एक्स्प्लोर

मलाला नावाचं कल्ट

भारताच्या माजी पंतप्रधानांच्या हत्येवर आधारित असणाऱ्या शुजीत सरकारच्या 'मद्रास कॅफे' चित्रपटात एक खुप सुंदर संवाद होता. एक भारतीय वंशाची पत्रकार जी भारत सरकारच्या धोरणांवर नेहमी टीका करत असते ती भारतीय गुप्तहेर अधिकाऱ्याला म्हणते ,"Criticizing national policies , doesn't make me anti national.". मद्रास कॅफे प्रदर्शित होऊन सहा वर्षे झाली पण हा संवाद आजच्या आपल्याकडच्या असहिष्णू, द्वेषभारीत वातावरणात जास्त संयुक्तिक वाटत आहे. कलबुर्गी, पानसरे आणि दाभोलकर यांच्या निर्घृण हत्या झाल्या असताना आणि बांगलादेशमध्ये विशिष्ट विचारसरणी मांडणाऱ्या ब्लॉगर्सचे हत्यासत्र चालू असताना मूलतत्ववादी लोकांच्या गोळ्या अंगावर झेलणाऱ्या मलाला युसुफझाईच्या आयुष्यावर प्रकाश टाकणारी डॉक्युमेंट्री आपल्याकडे प्रदर्शित झाली महत्त्वाची गोष्ट आहे. यापूर्वी काही अतिशय प्रभावी आणि वेगळे विषय डॉक्युमेंट्रीच्या माध्यमातून हाताळणाऱ्या डेविस गुगेनहेम याने ' He Named Me Malala' ही डॉक्युमेंट्री तयार केली आहे. ही डॉक्युमेंट्री भारतात प्रदर्शित झाली ही घटना सामाजिकदृष्ट्या जितकी महत्वाची आहे, तितकीच भारतामधील डॉक्युमेंट्री मेकिंग क्षेत्रासाठी महत्वाची आहे. मुलींच्या शिक्षणाचा प्रचार करते म्हणून पाकिस्तानच्या स्वात प्रांतामध्ये राहणाऱ्या मलाला युसुफझाई नावाच्या शाळकरी मुलीवर पाकिस्तानी तालिबानने जीवघेणा हल्ला केला. तिच्यावर अतिशय जवळून तीन गोळ्या झाडण्यात आल्या. पण चिवट मलाला त्या हल्ल्यातून वाचली. या हल्ल्यामुळे तिला जगभर प्रसिद्धी मिळाली. दहशतवाद विरोधाचं ती एक प्रतिक बनली. तिच्या आयुष्यामधल्या महत्वाच्या घटनांचा धांडोळा ही डॉक्युमेंट्री घेते. डॉक्युमेंट्रीच्या सुरुवातीलाच अॅनिमेशनच्या माध्यमातून मलाला या जरा वेगळ्या नावाची उत्पत्ती दाखवली जाते. मलाला हा एक अफगाणी लोककथांमधला एक असा नायक, ज्याने अफगाण-ब्रिटीश युद्धात मोलाची कामगिरी बजावली होती. अफगाणिस्तानमध्ये आज पण या कडव्या योद्धयाचे गुण गायले जातात. नंतर ही डॉक्युमेंट्री मलालावर झालेला हल्ला, नंतर तिचं इंग्लंडमध्ये विस्थापित होणं, तिचं वैयक्तिक आयुष्य आणि परिवार, तिने यूएन समोर दिलेलं ते 'प्रसिद्ध भाषण असे तिच्या आयुष्यातले महत्वाचे टप्पे उलगडत जाते. ही डॉक्युमेंट्री मलाला इतकीच तिच्यामागे चिकाटीने उभ्या राहणारे तिचे वडिल झिऔद्दीन युसुफझाई यांच्यावर पण 'फोकस' करते. त्यांनी मलालाच्या शिक्षणाला दिलेलं प्रोत्साहन, तालिबानच्या विरुद्ध दिलेला लढा, कडव्या युसुफझाई जमातीत जन्माला आलेले पुरुष असूनसुद्धा त्याच विचाराने सुधारक असणं ह्या गोष्टी डॉक्युमेंट्रीमध्ये छान 'हायलाईट' केल्या आहेत. हे सगळे बघितल्यावर डॉक्युमेंट्रीचं नाव ' He Named Me Malala'  का ठेवले आहे याचा प्रेक्षकांना उलगडा होतो. या बाप लेकीमध्ये जे एक सुंदर नाते आहे ते या डॉक्युमेंट्रीमध्ये संवेदनशिलपणे टिपले आहे. माहितीपट म्हणजे कुठलीतरी माहिती रटाळपणे देणारे माध्यम असा गैरसमज बहुतेक लोकांमध्ये प्रचलित आहे. माहितीपटाचं मुख्य ध्येय समाजप्रबोधन, माहिती देणे, जनजागृती हे असल्याने मनोरंजन ही कधीच या माध्यमाची प्राथमिकता नसते. पण याचा अर्थ या डॉक्युमेंट्री रटाळच असायला पाहिजेत असा काही नियम नाही. आपल्याकडे काही वर्षांपूर्वी येऊन गेलेली वीजचोरीच्या मुद्द्याला काहीशा विनोदी ढंगाने हाताळलेली 'कटियाबाज' ह्या डॉक्युमेंट्रीचे उदाहरण देता येईल. 'He Named Me Malala' पण पारंपारिक अर्थाने मनोरंजक नसली तरी दीड तास प्रेक्षकांना गुंतवून ठेवते. यासाठी दिग्दर्शकाने अॅनिमेशनचे तंत्र, रेकोर्डेड फुटेज (विशेषतः मलालाला गोळी घातल्यानंतरच्या क्राईम सीनचे फुटेज), फोटोग्राफ्स, मीडियामधले कवरेज या सगळ्यांचा प्रभावी वापर केला आहे. दिग्दर्शक डेविस गुगेनहेम म्हणजे डॉक्युमेंट्री मेकिंग मधलं एक प्रस्थापित नाव.  अमेरिकेच्या सार्वजनिक शिक्षणव्यवस्थेवर भाष्य करणारा 'वेटिंग फॉर सुपरमॅन' आणि ग्लोबल वार्मिंगसारख्या महत्वाच्या प्रश्नाचे नानाविध पैलू उलगडून दाखवणारा ऑस्कर विजेता माहितीपट 'अॅन इन कन्व्हिनियंट ट्रुथ ' हे माहितीपट या दिग्दर्शकाच्या क्षमतेची ग्वाही देतात. मलालाच्या विषयाला माहितीपटातून न्याय देण्याचं कसब या माणसाच्या अंगी आहे. आपल्याकडे चित्रपट वितरण व्यवस्था अतिशय क्लिष्ट आहे. असं म्हंटल जातं की भारतात सिनेमा बनवणं सोप असतं पण प्रदर्शित करणं खुप अवघड असतं. आडवा तिडवा विस्तार असणाऱ्या या देशाचं चित्रपट वितरण क्षेत्र मुंबई, दिल्ली, बेरार, निझाम इत्यादी अकरा मोठ्या भागात विभागलं गेलेलं आहे. सर्वच्या सर्व अकरा क्षेत्रात आपला चित्रपट प्रदर्शित करताना भल्या भल्या दिग्गज निर्मात्यांच्या तोंडाला फेस येतो. याला अनेक आर्थिक, सामाजिक आणि भाषिक घटक कारणीभूत आहेत. हे सगळे अडथळे ओलांडून भारतात सिनेमाच्या धर्तीवर डॉक्युमेंट्री प्रदर्शित होतील असं कोणी विधान केलं असतं तर लोकांनी त्याला वेड्यात काढल असतं. पण मागच्या काही वर्षात येऊन गेलेले 'कटियाबाज', 'द वर्ल्ड बिफोर हर' आणि आता ' He Named Me Malala'  यांचं चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणं हा एक स्वागतार्ह 'ट्रेंड' आहे. लोकांसमोर जाण्यासाठी फिल्म फेस्टिवल्स हा एकमेव पर्याय असणाऱ्या माहितीपट निर्मात्यांना हा आशेचा किरण नक्कीच सुखावून जाईल. त्यामुळेच ही घटना भारतामधील डॉक्युमेंट्री मेकिंग क्षेत्रासाठी महत्वाची आहे. ‘ He Named Me Malala' मध्ये मलाला एक सुंदर वाक्य बोलून जाते, " For Taliban, it is not about faith. It is about power."जगातल्या सगळ्या मूलतत्ववाद्यांचा अजेंडा ती या एका वाक्यात सांगून गेली आहे. जगभरात ईराण, अफगाणिस्तान, आपला शेजारी पाकिस्तान अशी अनेक उदाहरणं दिसतील. दुर्दैवाने आपल्याकडच्या सर्वधर्मीय कट्टरपंथीयांना या 'फेल्ड स्टेट्स'च्या धार्मिक मॉडेल्सचं अनाकलनीय आकर्षण आहे. हे देश धार्मिक बाबतीत जे वेडाचार करतात त्याचं अनुकरण आपल्या प्रचंड विविधता असणाऱ्या देशात व्हावं अशी सुप्त इच्छा ते बाळगून असतात. ' He Named Me Malala' अशा लोकांना दाखवावी . आपला देश कसाही असला तरी आपल्याला अनेक गोष्टी करण्याच जे स्वातंत्र्य आहे ते किती सुंदर आहे हे त्यांना कळून येईल.
View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kopargaon Nagarparishad Election 2025: कोपरगावमध्ये भाजप-राष्ट्रवादीत जोरदार राडा, पोलिसांसमोरच कार्यकर्ते भिडले, नेमकं काय घडलं?
कोपरगावमध्ये भाजप-राष्ट्रवादीत जोरदार राडा, पोलिसांसमोरच कार्यकर्ते भिडले, नेमकं काय घडलं?
T20 World Cup: टी 20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा, इशान किशनची एन्ट्री, शुभमन गिलला वगळलं, चकीत करणारी 15 जणांची टीम
टी 20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा, इशान किशनची एन्ट्री, शुभमन गिलला वगळलं, चकीत करणारी 15 जणांची टीम
Prithviraj Chavan: अभी तो पार्टी शुरु हुई है! पृथ्वीराज चव्हाणांकडून 9 सनसनाटी दावे, हरदीप सिंग पुरी, मोदी ते अनिल अंबानींचा पहिल्यांदाच थेट उल्लेख करत काय काय म्हणाले?
अभी तो पार्टी शुरु हुई है! पृथ्वीराज चव्हाणांकडून 9 सनसनाटी दावे, हरदीप सिंग पुरी, मोदी ते अनिल अंबानींचा पहिल्यांदाच थेट उल्लेख करत काय काय म्हणाले?
Prithviraj Chavan: 19 डिसेंबरला मराठी पंतप्रधान होणार असल्याचा दावा करणारे पृथ्वीराज चव्हाण आज म्हणाले...
19 डिसेंबरला मराठी पंतप्रधान होणार असल्याचा दावा करणारे पृथ्वीराज चव्हाण आज म्हणाले...
ABP Premium

व्हिडीओ

Kopargaon NCP Vs BJP : कोपरगावमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ भाजप- राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले
Sanjog Waghere Join BJP : संजोग वाघेरे भाजपात प्रवेश करणार, मुंबईकडे रवाना
Mumbai BJP And Shivsena Seat Sharing : मुंबईत जागावाटपात भाजप-शिवसेनेत जोरदार रस्सीखेच
Zero Hour Full नगराध्यक्षांच्या निकालाचा मनपा मतदानावर परिणाम होईल? मुंबईत महायुतीला कोणाचं आव्हान!
Special Report Manikrao Kokate माणिकराव कोकाटे संकटाच्या चक्रव्यूहात, कोकाटेंचं राजकीय भवितव्य काय?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kopargaon Nagarparishad Election 2025: कोपरगावमध्ये भाजप-राष्ट्रवादीत जोरदार राडा, पोलिसांसमोरच कार्यकर्ते भिडले, नेमकं काय घडलं?
कोपरगावमध्ये भाजप-राष्ट्रवादीत जोरदार राडा, पोलिसांसमोरच कार्यकर्ते भिडले, नेमकं काय घडलं?
T20 World Cup: टी 20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा, इशान किशनची एन्ट्री, शुभमन गिलला वगळलं, चकीत करणारी 15 जणांची टीम
टी 20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा, इशान किशनची एन्ट्री, शुभमन गिलला वगळलं, चकीत करणारी 15 जणांची टीम
Prithviraj Chavan: अभी तो पार्टी शुरु हुई है! पृथ्वीराज चव्हाणांकडून 9 सनसनाटी दावे, हरदीप सिंग पुरी, मोदी ते अनिल अंबानींचा पहिल्यांदाच थेट उल्लेख करत काय काय म्हणाले?
अभी तो पार्टी शुरु हुई है! पृथ्वीराज चव्हाणांकडून 9 सनसनाटी दावे, हरदीप सिंग पुरी, मोदी ते अनिल अंबानींचा पहिल्यांदाच थेट उल्लेख करत काय काय म्हणाले?
Prithviraj Chavan: 19 डिसेंबरला मराठी पंतप्रधान होणार असल्याचा दावा करणारे पृथ्वीराज चव्हाण आज म्हणाले...
19 डिसेंबरला मराठी पंतप्रधान होणार असल्याचा दावा करणारे पृथ्वीराज चव्हाण आज म्हणाले...
एपस्टीनच्या मेलमध्ये 'मोदी ऑन बोर्ड'चा उल्लेख, मंत्री हरदीप पुरींचंही नाव; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, सरकारने खुलासा करण्याची मागणी
एपस्टीनच्या मेलमध्ये 'मोदी ऑन बोर्ड'चा उल्लेख, मंत्री हरदीप पुरींचंही नाव; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, सरकारने खुलासा करण्याची मागणी
Imran Khan: सजा पे सजा! पाकिस्तानात इम्रान खान यांना पत्नीसह आणखी एका प्रकरणात तब्बल 17 वर्षाची शिक्षा
सजा पे सजा! पाकिस्तानात इम्रान खान यांना पत्नीसह आणखी एका प्रकरणात तब्बल 17 वर्षाची शिक्षा
एपस्टीन फाईल की राजरोस अय्याशींचा अड्डा! मायकेल जॅक्सन, बिल क्लिंटन, डोनाल्ड ट्रम्प ते इंग्लंडचा राजपुत्र; खळबळजनक स्थितीमधील 15 फोटो
एपस्टीन फाईल की राजरोस अय्याशींचा अड्डा! मायकेल जॅक्सन, बिल क्लिंटन, डोनाल्ड ट्रम्प ते इंग्लंडचा राजपुत्र; खळबळजनक स्थितीमधील 15 फोटो
Kolhapur Municipal Corporation Election: कोल्हापूर मनपा निवडणुकीसाठी महायुतीचं सुद्धा ठरलं! असा असणार जागावाटपाचा फाॅर्म्युला
कोल्हापूर मनपा निवडणुकीसाठी महायुतीचं सुद्धा ठरलं! असा असणार जागावाटपाचा फाॅर्म्युला
Embed widget