एक्स्प्लोर

BLOG | 'होय, मुंबई आमच्या बापाचीच'!

मुंबई आणि मुंबई पोलीस प्रत्येक मुंबईकरासाठी आई अन् बाप हाय. त्यामुळं या माय-बापाला बोलताना किमान दहावेळा विचार करावा. ही मुंबई आमच्या बाप-जाद्यांची आहे, होती आणि राहिल!

मुंबई! देशाच्या प्रत्येक व्यक्तिच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेलं शहर. याच मुंबईनं अनेकांना ओळख दिली. असं म्हणतात मुंबईत आलेला कुणीही कधीच उपाशी राहू शकत नाही. मुंबई तसं त्याला राहूच देत नाही! याच प्रत्येक आज लाखो, करोडोंनी घेतलाय. अनेकांनी तो कबुलही केलाय. सपनों का शहर, मायानगरी अशी किती विशेषणं प्रत्येक जण आपल्यापरीनं या मुंबईनगरीला देत आलेत. थोडक्यात काय अनेकांनी आपली कृतज्ञता व्यक्त केलीय. जी मुंबई सर्वांना सर्व काही देते, ती तुमच्याकडे परत काय मागते? आणि तुम्ही तिला देता तरी काय? मुंबईबद्दलचं अप्रुप प्रत्येकाला असतं तसं ते मलाही होतं.

कोकणात जन्म आणि शिक्षण झालं तरी दिवाळीच्या, मे महिन्याच्या सुट्टीत नातेवाईकांकडे राहणं आणि जीवाची मुंबई करणं हे दरवर्षीचंच झालं. पण, बारावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आयुष्य घडवण्यासाठी याच मुंबईत येण्याचा निर्णय झाला. तसं शहर ओळखीचं असल्यानं मनात भीती नव्हती. शिवाय, आपली अशी अनेक माणसं होतीच. काळजी घे हा आईचा सततचा शब्द. पण, मुंबईत आल्यानंतर हीच मुंबई तुमची आईच्या मायेनं काळजी घेते. याचा प्रत्येय तुम्हाला इथं आल्यानंतर नक्की येतो. शिवाय, त्यात मुंबईचं राजकीय, सांस्कृतिक वातावरण देखील अनुभवण्यासारखा. प्रत्येक जण आपला भूतकाळ मागे सारत वर्तमानाशी लढत भविष्य घडवण्यासाठी इथं धडपडताना दिसतो. हं, Bright Future असं देखील त्याला म्हणतात नाही का? घड्याळाच्या काट्यावर धावणारं हे शहर कधीच थांबत नाही. न थकता, न थांबता अविरत ते पुढं जात राहतं. ज्या शहरात प्रत्येक जण भविष्य घडवण्यासाठी, नाव कमवण्यासाठी येतो. त्यानं मुंबईचा इतिहास, भूगोल तरी किमान वरवर का असेना जाणून घेण्यास काहीच हरकत नाही.

आज प्रत्येक जण ही मुंबई आमची म्हणतो. पण, ही मुंबई आमची म्हणत असताना तिनं काय काय सोसलंय? याची माहिती करून घ्यायला काहीच हरकत नाही. कोळी, भंडारी, आगरी हे मुळ मुंबईचे मूळ रहिवासी. अगदी पोर्तुगीजांकडून हे सात बेटांचं शहर इंग्रजांकडे कसं आलं? यापासून संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापर्यंत या माझ्या मुंबईचा इतिहास रंजक आणि हेवा वाटावा असाच आहे. मुळात 105 हुतात्मांच्या बलिदानानंतर हे शहर महाराष्ट्राला मिळालंय. सेनापती बापट, श्रीपाद अमृत डांगे, प्रल्हाद केशव अत्रे, प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे, शाहीर अमर शेख, एस. एम. जोशी यांनी केलेल्या या लढ्याच्या नेतृत्वातून संयुक्त महाराष्ट्र घडला. अगदी भारतीय रिझर्व्ह बँकेचे पहिले गवर्नर सी. डी. देशमुख यांनी दिलेला राजीनामा याच लढ्याचं महत्त्व सांगून जातो. काँग्रेसच्या विचारधारेवर चालणाऱ्या अत्रेंनी काढलेल्या नवयुगमधून या लढ्याचं गांभीर्य दिसून येतं. असो. हा झाला मुंबईचा इतिहास.

पण, वर्तमानात देखील हे शहर कायम जगाच्या केंद्रस्थानी राहिलंय. या शहराची सुरक्षा ज्यांच्या हातात आहे त्या मुंबई पोलिसांची कामगिरी देखील तितकीच कौतुकास्पद. थोडं-फार कळायला लागल्यावर मुंबईच्या सुरक्षेबद्दल कायम अप्रुप वाटायचं. सुरक्षा काय असते याचं उत्तर हवं असेल तर नाईट शिफ्ट किंवा अगदी उशिरा घरी येणाऱ्या माझ्या माता - भगिनीला, मित्र-मैत्रिण कुटुंबासह नाईट आऊटचा प्लॅन करणाऱ्या प्रत्येक मुंबईकरांना विचारा. एवढंच कशाला रात्री उशिरा पबमधून बाहेर पडत सारं काही ओंगळवाणं दर्शन घडवत,दारूच्या नशेत ए पांडू म्हणून देखील हाक मारल्यानंतर आता नीट जा, उद्या बघतो असं हसत उत्तर देणारा कदाचित मुंबई पोलीस हा एकमेव असावा.

प्रसंग कोणताही असो दिवस - रात्र तत्परतेनं धावून येणारा मुंबई पोलिस प्रत्येकांना आपल्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर'चा विश्वास देतो. काळ, वेळ, ठिकाण काहीही आणि कोणतीही असो प्रत्येक जण जीवाची मुंबई याच मुंबई पोलिसांच्या जीवावर करतो. अगदी साधं उदाहरण घ्यायचं झालं तर, मुंबई पोलिसांवर विश्वास नाही, शहर असुरक्षित असल्याचं विधान असो किंवा मुंबई पाक व्याप्त काश्मीर झाल्यासारखं बाष्कळ विधान असो हे सारं केल्यानंतर देखील याच मुंबई पोलिसांची सुरक्षा असते. 2008साली झालेला दहशतवादी हल्ल्यावेळी प्रत्येकाला आपला बाप आठवला होता. पण, बापाच्या रूपानं आणि याच सुरक्षित हातानं प्रत्येकाला वाचवलं.

त्यासाठी काय-काय गमावलं हे शहाण्याला सांगावे न लागे. राजकीय नेत्यापासून सामान्य माणसापर्यंत प्रत्येकाला मुंबई पोलिसांचा मोठा आधार. सद्यस्थितीत मुंबईत वास्तव्याला नसलो तरी हे सारं पाहिलंय आणि अनुभवलंय. त्यामुळं मुंबई आणि मुंबई पोलिसांबद्दल मनात कायम आपुलकीच राहिलंय. ज्या आईनं जन्म दिला, मायेचा पदर धरायला दिला. ज्या बापाच्या जोरावर राडा केला. त्या आई-बापाला तुम्ही माझ्यासाठी काय केलं? हा प्रश्न विचारला तर यासारखा नालायकपणा आणि कृतघ्नपणा तो काय? होय, आज हीच मुंबई आणि मुंबई पोलीस प्रत्येक मुंबईकरासाठी आई अन् बाप हाय. त्यामुळं या माय-बापाला बोलताना किमान दहावेळा विचार करावा. ही मुंबई आमच्या बाप-जाद्यांची आहे, होती आणि राहिल!

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Bogus Voter : कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
BMC Exit Poll : मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
BMC Exit Poll : ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
Team India : टीम इंडियाला आणखी एक धक्का,तिलक वर्मानंतर वॉशिंग्टन सुंदर न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20 मालिकेतून बाहेर, T20 वर्ल्ड कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह
टीम इंडियाला धक्का,तिलक वर्मानंतर आणखी एक खेळाडू न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20 मालिकेतून बाहेर
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Voting And Fighting : व्होटिंग आणि राजकीय फायटींग, अनेक वॉर्डात बाचाबाची प्रसंग
Special Report Orange Guard :ठाकरे बंधू दक्ष,भगवा गार्डचं लक्ष,मतदान केंद्रावर पोलिसांबरोबर बाचाबाची
BMC Election Exit Poll : मुंबईत भाजप आणि शिवसेनेला 138 जागा मिळणार- एक्झिट पोलचा अंदाज
Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Akola Voting : अकोल्यात बुरखाधारी महिलांची तपासणी न करता सोडलं जातंय

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Bogus Voter : कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
BMC Exit Poll : मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
BMC Exit Poll : ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
Team India : टीम इंडियाला आणखी एक धक्का,तिलक वर्मानंतर वॉशिंग्टन सुंदर न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20 मालिकेतून बाहेर, T20 वर्ल्ड कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह
टीम इंडियाला धक्का,तिलक वर्मानंतर आणखी एक खेळाडू न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20 मालिकेतून बाहेर
Pune Exit Poll: पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
Shankar Jagtap : शंकर जगतापांचा अश्विनी जगतापांवर पलट'वार'! गृहकलहाने पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ
शंकर जगतापांचा अश्विनी जगतापांवर पलट'वार'! गृहकलहाने पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
Embed widget