एक्स्प्लोर

तांबडी माती | इतिहासाच्या पानात लुप्त झालेली पावणेतीन तासांची अजरामर कुस्ती!

6 मार्च 1965 रोजी कोल्हापूरच्या खासबाग कुस्ती मैदानात झालेली हिंदकेसरी मारुती माने विरुद्ध मल्लसम्राट विष्णुपंत सावर्डेकर ही लढत. कुस्तीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहली गेलेली ही कुस्ती ज्यांनी ज्यांनी त्याकाळी डोळ्यांनी पाहिली ते सारेच भाग्यवान. तब्बल 2 तास 45 मिनिटे चाललेला हा कुस्तीचा सामना अजरामर आहे.

>> पै. गणेश मानुगडे

एकोणिसाव्या शतकातील सर्वात प्रदीर्घ काळ लढली गेलेली अशी कोणती कुस्ती असावी, असा प्रश्न विचारला असता त्याचे एकच उत्तर माझ्याकडे आहे. ते म्हणजे 6 मार्च 1965 रोजी कोल्हापूरच्या खासबाग कुस्ती मैदानात झालेली हिंदकेसरी मारुती माने विरुद्ध मल्लसम्राट विष्णुपंत सावर्डेकर ही लढत. कुस्तीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहली गेलेली ही कुस्ती ज्यांनी ज्यांनी त्याकाळी डोळ्यांनी पाहिली ते सारेच भाग्यवान. अनेक जुन्या खोडांच्या मुखातून या कुस्तीची वर्णने अगदी भावनाविवश होऊन ऐकून डोळ्यासमोर जणू 55 वर्षांपूर्वीचे खासबाग कुस्ती मैदान उभे राहते.

तो काळ कुस्तीने मंतरलेला होता. कुस्तीला लोकाश्रय होता. तिकिटावर थिएटरमध्ये झुंजार मल्लांच्या लढती पहायला लोक वेडे व्हायचे. घरात एक तरी पैलवान असावा, असे प्रत्येक आई वडिलांचे स्वप्न असणारा तो महाराष्ट्र होता. कुस्तीपंढरी कोल्हापूरने कुस्तीची महान परंपरा आपल्या अंगाखांद्यावर मिरवली. पेठापेठात असणाऱ्या लाल मातीच्या तालमी बलदंड मल्ल घडवत असायच्या. अशा सुवर्णकाळात झालेली शतकातील एक सर्वश्रेष्ठ लढत आज आपल्यासाठी देत आहे.

खासबाग कुस्ती मैदान कोल्हापूर. छत्रपती शाहू महाराजांच्या आश्रयाखाली कोल्हापूर संस्थानात मल्लविद्या बहरली. देशोदेशींच्या मल्लांचे पाय कोल्हापूरला लागू लागले. कोल्हापूर हे कुस्तीचे अलिखित विद्यापीठ बनले. सण 1911 च्या सुमारास रोम देशात शाहू महाराज इटलीच्या राणीच्या राज्याभिषेकाला गेले होते. जगातील आठ आश्चर्यापैकी एक असणारे रोमन योध्याचे युद्धमैदान "रॉसरोम" पाहून शाहूराजे अंतर्मुख झाले. मैदानात कुठे जरी बसले तरी राणीचा राज्याभिषेक दिसत होता. कुस्तीवेड्या शाहूंराजांच्या मनात एक विचार चमकला. आपल्या कोल्हापूरात खास कुस्तीसाठी असे मैदान आपण बांधले तर नवोदित मल्लाना आपले कर्तृत्व दाखवायची संधी मिळेल. कोल्हापूरात येऊन त्यांनी प्रत्यक्ष कृतीला हात घातला आणि बघता बघता बशीच्या आकाराचे कुस्ती मैदान बांधून तयार झाले. शाहू महाराजांच्या कुटुंबियांसाठी राखीव असणाऱ्या बागेत अर्थात खासबागेत हे मैदान बांधण्यात आले. वास्तूशास्त्राचा अद्भुत नमुना म्हणजे खासबाग मैदान होय. एक लाख प्रेक्षक सहज बसतील एवढा वर्तुळाकार असणारे हे मैदान कुठेही बसले तरी कुस्ती दिसेल अशा रचनेत बांधले गेले. भारताच्या इतिहास श्रीकृष्ण कालखंडात कुस्तीसाठी मथुरा, द्वारका, हस्तिनापूर येथे मैदाने बांधले गेल्याची वर्णने लिहली गेली आहेत. मात्र गेल्या हजार वर्षात खास कुस्तीसाठी म्हणून बांधले गेलेले पहिले कुस्ती मैदान म्हणून खासबाग कुस्ती मैदानाचा नामोल्लेख करावा लागेल.

BLOG | तांबडी माती : पैलवानांनी आर्थिक नियोजनाची घडी कशी बसवावी?

तांबडी माती | इतिहासाच्या पानात लुप्त झालेली पावणेतीन तासांची अजरामर कुस्ती!

6/3/1965 रोजी याच ऐतिहासिक खासबाग मैदानात ऐतिहासिक कुस्ती मुकरर करण्यात आली. हिंदकेसरी मारुती माने विरुद्ध मल्लसम्राट विष्णुपंत सावर्डेकर.

मारुती माने हे सांगली जिल्ह्यातील सप्तर्षी कवठे (कवठेपिरान) गावचे मल्ल. अत्यंत कमी वेळेत मारुती माने यांनी महाराष्ट्र नव्हे तर देशाच्या कुस्तीक्षेत्रात गरूडभरारी मारली होती. हरियाणा कर्नाल येथे 1963 साली 6 फूट 4 इंच भाल्यासारख्या ऊंच्यापुऱ्या मेहरुद्दीनला मुलतानी टांग मारून आस्मान दाखवले व हिंदकेसरी झाले होते. तर, सांगली शहरात असणाऱ्या ऐतिहासिक भोसले व्यायामशाळेत सराव करणारे विष्णूपंत सावर्डेकर हे त्याकाळचे कुस्ती क्षेत्रातील अलिखित सम्राट झाले होते. त्याकाळी उच्चशिक्षित असणारे विष्णूपंत सावर्डेकर यांना जोतिरामदादा सावर्डेकर सारख्या महान मल्लांचा वारसा लाभला होता. ज्यावेळी ही कुस्ती जाहीर झाली त्यावेळी केवळ महाराष्ट्र नव्हे तर भारतात चर्चेचा विषय झाला. या कुस्तीचा त्याकाळी जितका बोलबाला झाला तितका बोलबाला खचितच एखाद्या कुस्तीचा झाला होता. सकाळ, केसरी सारखी वर्तमानपत्रे दररोज या कुस्तीविषयक लेख लिहू लागले. जशीजशी 6 मार्च तारीख जवळ येऊ लागली तशी तशी साऱ्या कुस्ती क्षेत्रात खळबळ माजू लागली.

मारुती माने आणि विष्णुपंत सावर्डेकर यांच्या शारीरिक जडणघडणीची मोजमापे अशी होती...

पै. मारुती माने

● उंची - 5 फूट 9 इंच ● वजन - 211 पौंड ● छाती - 44 इंच ● कंबर - 35 इंच

पै.विष्णुपंत सावर्डेकर

● उंची - 5 फूट 9 इंच ● वजन - 194 पौंड ● छाती 44 इंच ● कंबर - 35 इंच

यात वजन सोडले तर दोघांचीही मोजमापे समानच होती. काटा जोड म्हणतात ती यालाच. यात वयाचे म्हणाल तर मारुती माने 27 तर विष्णुपंत सावर्डेकर 30 म्हणजे 3 वर्षाचे अंतर होते.

तांबडी माती | इतिहासाच्या पानात लुप्त झालेली पावणेतीन तासांची अजरामर कुस्ती!

6 मार्च 1965 रोजी सकाळी कोल्हापूर शहराला माणसांचा महापूर आल्यासारखे वाटू लागले. सांगली, सातारा, सोलापूर पंचक्रोशीतील कुस्ती शौकीन भल्या पहाटे बैलगाडी जुंपून, टांगा करून तर काहीजण सायकली घेऊन कोल्हापूरच्या वाटेला लागल्या. सकाळी 7 वाजताच खासबाग मैदानाच्या तिकीट खिडकीवर तुंबळ गर्दी उडाली. 5 रुपये माती मागची बाजू, 7 रुपये माती पुढची बाजू व 17 रुपये खुर्ची अशी तिकीट दर होते. तिकीट घरावरील गर्दी पाहता याच तिकिटांची विक्री 20 ते 25 ला होऊ लागली. ठेकेदारांनी पोत्याने पैसे भरायला सुरवात केली. संध्याकाळी होणाऱ्या कुस्तीसाठी सकाळी 10 वाजताच प्रेक्षकांना सोडण्यात येऊ लागले. 11 वाजता तर खासबाग लोकांनी गच्च भरले व किमान 1 लाख प्रेक्षक तिकीट काढूनही बाहेर फिरत होते. लोकांची गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रूधुर व लाठीचार्जचा वापर करावा लागला. काहीही होवो या कुस्तीचा निकाल तरी ऐकायला मिळावा म्हणून लोक बाहेरही उभे होते.

कोल्हापूरचे लोजेस, सराया, धर्मशाळा आधल्या रात्रीच फुल्ल झाल्या. हॉटेल बाहेर "जेवन संपले आहे" अशा पाट्या लावायची वेळ आली. चिरमुरे, जिलेब्या, मिठाया या सुद्धा संपल्या इतकी तोबा गर्दी. खासबागच्या रस्स्त्यावर हत्ती झुलावेत असे पैलवान दिसू लागले.

तांबडी माती : शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी पै.पंढरीनाथ पठारे (अण्णा)

सायंकाळी 4 वाजून 10 मिनिटांनी प्रेक्षकांना अभिवादन करण्यासाठी मल्लसम्राट विष्णुपंत सावर्डेकर मैदानात आले. भगवा कोल्हापुरी फेटा आणि सफेद रंगाचा सदरा घालून विष्णुपंत सावर्डेकर प्रसन्न वदनाने प्रेक्षकांना अभिवादन करत मैदानाला फेरी काढू लागले. लोकांनी सावर्डेकर यांना भरभरून दाद दिली. बरोबर सायंकाळी 5 वाजता लहरी फेटा आणि जरीकारीचा कुर्ता घालून हनुमान पवित्रा घेत मारुती माने जय बजरंग आरोळी देत मैदानात प्रेक्षकांना अभिवादन करण्यासाठी आले लोकांनी त्यांनाही दाद दिली. मैदानाला फेरी काढून मारुती माने गेले.

सायंकाळी 5 वाजून 35 मिनिटांनी कुस्तीला प्रारंभ झाला आणि प्रेक्षकानी श्वास रोखून कुस्तीकडे लक्ष दिले. दोघेही एकमेकांच्या अंगावर माती टाकीत होते. धोका पत्करण्यास कोणीही तयार नव्हते. दोघेही एकमेकांच्या ताकदीचा अंदाज घेत होते. 6 वाजून 10 मिनिटांनी मारुती माने यांनी पटदिशी पट काढला पण विष्णूपंत बोटे तोडून चटदिशी सुटले. पुन्हा कुस्ती खडाखडी. पुन्हा एकदा मारुती माने पटात घुसले आणि विष्णुपंत सावर्डेकर यांना झटक्यात खाली घेतले. पण याही वेळेस विष्णुपंत सावर्डेकर शिताफीने सुटून गेले. साडेसहा वाजता विष्णुपंत सावर्डेकर यांनी टांग मारण्याचा प्रयत्न केला पण तो निष्फळ ठरला. सात वाजता मारुती माने यांनी परत परत पटावर हल्ला चढवत विष्णुपंत सावर्डेकर यांना खाली घेतले. त्यातही विष्णुपंत सावर्डेकर बोटे तोडून सुटका करून घेण्यात यशस्वी ठरले. मारुती माने हल्ला करायचे व विष्णुपंत सावर्डेकर सुटका करायचे अशी कुस्ती सुरू होती.

विष्णुपंत सावर्डेकर यांनी मारुती मानेच्या यांना पायाची ठेप लावून खाली धरून आणले व मारुती माने सुटका करून घेत असताना थोडी बाचाबाची झाली. उभय मल्लांच्यात वाद सुरू होणार इतक्यात पंचांनी मध्यस्ती केली व कुस्तीला पुन्हा प्रारंभ झाला. या वेळेपावेतो अंधार पसरू लागला होता म्हणून गॅसच्या बत्त्या मागवण्यात आल्या. गॅस बत्तीच्या उजेडात कुस्तीला प्रारंभ झाला.मारुती माने यांनी सावर्डेकर यांना खाली घ्यावे व विष्णुपंत सावर्डेकर यांनी सुटून जावे, असे आणखी तीन चार वेळा झाले. एका वेळी तर मारुती माने यांनी निर्णायक हल्ला चढवला मात्र सावर्डेकर मानेवर फिरत सामने आले व कुस्ती परत खडाखडी सुरू झाली.

तांबडी माती | इतिहासाच्या पानात लुप्त झालेली पावणेतीन तासांची अजरामर कुस्ती!

सायंकाळी 7 वाजून 35 मिनिटे झाली. कुस्तीला तब्बल 2 तास उलटून गेले होते. उभय मल्लांच्या डोक्यात, चेहऱ्यावर आणि सर्व शरीरावर लाल मातीचा चिखल झाला होता. मारुती माने कोण आणि सावर्डेकर कोण ओळखायला अवघड जाऊ लागले. दोघेही सारखेच दिसत होते.काळोख पडल्याने गॅस बत्तीच्या प्रकाशात लढत सुरू होती. लढत बरोबरीत सोडवायचा विचारही नव्हता कारण लाखो प्रेक्षक मैदानात, लाखो प्रेक्षक बाहेर आणि करोडो लोक महाराष्ट्र व देशात या निर्णायक कुस्तीचा निकाल काय हे ऐकायला उत्सुक होते. काहीही झाले तरी कुस्ती निकाली होणार होती त्यामुळे प्रेक्षक डोळ्यात तेल घालून कुस्ती पहात होते. मारुती माने व विष्णुपंत सावर्डेकर हे इतके दमून गेले होते तरीही जिद्दीने लढत होते. इर्षेवर कुस्ती चालू होती. हातापायात अवसान उरले नव्हते मात्र जीव गेला तरी मागे हटणार नाही अशा अविर्भावात कुस्ती करत होते.

साधारण 8 च्या दरम्यान मारुती माने यांनी पुन्हा विष्णुपंत सावर्डेकर यांचा पट काढला व कबजा घेतला. मैदानात कित्येक वेळा असे घडले होते की मारुती माने पट काढायचे व सावर्डेकर सुटून जायचे मात्र यावेळी सावर्डेकर यांना बोटे तोडत सुटायचे जमेना. बराच प्रयत्न करूनही सावर्डेकर यांची सुटका होईना, दरम्यान मारुती माने आपला गुडघा सावर्डेकर यांच्या मानेवर ठेवला व घुटना डावाची पकड धरली.बराच वेळ घुटना ठेऊन सुद्धा डाव यशस्वी होत नव्हता. अखेर 8 वाजून 20 मिनिटांनी मारुती माने यांना या डावात यश मिळाले व विष्णुपंत सावर्डेकर यांच्यावर विजय मिळवला. तब्बल 2 तास 45 मिनिटे चाललेल्या या कुस्तीत दमखस जाऊन मारुती माने विजयी ठरले. मैदानात प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून व फेटे उडवून विजय साजरा केला. तिकिटाचे पैसे फिटले अशी भावना व्यक्त केली.

पुण्यात बारा मावळ, चाकण चौऱ्याऐंशी, पिंपरी चिंचवडसह सासवड, नीरा भागातील कुस्ती शौकीन पुण्यातील "सकाळ" कचेरीत सकाळपासूनच ठाण मांडून निदान कुस्तीच्या बातम्या तरी समजाव्यात म्हणून उपस्थित होते. ट्रंक कॉल करून माहिती विचारली गेल्याची संख्या टेलिफोन खात्याने 500 च्या वर जाहीर केली होती. इतकी कमालीची उत्सुकता या कुस्तीचा निकाल काय होतो हे पाहण्यासाठी होती. अखेर रात्री 8 वाजून 30 मिनिटांनी सकाळ कचेरीत ट्रंक कॉल आला की मारुती माने यांनी विष्णुपंत सावर्डेकर यांच्यावर तब्बल 2 तास 45 मिनिटांनी घुटना डावावर विजय मिळवला. सकाळ कचेरी समोर कुस्ती प्रेमींनी जल्लोष साजरा केला.

इकडे खासबागेत मात्र हिंदकेसरी मारुती माने आणि मल्लसम्राट विष्णुपंत सावर्डेकर मातीत तसेच पाठीवर पडले होते. पोलिसांनी मैदानाला पहारा दिला होता. विजयाचा आनंद आणि पराभवाचे दुःख करायलाही त्यांना जमत नव्हते. दम इतका लागला होता की तुमच्या माझ्यासारख्यांची छाती फुटली असती. पावणे तीन तास लढायचे म्हणजे का चेष्टेचा विषय होता का?

पंचांनी पाण्याची बादली आणून दोन्ही मल्लांचा चेहरा धुतला व अजून एकदा कोण जिंकले याची खात्री केली. किमान अर्धा तास नुसता दम खात हे दोघे पैलवान पडले होते. एव्हाना खासबाग मैदान रिकामे झाले होते मात्र यांचा दम अजूनही निघालेला नव्हता.

तर मंडळी ही होती कुस्ती इतिहासाच्या पानातील लुप्त झालेली एक अजरामर लढत. महान मुष्टीयोध्ये महंमद अली विरुद्ध फेझर या दोन मुष्टियोध्यात 70च्या दशकात झालेली 13 राऊंडस ची लढत ही गिनीज बुकात "फाईट ऑफ द सेंच्युरी" म्हणून नोंद झाली. मात्र,महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात तब्बल पावणे तीन तासाच्या तुफानी लढतीला म्हणावी अशी प्रसिद्धी मिळाली नाही ही खंत आहे. आज या कुस्तीला 55 वर्षे उलटत आहे.इतिहासात लुप्त झालेली मात्र या शतकातील सर्वात प्रदीर्घ काळ लढली गेलेली ही अजरामर कुस्ती होय.

अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पाकिस्तानच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये चॅटिंग, अनेकांना मारण्याचं प्लॅनिंग, दहशतवादी कृत्यांची चर्चा; नांदेडमधील युवक गुजरात पोलिसांच्या ताब्यात
पाकिस्तानच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये चॅटिंग, अनेकांना मारण्याचं प्लॅनिंग, दहशतवादी कृत्यांची चर्चा; नांदेडमधील युवक गुजरात पोलिसांच्या ताब्यात
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 
Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Zero Hour Amit Shah : महाराष्ट्रात भाजपला किती जागा मिळतील? झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चाGhatkopar Hoarding Video : गाटकोपरमधील होर्डिंग कसं पडलं? प्रत्यक्षदर्शींनी सांगितला संपूर्ण थरार!Zero Hours Amit Shah Full : पक्षफुटी, सत्तांतर ते जागांचं समीकरण? अमित शाह EXCLUSIVE ABP MAJHAVare Nivadnukiche Superfast News 10 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 13 May 2024

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पाकिस्तानच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये चॅटिंग, अनेकांना मारण्याचं प्लॅनिंग, दहशतवादी कृत्यांची चर्चा; नांदेडमधील युवक गुजरात पोलिसांच्या ताब्यात
पाकिस्तानच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये चॅटिंग, अनेकांना मारण्याचं प्लॅनिंग, दहशतवादी कृत्यांची चर्चा; नांदेडमधील युवक गुजरात पोलिसांच्या ताब्यात
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 
Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
Pune Loksabha : शिरुर, मावळच्या तुलनेत पुण्यात मतदानाचा आकडा वाढण्याची चिन्हे; कोणाच्या काळजाचा ठोका चूकणार?
शिरुर, मावळच्या तुलनेत पुण्यात मतदानाचा आकडा वाढण्याची चिन्हे; कोणाच्या काळजाचा ठोका चूकणार?
CSK विरोधातील सामन्याआधी RCB च्या अडचणी वाढल्या, दोन खेळाडू मायदेशी परतले, प्लेऑफचा प्रवास कठीण 
CSK विरोधातील सामन्याआधी RCB च्या अडचणी वाढल्या, दोन खेळाडू मायदेशी परतले, प्लेऑफचा प्रवास कठीण 
Kim Jong Un : कोरियाचा हुकूमशहा किम जोंगची आता लाल लिपस्टीकने 'सटकली'! लाल लिपस्टिकवर का केला सर्जिकल स्ट्राईक?
कोरियाचा हुकूमशहा किम जोंगची लाल लिपस्टीकने 'सटकली'! लाल लिपस्टिकवर का केला सर्जिकल स्ट्राईक?
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
Embed widget