुळे नेमकं काय साधलं?  किती जणांची तोंडं खरच गोड झाली? किती जणांमधली भांडणं मिटली? किती जणांनी बिघडलेले संबंध सुधारण्यासाठी पहिले पाऊल उचलले? किती जणांनी आपल्या मनातला दुसऱ्या बद्दलचा राग-रुसवा धुवून टाकला? कितीजणांनी तोंडाला येईल तेंव्हा इतरांच्या नावानं शिव्यांची लाखोली वाहायची नाही अशी प्रतिज्ञा केली?  खपून तिळगुळाचे लाडू वळणाऱ्या आणि घरोघरी वाटणाऱ्या किती स्त्रियांनी दुसऱ्या स्त्रियांविषयी कुत्सितपणाने बोलायचं नाही, उठल्या बसल्या टोमणे मारायचे नाहीत, तोंडावर गोड आणि पाठीमागे गॉसिप करायचं नाही असं ठरवलं? आणि किती जणींनी एकमेकींविषयी चहाड्या-चुगल्या करायच्या नाहीत, एकमेकींमध्ये भांडणं लावायची नाहीत असं स्वतःच्या मनाला बजावलं? तोंडाला येईल ते बोलून समोरच्याच्या काळजावर घाव घालणाऱ्या किती जणांनी जिभेवर ताबा मिळवण्याची शपथ घेतली?  या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अधिकतर नकारार्थीच असतील. अलीकडे खरं न बोलता बरं म्हणजेच समोरच्याला ऐकायला गोड वाटेल असंच बोलणं रूढ होत चाललं आहे. कारण गोड बोलून समोरच्यावर मोहिनी घालणं, त्याला अंकित करुन घेणं हा बऱ्याचदा त्यापाठीमागचा हेतू असतो. ही फॉर्मलिटी समोरच्याकडून काहीतरी साध्य करून घेण्यासाठीही असते. या हेतुपायी आपण समोरच्यावर कितीही स्तुतीसुमनं उधळायची झाली तरी मागे हटत नाही. खरं बोलून कशाला कुणाचं मन दुखवा असा विचार करणारा जसा एक वर्ग आहे तसंच उठता लाथ बसता बुक्की या उक्तीप्रमाणे उठता बसता वाईटसाईट बोलणारा, कुचकेपणे विनाकारण टोमणे मारणारा, दुसऱ्याच्या आनंदात आपल्या विषारी शब्दांचं विरजण टाकणारा एक वर्ग आहे. कुठे काय चांगलं घडताना दिसलं की त्याचा बिमोड करायला यांच्या जिभा सरसावतात. हा गुण पुरुषांपेक्षा स्त्रीवर्गामध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो. सून कितीही चांगली वागली तरी तिच्यावर दिवस उगवल्यापासून तो मावळेपर्यंत तोंडाचा बेबंद पट्टा चालवणाऱ्या सासवा आहेत तशा सासू मवाळ असली तरी आपला जहालवाद तिच्यावर लादणाऱ्या सुनाही आहेत. नणंद-भावजय, जावा- जावा या नात्यांमध्येही टोकाचा जळकुटेपणा आणि वर्चस्ववादी वृत्ती दिसून येते. सतत एकमेकांबद्दल आकस बाळगणे, मत्सर करणे, एकमेकींची उणीदुणी काढणे, एकमेकींवर शब्दांच्या धारदार तलवारी चालवून घायाळ करणे अशा वृत्तीमुळे नात्यांची माती व्हायला जराही वेळ लागत नाही. आणि गमतीची गोष्ट अशी की संक्रांतीला तिळगूळ वाटप मोहिमेत याच स्त्रिया आघाडीवर असतात. केवळ स्त्रियांजवळच सगळ्या अवगुणांची जंत्री आहे आणि पुरुष साधू संत आहेत अशातला भाग नाही. महत्वाची कामं सोडून सतत दुसऱ्यावर तोंडसुख घेण्यात स्त्रियांचा हात कुणी धरु शकणार नाही. आमच्या शेजारी पूर्वी एक सुशिक्षित कुटुंब राहायचं. त्या घरातील काकू रोज त्यांच्या दारातील झाडांचा पालापाचोळा गोळा करून आमच्या दारात आणून टाकायच्या पण संक्रांतीला मात्र न चुकता प्लेट भरून तिळगुळाचे लाडू आणून द्यायच्या. "आमचे तीळ सांडू नका आमच्याशी भांडू नका." हे पूर्वापार चालत आलेलं पालुपद प्लेट हातात देताना अगदी न चुकता उच्चारायच्या. त्यांनी वैयक्तिक अडचणीमुळे घर बदललं पण आजही मला प्रत्येक संक्रांतीला त्यांची हटकून आठवण येते. संक्रांतीच्या निमित्ताने आपण सगळ्यांनी अगदी त्या काकूंसारखी तीळगुळाची गोडमिट्ट फॉर्मलिटी तेवढी काल पूर्ण केली आहे. संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशीपासून पुन्हा मूळ पदावर येऊन आपली मनं आणि जीभ पुन्हा कडवटच. एका दिवसापुरता फक्त गुळाचा गोडवा, तिळातला स्नेह आपण सगळ्यांच्या जिभेवर टेकवला. व्हर्चुअल शुभेच्छांचा जसा काही सेकंदात कचरा झाला तसाच तंतोतंत आपल्या मनातील भावनाही आपण पुन्हा वर्षभरासाठी अडगळीत टाकून दिल्या. नाही का! दुसऱ्याची प्रगती पाहून तोंडदेखलं अभिनंदन करत मनातल्या मनात जळून राख होणे, सतत समोरच्यापेक्षा वरचढ ठरण्याचा अट्टाहास करणे आणि त्यासाठी कुठल्याही थराला जाण्याची तयारी ठेवणे या गोष्टी माणसाला माणसापासून कोसो दूर नेत आहेत. आपल्याला स्वतःच्या प्रगतीपुढे नाती, मैत्री अधिक महत्वाची वाटेनाशी झाली आहेत. आपण सतत समोरच्याला दाखवत असतो तू किती माझ्यासाठी महत्वाचा/महत्वाची आहेस, तुझ्या यशाने मला किती पराकोटीचा आनंद होतोय आणि आपलं नातं कसं जगावेगळं आणि घट्ट आहे वगैरे वगैरे. आपली मैत्री, आपली नाती निस्वार्थी, पवित्र असल्याचा गवगवा आपण नित्यनेमाने सोशल मिडियावर करत असतो पण खरंच कुठल्याही नात्यात आपण दाखवतो तेवढे प्रामाणिक असतो का? की समोरच्या व्यक्तीकडून आपल्याला काही स्वार्थ साधून घ्यायचा असतो म्हणून आपण मधाहूनही गोड बोलण्याचं नाटक करत असतो? की या सगळ्यामागे फुकाची दिखाऊगिरी असते? कम्युनिकेशनच्या अद्ययावत साधनांमुळे जग जितकं जवळ आलंय तितकीच माणसं एकमेकांपासून दूर चालली आहेत. माणसं दुतोंडी आणि अधिकाधिक दांभिक होत चालली आहेत. "तोंडावर एक आणि पाठीमागं भलतंच" असं वागणारे बहुरुपी, तोंडाचं गटार सतत उघडं ठेवून भोवताल दुर्गंधीत करणारी माणसं वाऱ्याच्या वेगानं वाढत आहेत. सण समारंभाचे मूळ उद्देश बाजूला तर पडले आहेतच शिवाय त्याचं ओंगळवाणं बाजारीकरण झपाट्यानं होत आहे. या सर्वबाजूंनी बिघडत चाललेल्या वातावरणाला दुसरं तिसरं कुणी नाही तर तुम्ही, मी, आपण सगळेच जबाबदार आहोत. आपण बहुरुपी आहोत, दांभिक आहोत, दुतोंडी आहोत, आपण खरं बोलण्यापेक्षा गोड बोलून आपला हेतू साध्य करणारी आपमतलबी जमात आहोत. "सण समारंभाच्या पूर्वापार चालत आलेल्या परंपरागत कृती करून वेळ, पैसा, श्रम वाया घालवण्यापेक्षा त्यांचा मूळ उद्देश अमलात आणूया." असा साधा  विचारही आपल्या मनाला शिवत नाही म्हणूनच आपल्याला कुणाचे तरी उसने शुगरकोटेड शब्द वापरून संक्रांतीच्या घिस्यापिट्या शुभेच्छा द्यायची गरज पडते आणि सोबतच तिळगुळाची गोडमिट्ट फॉर्म्यालिटीही पार पाडावी लागते. - कविता ननवरे (लेखातील मते लेखिकेची वैयक्तिक आहेत.)
View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bihar Election 2025: जीतनराम  मांझी यांच्या पक्षाच्या आमदारावर दगडफेक अन् गोळीबार, प्रचारावेळी गावकरी आक्रमक
जीतनराम मांझी यांच्या पक्षाच्या आमदारावर प्रचारावेळी हल्ला, दगडफेकीनंतर गोळीबार झाल्याचा दावा
Sharad Pawar: देवेंद्र फडणवीस क्रिकेटच्या मैदानात राजकारण करणार नाहीत; शरद पवारांनी टाकली 'गुगली'
देवेंद्र फडणवीस क्रिकेटच्या मैदानात राजकारण करणार नाहीत; शरद पवारांनी टाकली 'गुगली'
मविआ आणि मनसेच्या मोर्चापूर्वीच राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल,  मतदार यादीतील संभाव्य दुबार नावांबाबत मोठा निर्णय
मविआ आणि मनसेच्या मोर्चापूर्वीच राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, मतदार यादीतील संभाव्य नावांबाबत मोठा निर्णय
महिला डॉक्टर मृत्यूप्रकरणात बजरंग सोनवणेंची एन्ट्री; पीडित कुटुंबीयांची भेट, चाकणकरांसह मुंडे बंधू-भगिनींवर हल्लाबोल
महिला डॉक्टर मृत्यूप्रकरणात बजरंग सोनवणेंची एन्ट्री; पीडित कुटुंबीयांची भेट, चाकणकरांसह मुंडे बंधू-भगिनींवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Asian Youth Games: मुंबईच्या श्रिया साटमची 'सिल्व्हर' कामगिरी, MMA मध्ये भारताला ऐतिहासिक पदक
MCA Elections: 'क्रिकेटमध्ये राजकारण नको', Sharad Pawar यांचे संकेत, Ajinkya Naik पुन्हा अध्यक्ष होणार?
ICC Rankings : 'हिटमॅन' Rohit Sharma आता जगात भारी, Sachin Tendulkar यांना मागे टाकत रचला विश्वविक्रम!
CWC25 Semi-Final: Laura Wolvaardt च्या अविश्वसनीय खेळीने रचला इतिहास, South Africa पहिल्यांदाच World Cup फायनलमध्ये!
Child Safety: वसईतील 'अमेय क्लब'च्या स्विमिंग पूलमध्ये साडेतीन वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Election 2025: जीतनराम  मांझी यांच्या पक्षाच्या आमदारावर दगडफेक अन् गोळीबार, प्रचारावेळी गावकरी आक्रमक
जीतनराम मांझी यांच्या पक्षाच्या आमदारावर प्रचारावेळी हल्ला, दगडफेकीनंतर गोळीबार झाल्याचा दावा
Sharad Pawar: देवेंद्र फडणवीस क्रिकेटच्या मैदानात राजकारण करणार नाहीत; शरद पवारांनी टाकली 'गुगली'
देवेंद्र फडणवीस क्रिकेटच्या मैदानात राजकारण करणार नाहीत; शरद पवारांनी टाकली 'गुगली'
मविआ आणि मनसेच्या मोर्चापूर्वीच राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल,  मतदार यादीतील संभाव्य दुबार नावांबाबत मोठा निर्णय
मविआ आणि मनसेच्या मोर्चापूर्वीच राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, मतदार यादीतील संभाव्य नावांबाबत मोठा निर्णय
महिला डॉक्टर मृत्यूप्रकरणात बजरंग सोनवणेंची एन्ट्री; पीडित कुटुंबीयांची भेट, चाकणकरांसह मुंडे बंधू-भगिनींवर हल्लाबोल
महिला डॉक्टर मृत्यूप्रकरणात बजरंग सोनवणेंची एन्ट्री; पीडित कुटुंबीयांची भेट, चाकणकरांसह मुंडे बंधू-भगिनींवर हल्लाबोल
मोठी बातमी! घरकुलासाठी लाच घेणाऱ्या 9 अधिकाऱ्यांवर कारवाई, थेट कार्यमुक्त, आदेश जारी
मोठी बातमी! घरकुलासाठी लाच घेणाऱ्या 9 अधिकाऱ्यांवर कारवाई, थेट कार्यमुक्त, आदेश जारी
मनोज जरांगे पाटील तातडीने नागपूरला रवाना; बच्चू कडूंनी सांगितली शेतकरी आंदोलनाची पुढील दिशा
मनोज जरांगे पाटील तातडीने नागपूरला रवाना; बच्चू कडूंनी सांगितली शेतकरी आंदोलनाची पुढील दिशा
Bacchu Kadu : आंदोलन न थांबवता मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार, बच्चू कडू, राजू शेट्टींसह शेतकरी नेते सहमत, आशिष जयस्वाल, पंकज भोयर यांची मध्यस्थी
आंदोलन न थांबवता मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार, बच्चू कडू, राजू शेट्टींसह शेतकरी नेते सहमत, आशिष जयस्वाल, पंकज भोयर यांची मध्यस्थी
राज ठाकऱ्या तुझ्यात दम असेल तर चुनाव रोक के दिखाव; विरोधकांच्या मोर्चावरुन गुणरत्न सदावर्ते आक्रमक
राज ठाकऱ्या तुझ्यात दम असेल तर चुनाव रोक के दिखाव; विरोधकांच्या मोर्चावरुन गुणरत्न सदावर्ते आक्रमक
Embed widget