एक्स्प्लोर

जेपी-असा दिग्दर्शक ज्याला पाकिस्तानातून धमक्या यायच्या 

'बॉर्डर'सारख्या युद्धपटांची निर्मिती करणं खूप अवघड असतं. सरकारकडून शेकडो प्रकारच्या परवानग्या घ्याव्या लागतात. पण सरकारी कारभाराला गांजलेल्या जेपीने सरळ पंतप्रधान नरसिंहराव यांना भेटून जेपीने एक निवेदन दिले. ज्यात त्याला शूटिंगदरम्यान येणाऱ्या अडचणींचा पाढा वाचला होता. पंतप्रधान नरसिंह राव यांच्या खंबीर पाठिंब्यामुळे बॉर्डर तयार झाला, सिनेमा देशात प्रचंड लोकप्रिय झाल. पण यामुळे जेपीला पाकिस्तानातून धमक्यांचे फोन येऊ लागले.

एकतीस वर्षात फक्त नऊ फिल्म्स. जे.पी. दत्ता या दिग्दर्शकाच्या कामाची ही आकडेवारी. पण आकडे वेगळीच कहाणी सांगत असले, तरी जेपी हा एक अतिशय महत्त्वाचा दिग्दर्शक आहे. जेपी म्हंटल की, लोकांच्या डोळ्यासमोर 'बॉर्डर' आणि 'एलओसी' सारखे युद्धपट उभे राहतात. पण दिग्दर्शक जेपीने त्याच्या सिनेमातून इतर अनेक प्रयोग केले आहेत. मात्र, 'बॉर्डर'च्या जेपीने या जुन्या जेपीला झाकोळून टाकलं आहे . जेपीला सिनेमाचा वारसा आपल्या वडिलांकडून म्हणजे ओ.पी. दत्ता यांच्याकडून मिळाला. ओ.पी. दत्ता इंडस्ट्रीमधील मोठं प्रस्थ. बऱ्याच सिनेमाचं दिग्दर्शन त्यांनी केलं आहे. जेपीच्या बऱ्याच चित्रपटांचे संवाद पण त्यांनीच लिहिले आहेत. राजस्थानच्या मरुभूमीचं जेपीला प्रचंड आकर्षण. राजस्थानला जेपीने कॅमेऱ्यात जितक्या सुंदरपणे पकडलं आहे, तितकं अजून कुणी पकडलं नाही. 'यतीम', 'गुलामी', 'बंटवारा', 'हथियार' हे जेपीचे सुरुवातीचे चित्रपट अनेक सामाजिक मुद्द्यांवर भाष्य करतात. 'गुलामी'मध्ये धर्मेंद्रचं पात्र जातीव्यवस्थेविरुद्ध बंडखोरी करणार दाखवलं आहे. गावातल्या शाळेत सवर्णांच्या मुलांची आणि दलितांच्या मुलांची पाणी पिण्याची भांडी वेगवेगळी असतात. या अन्यायाविरुद्ध धर्मेंद्र आवाज उठवतो. राजस्थानमध्ये अजूनही टिकून असलेला सरंजामवाद जेपीच्या सिनेमात दिसत राहतो. 'बंटवारा' सिनेमात एक पोलीस अधिकाऱ्याचं पात्र आहे. त्याच्या तोंडी, मी  पोलीस अधिकारी असलो; तरी पहिले ठाकूर आहे, या अर्थाचा संवाद आहे . 'यतीम' हा जेपीचा सिनेमा खूप बोल्ड होता. सावत्र मुलाकडे कामवासना शमवायचे माध्यम म्हणून बघणारी आई त्या सिनेमात होती. जेपीने 1997 पर्यंत काही हिट सिनेमे दिले, तर काही फ्लॉप. पण 1997 सालात काहीतरी वेगळं घडणार होतं. जेपीने 'बॉर्डर' सिनेमा शूट करायला सुरुवात 1995 सालातच केली होती. 'बॉर्डर' अनेक अर्थांनी भारतीय चित्रपटांच्या इतिहासातला लक्षवेधी सिनेमा आहे. इतके वर्ष पाकिस्तानचा चित्रपटातला उल्लेख 'पडोसी मुल्क' किंवा 'दुश्मन मुल्क' असा केला जात आहे. पाकिस्तानच नाव घ्यायला आपल्या दिग्दर्शक निर्मात्यांना कसली भीती वाटायची देव जाणे. 'बॉर्डर' मध्ये जेपीने वर्षानुवर्षे चालत आलेली ही प्रथा मोडली.या सिनेमात पाकिस्तानचा उल्लेख उघड-उघड शत्रूराष्ट्र असा केला होता. 'बॉर्डर'सारख्या युद्धपटांची निर्मिती करणं खूप अवघड असतं. सरकारकडून शेकडो प्रकारच्या परवानग्या घ्याव्या लागतात. लष्कराच्या पाठिंब्याची पण शूटिंग करताना नितांत आवश्यकता असते. या लालफीतशाहीचा जेपीला खूप त्रास व्हायला लागला होता. त्यावेळेस केंद्रात पी.व्ही. नरसिंहराव पंतप्रधान होते. सरकारी कारभाराला गांजलेल्या जेपीने सरळ पंतप्रधान नरसिंहराव  यांच्याशी संपर्क साधला. पंतप्रधान नरसिंहराव यांना भेटून जेपीने त्यांना एक निवेदन दिले, ज्यात त्याला शूटिंगदरम्यान येणाऱ्या अडचणींचा पाढा वाचला होता. पंतप्रधन नरसिंहराव यांनी अर्ज वाचला, दोन मिनिटं डोळे मिटून विचार केला, आणि निवेदनाच्या खाली 'सर्व सहकार्य देण्यात यावे' अशा अर्थाची नोट लिहिली. जेपीने भारावून जाऊन नरसिंहराव यांच्याशी जाताना हात मिळवला. 'ही फिल्म बनायलाच पाहिजे' असं नरसिंहराव यांनी जेपीला निक्षून सांगितलं. नरसिंहराव यांची प्रतिमा माध्यमांनी 'खूप उशिरा निर्णय घेणारा' किंवा 'थंडा करके खाओ' असं तत्वज्ञानं असणारा नेता अशी बनवली आहे. त्या पार्श्वभूमीवर राव यांची वेगळीच बाजू या प्रसंगात दिसून येते. भारतीय लष्कर आणि राव यांच्या पाठिंब्यावर शूटिंग सुरळीत पार पडलं. सिनेमा प्रदर्शित झाला आणि देशभरात तुफान चालला. पिक्चर प्रदर्शित झाल्यावर जेपीला पाकिस्तानमधून धमक्यांचे फोन यायला लागले. मुंबई पोलिसांनी जेपीला संरक्षण दिलं. दोन हत्यारबंद गार्ड सतत जेपीबरोबर राहायला लागले. जेपीचा पुढचा सिनेमा होता 'रेफ्युजी'. अमिताभ बच्चन आणि कपूर घराण्याने अभिषेक आणि करीनाच्या पदार्पणासाठी जेपीवर विश्वास दाखवला. पण चित्रपट जोरदार आपटला. 'बॉर्डर'मुळे प्रेक्षकांना जेपीकडून अजून तशाच युद्धपटाची अपेक्षा होती. शांततेची तान छेडणारा  'रेफ्युजी' प्रेक्षकांना पसंद पडला नाही. पाकिस्तानला पडद्यावर शत्रूराष्ट्र संबोधण्याची तयारी दाखवणारा जेपी हा खमका दिग्दर्शक असला, तरी भारत-पाकिस्तान हे रक्ताच्या, संस्कृतीच्या नात्याने जोडले गेले आहेत, असं त्याचं भाबडं वाटू शकेल असं मत आहे. 'बॉर्डर'मध्ये युद्ध संपल्यावर 'मेरे दुश्मन मेरे भाई' हे हरिहरनने गायलेलं गाणं मुळातूनच ऐकायला हवं.  'रेफ्युजी'मधलं दोन देशांमधल्या सीमारेषांची निरर्थकता सांगणार 'पंछी नदीया पवन के झोनके' गाणं पण जेपीचा भारत-पाक संबंधातला रोमाँटिसझम् सांगून जातं.  'रेफ्युजी' हिट झाला असता, तर जेपी पुढचा सिनेमा भारत-पाकिस्तान यांनी सीमारेषा पुसून एकत्र यायला हवं या विषयावर करणार होता. पण  'रेफ्युजी' दाणकन आपटला. जेपी खडबडून त्याच्या भाबड्या रोमँटिसिझममधून बाहेर आला. दरम्यानच्या काळात पुलाखालून बरच पाणी वाहून गेलं होतं. कारगील युद्ध घडून गेलं होत. अनेक लष्करी अधिकाऱ्यांनी जेपीला कारगील युद्धावर सिनेमा बनवण्याची विनंती करत होते. जेपी हा प्रोफेशनल माणूस. भावनांना कधी महत्त्व द्यायचं आणि कधी नाही द्यायचं हे त्याला चांगलं कळायचं. मग त्याने कारगील युद्धावर पुढचा सिनेमा बनवला. चित्रपटात अनेक मोठे स्टार होते. संजय दत्त, अभिषेक बच्चन, अक्षय खन्ना, करीना कपूर, राणी मुखर्जी, मनोज वाजपेयी, आशुतोष राणा अशी कित्येक कलाकारांची मांदियाळी त्यात होती. पण इतक्या सगळ्या कलाकारांना सांभाळून घेण्याच्या फंदात पटकथा रुळावरुन घसरली. चित्रपट वाईटच होता. प्रेक्षकांना आवडतील असे घटक असून पण सिनेमा दणकून आपटला. मग सलग दोन अपयशी सिनेमे दिल्यावर जेपीने भारत-पाकिस्तान या आपल्या आवडत्या विषयापासून ब्रेक घेण्याचं ठरवलं. त्याने 'उमरावजान ' या क्लासिकचा रिमेक करण्याचं ठरवलं. रेखाच्या भूमिकेत ऐश्वर्या राय. पण हा चित्रपट पण प्रेक्षकांनी नाकारला. जेपी एक सिनेमा बनवायला दोन तीन वर्ष घेतो. पण सलग तीन फ्लॉप दिल्यावर जेपी जवळपास अज्ञातवासात गेला. 2006 नंतर त्याने एक पण सिनेमा केला नाही. पण आता त्याने पुन्हा नवीन सिनेमा करायला घेतला आहे. सिनेमाचं नाव 'पलटण'. पुन्हा अजून एक युद्धपट. ही आपल्या मुळांकडे जाण्याची केवीलवाणी धडपड वाटते. जेपी आणि नव्वदच्या दशकात मोठे दिग्दर्शक मानले जाणाऱ्या अनेकांनी चित्रपटसृष्टीमधल्या बदलत्या प्रवाहांशी जुळवून घ्यायचं नाकारलं. कथानक, तांत्रिक बाजू, मार्केटिंग यामध्ये जग हादरवून टाकणारे बदल होत असताना जेपीसारख्या लोकांनी याची नोंद घेण्याचंच नाकारलं. आजच्या प्रेक्षकांना नेमकं काय हवं आहे, याचा अंदाजच यांना नाही. 'पलटण' ही 'बॉर्डर'चीच फिकट झेरॉक्स कॉपी असेल, असं मानायला भरपूर वाव आहे. जाता जाता जेपीबद्दल अजून एक किस्सा. इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या एका मित्राने सांगितलेला. जेपीच नाणं खणखणीत वाजत होतं, त्या काळात जेपीच्या माहीम इथल्या फ्लॅटवर' वाना बी' अभिनेत्यांची आणि अभिनेत्रींची झुंबड असायची. कोणी किचनमध्ये उभं राहून कॉफी बनवत असायचं. तर कोणी गॅलरीत बसून गाण्याचा रियाज करत असायचं. कधीकधी तर धक्काबुक्की होईल; इतकी गर्दी असायची. दिवस बदलले. जेपीचे दिवस पण बदलले. जेपीची गणना फ्लॉप दिग्दर्शकांमध्ये व्हायला लागली. आणि त्याच्या फ्लॅटवरची गर्दी पण ओसरली. हल्ली जेपी आणि त्याची बायको कुणीतरी आपल्या घरी येईल याची वाट बघत असतात .Strange are the ways of film industry. संबंधित ब्लॉग एका हरवलेल्या दशकाची डायरी : एक ऐसी लडकी थी! ब्लॉग : माजघरातल्या उबदार भीतीचा चेहरा एका हरवलेल्या दशकाची डायरी : या ‘सूर्यवंशम’चं काय करायचं ? जावेद जाफरी -दुर्लक्षित गुणवत्तावान  अलका याज्ञिक : जिचं गाण्यात असणं आपण गृहीत धरायचो अशी गायिका गर्दीश : हातातून निसटत जाणाऱ्या स्वप्नांची गोष्ट  श्रीदेवी नावाचं फेनॉमेन  कुमार सानू -एका  दशकाचा  आवाज (1)
View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Hostage Scare: रोहित आर्यानं मुंबईत 17 मुलांना ओलीस ठेवलं, 'त्या' बॉलिवूड फिल्मशी कनेक्शन की योगायोग? घटना, वेळ आणि दिवसही सारखाच... तुम्ही पाहिलाय का?
रोहित आर्यानं मुंबईत 17 मुलांना ओलीस ठेवलं, 'त्या' बॉलिवूड फिल्मशी कनेक्शन की योगायोग? घटना, वेळ आणि दिवसही सारखाच...
Maharashtra Live blog: बच्चू कडू यांच्या 'हवामहालाची' उच्चस्तरीय चौकशी करा, भाजप आमदाराची मागणी
Maharashtra Live blog: बच्चू कडू यांच्या 'हवामहालाची' उच्चस्तरीय चौकशी करा, भाजप आमदाराची मागणी
अजित पवार अध्यक्षपदासाठी, महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या निवडणुकीसाठी पॅनेलची घोषणा; 3 बिनविरोध
अजित पवार अध्यक्षपदासाठी, महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या निवडणुकीसाठी पॅनेलची घोषणा; 3 बिनविरोध
रोहित आर्य म्हणाला शिक्षण विभागाने 2 कोटी थकवले; शिक्षणमंत्र्यांचं स्पष्टीकरण, दादा भुसेंनी सांगितलं
रोहित आर्य म्हणाला शिक्षण विभागाने 2 कोटी थकवले; शिक्षणमंत्र्यांचं स्पष्टीकरण, दादा भुसेंनी सांगितलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pralhad Salunkhe On Ramraje Nimbalkar: रणजित निंबाळकरांना होत असलेल्या आरोपामागे रामराजे, प्रल्हाद साळुंखेंचा आरोप
Powai Rohit Aary Story: ..मग पोलिसांनी दरवाजा तोडला, ओलीस ठेवलेल्या मुलीचे सांगितला A टू Z स्टोरी
Powai Hostage Crisis: रोहित आर्यचे पैसे दिपक केसरकरांनी का थकवले, ओलीस ठेवण्याची वेळ का आली?
Rohit Aary Pune House: रोहित आर्यचं पुण्यातील घर सध्या बंद, माझा खास रिपोर्ट
Mumbai Hostage Crisis: ऑडिशनच्या नावाखाली 17 मुलांना ओलीस, पवईत नाट्यमय थरार

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Hostage Scare: रोहित आर्यानं मुंबईत 17 मुलांना ओलीस ठेवलं, 'त्या' बॉलिवूड फिल्मशी कनेक्शन की योगायोग? घटना, वेळ आणि दिवसही सारखाच... तुम्ही पाहिलाय का?
रोहित आर्यानं मुंबईत 17 मुलांना ओलीस ठेवलं, 'त्या' बॉलिवूड फिल्मशी कनेक्शन की योगायोग? घटना, वेळ आणि दिवसही सारखाच...
Maharashtra Live blog: बच्चू कडू यांच्या 'हवामहालाची' उच्चस्तरीय चौकशी करा, भाजप आमदाराची मागणी
Maharashtra Live blog: बच्चू कडू यांच्या 'हवामहालाची' उच्चस्तरीय चौकशी करा, भाजप आमदाराची मागणी
अजित पवार अध्यक्षपदासाठी, महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या निवडणुकीसाठी पॅनेलची घोषणा; 3 बिनविरोध
अजित पवार अध्यक्षपदासाठी, महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या निवडणुकीसाठी पॅनेलची घोषणा; 3 बिनविरोध
रोहित आर्य म्हणाला शिक्षण विभागाने 2 कोटी थकवले; शिक्षणमंत्र्यांचं स्पष्टीकरण, दादा भुसेंनी सांगितलं
रोहित आर्य म्हणाला शिक्षण विभागाने 2 कोटी थकवले; शिक्षणमंत्र्यांचं स्पष्टीकरण, दादा भुसेंनी सांगितलं
Rohit Arya Encounter: एकनाथ शिंदेंसोबत गप्पा मारतानाचे फोटो, रोहित आर्य ज्या योजनेमुळे आयुष्यातून उठला ती महत्त्वाकांक्षी सरकारी योजना नेमकी काय होती?
एकनाथ शिंदेंसोबत गप्पा मारतानाचे फोटो, रोहित आर्य ज्या योजनेमुळे आयुष्यातून उठला ती महत्त्वाकांक्षी सरकारी योजना नेमकी काय होती?
मी स्वत: चेकने पैसे दिले होते; 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यबद्दल दीपक केसरकरांनी दिली माहिती
मी स्वत: चेकने पैसे दिले होते; 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यबद्दल दीपक केसरकरांनी दिली माहिती
CBSE दहावी अन् बारावी बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर; अभ्यासासाठी विद्यार्थ्यांकडे 110 दिवस
CBSE दहावी अन् बारावी बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर; अभ्यासासाठी विद्यार्थ्यांकडे 110 दिवस
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 ऑक्टोबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 ऑक्टोबर 2025 | गुरुवार
Embed widget